Jump to ratings and reviews

पूर्वरंग [Purvarang]

A travelogue of South East Asia

287 pages, Paperback

First published January 1, 1963

Loading...
Loading...

About the author

P.L. Deshpande

91 books1,078 followers
पुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.


P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra

The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more

Lovingly called 'Pula' by all the fans.

Ratings & Reviews

What do you think?

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
568 (52%)
4 stars
318 (29%)
3 stars
150 (13%)
2 stars
30 (2%)
1 star
18 (1%)
Displaying 1 - 23 of 23 reviews
Profile Image for Vikram Choudhari.
59 reviews14 followers
February 22, 2024
● पुस्तक - पूर्वरंग
● लेखक – पु. ल. देशपांडे
● साहित्यप्रकार – प्रवासवर्णन
● पृष्ठसंख्या – २४५
● प्रकाशक – श्रीविद्या प्रकाशन
● आवृत्ती - ३०वी । प्रथम आवृत्ती - १९६३
● पुस्तक परिचय - विक्रम चौधरी

पु. ल. देशपांडे.. महाराष्ट्राला पडलेलं एक मार्मिक, निरागस स्वप्न.. पुल म्हंटलं की आपल्याला चितळे मास्तर आठवतात, नारायण तसेच नामु परीट आठवतो आणि आठवतात नाच रे मोरा चे बोल आणि संगीत.. आपल्यातील बहुसंख्य वाचकांना पुलंची फक्त विनोदी लेखक ही एकच बाजू माहीत असते. पण पुलंनी चतुरस्त्र लिखाण केलेलं आहे. 

पूर्वरंग हे प्रवासवर्णन त्यातील एक अविष्कार.. हे पुस्तक, भारताला आणि पूर्वेकडच्या देशांना सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या जोडणारा पूल आहे.. पुलंनी अतिपूर्वेकडच्या देशांची सफर केली आणि ते करत असताना प्रत्येक देशातील कला, संस्कृती तसेच भेटलेली माणसं यांचं पूर्वेच्या कॅनव्हास वर त्यांनी रेखाटलेलं चित्र म्हणजे पूर्वरंग..

प्रवासवर्णन लिहिताना वाचकाला गाईड न करता त्याची उत्कंठा वाढवत त्यांना शब्दांच्या आणि अनुभवाच्या नितळ तळ्याकाठी नेऊन सोडण्याची पुलंची शैली आनंद देऊन जाते. हे पुस्तक लिहिताना प्रवास केलेल्या जागेसोबतच तिथल्या माणसांना, खाद्यसंस्कृती तसेच तिथे रुजलेल्या, वाढलेल्या कलेला पुलंनी सतत अधोरेखित केले आहे.. १९६३ मध्ये लिहिलेलं हे पुस्तक आजही कालातीत भासतं. जागा कदाचित बदलल्या असतीलही पण आपण स्वतःही भेट देऊनही, पुलंच्या समृद्ध नजरेने जे पाहिलंय ते कदाचितच पाहू शकू.. 

एखादा प्रसंग आहे तसा आपल्या लिखाणात उतरवण्याची आणि वाचकाला तो अनुभवायला लावण्याची अशी ताकद पुलंच्या लिखाणात आहे.. 
पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना पुलंचा मिश्किल विनोद मधेच डोकावतो आणि त्या क्षणांसाठी पुलंची निरीक्षण दृष्टी वाचकांना देऊन जातो.

पुलंनी आपल्या या देशाटनात सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, हॉंगकॉंग आणि जपान असा प्रवास करून प्रत्येक देशातील जीवनशैली, तेथील माणसांच्या धार्मिक व आध्यात्मिक संकल्पना, त्यांची कलासक्ती, खाद्यसंस्कृती ई. सहजपणे रेखाटले आहे.  महत्वाचे म्हणजे हे करताना त्या त्या देशातील परंपरेशी भारताचे असलेलं नातंही पुलंनी उलगडून दाखवले आहे. म्हणूनच की काय, बाली मधल्या खेड्यातल्या जत्रेत त्यांना गोव्यातील शांतादुर्गेच्या जत्रेची आठवण झाल्याखेरीज राहत नाही..

लेखकाला कालपरत्वे लेखन करावं लागतं, तर काही लेखक काळाच्या पुढे जाऊन लिखाण करतात. सामान्य वाचकांना समजेल, त्यांच्यात अभिरुची निर्माण करेल अश्या शैलीत लिहिणं आणि त्यातही हलके फुलके विनोद विणणं हे पुलंनी सहज साध्य केलंय..

