What do you think?

एक शून्य मी [Ek Shunya Mee]
- GenresMarathi
192 pages, Paperback
First published January 1, 1980
About the author
P.L. Deshpande
91 books1,079 followersपुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
Lovingly called 'Pula' by all the fans.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 15 of 15 reviews
November 17, 2016
खूपदा विचार होऊन पुढे तो मांडता येतोच अस नाही. कधी मांडायच खूप असत पण प्रगल्भ vocabulary नसते, कधी नुसतच सुन्न वाटत, कधी सोयिस्कररित्या दुर्लक्ष करतो आपण. ultimately जाऊ दे होतं त्या सगळ्याचच. पण मग एक वेळ अशी येते की आपण कोणालातरी भेटतो आणि सगळ confess करायचा प्रयत्न करतो, अगदी सगळ. तोड़क मोडकं जस जमेल तस. एक शून्य मी वाचताना मीच पुलंच्यासमोर confess karat hote. मला जे म्हणायचय ते मी त्यांच्याशी बोलत होते, मला शब्दात मांडता येत नव्हतं ते पुलं सांगत होते आणि दरवेळी मी म्हणत होते "haa exactly मला हेच म्हणायचय"
May 8, 2013
Intellectual writings by pu.la. sankar, natak,ek shunya mi write ups are thought provoking.
May 13, 2020
Its an agony, that I have to write the review of a book, of the best writer in Marathi( my mother tongue) in English.
I will write my next review on marathi book in marathi for sure.
This is one of the best work of P L Deshpande. The more you read his book more you love him and his writing.
The best chapters that i loved and learnt from is
-
"Sanskaar"
"Chan pikat janare mhatarpan"
And.
" Dharma Andhashradha ni tumhi Amhi"
This book is not just story telling but, the sketch of many lives and insight.
You will not only enjoy it while reading, but, here there is much to be learnt from..

September 20, 2026
विनोदापलीकडचे पुलं
पुलंच्या निधनापश्चात प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये त्यांच्या नेहमीपेक्षा वेगळ्या आणि बहुतांश धीरगंभीर अशा लेखांचे संकलन केले आहे. हे लेख 'महाराष्ट्र टाइम्स', 'सामना' अशा वृत्तपत्रांत किंवा इतर मासिकांमध्ये छापून आलेले होते. या लेखांमधून त्या त्या काळी महाराष्ट्रात आणि देशात समाजासमोर असणाऱ्या प्रमुख प्रश्नांची, तसेच तत्कालीन सांस्कृतिक विश्वाचीदेखील ओळख होते.
त्याचबरोबर पुलंचा विज्ञानवादावर आणि तर्कनिष्ठेवर भर होता; भारतासारख्या अंधश्रद्ध समाजात तर्काचा बळी राजरोसपणे कसा दिला जातो, याची त्यांना खूप खंत वाटायची. याचे त्यांच्या अनेक लेखांमधून दर्शन होते. या देशात होऊन गेलेल्या विविध थोर व्यक्तींची वेगवेगळ्या समाजात कशी विभागणी केली गेली आहे, आणि त्यांच्या शिकवणुकीचे आचरण करण्याऐवजी केवळ त्यांच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने एकदा नामस्मरण केल्याने आपण आपल्या कर्तव्यातून मुक्त होतो व वाटेल तसे वागायला मोकळे होतो, याविषयीदेखील पुलंनी कठोर टीका केली आहे.
एकंदरीत सर्वच लेख विचार करायला भाग पाडणारे आहेत. 'बटाट्याची चाळ', 'व्यक्ती आणि वल्ली' अशा पुस्तकांतून भेटलेले पुलं या लेखांमधून एका अतिशय वेगळ्या, पण तेवढ्याच प्रभावी रूपात आपल्याला बघायला मिळतात.
स्टोरीटेल वर ध्वनिमुद्रण विविध कलाकारांनी उत्तम रीतीने केले असून दिलीप प्रभावळकरांचा त्यामधील सहभाग हे विशेष आकर्षण.
विविध लेखांमधील महत्वाचे मुद्दे आणि उल्लेखनीय परिच्छेद पुढीलप्रमाणे :
१) प्रकरण एक: शूर आम्ही वंदिले
शूर आम्ही वंदिले या लेखांमध्ये पुलं लडाखमध्ये चीन सीमेवर पाच मराठी साहित्यिकांच्या शासनपुरस्कृत दौऱ्याचा अनुभव कथन करतात.
