मी आज पहिल्यांदाच यांचं पुस्तक वाचलं. इतकं आवडलं, इतकं आवडलं, कसं सांगू तेच कळत नाही. खूप हसलो. पण तिथेच आज दुसरं आणखी एक पुस्तक वाचलं, पितृऋण म्हणून, खूप रडलोदेखील. मला Wonder पुस्तक वाचताना सुद्धा असंच वाटलं होत. तेव्हासुद्धा रडलो. मी तिघांचा अभिप्राय एकत्रच देतोय, कारण तसं आज लिहावंसं वाटलं. तिन्ही पुस्तक खूप सुंदर आहेत. म्हणजे हे असंच, तुम्ही जितकं हसाल तितकं रडणं तुमच्या आयुष्यात येणार, हे वैश्विक सत्य पुन्हा समोर आलं.