पूर्वरंग चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात प्रसंगानुरूप दिलेली व्यंगचित्रे.. शि. द. फडणीस यांनी शब्दविरहित चित्रांनी ये प्रवासवर्णन सजवले आहे.. ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने प्रत्येक प्रसंगातील विसंगती टिपून अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले आहेत.. पुस्तक वाचताना ही चित्रे लगेच त्या प्रसंगाचा सार वाचकाला सांगत , वाचनाचा अनुभव समृद्ध करतात..

पुलं म्हणतात “प्रवासाला निघताना विद्वत्तापूर्ण तयारी करून निघू नये.. मनाची निगेटिव्ह कोरी असावी म्हणजे सुंदर चित्रे उमटतात..” प्रवासवर्णने किंवा इतर पुस्तके वाचताना, वाचक म्हणून आपणही मनाची निगेटिव्ह अशी कोरी ठेऊन वाचलं तर आपल्या मनावर नानारंगी अनुभवाची आणि नव्या क्षितिजांची चित्रे नक्कीच उमटतील..

अशी ही पूर्वेकडची यात्रा संपवून, अक्षरांचे धनी असलेल्या पुलंनी, वाचकांसाठी या पुस्तकाचे मावंदे घातले आहे.. ते गोड मानून घ्यावं अशी विनंती पुलंनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत केली आहे.

पुलंच्या अनुभवांनी समृद्ध झालेलं हे प्रवासवर्णन 
नक्कीच वाचा..!!

©पुस्तकायन
Profile Image for In.
160 reviews1 follower
October 25, 2017
कालातीत सुंदर लिहिण्याची हातोटी फार कमी जणांकडे असते आणि पु ल देशपांडे ह्याचं नाव त्या यादीत फार वरती येईल हे सांगायला नकोच. पूर्वरंग हे खास पुलंच्या शैलीतून आलेलं एक प्रवासवर्णन आहे. जवळजवळ २-४ महिने हॉंगकोंग, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, जपान असा छान प्रवास करून झाल्यावर (कसलं नशीब म्हणायचं) आपले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.

प्रवासवर्णन लिहिताना, ज्या जागेबद्दल आपण लिहित आहोत त्याचबरोबर, आपण ते कोणासाठी लिहित आहोत ह्याचा विचार पण आवश्यक ठरतो. एखाद्या प्रदेशाची, तिथल्या संस्कृतीची माहिती मराठीतून करून देताना चपखल उदाहरणांनी वाचकाला परिणामकारकरीत्या ओळख करून देता आली पाहिजे. पूर्वरंग मध्ये पुलंनी हे अगदी फर्मास साधलेलं आहे. पुस्तक प्रथम प्रकाशित झालं १९६३ साली. त्या काळी आजच्या इतके सहज प्रवास होत नसत, आंतरदेशीय प्रवास तर त्याहूनही कमी. साहजिकच एका वेगळ्या राष्ट्राची, तिथल्या संस्कृतीची ओळख आणि त्यातील वेगळेपणा समजून घेण्याइतका समाज मोकळा झालेला नव्हता. अशा काळात, सर्वसाधारण लोकांना समजेल, आवडेल आणि उत्कंठावर्धक वाटेल अश्या ओघवत्या शैलीत एकटे पुलच लिहू जाणे.

या अनेक राष्ट्रांच्या सफरीमध्ये पुलंना अनेक अनुभव आले, त्यातले काही सामान्य मराठी माणसाच्या मानसिकतेसाठी फार वेगळे होते, काही हृद्य तर काही विचारात पाडणारे होते. हे सर्व अनुभव पुलंनी सहज विषद केले आहेत. संगीत, कला आणि खानपान हे पुलंचे जिव्हाळ्याचे विषय. त्यामुळे ह्या सर्व ठिकाणी आलेल्या कलेच्या विविधतेबद्दल पुलं मनापासून लिहितात.

जपानी काबुकीची तुलना महाराष्ट्रातल्या संगीत नाटकांशी करताना, कमी होत चाललेले नाटकांचे प्रयोग त्यांना विषण्ण करून जातात हेही त्यांच्या लिखाणात उतरलेले आहे. प्रवासवर्णन अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिता येते. आम्ही इथे गेलो, हे पाहिले, ह्याच्या वेळा अमुक अमुक, इथे राहिलो वगैरे वगैरे. प्रवासवर्णनाची डायरी न होऊ देता त्यात आपले अनुभव टाकून त्यांची आपल्या रोजच्या आयुष्याशी तुलना करून, आणि त्या अनुभवांमुळे आपल्या मनात आलेले विचार शब्दबद्ध करून प्रवासवर्णनालाही एक खोली देता येते आणि पुलंचे पूर्वरंग म्हणजे अश्या लेखनशैलीसाठी उत्तम नमुना आहे.