लडाखमधील भेटीत अनेक लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. त्यांना आपल्या समाजात अजूनही हवा तितका मान मिळत नाही याची त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार ते खंत व्यक्त करतात. लष्करी जवान सुट्टी घेऊन घरी परतल्यावर त्याला जी काही घरची कामे सांभाळावी लागतात त्यात त्याला अग्रक्रम मिळाला पाहिजे. त्याची जाणीव मामलेदार कचेरी मधल्या कारकूनापासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी ठेवली पाहिजे हे तळमळीने सांगतात.
पुलंचे राष्ट्रीय ऐक्या वरील सखोल चिंतन त्यांच्या या प्रवास वर्णनात वाचायला मिळते. तेथील सफरचंदासारखी लाल गाल असणारी गोरी गोमटी मुले इतर राज्यांमधील मुलांसोबत पत्र व्यवहाराने का होईना पण आत्तापासून जोडली गेली पाहिजेत तसेच विविध शाळांमध्ये म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनांमध्ये बहुभाषिक गाण्यांचा प्रार्थनांचा समावेश केला पाहिजे अशा विविध व्यवहार्य योजना राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते सुचवतात.
लडाख सीमेवर चीन युद्धात लढलेले अनेक जवान देखील त्यांना भेटले. त्यामध्ये काही युद्धकैदी देखील होते. चिन्यांनी पाठीत कसा वार केला आणि त्याचं उट्ट काढण्याची कशी त्यांच्या मनामध्ये जाज्वल्य आग धगधगत होती याचं वर्णन पुस्तकात वाचायला मिळतं. अनेक जवानांच्या समाध्यांना देखील त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांना कसे वीरमरण आले त्याचे देखील वर्णन केले आहे. भारावलेले पुलं लिहितात,
प्रकरण दोन: मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस
प्रकरण ३: गांधीयुग आणि गांधीयुगांत
1969 मध्ये गांधी जन्मशताब्दी निमित्त त्यांचे कर्तृत्व आणि त्यापश्चात त्यांच्या अनुयायांचे आचरण यावर पुलंनी सविस्तर आढावा घेतला आहे.
गांधीजींचे सर्व राजकारण नीती मूल्यांवर आधारित होते आणि स्वातंत्र्यानंतर व्यवहारीतेच्या नावाखाली राजकारण्यांनी त्याच नीतीमूल्यांना पहिली तिलांजली दिली यावर पुलं टीकेचे आसूड ओढतात.
प्रकरण चार : सोप्या भाषेचे महत्त्व
शासकीय आणि वैज्ञानिक मंडळींचा मराठी भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा प्रयत्न कसा चुकीचा आहे यावर हा लेख आहे. 'बीज गुणन प्रक्षेत्र ' असे नाव असणाऱ्या जागी कृषी विभाग नेमके काय करणार आहे हे कोणत्या शेतकऱ्याला कळते ? उपअभियंता आणि डेप्युटी इंजिनीयर यापैकी कोणता शब्द नागरिक प्रत्यक्षात वापरतात ? असे प्रश्न विचार करायला भाग पाडतात.
प्रकरण पाच: संस्कार
लहान मुलांवर कशाप्रकारे संस्कार व्हावेत याविषयीच्या रूढ समजून मध्ये एकप्रकारे घरातील वडिलांची हुकूमशाही अव्याहतपणे चालू राहावी असाच सुप्त हेतू असतो. मुले निरीक्षणातून खूप गोष्टी टिपत असतात आणि त्यामध्ये घरातील आई-वडिलांचे एकमेकांशी आणि समाजातील इतरांशी वर्तन कसे आहे याचा मोठा वाटा असतो.
जे पालक आपल्या मुलांना विविध बौद्धिक आणि सांस्कृतिक अनुभव देण्याचा आणि त्या आधारे त्यांचा सहज पद्धतीने जो विकास होईल तो होऊ देण्याचा प्रयत्न करतात त्यांना खरे संस्कारांचे महत्त्व कळले आहे असे पुलंना वाटते.
प्रकरण सहा: छान पिकत जाणारे म्हातारपण
स्वतःच्या बालपणाविषयी पु.लं.च्या हृद्य आठवणी आहेत. त्यांचे वडील, मामा आणि आजोबा यांच्यासोबत गप्पांच्या मैफिली कशा रंगत आणि नवीन कथा, गाणी, संगीत इत्यादींमध्ये त्यांचा वेळ कसा जाई, या त्यांच्यासाठी अतिशय अमोल आठवणी आहेत. त्यांना स्वतःच्या बालपणातील भौतिक सुविधांचा अभाव इत्यादी गोष्टी आठवतच नाहीत; या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे त्यांचे भविष्यात एक आनंदमयी कलाकार म्हणून विकसित होत जाणे होय.
