Based on the true story of Anandibai Joshi, India's first woman doctor, this novel depicts the incredibly constricted world of the Brahmin orthodoxy at that time. A powerful novel on heart-felt issues, it also records the bitter and intense debates on the condition of women, the role of education, and the need for social reform, which are still very alive today.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी व त्यांच्यापेक्षा वीस वर्ष मोठे असणारे त्यांचे पती यांच्या जीवनावरील कादंबरी म्हणजे 'आनंदीगोपाळ'. मिस्किल, व्रात्य, खोडकर पण काहिसे विक्षिप्त असे वादळी व्यक्तीमत्व असलेले गोपाळराव जोशी. माणसे खुप प्रकारची असतात पण गोपाळराव खरोखरच लोकविलक्षण होते. लेखकाच्या भाषेत ते आकाशातल्या ढगाप्रमाणे होते. त्याचे आकार सारखे बदलत असत.. आतां एक बोलतील, उद्यां दुसराच हट्ट धरतील, परवा तिसर्या गोष्टीचा त्रागा करतील , असें सारें होते. बोलकी चळवळ त्यांना मान्य नव्हती.ते कृतीचे भोक्ते होते. आपली दुसरी बायको आनंदीबाई हिने खुप शिकून जग गाजवावे या कल्पनेने झपाटलेले होते. याविरूद्ध असलेल्या आनंदीबाई एक विलक्षण व्यक्तिमत्व होत्या. सातासमुद्रापार एकट्याने प्रवास करुन, भरपुर शारीरक व मानसिक हालअपेक्षा सहन करुन डॉक्टरकीची पदवी प्राप्त केलेल्या पण परक्या देशात जाऊन सुद्धा स्वत:च्या चालीरीती व परंपरा याबाबतीत तडजोड न करणार्या आनंदीबाई यांची कथा या पुस्तकात ईतक्या सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. अठराशेचा काळ , तेव्हाच्या कर्मठ चालीरीती, ब्राह्मणी संस्कृती या गोष्टी ओघानेच आपल्या समोर येतात. विशेषत: लेखकाची निवेदनशैली ईतकी ऊत्कृष्ट आहे की सर्व प्रसंग वाचताना अक्षरश: डोळ्यासमोर ऊभे रहातात. आवर्जु वाचावे असे पुस्तक.