Prahlād Keshav Atre (Marathi: प्रल्हाद केशव अत्रे (13 August 1898 – 13 June 1969), popularly known as Āchārya Atre (Marathi: आचार्य अत्रे), was a multi-faceted Indian figure. He was a prominent Marathi writer, a poet, an educationist, a newspaper founder–editor of Maratha (a Marathi language daily whose head office and press was located at Coca-Cola gulley in Worli, Mumbai), a political leader, a movie producer–director–script writer and above all, a noted orator.
Atre's contributions to Marathi literature have been listed under Important works below. He was an outstanding humorist, and his writing style – whether he wrote humorous or serious material – was highly effective. He introduced parodistic poetry to Marathi language under the pseudonym Keshav Kumār. His book, zenduuchi Phule, is a collection of his parodistic poems.
Atre wrote seven plays; some of them had a humorous theme while others, a serious one. All of them received high public acclaim. His comedy-play, Moruchi Mavshi was later adapted into Hindi film, Aunty No. 1 (1998)
Atre's two autobiographical works, Mi Kasā Jhālo and Karheche Pāni, similarly received much public acclaim. Atre was the founder–editor of four Marathi newspapers.
Known for his straight forward views in his writing he was called 'Writer & Fighter of Maharashtra' by Former Indian President Dr.K.R.Narayanan.
Atre's worthy contributions in the Marathi movie world have been listed below. His movie Shyamchi Aai (1953) received an award as the National Film Award for Best Feature Film in 1953, while his movie Mahatma Phule (1955) received the President's Silver Medal.
A collection of satirical imitations of poems by P.K. Atre of poems by well-known Marathi poets, A landmark in Marathi literature of the first half of the 20th century.
it is hilarious and fun to listen to.
आचार्य अत्रे यांची सुप्रसिद्ध विडंबन काव्ये. "... काव्यात क्रांती घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रात परस्पर-प्रसंशा-संघ स्थापन झाले. तेव्हा त्यांचे ते नियम, ती ध्येये, त्या मंडळाच्या साप्ताहिक बैठका, तो नाविन्याचा व वैशीष्टाचा पोकळ अभिनिवेश, ते एका विषयावर अनेकांनी काव्य करणे, ते क्षुल्लक गोष्टींसाठीसुद्धा एकमेकांनी एकमेकांवर सकाळसंध्याकाळ स्तुतीचा वर्षाव करणे, तसेच कोणी आपण समोर असतांना केशवसुतांना कवि म्हणणेच रास्त नव्हे, असे म्हणावे, तर कोणी गोविंदाग्रज केवळ बुद्धीवर जगले - त्यांना हृदय नव्हते असा निर्वाळा द्यावा; कोणी नव्या प्रकारच्या खाणी खोदाव्या तर कोणी छंदाच्या आणि शब्दांच्या टांकसाळी घालाव्या; एक ना दोन अशी निरनिराळी सोंगे घेऊन ही कविमंडळी वाङ्मयात घुमाकूळ घालू लागली. म्हणूनच मला विडंबनाचे हत्यार उचलावे लागले." -- आचार्य अत्रे यांची "उपहासिनी"साठी प्रस्तावना यातून.
"बोलूनचालून 'झेंडूची फुले'! यांना वास तरी कसला आणि रंग तरी कसला? मोहक फुलांच्या सुवासासाठी हपापलेली रसिकता या बिनवासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री आहेराचा कसा स्वीकार करणार? उलट तिच्या भा- वनेची कोमलता दुखावल्याचा उद्धटपणा केल्याचे पाप मात्र पदरी यायचे! तरीपण वाङ्मयाच्या वरातीत कोतवाली घोड्याप्रमाणे पुढे पुढे नाचणार्या घोडकवींच्या गळ्यांत सणां- सुदीचे दिवशी माळा करून घाला- यला जरी ही 'झेंडूची फुले' उपयोगी पडली तरी लेख- काला आपल्या श्रमाचे सार्थक झल्यासारखे वाटेल!
It is a parody on various poems in the 1930s-40s. It has preface by N.C.Kelkar. The parodies are hilarious though some are now outdated. However, it is very funny and intelligent and immensely enjoyable.
विडंबन काव्य म्हणून प्रसिद्ध असलेलं अत्रेंचं हे पुस्तक मोठ्या आशेनं वाचायला घेतलं खरं, पण सुमारे ७७-७८ पानी प्रस्तावना पाहूनच पुस्तक वाचावेच की नाही असं झालं.. तरीही प्रस्तावनेची साधारण तीसेक पानं मी वाचली, आणि अखेर कंटाळून ती तशीच अर्धवट टाकून मूळ कविता वाचायला सुरूवात केली. सुरूवात तशी छान झाली, “कवी आणि चोर” मला आवडली. पण नंतरच्या कविता जरा जडंच गेल्या समजायला.. “श्यामले” त्यातल्या त्यात चांगली, पण थोडी चावट वाटली. “नवरसमंजरी” मधील ‘ वीररस, करूणारस, रूद्ररस’ एकदम छान वाटले👌🏼; तर ‘हास्यरस’ कळलाच नाही..😅 “कवी आणि कारकून” आवडली ; तर “मम बावाची ती आवा” काहीच कळली नाही..
यातील “आम्ही कोण” ही विडंबन कविता बहुतांश लोकांना माहित असेलंच.. मूळ कविता आणि ही विडंबन कविता शाळेच्या मराठीच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते…
खूप साऱ्या कविता छान वाटल्या, पण कदाचित मूळ कविता जास्त माहित नसल्याने असेल, वाचताना फारशी मजा आली नाही.. अगदी खळखळून हसूही नाही आले. पण शेवटी शेवटी राजकारणी लोकांचे ज्या पद्धतीने अगदी वाभाडे काढले आहेत, ते पाहून अत्रेंचे कौतुक वाटले. आत्ताच्या राजकारण्यांवर अशा पद्धतीने लिहिणे सोडा, बोलण्याचेही धारिष्ट्य सापडणे अवघड आहे, मग विडंबनाबद्दल तर न बोलणेच उत्तम!
असो, पुस्तक तसे चांगले आहे, पण कवितेची ज्यांना चांगली जाण आहे, आणि ज्यांना मूळ कविता माहित आहेत, त्यांना हे पुस्तक जास्त आवडणार, यात शंका नाही. पण कवितांची साधारणच माहिती असणाऱ्यांनी खूप मनोरंजन होईल अशी अपेक्षा करू नये!😅