प्रकरण नऊ : नाटक
एखाद्या नाटककाराला नाटक रंगविण्यासाठी कोणकोणत्या बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो या बाबी पुलं वाचकाला सखोलपणे समजावून सांगतात.
प्रकरण बारा : विनोबा भावे
विनोबांसोबत पुलनी आकाशवाणीसाठी एक संदेश रेकॉर्ड केला होता मात्र त्याकरिता त्यांना बिहारमध्ये विनोबांसोबत भूदान चळवळीसाठी आयुष्यात कधी नव्हे एवढी पायपीट करावी लागली होती. विनोबांच्या मधुकर या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
विनोबांचा हेवा वाटण्याचे कारण स्पष्ट करताना पुल लिहितात,
प्रकरण तेरा: गांधीजी आणि त्यांचे घड्याळ
गांधीजींचा वेळेविषयी कटाक्ष यावर पूर्ण लेख आहे. पुलं लिहितात :
प्रकरण 14 नामस्मरणाचा रोग
एकदा नाव बदलले की परिस्थिती बदलते असा समज आपण करून घेतला आहे. या देशातील महापुरुषांच्या पुण्यतिथी आणि जयंती इतक्या स्मरणाइतपतच त्यांना आपण सीमित ठेवले आहे. त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्याइतपत प्रामाणिकपणा आपल्यात नाही याची खंत पुलं या लेखातून व्यक्त करतात.
प्रकरण 15 एक शून्य मी
आपल्या समाजातील धर्मवेडेपणा आणि त्या अनुषंगाने येणारा दांभिकपणा यावर पु.ल. अनेक उदाहरणांसहित चिंतन करतात. स्वप्नात पडणारा दृष्टांत इत्यादी कारणांमुळे मुंबईत कॉर्नवॉलिस या ब्रिटिश गव्हर्नरच्या पुतळ्याची देखील पूजा करणारे कोकणातील गावकरी पुलंनी स्वतः अनुभवले. या आणि अशा अनेक अनुभवांतून ते या समाजाचा एक भाग न होता त्याच्यातून वजा होत जातात, आणि पुन्हा पुन्हा शून्य बनण्याचा अनुभव घेतात. विशेषतः उच्चभ्रू समाजातील व्यक्तींमध्ये देशापुढील खऱ्या सामाजिक प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीविषयी त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
जुळविलेले लग्न या संस्थेविषयीचे परखड विचार पुढील प्रमाणे व्यक्त केली आहेत:
प्रकरण 16 माणशी अर्धा एकर पाणी
1972 च्या दुष्काळामध्ये विलासराव साळुंखे जे स्वतः कारखानदार होते त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुरंदर तालुक्यातील भयावह परिस्थितीचा दौरा केला आणि त्यानंतर पाणी पंचायतीची स्थापना करून शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये देखील यशस्वी शेती कशी करता येईल याचा वस्तू पाठ घालून दिला. पु ल देशपांडे यांनी त्यांच्या या प्रयोगाला भेट दिली आणि त्याचे सुरेख मांडणी या लेखामध्ये केले. पाणी पंचायत स्थापन केलेल्या गावांमध्ये उसाच्या लागवडीवर बंदी घालण्यात आली कारण ऊस पिकवण्यासाठी लागणारे पाणी प्रचंड असते. 1982 मध्ये लिहिलेल्या महाराष्ट्र टाइम्स मधील या लेखात पुलनी या उपक्रमाविषयी सरकारच्या वाढत्या उदासीनतेबाबत देखील टीका केली आहे.
प्रकरण 18 प्रभात फिल्म कंपनी
प्रकरण 20 धर्म अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही
भारतातील एकंदरीत श्रद्धा या विषयावर कर्मठ विज्ञानवादी भूमिकेतून लिहिलेला हा लेख आहे.

"धारातीर्थी देह ठेवायलाही फार मोठं भाग्य लागतं."
प्रकरण दोन: मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस
ज्या ज्या प्रांतातला माणूस अन्य प्रांतात ज्या ज्या व्यवसायात सामोरा आला त्या माणसाचे सारे गुणवगुण आपण त्या प्रांताला चिटकवून मोकळे होतो. आणि परस्परांच्याच काय स्वतः विषयीच्या देखील गैरसमजांना वाढीला लावून आपण काहीतरी निराळे या ऐटीत राहतो.