१९६३ साली लिहिलेले प्रवासवर्णन आज २०१७ मध्येही तितकेच वाचनीय ठरते ते ह्याचसाठी. १९६३ सालच्या सिंगापूर आणि मलेशियाबरोबरच, १९६३ सालच्या मराठी कुटुंबाच्या दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अधिक वाचनीय झालेले आहे. अधिक लिहित नाही, वाचले नसल्यास जेंव्हा जमेल तेंव्हा जरूर वाचावे.
128 reviews10 followers
February 11, 2017
अंत:करणाला गारवा देणारे असे हे पुस्तक! हसत हसत सुरुवात करून "माणसे जोडावी आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घेत जावा" ही शिकवण देऊन जाणारे हे पुस्तक! एकदा वाचले आणि मन प्रसन्न झाले. इथून पुढेही एखाद्या संथ दुपारी मी माझा पुस्तकांच्या गठ्यातून हे पुस्तक उघडेन आणि मध्येच कुठे तरी एक दोन पाने वाचेन. ती पाने जुन्या हसऱ्या आठवणी सारखे चेहऱ्यावर समाधानाचे स्मित खुलवून जातील.
214 reviews5 followers
August 26, 2026
सुसंस्कृत मराठी चष्म्यातून पूर्व आशियाची सफर

साधारण ६५ वर्षांपूर्वी पुलंनी पूर्वेकडच्या देशांचा सहकुटुंब प्रवास केला. चांगले ३ - ४ महिने वेळ काढून भेट दिल्याने या देशांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा सर्व प्रकारचे अंतरंग अगदी खोलवर समजून घेतले आणि वाचकांसाठी नेहमीच्या विनोदी शैलीत सादर केले. त्याची परिणिती म्हणजे पूर्वरंग.
काही वाचकांना असे वाटू शकते की सहा-सात दशकांपूर्वीचे जुनेपुराणे प्रवासवर्णन वाचण्यामध्ये आता काही उपयोग आहे का? माझे त्यावर उत्तर असे राहील की केवळ पुलंच्या सदाबहार लिखाणासाठी जरी हे पुस्तक वाचायला घेतलं तरी ते पुरेसं कारण आहे. पूर्व आशियाची मागच्या शतकातील स्थिती कशी होती याबद्दलची जी माहिती मिळते त्याला बोनस समजावा :)

हे पुस्तक लिहिले तेव्हा स्वातंत्र्य मिळून खूप काही काळ लोटून गेला नव्हता. साहेबांच्या गुलामगिरीचे आपल्यावरील मानगुट अजूनही उतरलेले नाही याविषयी पुलं पदोपदी खंत व्यक्त करतात. त्याची तुलना ते परदेशातील मातृभूमी आणि मातृभाषा याविषयीच्या सर्वत्र आढळणाऱ्या स्वाभिमानाशी प्रत्येक ठिकाणी करतात.

"आपल्या देशात इंग्रजी ही नाईलाज झाला तरच बोलायची भाषा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. विलायती सफाई अंगात नसल्यामुळे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात (म्हणजे मराठी सोडून सर्व ) अशा शहरात मराठी माणसाचा दर्जा किती खालचा मानला जात असे याचे शल्य माझ्यासारख्या जातीच्या मुंबईवाल्यालाच ठाऊक."

अनेक मराठी वक्त्यांच्या मनातील बाब पुलं सांगून जातात,

"मला इंग्रजीत भाषण करायला फारसे आवडत नाही. मुख्य म्हणजे मला नक्की जे काही म्हणायचे असते ते इंग्रजीतून मांडता येत नाही.
त्या भाषेतल्या वाङ्मयावर माझे अपरंपार प्रेम आहे.
त्या भाषेच्या सामर्थ्यावर आहे.
चपखलपणावर आहे.
पण तिचे माझ्यावर नाहीये. मयिसा विरक्ता" (She is indifferent to me)

" मलाय काय इंडोनेशिया काय सयाम काय किंवा जपान काय; हा सारा आशिया हसरा आहे. कम्युनिस्ट लोक त्यांची ते निरागस हास्य ओरबाडून काढून त्यांना लाल भडक बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. परदेशात हिंडताना या अनोळखी चेहऱ्यावरील हास्याने केवढा धीर येतो हे परदेशी हिंडल्याशिवाय नाही कळणार. हास्याची भाषा माणसामाणसाचे नाते जमवून जाते. आम्ही हा मख्खपणा इंग्रजांकडून घेतला की काय कळत नाही! ते एक या फुकटच्या स्मिताला महाग आणि दुसरे आम्ही!"


