‘दौड धोप मुलुख’ हि छत्रपतींच्या काळात घडलेली झुंजार मावळ्यांची एक काल्पनिक ऐतिहासिक शौर्य गाथा आहे. वाटानी लागलेल्या काफिरांच्या मुंडक्यांचे उच उच मनोरे बनीत अन सारे मंदिरं खंडित करीत हजाराचं लष्कर घेऊन रुद्रगडावर आक्रमन करायला निघालेल्या मुघल सरदार बिलाल खानाला आंगावर घेनाऱ्या मराठा सरदार बापू तुकाराम शेलार अन त्यांच्या मूठभर मावळ्यांच्या शिवभक्तीनं माखलेल्या गनिमी काव्याची हि गाथा आहे. हि गाथा आहे बोबड्या गंगेच्या सळसळत्या धोपीची, गनिमाचं छाताड फोडून येनाऱ्या शिवाच्या इटाची, हनमाच्या केसरी कुस्तीची, भित्र्या धनाच्या श्याम भक्तीची, राकट खंडूच्या पट्ट्याची, काळ्या मल्हारीच्या दानपट्ट्याची, आडदांड रायबाच्या परशु कुऱ्हाडीची, यमाला हुसकून लावनाऱ्या श