आमच्या मराठी मातीत पायाला बोचणारे खडे कमी नाहीत. त्या मातीची सवय नसलेल्या पायांना ते बोचतात. पण या मातीची एकदा ओळख झाली की तिची चटक लागते. आणि म्हणून मराठी माणसाची अन्नप्रांतियांशी जेव्हा दोस्ती होते त्यावेळी त्या गाठी फार घट्ट बसतात.
प्रकरण ३: गांधीयुग आणि गांधीयुगांत
1969 मध्ये गांधी जन्मशताब्दी निमित्त त्यांचे कर्तृत्व आणि त्यापश्चात त्यांच्या अनुयायांचे आचरण यावर पुलंनी सविस्तर आढावा घेतला आहे.
गांधीजींचे सर्व राजकारण नीती मूल्यांवर आधारित होते आणि स्वातंत्र्यानंतर व्यवहारीतेच्या नावाखाली राजकारण्यांनी त्याच नीतीमूल्यांना पहिली तिलांजली दिली यावर पुलं टीकेचे आसूड ओढतात.
गांधीजींचे हे लौकिकत्व अलौकिक होते म्हणून त्यांचे आणि अनुयायी त्यांच्यासोबत पुढारी आणि अनुयायी म्हणून न चालता कुटुंबीय म्हणून चालले. ते महात्माजी होतेच पण त्याहूनही अधिक ते बापू होते.
जो संतांसारखा असामान्य नाही किंवा जो संतपणाला पारखाही नाही, जो अविद्वान नाही आणि विद्याभ्यासजडही नाही, जो सदाचाराचा बडेजाव करणार नाही किंवा दुराचारीही नाही असा लौकिकात लौकिक आणि अलौकिकात अलौकिक असणारा हा माणूस पोथीनिष्ठांना बुचकळ्यात पाडत असला तरी सामान्यांना आपल्याहून थोर असल्याची जाणीव असूनही आपला वाटतो.
गांधींना इंग्रज मालक जाऊन देशी मालक यावा हे अभिप्रेतच नव्हते. म्हणूनच त्यांनी सारी शक्ती माणसामाणसातल्या उच्चनीचतेच्या कल्पनांना नष्ट करण्यात लावली.
अश्रू आणि हास्य हे माणसांना जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत.
प्रकरण चार : सोप्या भाषेचे महत्त्व
शासकीय आणि वैज्ञानिक मंडळींचा मराठी भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा प्रयत्न कसा चुकीचा आहे यावर हा लेख आहे. 'बीज गुणन प्रक्षेत्र ' असे नाव असणाऱ्या जागी कृषी विभाग नेमके काय करणार आहे हे कोणत्या शेतकऱ्याला कळते ? उपअभियंता आणि डेप्युटी इंजिनीयर यापैकी कोणता शब्द नागरिक प्रत्यक्षात वापरतात ? असे प्रश्न विचार करायला भाग पाडतात.
प्रकरण पाच: संस्कार
लहान मुलांवर कशाप्रकारे संस्कार व्हावेत याविषयीच्या रूढ समजून मध्ये एकप्रकारे घरातील वडिलांची हुकूमशाही अव्याहतपणे चालू राहावी असाच सुप्त हेतू असतो. मुले निरीक्षणातून खूप गोष्टी टिपत असतात आणि त्यामध्ये घरातील आई-वडिलांचे एकमेकांशी आणि समाजातील इतरांशी वर्तन कसे आहे याचा मोठा वाटा असतो.
जे पालक आपल्या मुलांना विविध बौद्धिक आणि सांस्कृतिक अनुभव देण्याचा आणि त्या आधारे त्यांचा सहज पद्धतीने जो विकास होईल तो होऊ देण्याचा प्रयत्न करतात त्यांना खरे संस्कारांचे महत्त्व कळले आहे असे पुलंना वाटते.
प्रकरण सहा: छान पिकत जाणारे म्हातारपण
स्वतःच्या बालपणाविषयी पु.लं.च्या हृद्य आठवणी आहेत. त्यांचे वडील, मामा आणि आजोबा यांच्यासोबत गप्पांच्या मैफिली कशा रंगत आणि नवीन कथा, गाणी, संगीत इत्यादींमध्ये त्यांचा वेळ कसा जाई, या त्यांच्यासाठी अतिशय अमोल आठवणी आहेत. त्यांना स्वतःच्या बालपणातील भौतिक सुविधांचा अभाव इत्यादी गोष्टी आठवतच नाहीत; या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे त्यांचे भविष्यात एक आनंदमयी कलाकार म्हणून विकसित होत जाणे होय.