पुलंच लिखाण मंत्रमुग्ध का करतं? पुढचं उदाहरण पुरेसं राहील. शनिवारी रस्त्यावर ऑफिस सुटल्यानंतरची गर्दी होती ही साधी सोपी माहिती देखील पुलं अशा शैलीत देतात की वाचकाला थांबून त्या कल्पनेला दाद द्यावी वाटते.

"शनिवारची दुपार होती.
कचेऱ्या फुटल्या होत्या.
रस्तोरस्ती कारकून सांडले होते."


पुलंचा पहिला थांबा कोलंबोला असतो. त्यानंतर मलेशिया आणि सिंगापूर. एवढ्या दशकांपूर्वी देखील सिंगापूरचे जागतिक व्यापारात महत्त्वाचे स्थान होते हे वाचून विशेष वाटले.

पुलंमधला दर्दी रसिक पदोपदी आपले अस्तित्व दाखवतो. ते लिहितात,

" सृष्टी सौंदर्य हे दाखवून दाखवता येते थोडेच! विशेषतः निसर्गाची शोभा ही अचानक धनलाभासारखी प्राप्त झाली पाहिजे. सूर्योदय पाहण्यासाठी मुद्दाम पहाटे उठल्यासारखा दुसरा अरसिकपणा नाही. गच्चीवर गप्पागोष्टी रंगाव्यात आणि चुकून ती पौर्णिमेची रात्र निघावी यात खरी मजा आहे. एरवी तो कोजागिरीचा केवळ अटीव आणि आखीव दुग्धपनाचा कार्यक्रम होतो!"

इंडोनेशिया मध्ये फिरताना त्यांनी डच राज्यासोबतच भाषेला कसे जोखडून फेकले याचा पुलं तपशीलवार उल्लेख करतात. एखाद्या देशाची संस्कृती समजण्यासाठी दुकानांच्या पाट्यांचा उपयोग होतो हे त्यांचे महत्त्वाचे निरीक्षण आहे. इंडोनेशिया मध्ये स्वातंत्र्यानंतर स्वतःची बहासा इंडोनेशिया भाषा आत्मसात केली गेली आणि जिथे शब्द उपलब्ध नव्हते तिथे संस्कृतचा आधार घेतला गेला. म्हणूनच विद्यापीठांमध्ये गुरु आणि महागुरू असे शब्द प्राध्यापकांसाठी सहज वापरले जाऊ लागले. मुसलमान व्यक्ती रोजा पाळतात मात्र त्याला रोजा न म्हणता उपवासा म्हणतात! असे अनेक भारतीय संस्कृती आणि भाषेचे आग्नेय आशियाशी असलेले लागेबंध आपल्याला या पुस्तकातून कळतात.

संपूर्ण आग्नेय आशियात महाभारत आणि रामायणाचा प्रचंड प्रभाव आहे. त्याचाच परिपाक म्हणजे तिथे अनेक नाटिकांमध्ये या दोन्ही महाकाव्यातील कथांना सादर केले जाते. पुलं अशा अनेक नाटकांचा आस्वाद घेतात आणि आपल्या रसभरीत वर्णनाने वाचकांना देखील तेथील प्रेक्षकांमध्ये नेऊन बसवतात.

प्रवास कसा करावा याविषयी पुलंची काही ठाम मते आहेत ज्याचा इथे उल्लेख करावा लागतो. ते म्हणतात प्रवासाला निघण्यापूर्वी विद्वत्तापूर्वक तयारी करून निघू नये. मनाची निगेटिव्ह कोरी असली की त्यावर चित्रे सुंदर उमटतात.
दुसऱ्या एका प्रसंगात ते सांगतात एखाद्या गावात प्रेक्षणीय स्थळ काही नसेल हे कळल्यावर त्यांना विलक्षण आनंद होतो याचे कारण मग पूर्णवेळ तेथील माणसांचे निरीक्षण करण्यात घालवता येतो आणि प्रत्येक व्यक्ती ही देखील त्यात्यापरत्वे प्रेक्षणीय असते.

