What do you think?
Rate this book


202 pages, Paperback
First published January 1, 1966
" वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. "मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही" हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.
इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद्गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा "माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे," असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो."
"एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये त्याला काही उत्तर नाही.
पंधरा-पंधरा वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे होते भेटणे बोलणे होते पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत आणि काही माणसे एक क्षणभरात जन्मजन्मांचे नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणात नष्ट होतो.
तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी कशाचाही आधार लागत नाही.
सूत जमून जाते.
गाठी पक्क्या बसतात."
".....इतिहासातून राष्ट्राचे शील शोधायचे असते, तहाचा आणि लढायांचा तपशील नव्हे."