हल्लीची पिढी बिघडलेली आहे असं म्हणणाऱ्यांना ही बाप म्हणून आपणच वाढवलेली पिढी आहे याचा विसर पडलेला दिसतो.
संवाद तुटलेल्या कुटुंबात वेळ कसा घालवावा हा ज्येष्ठांना पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. विशेषतः तारुण्यात ज्यांनी वाचन, चित्र, संगीत, कला याचा छंद जोडलेला नसतो अशा म्हाताऱ्यांना ही पोकळी फार जाणवते. ज्यांनी अशा काही चांगल्या आवडी जोपासलेले असतात त्यांना असा प्रश्न पडत नाही.
प्रकरण नऊ : नाटक
अनुभव सांगण्याच्या आणि दुसऱ्याचे अनुभव ऐकण्याच्या माणसांमध्ये असणाऱ्या प्रबळ इच्छेतूनच साहित्याचा जन्म होतो. कहाण्या , कथा, कादंबऱ्या, पुराण, नाट्य, काव्य इत्यादी सर्व साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांपाशी आपल्याला आलेले अनुभव दुसऱ्यांना सांगायची ओढ हीच खरी प्रेरणा आहे.
एखाद्या नाटककाराला नाटक रंगविण्यासाठी कोणकोणत्या बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो या बाबी पुलं वाचकाला सखोलपणे समजावून सांगतात.
प्रकरण बारा : विनोबा भावे
विनोबांसोबत पुलनी आकाशवाणीसाठी एक संदेश रेकॉर्ड केला होता मात्र त्याकरिता त्यांना बिहारमध्ये विनोबांसोबत भूदान चळवळीसाठी आयुष्यात कधी नव्हे एवढी पायपीट करावी लागली होती. विनोबांच्या मधुकर या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
विनोबांचा हेवा वाटण्याचे कारण स्पष्ट करताना पुल लिहितात,
"आम्ही नित्याच्या व्यवहारात इतके गोंधळून जात असताना, विनोबांना भेटणारी ही माणसे आम्हाला का भेटू नयेत? आम्हाला त्या महानुभावांशी सख्य करायला सवडच मिळाली नाही; विनोबांना मात्र खूप खूप सवड मिळते. कारण त्यांनी जीवनातला प्रत्येक क्षण विलक्षण कंजूषीने खर्च करून, त्या त्या क्षणाच्या मोबदल्यात या सगळ्या महात्म्यांना विकत घेतलेले आहे.
मीराबाईंनी 'मायी री म्हे तो गोविंद लियो मोल' म्हणत गोविंद विकत घेतला होता; विनोबांनी शंकराचार्य, व्यास, वाल्मीकी, तुलसी, कबीर, तुकोबा, ज्ञानोबा अशा अनेकांना विकत घेतले आहे. जीवनातला प्रत्येक क्षण असा सार्थकी लावला, तरच वर्ष अखेर झाल्यावर येतो त्याला 'वाढदिवस' म्हणायचे!"
प्रकरण तेरा: गांधीजी आणि त्यांचे घड्याळ
गांधीजींचा वेळेविषयी कटाक्ष यावर पूर्ण लेख आहे. पुलं लिहितात :
" वेळेचे भान ठेवणे म्हणजे भान हरपून काम न करणे, अशी सामान्यांची समजूत असते. पण गांधीजींनी केलेले कार्याचे डोंगर पाहिले, म्हणजे ठरवलेल्या कालावधीत माणूस काळाची आणि कर्माची कशी सुरेख सांगड घालू शकतो, ते ध्यानात येते."
साधी गोष्ट आहे, परंतु प्रत्यक्षात आणणे जवळजवळ अशक्य आहे. इंग्लंडच्या बादशहाला साधा पंचा नेसून भेटायला जाणे ही गोष्ट किती साधी वाटते! आपल्यासारख्याला इंग्लंडचा बादशहा जाऊ द्या, साध्या चित्रपटाला देखील पंचा नेसून जाण्याचे धैर्य होणार नाही. त्यातून इंग्लंडमधल्या तसल्या त्या भयंकर थंडीत नुसता गुडघ्यापर्यंत पंचा आणि अंगावर खादीचे उपरणे घेऊन जाणे—यात शारीरिक कष्ट किती होते! पण गांधीजींनी हे सारे किती सहजतेने केले.
