गिरीश कुबेर यांची 'हा तेल नावाचा इतिहास आहे' आणि 'एका तेलियाने' हि दोन्ही पुस्तके तेल या ‘ज्वलंत’ विषयावर आहेत. पहिल्या पुस्तकात तेलाचा संपूर्ण इतिहास आहे तर दुसरे पुस्तक शेख अहमद झाकी यामानी या तेलीयाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिण्यात आले आहे.
सौदी अरेबिया नामक वाळवंटात जगातले सर्वात मोठे तेलसाठे सापडतात आणि कधीहि न आटणार्या संपत्तीचे दरवाजे उघडे होतात. या सर्व खजिन्यावर झाकी यामानी सौदीचे राजे फैझल यांच्या पाठिंब्याने नियंत्रण ठेवतात. तेलदराचे राजकारण, अमेरिकेची दादागिरी, त्याला यामानींनी शांतपणे दिलेले प्रत्युत्तर, लिबिया सारख्या उपद्रवी देशासकट सर्व तेल उत्पादक देशांना एकत्र आणण्याची धडपड, ओपेक ची स्थापना, कार्लोस द जॅकल या दहशतवाद्याकडून यामानींचे अपहरण या सारख्या अनेक सुरम्य आणि सुरस कहाण्या यात आहेत.
या पुस्तकातून तेलाचा इतिहास जसा कळतो तसेच राजे फैझल आणि झाकी यामानी या दोघांचे वैयक्तिक गुणही डोळ्यासमोर उभे राहतात. घटनांचा आणि व्यक्तींचा इतिहास समजून घेण्याचा हा नक्कीच सुंदर मार्ग आहे.
आपले पुस्तक"एका तेलीयाने "वाचुन संपविले. येवढी प्रचंड माहिती तीही परक्या देशाची ,अनेक प्रसंग तेथील सामाजिक ,राजकीय ,भौगोलिक ,परिस्तिथी ,सत्तांतरे ,आंतरराष्ट्रीय करार ,ह्या सर्वांचा तेलउत्पादक देशांवर होणारा परिणाम ह्या सर्वांचा जगावर होणारा परिणाम ,ह्याचा केवढा मोठा आभ्यास आपण केला आहे ह्याची कल्पना आपला हा ग्रंथ वाचून येते . खरतर आपले हे पुस्तक या अगोदर का वाचले नाही असा प्रश्न मला पडला आहे हे पुस्तक भारतातल्या सर्व विद्यापिठात अभ्यासक्रमात , अर्थशास्त्र ,जगाचेअर्थशास्त्र ,म्हणून ठेवण्यास पाहिजे . आपण कष्टाने साठविलेली हि "कुबेराची धन " खरोखरच अत्यंत मौल्यवान असून ती आपण मांडलीही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने . मला आठवते ज्यावेळी जगात "आईलक्राईसेंस "चालू होते त्यावेळी श्री चंद्रशेखर पंत प्रधान असतांना त्यांच्या '' तेलसम्राटासी "असलेल्या व्यैयक्तिक मैत्रीतून तेलाचे जहाज भारता साठी खास आयात करण्यात आले होते आपण हे पुस्तक ५/६ वर्षा पूर्वी लिहिले आहे ,त्यानंतरचा ह्या इतिहासात अनेक बदल नक्कीच घडले असतील ,तो बदल हि वाचावयास आवडेल
Awesome book if you want to understand Oil Politics. Takes you from 1930 to twenty first century. It puts lot of efforts so that readers understand US, Russia and Middle East love-hate triangle. Girish Kuber Sir, Hats off to you!
This book is about Sheikh Ahmad Zaki Yamani, Saudi Arabia's former petroleum minister...who became a global celebrity after he orchestrated the 1973 oil embargo that shifted energy market power decisively in favour of the Middle East also How his decisions influenced Saudi Arabia's and West Asia's fate.Yamani was best known for leading OPEC to erode the position of Big Oil — the Anglo-American dominated Seven Sisters petroleum corporations. Yet arguably more enduring was his strategic and incremental takeover of ARAMACO in the 1970s...In fact, he developed the kingdom's anti-slavery law. Yamani was one of the royal family's few commoners who worked for royalty. His title of "sheikh" was completely honorific..
“The stone age did not end because the world ran out of stone, and the oil age will end long before the world runs out of oil.”- Sheikh Ahmad Zaki Yamani
---
I found this book to be quite informative, and it's encouraging to see that there are works in Marathi literature on a myriad of subjects. To be honest, before reading this book, I knew very little about oil, Saudi Arabia, West Asia, world politics, or why the United States wants so much oil... If you want to understand why oil is so important and how it has influenced world politics, read this book...
**********************************************
"एका तेलियाने"
हे पुस्तक सौदी अरेबियाचे माजी पेट्रोलियम मंत्री शेख अहमद झकी यामानी यांच्याबद्दल आहे...जे 1973 च्या तेल बंदीनंतर जागतिक कीर्ती बनले ज्याने ऊर्जा बाजाराची शक्ती मध्यपूर्वेच्या बाजूने निर्णायकपणे बदलली.. त्यांच्या निर्णयांचा पश्चिम आशिया सौदी अरेबियावर कसा प्रभाव पडला..यामानी हे बिग ऑइल - अँग्लो-अमेरिकन वर्चस्व असलेल्या सेव्हन सिस्टर्स पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे स्थान नष्ट करण्यासाठी ओपेकचे नेतृत्व करण्यासाठी प्रसिद्ध होते. तरीही 1970 च्या दशकात त्यांनी अरामकोचे धोरणात्मक आणि वाढीव टेकओव्हर केले हे वादातीतपणे अधिक टिकाऊ होते...तसेच त्याने राज्याचा गुलामगिरी विरोधी कायदा विकसित केला. यामानी हे राजघराण्यातील काही सामान्य लोकांपैकी एक होते ज्यांनी राजेशाहीसाठी काम केले. त्यांची "शेख" ही पदवी पूर्णपणे सन्माननीय होती...
