डॉ. मीना प्रभु म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. जसं आनंदी स्मित त्यांच्या मुखावर सतत विलसत असतं तसं त्यांचं लेखन कागदावर फुलत असतं. सभोवतीचं जग त्या आपल्या डोळ्यांनी निरखीत असतात आणि कागदावर उमटतो गद्यातील स्वभावोक्ती अलंकार, आपल्या प्रभावी शैलीत त्यांनी सहारा वाळवंटासारखे रुक्ष प्रदेशसुद्धा ओअॅसिस बनवून टाकले आहेत. त्यांची पुस्तकं केवळ प्रवासवर्णनं नसतात तर कधी बोटाला धरून तर कधी मैत्रीचा हात खांद्यावर ठेवून त्या आपल्याला बरोबर घेऊन जातात.
सौंदर्याचा वेध घेत घेत त्यांची लेखणी चालत असते. त्या नावाप्रमाणे साक्षात शब्द-प्रभू आहेत. त्यांच्या लेखनात कुरुपतेला वाव नाही. नचातुर्यार्थ कलाकामिनीङ हा ज्ञानेश्वरांचा शब्द त्यांचं लिखाण वाचणाऱ्या रसिकांना नक्की आठवेल असे मला वाटते. निसर्गप्रेमी बालकवी ठोमरे जर आज असते तर त्यांच्या फुलराणीनं मोगऱ्याची फुलं घेऊनच मीनाताईंचे स्वागत केले असते. आजपर्यंत जवळजवळ चार हजार पानं वाचकांपुढे ठेवून त्यांनी मराठी माणसाला जगाची सुंदर ओळख करून दिली आहे. नव्हे, मराठी साहित्यात नवे दालन खोलून ते एकहाती भरघोस केले आहे. मराठीच काय इंग्रजी वा अन्य कुठल्याही भाषेत, कोणत्याही लेखकानं इतकं प्रचंड काम प्रवासवर्णन प्रकारात केल्याचे माझ्या तरी माहितीत नाही!
Meena Prabhu is an acclaimed author of Marathi travelogues. She lives in London.
पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा' एवढं लक्षात ठेवायचं. माझं सुख दुसऱ्याच्या दुःखावर उभं नाही ना, माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला, माझ्या कुटुंबीयांना, माझ्या शेजाऱ्यांना, माझ्या मित्रमंडळींना वा समाजाला त्रास तर नाही ना पोहोचत? हे पाहिलं की झालं. दुसर कोणतंही बंधन माझ्यावर नाही. हे बंधनही मी माझ्यावर घालून घेतलेलं. ते जाचण्याचा किंवा मोडण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे मला कुठलं पुस्तक समोर लागत नाही. " “एखादं तत्वज्ञान पुस्तकात कोंडलं की ते बंदिस्त होतं. त्यात एक शब्द घालता येत नाही की काढता येत नाही. उलट काळाप्रमाणे बदलून योग्य तसं वागायचा मी प्रयत्न करते.' आता आ वासून बघण्याची पाळी सय्यदची होती. 'अशा प्रकारचं मोकळं जगणं असतं ?" "निदान माझं तरी आहे." मी हसत म्हणाले. गला होता.
Superb travelog...her writing is so rich and captive, it feels she has held my hand and shown me all these places in person...a must before setting off to the Egypt
● पुस्तक - इजिप्तायन ● लेखक – डॉ. मीना प्रभू ● साहित्यप्रकार – माहितीपर, प्रवास वर्णन, पर्यटन ● पृष्ठसंख्या – ३८३ ● प्रकाशक – पुरंदरे प्रकाशन ● आवृत्ती - प्रथम आवृत्ती - डिसेंबर १९८१ ● पुस्तक परिचय - विक्रम चौधरी ● मुल्यांकन – ⭐⭐⭐⭐
इजिप्त.. पिरॅमिडस तसेच भूमिगत कबरी; अश्या स्मशानांसाठी व मृतांच्या निवासासाठी प्रसिद्ध असणारा एकमेव देश.. इजिप्तच्या भूमीने ५००० वर्षांपासून अनेक गुपित आपल्या उदरात सामावून घेतलेली आहेत आणि त्यावर निश्चल वाळूचे अंथरून घातलेलं आहे.
मीना प्रभू यांनी जगभर फिरून मराठी वाचकांसाठी अनेक प्रवासवर्णने लिहिली आहेत. मीनाताई वाचकाला आपल्या हाताशी धरून अलगदपणे नवीन प्रांतात घेऊन जातात आणि त्या प्रांताच्या भौगोलिक, राजकीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घरबसल्या घडवून आणतात. इजिप्तायन मध्ये लेखिकेने अगदी तीन महिन्यांत, जॉर्डन, इस्राईल व इजिप्त या तीन देशांत केलेला प्रवास मांडला आहे.
हा सगळा प्रवास एकट्याने करत असताना आलेल्या सुखद, रोमांचकारी तसेच काही प्रमाणात साहसिक अनुभवांनी हे प्रवासवर्णन समृद्ध झाले आहे..
