Jump to ratings and reviews
Rate this book

जावे त्यांच्या देशा [Jave Tyanchya Desha]

Rate this book
पुस्तकाबद्दल दोन शब्द...

....म्हणून हे पांढर्‍यावर काळे

माझ्या पायावर चक्र आहे की नाही ते मला ठाऊक नाही. पण मला येणारे प्रवासाचे योग पाहिल्यावर एखाद्या ज्योतिष्याला पाय दाखवावेसे वाटायला लागले आहे. एक गोष्ट मात्र खरी. मी मायदेशात तसा बैठा माणूस आहे. परदेशात मात्र खूप हिंडतो. अधाश्यासारखा पाहतो आणि ऐकतो. नव्हे, पाहण्यासाठी हिंडतो. कुठे काय ऐकण्यासारखे आहे ते शोधत जातो. आणि जे काही ऐकले-पाहिले ते सांगायची मला ओढ लागते. आणि त्यातूनच माझे हे सांगणे ऐकणारेही भेटत आले आहेत हे माझे भाग्य!

ना वंशाचे, ना भाषेचे, ना धर्माचे, ना राष्ट्राचे असे कितीतरी लोक ह्या प्रवासात यथा काष्ठं च काष्ठं च म्हणतात तसे भेटतात. स्नेहाचा हात पुढे करतात. अकारण मने मोकळी करतात. आपल्या घराची दारे मोकळी करतात. कोण कुठला जर्मन आबिल, कुठली स्कॉटिश ब्रॉमलेबाई, हंगेरीतला गेझाकाका, पोन्नानेनी, डॉ. बेंके योशेफ आणि त्याची थेट पर्‍यांच्या राज्यातून उतरलेली छोटी एस्थेर... पुन्हा दिसणार देखील नाहीत... मन:पटलावर कायमची चित्रित झालेली पॅरिसमधल्या सीनच्या तीरावरची संध्याकाळ, कोण्या जपानी गेशाचा कानात वर्षानुवर्षे रेंगाळणारा तो ‘सायोनाऽऽरा’!...अनपेक्षितपणाने दिसलेला तो रोदांचा ‘थिंकर’... बर्लिनच्या ऑपेराहाऊसमध्ये ‘बार्बर ऑफ सॅव्हिली’च्या नांदीचे अप्रतिम वाद्यसंगीत ऐकताना अर्जेंटिनातल्या मारियाचे डबडबलेले निळे निळे डोळे... प्रतिभेचे थोर देणे लाभलेल्या एखाद्या साहित्यकाराने ह्यातून शब्दांची कितीतरी मोठी शिल्पे उभी केली असती-ती ताकद माझ्यात नाही याची मला जाणीव आहे. हा माझा विनय वगैरे नाही. भव्य कलाकृतींच्या दर्शनातून मला लाभलेले हे शहाणपण आहे. तरीही लिहिल्यावाचून राहवत नाही म्हणून हे पांढर्‍यावर काळे.

~ पु. ल. देशपांडे

188 pages, Paperback

First published January 1, 1974

38 people are currently reading
1321 people want to read

About the author

P.L. Deshpande

91 books1,061 followers
पुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.


P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra

The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more

Lovingly called 'Pula' by all the fans.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
271 (43%)
4 stars
202 (32%)
3 stars
117 (18%)
2 stars
13 (2%)
1 star
13 (2%)
Displaying 1 - 13 of 13 reviews
Profile Image for Manjusha Joglekar.
12 reviews
August 22, 2020
जावे त्यांच्या देशा
लेखक - पु. ल. देशपांडे

पुलंनी साहित्याच्या अनेक सुरेल सुरावटी जन्माला घातल्या पण त्यातही त्यांची प्रवासवर्णने अतिशय श्रवणीय.

पुलंच्या साहित्यातील या सुरावटी विशेष आवडीच्या. पुलंच्या लेखनाबद्दल काही बोलावं, एवढी माझी पात्रता नाही पण मला त्यांची प्रवासवर्णने जास्त भावतात. ही वर्णनं पुलंच्या खास शैलीतून उतरलेली असतात आणि या खुसखुशीत वर्णनाच्या साथीने ते ते ठिकाण जिवंत होऊन गेलेलं असतं. त्या त्या ठिकाणी त्यांना भेटलेली लोकं, घडलेले प्रसंग यांचं वर्णन वाचत वाचत त्या ठिकाणांना भेटी देत देत पुस्तक कधी वाचून संपून जातं हे ही समजत नाही. पुस्तक वाचताना पुलं जगाची सहल घडवून आणतात आणि ही सहल इतकी अफलातून असते की वाचताना वाटतं, या या ठिकाणी आपणही जायला हवं. मी तर बर्‍याचदा ती ठिकाणं इंटरनेटवर शोधून बघते, पुलंनी वर्णनच इतकं भन्नाट केलेलं असतं की वाचन करत असताना इंटरनेट तर इंटरनेट तिथून तरी ते ठिकाण बघण्याचा मोह मला आवरता येत नाही.

अपूर्वाई आणि पूर्वरंग ही पुलंची विशेष गाजलेली प्रवासवर्णने पण प्रवासवर्णन असूनही फारशी चर्चा न झालेलं पुस्तक म्हणजे हे, जावे त्यांच्या देशा. हे पुस्तक फारसं आवडलं नाही असं म्हणणारे वाचकही बघायला मिळतात. पण खरं सांगायचं तर हे पुस्तकही छान आहे.

छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये हे पुस्तक आपल्या समोर येतं. पुलंनी युरोप आणि अमेरिका सहल केली, तेथील काही भागांचं वर्णन यात आहे. पुलंनी युरोपच्या त्या त्या देशातील केलेलं कलेचं भरभरून कौतुक या पुस्तकात वाचायला मिळतं आणि त्याच वेळी आपल्या देशात कलेला कसा वाव मिळत नाही, याची हळहळ व्यक्त करताना ते वेळोवेळी विसरलेले नाहीत. कधी कधी या युरोपीय देशांचं एवढं एवढं कौतुक आणि आपल्या इथल्या परिस्थितीतील काढलेले दोष वाचायला मिळतात की देशप्रेमी मनाला कधी कधी ते आवडत नाही.

अमेरिकेच्या भेसूर जीवनाचं, संस्कार शून्य अशा मुलांच्या आयुष्याचं वर्णनही यात एका प्रकरणात आहे. त्याच वेळी अमेरिकेचाच एक भाग असणार्‍या सॅन फ्रान्सिस्कोवर जडलेलं पुलंचं अत्याधिक प्रेमही यात बघायला मिळतं.

हे पुस्तक वाचताना युरोपची छोटी सफर घडते, पाण्यावर नांदणाऱ्या व्हेनिसची जिथे भेट घडते तिथेच नेपल्सची निळी किमयाही पुलंच्या शैलीतून आपल्या भेटीस येते. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, संगीत, चित्र, शिल्प, स्थापत्य, नाट्य या कलांची युरोपातील गंगोत्री इटलीत असल्याने, या पुस्तकात इटली तर अधिक विस्ताराने दर्शन देते.

फ्लोरेंसला असताना पुलं या गंगोत्रीची अक्षरशः मानसपूजा करत असताना त्यांची एका अशा वृद्ध डॉक्टरशी भेट होते जो त्या फ्लोरेंसमध्ये राहून आद्य शंकराचार्य यांची पूजा करीत असतो. त्यांना आपला गुरू मानत असतो. भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय इतिहास, भारतीय संतांची चरित्रे, वेद, उपनिषदे, गीता यांचा खूप मोठा अभ्यासक आणि पूजक असतो. पु.ल आणि या डॉक्टरची भेट हा या प्रकरणाचा परमोच्च बिंदू.

नेपल्सच्या प्रकरणात लेखिका डॉ. मीना प्रभु आणि त्यांचे यजमान श्री. सुधाकर प्रभु यांचाही उल्लेख आहे. हे दांपत्य पुलंच्या परिचयाचं.

हे पुस्तक आवर्जून वाचावं असंच... अपूर्वाई आणि पूर्वरंग डोक्यात ठेवून हे पुस्तक वाचलंत तर कदाचित निराशा होईल पण तरीही हे पुस्तक "जावे त्यांच्या देशा", त्या त्या देशांना भेट देण्यासाठी आणि तेथील कलेच्या वर्णनाने, ठिकाणांच्या वर्णनाने अचंबित होण्यासाठी किमान एकदा तरी जरूर वाचावे.

हे पुस्तक वाचत असताना एक गोष्ट मात्र राहून राहून वाटत होती की, पुलंनी विस्तृत प्रवासवर्णने मात्र कमी लिहिली. आख्खं जग पालथं घालणाऱ्या पुलंनी फक्त दोनच दीर्घ प्रवासवर्णने लिहावीत !

- मंजुषा जोगळेकर
Profile Image for Mayur.
50 reviews
June 25, 2015
पुलंच्या विनोदी शैलीत विविध देशांची, शहरांची सफर. या पुस्तकात इतर देशातल्या कला आणि कलाकारांच वर्णन करताना पुलंमधला कलाकार सतत दिसून येतो. तसच त्या कलांना भारतात फारशी किंमत मिळत नाही याचं आणि बदलत्या जगासोबत हरवत चाललेल्या अनेक गोष्टी याचं दु:ख सुद्धा व्यक्त होत.
Profile Image for Aniket Patil.
525 reviews22 followers
December 10, 2017
a very good book considering the time when he wrote this one. when compared to today's travelogues and tv shows , it seems okay. Still being a Pu La fan I loved this book.
1 review
July 23, 2018
as i started this . i dont know what happened to me , i was onto it . it feels so good . so heartworming.
Profile Image for Rohit Kadam.
48 reviews
May 20, 2022
Really awesome book. PL Deshpande yanchya najretun aani tynchya anubhavatun sarv desh pahane mahnje mejvanich..
Profile Image for Sujay Sawant.
102 reviews1 follower
August 14, 2023
इटलीची कलासक्त, न्यूयॉर्क ची प्रगत पण भयवाह, सॅन फ्रान्सिस्को ची बहुरंगी, हंगेरीची लोभस आणि स्वित्झरलँडची दिमाखदार सहल आणि अनुभव ह्यांच मनोरंजक मनोगत.
Profile Image for अनिकेत.
401 reviews22 followers
August 22, 2025
The travelogue written in his usual way...I specifically liked the chapter 'Nilaee', where you actually could visualise the description written about Venice, Italy
Displaying 1 - 13 of 13 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.