एका अमेरिकन गृहस्थाने विचारले, "मिस्टर गांधी, तुम्ही अशा तुटपुंज्या कपड्यांत बादशहांना भेटलात, थंडी नाही वाजली?" गांधीजी हसत म्हणाले, "आम्हा दोघांच्या थंडीचे निवारण होईल एवढे कपडे एकट्या बादशहाच्या अंगावर होते!"
हे सारे कठोर निश्चय गांधीजी किती सहजतेने पाळत! असले निश्चय पाळायला विलक्षण सामर्थ्य लागते. विक्षिप्तपणा, ढोंग, आचरटपणा अशा अनेक 'भूषणां'चा वर्षाव सांभाळावा लागतो. गांधीजींनी ही सारी दूषणे शांतपणाने स्वीकारली.
प्रकरण 14 नामस्मरणाचा रोग
एकदा नाव बदलले की परिस्थिती बदलते असा समज आपण करून घेतला आहे. या देशातील महापुरुषांच्या पुण्यतिथी आणि जयंती इतक्या स्मरणाइतपतच त्यांना आपण सीमित ठेवले आहे. त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्याइतपत प्रामाणिकपणा आपल्यात नाही याची खंत पुलं या लेखातून व्यक्त करतात.
"सामाजिक अनास्था दूर करण्याऐवजी नाव बदलून क्रांतीचा आव आणणं सोपं "
"... ज्योतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही; त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेवायचा असे होत असेल, तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल. वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात; मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल.
फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेने दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये म्हणून केलेली फसवणूक आहे, हे मानावे लागेल. 'देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सर्व काही आपोआप चांगले होईल' ही भावना टाकून द्यावी लागेल. 'स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः' अशा प्रकारच्या, 'जन्माने ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' असल्या माणसामाणसांत भेद करणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत, असेच मानून वाचावे लागतील.
शंभर वर्षांपूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसे, अशा काळात जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले, तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना सोबत घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री-पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल."
प्रकरण 15 एक शून्य मी
आपल्या समाजातील धर्मवेडेपणा आणि त्या अनुषंगाने येणारा दांभिकपणा यावर पु.ल. अनेक उदाहरणांसहित चिंतन करतात. स्वप्नात पडणारा दृष्टांत इत्यादी कारणांमुळे मुंबईत कॉर्नवॉलिस या ब्रिटिश गव्हर्नरच्या पुतळ्याची देखील पूजा करणारे कोकणातील गावकरी पुलंनी स्वतः अनुभवले. या आणि अशा अनेक अनुभवांतून ते या समाजाचा एक भाग न होता त्याच्यातून वजा होत जातात, आणि पुन्हा पुन्हा शून्य बनण्याचा अनुभव घेतात. विशेषतः उच्चभ्रू समाजातील व्यक्तींमध्ये देशापुढील खऱ्या सामाजिक प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीविषयी त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
जुळविलेले लग्न या संस्थेविषयीचे परखड विचार पुढील प्रमाणे व्यक्त केली आहेत:
" एक अनोळखी नर आणि अनोळखी मादी, एका अनोळखी भटजीने अनोळखी भाषेत पुटपुटण्याच्या कार्यक्रमाला 'विधी' मानून, सुमारे ५० भुकेल्या तोंडांत जायला हवे असलेले तांदूळ एका अनोळखी गर्दीच्या हाती देऊन स्वतःच्या डोक्यावर उडवून घेतात. दुसऱ्या दिवशी त्याच मंगलकार्यालयापुढल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अभाग्यांच्या पोरांनी आपल्या चिमुकल्या चिमटीतून ते एकेक करून उचलत, हातातली अक्षय करवंटी त्या अक्षतांनी भरावी... उच्च विद्याविभूषित म्हणवणाऱ्या समाजातले हे 'संस्कार' पाहत असताना, त्या मांडवात आपण कमालीचे परके होऊन जातो."
प्रकरण 16 माणशी अर्धा एकर पाणी
1972 च्या दुष्काळामध्ये विलासराव साळुंखे जे स्वतः कारखानदार होते त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुरंदर तालुक्यातील भयावह परिस्थितीचा दौरा केला आणि त्यानंतर पाणी पंचायतीची स्थापना करून शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये देखील यशस्वी शेती कशी करता येईल याचा वस्तू पाठ घालून दिला. पु ल देशपांडे यांनी त्यांच्या या प्रयोगाला भेट दिली आणि त्याचे सुरेख मांडणी या लेखामध्ये केले. पाणी पंचायत स्थापन केलेल्या गावांमध्ये उसाच्या लागवडीवर बंदी घालण्यात आली कारण ऊस पिकवण्यासाठी लागणारे पाणी प्रचंड असते. 1982 मध्ये लिहिलेल्या महाराष्ट्र टाइम्स मधील या लेखात पुलनी या उपक्रमाविषयी सरकारच्या वाढत्या उदासीनतेबाबत देखील टीका केली आहे.