मराठी साहित्याला प्रवासवर्णनांची समृद्ध पार्श्वभूमी लाभली आहे. पुलंच्या अपूर्वाई, जावे त्यांच्या वंश्या, पूर्वरंग ई. पुस्तकांनी तसेच रा. भि. जोशी, वसंत बापट तसेच गंगाधर गाडगीळ यांनी देखील प्रवासवर्णनात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मीना प्रभू यांनी हाच वारसा पुढे नेत अनेक प्रवासवर्णने लिहिली आहेत. माझे लंडन या पुस्तकंपासून त्यांनी सुरवात केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या खंडात त्यांनी केलेल्या भ्रमंतीवर अशी १४ प्रवासवर्णन लिहिली आहेत.
मीना प्रभू यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या जिथे प्रवास करतात तिथल्या ठिकाणांची कालातीत वैशिष्ट्ये, आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणाऱ्या चालीरीती, खाद्यसंस्कृती तसेच भौगोलिक परिस्थिती अधोरेखित करून दाखवण्याची त्यांची शैली..
इजिप्तायन मध्ये लंडनमधील ‛इजिप्शियन एम्बसी’ पासून सुरू होणारा प्रवास गाझा येथील ‛पिरॅमिड्स’ च्या भव्यतेवर येऊन संपतो. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर वाचकांना अनुभवता येईल अशा शैलीत मीनाताई त्यांचे अनुभव मांडतात. लेखिकेने एखाद्या स्थळाला भेट देण्यापूर्वी केलेली तयारी, त्या स्थळाविषयीचे वेगवेगळे संदर्भ, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, विविध लेखकांनी त्या स्थळाला दिलेल्या उपमा ई. माहिती रंजक आणि विस्मयकारक आहे. लेखिकेने दिलेल्या तपशीलातून प्रत्येक पान उलटताना आपल्या ज्ञानात भर पडत जाते. “सुवेझ कालव्याच्या शिल्पकार लसेप्स यानेच पनामा कालवा बांधला”, अशी बऱ्याचदा दुर्लक्षित अशी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याची लेखिकेची धडपड सतत दिसून येते..
प्रवास करत असलेल्या प्रत्येक देशातल्या भाषेचा मराठी भाषेवर असलेला प्रभाव, त्या त्या भाषेतून आलेले शब्द मीनाताईंनी अधोरेखित केले आहेत. जॉर्डन मधून प्रवास करताना त्यांना आलेल्या अनुभवावरून त्या सांगतात, “ मराठीत फार्सी, अरबी आणि उर्दू शब्दांची रेलचेल आहे. आपल्या रोजच्या वापरातले ‘दुकान’, ‘साबुन’, ‘हवा’, ‘पंखा’, ‘मस्करी’ असे पुष्कळ शब्द कानी येत होते. ‘अजनबी’, ‘मस्जिद’ मराठी नसले तरी असलेले.”
लेखिकेला हे करत असताना मराठी साहित्यातील प्रवासवर्णांची आठवण येते. त्यांनी पुलंच्या ‛अपूर्वाई’ तसेच अत्रे यांच्या ‛गावगाडा’ पुस्तकातील नोंदी ही आवर्जून दाखवल्या आहेत. साहित्यातील संदर्भ देत असताना हेरोडोटस या प्राचीन ग्रीक इतिहासकाचे “नाईल ही निसर्गाची इजिप्तला देणगी असली तरी इजिप्त ही नाईलची जगाला देणगी आहे.” असे जागतिक साहित्यातली संदर्भ दयायला पण त्या विसरल्या नाहीत.
प्रवासवर्णन लिहीत असताना आणि वाचकांना त्या प्रदेशाची सफर घडवून आणताना तिथली वैशिष्ट्ये, संस्कृती, वास्तुशैली ई. लेखकाला नेमकी पकडावी लागतात आणि वाचकांना त्यांच्या जगाशी जोडून दाखवावी लागतात. हे साध्य झाले तर वाचकांसमोर प्रत्येक स्थळ, त्याचे कानेकोपरे उजळतात आणि ते स्वतः त्या स्थळी असल्याची जाणीव करून देतात. मीना प्रभू यांनी हे सगळं इजिप्तायन मध्ये सहज साध्य केले आहे.
जागतिक पटलावर प्रवास करताना एक मराठी माणूस म्हणून मराठी माणसाला जे आणि जस भावेल अश्या सगळ्या संदर्भांची या पुस्तकात रेलचेल आहे.. हे पुस्तक वाचायला घेताना मी समोर जगाचा नकाशा ठेऊन वाचलंय. त्यामुळे लेखिकेचा प्रवास आलेख सहजपणे मलाही गिरवता आला. सध्या सुरू असलेल्या इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाची थोडी न फार पार्श्वभूमी ही इथे वाचावयास मिळते..