---
मला हे पुस्तक खूप माहितीपूर्ण वाटले, आणि मराठी साहित्यात असंख्य विषयांवर कामे आहेत हे पाहून मला आनंद वाटल... खरे सांगायचे तर, हे पुस्तक वाचण्यापूर्वी मला तेल, सौदी अरेबिया, पश्चिम आशिया, जागतिक राजकारण किंवा अमेरिकेला इतके तेल का हवे असते याबद्दल फार कमी माहिती होती... तेल इतके महत्त्वाचे का आहे आणि त्याचा जागतिक राजकारणावर कसा प्रभाव पडला आहे हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचा...
गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे!' या पुस्तकातून संपूर्ण तेल क्षेत्राच्या उगमापासून ते आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंतचा प्रवास समजतो. साहजिकच तेल हे आंतरराष्ट्रीय राजकारणातलं प्रमुख अस्त्र बनून जात.
अख्या जगाची तेलाची तहान भागवण्याची क्षमता सौदी अरेबियाची होती आणि आहे परंतु या क्षेत्रावर अमेरिका आणि पाश्चत्य देशांची असणारी दादागिरी सौदीसकट अन्य तेलउत्पादक देशांची दुखरी बाजू होती. या सर्व तेल उत्पादक देशांना बरोबर घेऊन त्यांची 'OPEC' ही संघटना स्थापन करण्यामागे झाकी यामानी यांचा सिंहाचा वाट होता. कालांतराने याच संघटनेने आणि झाकी यामानी यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेच्या आपल्या बोटावर नाचवले .
अशा झाकी यामानी (सौदीचे तेलमंत्री) यांच मुत्सद्दी व्यक्तिचरित्र म्हणजे हे पुस्तक आहे. यामध्ये झाकी यामानी आणि राजे फैझल यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू भावतात.
'Eka Teliyane' revolves around OPEC, Saudi peninsula kingdoms', USA and the former Saudi oil minister Mr. Yamani. The book is well researched and well narrated. It starts with oil's history, from Venezuela, Iran, establishment of Saudi kingdom, exploitation by USA oil companies of oil producing countries, their gradual realisation, formation of OPEC. The book mainly revolves around oil shocks in 1970s, the relation between israel- arab wars and the oil crisis and role of Yamani in all this. I liked the book for its keen insights into the working of american government's foreign policies, their psyche, and their attitude towards west asia (middle east for western people). The remarks are true and on point. However the book doesnt take same critical view with regards to Yamani. And the book, hence comes off as a fan boys love letter to his idol, i.e. Yamani.
शीतयुद्धाच्या काळात अमेरिका या बलाढ्य महासत्तेला आव्हान देणारं दूरदूरपर्यंत कोणीच नव्हतं. त्यामानाने मागास असलेल्या धर्मभोळ्या अरबांना आपल्याजवळ असलेल्या अस्त्राची कल्पना नव्हती. अशा वातावरणात शेख यामानी यांनी कशी पाश्चिमात्य जगाला त्यांच्याच भाषेत धुळ चारली याची चित्तवेधक कहाणी म्हणजे ‘एका तेलियाने’! भारतीय वाचकांचे तेल विषयाबाबत असलेले अज्ञान दूर करण्यासाठी लिहिल्या गेलेले हे पुस्तक वाचणे म्हणजे एक मोठी भर टाकणारा अनुभव आहे.
खनिज तेलाच्या जोरावर अखंड जगाला आत्ता पर्यंत कसे वेठीस धरले गेले आहे याचा इतिवृतांत. You will realise that ultimately what matters is bargaining power - in international relations and in daily life too.
फक्त रशिया बद्दल चा पार्ट मस्त आहे पण त्यातच भारतातील मोदी द्वेष घुसवला आहे. केवळ कुबेराला वाटते म्हणून विनाकारण चांगल्या पुस्तकाची वाट लावलीय. किती हा मोदी द्वेष?
गिरीश कुबेर यांच्या बद्दल काय बोलायचं ...त्यांची लिखाण शैली पुढचं पान पलटवयला भाग पडते.....आणि तेलाचा आणि अरब देश आणि तिथल्या राजांचा रंजक असा इतिहास अगदी निरपेक्ष पद्धतीने मांडला आहे..
What a book! And what a was man he was ! Mr.Yamani - oil minister of Saudi Arabia ..His coordination with RAJE FAISAL on oil , business , strategy was so good .. inspiring book 💖
Its one of the best book i hve read n liked....Reading about Dr. Zaki Yamani is just a great thing....his life, his experiences, his tenture as oil minister.....amazing history of oil nd its dirty politics.....
It's one of the biographies I have ever liked. It's written exceptionally focusing on the Saudi kingdom, its kings, and their well-to-do-off Oil ministers. The author has cited his views on the then American politics, oil rates, OPEC, OAPEC and many other things. Reading about Dr. Zaki Yamani is just a great thing. His life, his experiences, his tenure as oil minister and a game changer with his king Faizal. The book is a must read for history, politics lover.