प्रकरण 18 प्रभात फिल्म कंपनी
निर्मिती आणि फायदा हे सूत्र जाऊन फायदा असेल तर निर्मिती हे सूत्र बाळगणाऱ्यांना संस्कृती वगैरेचा विचार नेहमीच फालतु वाटतो.
प्रकरण 20 धर्म अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही
भारतातील एकंदरीत श्रद्धा या विषयावर कर्मठ विज्ञानवादी भूमिकेतून लिहिलेला हा लेख आहे.
"भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एका प्रकारच्या भ्रमातच वावरत होते, असं मला वाटतं. एकूणच आपल्या देशातल्या हिंदूंना आणि मुसलमानांना बुद्धीचे वावडे. बरं, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, तेही पाद्री-धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजं त्यांनीच चालवली; त्यांच्याही डोळ्यांना झापडं बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचाही तिटकारा.
वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा, त्याला अक्कल लागत नाही; पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधूनसुद्धा सापडायचे नाहीत, सारे 'अभिमानांध'! भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हणायचं आणि इतरांनी आपण तो पाहिल्यासारखं वागायचं. आमचे इतिहास-संग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणांसारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचं. कुठल्याही घटनांचा कार्यकारणभाव लावण्याच्या फंदातच पडायचं नाही. सारा हवाला एक तर देवावर, नाही तर दैवावर!"
July 25, 2012
PL goes philosophical. Fresh. Provoking
February 18, 2019
अतिशय सुंदर पुस्तक. नेहमी पेक्षा वेगळेच पु ल देशपांडे वाचायला मिळाले. १९६५ नंतरचे बरेच लेख आहेत. वेगळा दृष्टिकोन वेगळें पु ल देशपांडे
July 19, 2012
A slightly different book from PL Deshpande. Topics are diverse but well thought none the less
June 14, 2026
पु. ल देशपांडे यांनी लिहिलेल्या वैचारिक लेखांची कात्रणे सुनीताबाईंनी जपून ठेवली होती. पुलंच्या पश्चात मौज प्रकाशनाने त्यांना एकत्रित पुस्तक स्वरूपात वाचकांसमोर आणले. पुलंच्या पहिल्या स्मृती दिनाला ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. जुन्या जाणत्या लोंकानी यातील काही लेख महाराष्ट्र टाइम्स, एकता, शतायुषी, नवभारत अशा मासिकांमध्ये किंवा नियतकालिकांमध्ये कदाचित याआधी वाचले असतील
मला ह्या पुस्तकाविषयी दोन एक वर्षांपूर्वी समजले. एक - दोन लेख थोड्याथोड्या विलंबाने वाचत अखेर एका वर्षात हे पुस्तक वाचून पूर्ण झाले. लेख वैचारिक आहेत, वाचताना आपण अंतर्मुख होतो, स्वतःला तपासून बघतो, अस्वस्थ होतो, सुन्न होतो, कधी एखादी तिडीक आपल्या डोक्यात जाते. त्यामुळे एका बैठकीत वाचण्यासारखे हे पुस्तक निश्चितच नाही (माझ्यासाठी तरी नव्हते). उलट संग्रही ठेवावे, कधी मधेच एखादा लेख परत वाचावा अशी पुस्तके कमीच - हे त्यापैकी एक वाटले.
आपल्याला त्यांच्या इतर साहित्यातून माहित असलेले पुलं हे रसिक, मिश्किल, हजरजबाबी. तल्लख आहेत. त्यांचा विनोद निखळ आनंद देतो, तर कधी कोपरखळ्या मारून जातो. त्यांनी रंगवलेली पात्रे इतक्या वर्षांनंतरही वाचकांच्या मनात जिवंत राहिली आहेत. स्वतः पुलंनी सांगून ठेवलंय की लोकांनी त्यांना आठवावे तेच मुळी - “ ह्या माणसाने आम्हाला हसवले“ असे . पण हे पुस्तक वाचताना जाणवतं, या सर्व नितळ, निखळ आणि सात्विक विनोदाचा पाया मजबूत, भक्कम विचारसरणीत होता. विचारांच्या खोलीत होता. अफाट वाचनात होता. नीरक्षिर विवेकात होता. कदाचित म्हणूनच त्यांचा विनोद इतका टिकला. जिवंत राहिला.