" एखादे शहर पाहायचे असेल तर पायिपायी हिंडायला हवे त्याशिवाय त्या शहराच्या स्वभाव कळत नाही. मोटारीतून फिरून शहर समजत नाही. "


कधीकधी विनोदात देखील पुलं आंतरराष्ट्रीय राजकारणावर मार्मिक भाष्य करून जातात. आजच्या चीनने जवळपास ताबा घेतलेल्या हाँगकाँगचे राजकीय भवितव्य कसे असेल याचे भाकीत एवढ्या दशकांपूर्वीच्या पुस्तकात आढळून येते.

"मला तर हे हाँगकाँग म्हणजे एखाद्या अजस्त्र अजगराच्या शेपटीवर बेडकाने वस्ती करावी असे वाटले. केव्हा घास घेतला जाईल काय सांगावे!"


पुलंनी केवळ विनोदी भाषेत निरीक्षण केली नाहीत तर त्यामागे अनेक मुद्द्यांवर चिंतन देखील केले आहे. देशोदेशी फिरण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्या चिंतनामध्ये वेगळी प्रगल्भता आहे. जसे की जपान मधील एका गावातील म्हातारीकडील पाहुणचार घेऊन परतताना पुलं लिहितात,

"टोकियोच्या झगमगटात शिरताना लक्षात आले की, टोकियो म्हणजे जपान नव्हे.
पॅरिस म्हणजे फ्रान्स नव्हे.
न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका नव्हे
आणि मुंबई म्हणजे हिंदुस्तान नव्हे.
चार डोंगर चढावे उतरावे. चार नद्या ओलांडव्यात.
चार आडवळणे घ्यावीत, तेव्हा देश दिसायला लागतो. बाकीची मोठमोठी शहरे म्हणजे छापाचे गणपती व्हायला लागले आहेत."

पुलंचे नाटकावर प्रचंड प्रेम असल्यामुळे जपानमध्ये देखील त्यांनी तिथल्या नाट्यसंस्कृतीचा खोलवर अभ्यास केला. काबुकी हे पारंपारिक आणि संथगतीने सादर होणारे नाटक त्याचबरोबर इंग्लंड मधील नाटकांच्या तोडीची नेपथ्यरचना असलेले आधुनिक जपानी नाटक या दोन्हींचा आस्वाद घेत एकंदरीत भारतातील नाट्यसंस्कृतीवर तुलना करून पुलं खंत व्यक्त करतात.

जपानी लोकांच्या चिवट वृत्ती विषयी पुलं लिहितात,

" एक दारुमा नावाचा बाहुला आहे. त्याला कितीही पडला तरी उठून बसतो. हे खेळणं मोठा सूचक आहे. सारा जपान हा त्या दारुमा सारखा आहे. सदैव अपराजित. लहानपणापासून विपत्तीतून वर यायचे त्याला शिक्षण आहे. भूकंपात घरे जातात. हिवाळ्यात बर्फाखाली गोठावे लागते. भयानक टायफून्स येतात. युद्ध तर आहेतच. या साऱ्या आपत्तीत जे जे तरते त्याचे जपान्यांना विलक्षण अप्रूप वाटत असते."