मराठीत स्थळवर्णनांचा झेंडा पाच खंडांत नेऊन रोवणाऱ्या मीना प्रभू यांची ही इजिप्त, जॉर्डन आणि इस्राईल ची उत्कंठावर्धक सफर नक्कीच वाचा..
एकटं फिरण्यातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे एकट्याने जेवणं. वैताग नुसता. जिथं तोंडी लावायला गप्पा नाहीत तर कसलं भोजन? सार्वजनिक उपाहारगृहात एकटंच बसून खाताना कुणीही केविलवाणं दिसतं. जेवणारा अन्नछत्रात फुकट जेवल्यासारखा खाली मुंडी घालून खात असतो. वर पाहिलंच तर बाजूच्यांच्या नजरा चुकवतो. बाकीचे लोक आपल्या जेवणावर, आपण किती चरतो त्यावर नजर ठेवून आहेतसं वाटतं. निदान मलातरी तसं वाटतं. मग आपलंही लक्ष आपल्याकडे जातं. आपण फार खातो की काय, काटे चमचे चुकताहेत का, तोंडाची मचमच तर फार होत नाही ना, असले प्रश्न छळायला लागतात आणि खाणंच नकोसं वाटून कधी एकदा तिथून निघतोसं होतं. त्यातून या चौतारांकित हॉटेलचं भोजनालय अत्यंत रुक्ष होतं. केवढंतरी मो���ं. दोनशे लोक संहज बसायची सोय. पण रात्री आठाच्या सुमारालाही तिथं मी एकटी. सगळे वेटर्स आणि मॅनेजर माझ्या भोवती घोटाळत होते. प्राणिसंग्रहालयात वाघसिंह खात असताना आपण पाहावेत तसे. जेवणही अगदी भिकार. उत्तम अरबी जेवणाची चव मी वाफाकडे घेतली होती. तितक्या तोलाचं नको पण या जेवणाला काहीतरी चव असावी. भारतासारखी चटकमटक चवींची चंगळ जगात कुठेही नाही. खाऱ्या काय, गोड्या काय, सामिष वा निरामिष, खाण्याच्या इतक्या परी दुसरीकडे नाहीत. जेवणाचे, मधल्या वेळच्या खाण्याचे, उपवासाचे, फराळाचे, सहलींचे, ओले वा कोरडे किती किती प्रकार! उपवासाच्या पदार्थांची नुसती नावं ऐकून वजन वाढावं. नावं लिहिता लिहिता तोंडाला पाणी फोडणारे पदार्थ. त्यांत फोडणी हा खास स्वादवर्धी खमंग प्रकार म्हणजे भारतीय पाकशास्त्राच्या मर्मबंधातली ठेव! पृथ्वीवरच्या दुसऱ्या कुठल्याही पाककलेला ही देणगी नाही. पदार्थ शिजवताना सुरवातीला किंवा शेवटी हा सणसणीत साज चढवायचा. जिभेवर अमृताचा शिडकावा करणारा पण त्या आधी नाकावाटे आत जाऊन खवैयाचा कब्जा घेणारा, आगामी मेजवानीची चाहूल देणारा जिनं शोधला त्या अन्नपूर्णेला शतदा वंदन. शिवाय घरोघरी त्याच पदार्थांची चव वेगळी. एकाच प्रकारची बटाट्याची भाजी चार घरी अगदी वेगळी लागेल. हे रुचिवैविध्य खरोखर दुर्लभ. त्याला नाकारण्याचं पाप कधी घडू नये. - मीना प्रभु ("इजिप्तायन" या पुस्तकातून) वरील उतारा मीना प्रभु यांच्या "इजिप्तायन" या पुस्तकातून घेतला आहे. इजिप्तला जाण्याआधी त्यांनी इस्राएल आणि जॉर्डन असे दोन देश पाहिले. त्यापैकी वरील उतारा हा जॉर्डन देशातील अम्मान येथील वर्णन करतांना त्यांनी लिहिलेला आहे. वरील तिन्ही देशांत लेखिका दक्षिण अमेरिकेप्रमाणे पूर्णपणे एकट्यानेच फिरल्या. अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचकाला बांधून ठेवणाऱ्या उच्च दर्जाच्या साहित्याने नटलेल्या त्यांच्या प्रवासवर्णन पुस्तकांनी मराठी साहित्यात अत्यंत मोलाची भर टाकली आहे. वाचकाला हातात हात धरून त्या प्रत्येक देश फिरवून आणतात असे त्यांच्या प्रत्येक वाचकाचे म्हणणे आहे.
This book is typ. Meena Prabhu book about her travel in Israel, Jordan & Egypt.
The thing I loved her about her travel is the way she tries to travels the length & breadth of country, mingles with locals, learn about their cultures tries to relate with Indian cultures.
The Jordan is the best part of her book since it is very little explored by global travelers. Learning about it is very good.
Though the book is not as great as her Gatha Irani & Turknama, it is good book to read.
It’s very good book. It’s not typical boring travel log but enriched with history, culture and loads of interesting things during her visit there. Beautifully written.