‘एक शून्य मी’ वाचताना मला ते विनोदाच्या अलीकडले, पलीकडले बुद्धीची धार सतत पाजळती ठेवणारे, जे जे उत्तम आणि उदात्त आहे त्याचा ध्यास बाळगणारे, वाचनाचा व्यासंग जपणारे, नाटकावर मनापासून प्रेम करणारे, माय मराठी विषयी ममत्व वाटणारे, सुस्पष्ट विचार सुसूत्रतेने सडेतोडपणे मांडणारे, याआधी मी कधी न बघितलेले पुलं भेटले.
इथे ते सरळ परखडपणे मुद्दे मांडतात, त्रुटी दाखवतात, प्रसंगी चपराक बसावी, तसे त्यांचे ते शब्द क्वचित कधी आपल्या वर्मी बसतात, अस्वथ करतात. ते स्वतः शून्य होत जाताना बघताना / वाचताना, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या - आपल्याला रिते करत नेणाऱ्या हजारो गोष्टी, आपल्या डोक्यात थैमान घालू लागतात. ते रितेपण आपल्याला सुन्न करते, अर्थात त्याची परिणीती काही ठोस भरीव कामाने झाली तर .. !
प्रसंगा प्रसंगाने लिहिलेले हे लेख अनेक विषयांवर, महान व्यक्तींवर बेतलेले आहेत.
अत्र्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच मिळालेली अफाट लोकप्रियता, त्यांचा मोकळा-ढाकळा स्वभाव यांवर पुलंही भरभरून मुक्तहस्ताने लिहितात. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जयजयकार करणारे स्वतः त्याच जागी जेव्हा सत्यनारायणाची पूजा मांडतात त्याविषयी लिहिताना त्यांच्या लेखणीलाही धार चढते. भिंतीवर गांधीजींचा फोटो लावून त्यांची मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचा उद्धार करायला ते मागे पुढे बघत नाहीत. गांधीजी, विनोबा भावे यांच्या विषयी तितक्याच आदराने लिहताना लेखणी नम्र होऊन जाते.
मराठी माणूस ज्या तत्वांचा इतका अभिमान ( की दुराभिमान ?) बाळगतो, त्यातील बाळगणे आणि आचरणे यातील विसंगती, ‘मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस’ मध्ये थोड्या बोचऱ्या आणि रोखठोक मराठी बाण्यात सांगतात.
‘नाटक’ आणि ‘नाटकवेडा महाराष्ट्र’ मध्ये नाटककार पुलंनी महाराष्ट्राचे नाटक वेड दाखवून देताना, नाटक बघतो तेव्हा प्रेक्षकांची अनुभूती कशी असते. चांगले नाटक कसे असावे, ते कसे बघावे - असे त्यातील बारकावे समजावून सांगताना वाचकाला प्रेक्षक म्हणून समृद्ध केले आहे.
त्यातील शूरा मी वंदिले, नामस्मरणाचा रोग, संस्कार, एक शून्य मी असे काही लेख तर परत परत वाचुन समजून घ्यावे असे .
पुलंवर निस्सीम प्रेम करणाऱ्यानीं त्यांची ही फारशी (अलीकडच्या काळात ) प्रकाशझोतात न आलेली बाजू, त्यांच्या प्रतिभेचा हा पैलू जाणून घेण्यासाठी, ‘एक शून्य मी’ जरूर वाचावे.

October 20, 2017
This one is fantastic read. Thoughtful and highly intellectual insight of Pu LA can be felt right from page one. The chapters I liked the most are Gandhi, Time managment of Gandhi, Ladakh tour, How to behave when you are senior citizen, sanskar, Marathi manus etc.
Those who love such topics can go for it.

July 30, 2019
Good book
December 22, 2019
Miscellaneous articles by PL Deshpande. These are in comdey genre but on serious topics. It's a brilliant read. Heavily recommended.
June 15, 2020
PL as usual but this time on philosophical and realist.
May 31, 2022
Fantastic series of essay by PL on diverse topics
December 23, 2015
A pretty different take on.life by P.L. but as always he charms with intelligent discussion on life n its goals.... beautiful....
August 29, 2017
Its an awesome book, acclaiming and criticizing different social issues which writer came across. Some stories really make us introspect.
Displaying 1 - 15 of 15 reviews