पुलंनी या संपूर्ण प्रवासात श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, हॉंगकॉंग आणि जपान या देशांचा दौरा केला. मात्र त्यांच्या मनावर बाली आणि जपान यांनी सर्वात जास्त गारुड केले असे नक्की म्हणता येईल.
एकंदरीत आग्नेय आशिया आणि पूर्व आशिया याचा सुसंस्कृत मराठी डोळ्यांमधून घेतलेला हा वेध जगाविषयी कुतहून असलेल्या कोणत्याही मराठी वाचकाला नक्कीच आवडेल.
Profile Image for Mayur.
50 reviews
September 17, 2014
पुलंच्या नजरेतुन आग्नेय आशिया ची धमाल सफर. एखादा देश, शहर फक्त वरवर न पाहता त्याचं अंतरंग दाखवण्याची किमया पुलंनी अगदी सहज साधलीय. त्या देशातली स्थळ, माणसं तिथली संस्कृती, जीवनशैली या सगळ्याच विनोदी शैलीत सुंदर दर्शन घडतं या पुस्तकात. म्हणायला प्रवासवर्णन असलं तरी खूप काही दाखवणारं, शिकवणारं एक अप्रतिम पुस्तक.
21 reviews1 follower
March 20, 2019
Very nice story of his journey to eastern countries. He has well narrated his experiences which make you introvert sometimes. Many of the thoughts which he has expressed in this book still hold true today. An evergreen book. I will re-read it sometimes.
1 review
July 22, 2014
Excellent book on the culture and life of East Asia and Japan, with a touch of humour.
Profile Image for Rohit Kadam.
56 reviews
October 21, 2023
अप्रतिम पुल...खूप प्रवास वर्णन वाचली पण त्यांच्या डोळ्यांनी ते पाहणे इतके सुबक असते जेवढे आपण स्वतः जाऊन ते पाहिले तरी तसे भासणार नाही.
Profile Image for Apurva Nair.
32 reviews13 followers
July 16, 2020
अप्रतिम पुस्तक. नुसतंच प्रवासवर्णन नसून अनुभवकथनही म्हणता येईल. त्यात लिहिलेली छोट्या छोट्या गोष्टींमधील निरीक्षणे तर खूपच सुंदर. पुलंनी पाहिलेले पूर्वेकडील देश (थायलंड, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर आणि हॉंगकॉंग), तिथे भेटलेली लोकं, तिथली कला आणि संस्कृती या सगळ्यांचा एकत्रित अनुभव हे पुस्तक वाचून मिळतो. हलकं फुलकं असलेलं, बऱ्याचदा हसायला लावणारं, कधी आश्चर्यचकित करणारं (परदेशातल्या आश्चर्यांपेक्षा 'असं कसं लिहायला जमतं बरं?' याचंच जास्त आश्चर्य वाटतं खरं तर!) आणि कधी विचार करायला लावणारं हे पुस्तक; पण हीच तर ती पुलंची प्रसिद्ध भाषाशैली!

1963 मधे लिहिलेलं हे पुस्तक, तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आजही जसाच्या तशा लागू होतात, त्यामुळे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. तिथल्या कलांचं आणि माणसांच्या स्वभावाचं त्यांना विशेष कुतूहल ज्याचं वर्णन बऱ्याचदा वाचायला मिळतं आणि त्यामुळेच मला वाटतं हे पुस्तक इतर प्रवासवर्णनांपेक्षा वेगळं ठरतं. नुसतंच प्रवासवर्णन - म्हणजे इथे गेलो, अमुक तमुक पाहिलं, हे खाल्लं आणि या हॉटेलात राहिलो आणि परत आलो असं हे पुस्तक अजिबात नाही. त्यामुळे कदाचित सहलीची आखणी करण्यासाठी हे पुस्तक नाही, पण हे पुस्तक वाचून या देशांना जायची (किंवा पुन्हा एकदा जायची) नक्कीच इच्छा होते! माझ्यासाठी 'परत परत वाचावं' असं हे पुस्तक.
Profile Image for Sujay Sawant.
102 reviews1 follower
August 24, 2023
श्रीलंकेचे मनोहारी, मलेशिया आणि इंडोनेशिया वर असलेले हिंदू संस्कार आणि एकात्मकता, सिंगापूर, हाँगकाँगची भव्य प्रगती, बालीचे सौंदर्य आणि जपानची नव्या-जुन्याची सांगड दर्शवणारे मनोरंजक प्रवासवर्णन.
Profile Image for Niranjan Akut.
84 reviews1 follower
July 27, 2026
ते पु. ल. देशपांडे आहेत...
विषय संपला!! 😀
Profile Image for Veena.
156 reviews15 followers
May 1, 2021
A+++++++++++++++.............
Profile Image for Pushkar.
Author 1 book16 followers
July 17, 2015
What a lovely travelogue! The way he has traveled is amazing enough to make anybody jealous. There's no fuss about visiting the most touristy places and his writing flourishes when he comes across people. Laughed like anything at turning up alone at the port and being like a "navardev jyaacha band eka gallitun jaato wa to dusrya gallitun'. The play of words on austria, prussia and balkan countries is truly epic.
Profile Image for Mugdha.
74 reviews9 followers
July 29, 2012
Not as exciting as other PuLa books. I had a lot of expectations from this book but it didn't turn out to be as much fun. After sometime, PuLa talks more about the ppl he met during the trip than the places, which makes it a bit boring. Surprisingly, his travelogues of 1962 still seem relevant. An East Asia trip is 1960s must have been so uncommmon.
3 reviews
August 7, 2013
अप्रतिम प्रवासर्णन..
4 reviews
Read
August 12, 2013
a journey diary of P L Deshpande to the east. Typical PL.
Displaying 1 - 23 of 23 reviews

Join the discussion