Each story examines personal relationships in people's lives - people they are bound to becausae of kinship, but who they want to break away from beacause they are essentially meaningless. The stories are a strong reflection of the kind of life the author himslf led.
G.A. Kulkarni or simply "GA” was a legendary Marathi writer of short stories.
GA, who bought new strength and vitality to the Marathi short story, is admittedly the most distinguished exponent of that genre. He did not subscribe to the cause of modernism in literature. He charted his own separate course and cultivated new acuity and taste for a class of faithful readers.
GA created a world of his own in his short stories where his characters are in pursuit of the unknowable destiny. A dark mode reflects the inscrutable ways in which destiny shadows his characters. His use of symbolism, allegory and irony provides his stories a unique texture and ethos. His world encompasses a wide diversity of locales, situations, characters and experiences. The mythic, allegorical experiences make it difficult to sort out the realities from the dreams, themes, and meditations. Yet, it is possible for the reader to identify with is characters, places, and experiences because of his keen observation of human, animal, and social worlds in their beauty and deformity.
Critics observe that characters in GA’s world are multifaceted, but they are not independent. They lead their lives as if they are puppets guided by an unseen hand are unable to change the direction. Why they follow that path to their demise or why they cannot change it by their volition is not known. In that sense, his work is a reversal of direction fostered by the modernist short story in Marathi. GA's earlier short stories depicted the tragic and cruel aspects of human situation.
जी ए कुलकर्णी ह्यांच नाव ऐकून होतो. बरेच दिवस त्यांच एखाद पुस्तक वाचाव अस मनात होत. मग हल्लीच पुस्तक खरेदीलाला जाण्याचा योग आला आणि तिथे जरा चौकशी करून हे पुस्तक उचलल. जीएच लिखाण थोड वेगळ्या धाटणीच आहे आणि सर्वांना रुचेल अस नाही. पुस्तकाची पहिली काही पानं वाचतानाच त्याचा प्रत्यय आला.
जीए समाजाकडे एका विशिष्ट दृष्टीने पाहतात. त्यांच्या नजरेत त्या व्यक्ती दिसतात जा सहज नजरेत भरत नाहीत. म्हणजे वास्तवात जगताना आपण अनेकदा प्रतिथयश आणि लोकप्रिय व्यक्तींकडे ओढले जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वाची भूल पडते आपल्याला. त्यांच्या कहाण्या सगळेच लिहितात. अशी माणस मनावर राज्य वगैरे करतात. त्यांच्या छान कहाण्या असतात, त्यांना सुखांत असतात. पण ह्या अश्या कहाण्या बऱ्याच असतात. जीए ज्यांच्याबद्दल लिहितात ती माणस समाजात अगदी पैशाला पाच मिळतील पण त्यांच्या बद्दल कोणी फारस लिहिताना दिसत नाही.
त्यांची कथानके दैववाद आणि निष्क्रियता ह्यांचा संगम आहेत असं वाटत. म्हणजे अठराविश्वे दारिद्र्य असेलच असं नाही, पण दुर्दैव नक्कीच. ह्या दुर्दैवाची जबाबदारी त्यांच्यावरच. कधी कुणाचा भूतकाळ तर कधी कुणाचे चुकलेले निर्णय. परिस्थितीवश हतबलता त्यांच्या लिखाणात जागोजागी आढळते. सलग बऱ्याचकथा वाचल्या कि उगीच जग भकास वाटू लागतं.
त्यांनी वापरलेल्या उपमा त्यांच्या लेखनशैलीला आणि कथावस्तूला अतिशय साजेश्या असतात. एक वेगळीच दृष्टी त्या माणसाला मिळाली होती की काय असं वाटल्याखेरीज राहवत नाही. पण तरी पुस्तक आवडलं का ह्याचं पक्क उत्तर सापडत नाही. मी जीएचं लगेच दुसरं पुस्तक वाचणार नाही हे नक्की.
goodreads या वेबसाईट वर एका वाचकाची ओळख झाली आणि तिने मला सुशी, धारप आणि जी ए सुचवले. शिरवळकर याचं नाव ऐकून होतो पण जी ए याचं नाव कधी ऐकलेलं नाही. मी जर चूक नसेल तर, त्याचं लिखाण पाठ्यपुस्तकात पण कधी मिळालं नाही. त्यामुळे असेल कदाचित, पण त्याचं रक्तचंदन हे पुस्तक सुरु करण्या अगोदर मी थोडा साशंकच होतो. आणि पहिली कथा वाचली... प्रेमात पडलो न राव! एका दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या या सगळ्या कथा... तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतात.
**possible SPOILERs ahead***
पहिली कथा: एका बायकोने आपल्या पतीसाठी केलेला त्याग, नंतर एक आईने आपल्या मुलीचे तिच्या (अर्ध) भावासोबत लग्न होऊ न देण्यासाठी आपल्याच मुलीसाठी जन्मभराचे वैर, मुलाचे सुख साधण्यासाठी मुलीला जे ऐकायला मिळाले पाहिजे तेच बोलणारी आई... आणि दुसरीकडे आपल्याच आईवर राग ठेऊन बसलेली मुलगी यांच्या संघर्षात होरपळून निघणारा मुलगा... आजही तुम्हाला कोण बरोबर आणि कोण चूक याबाबतीत एकमत होऊ देत नाहीत.
दुसरी कथा: जन्मभर आपणच आपल्या मुलीचा खून केला असा स्वतःलाच दोष देणारा डॉक्टर, आणि ज्याने प्रत्यक्ष खून केला त्याच्यासोबत राहणारी त्याची बायको... मनाला विषण्ण करून जातात.
तिसरी कथा: घरातला नावडता मुलगा सगळं सहन करूनही जेव्हा सहन होत नाही तेव्हा मोठ्या आशेने घर सोडून एकट्याने जगाला सामोरे जाण्याच्या प्रयत्नात तुम्हाला एक अशा देऊन जातो.
चौथी कथा: नवऱ्याला वेड्याच्या इस्पितळात ठेऊन स्वतःच्या जीवावर गावातल्या लोकांचे टोमणे ऐकत ऐकत टिच्चून जगणारी राधी आणि तिला परोपरीने मदत करणारे आबा आणि गणेशवाडी भट माणुसकी आणि गावातली असंवेदनशीलता यांच्यातला संगम दर्शवतात.
पाचवी कथा: एकाचा वर्तमान काळ आणि दुसऱ्याचा भूतकाळ आणि त्यावरून दिसणारा पहिल्याचा भविष्यकाळ यांचे वर्णन विश्वनाथ आणि निकम सर यांच्याद्वारे दिसून येतो. एखादी गोष्ट जर जात दाबल्या गेली तर तिचा विस्फोट होतो हेच जणू लेखकाला दाखवून द्यायचे होते.
सहावी कथा: आळशी माणसाच्या जीवनात कुत्र्याचे हाल होतात हेच जणू धडल बंडाचार्य सांगून जातात.
सातवी कथा: आपण जीवनभर केलेल्या उपकाराचा पेन्शन म्हणून वापर करता येत नाही, कारण लोकांना उपकाराची जस असावी हि अपेक्षाच मुळी अवास्तव आहे. cliche: पुरुष जर स्त्रीला आवडत नसेल आणि त्याने तिच्यावर हात टाकला तर लेखकाला त्याचे पिवळे दात, तंबाखूचा वास आणि दारू आणि सिगारीच्या धुराचा किळस दिसतो. आणि तेच जर आवडता पुरुष स्त्रीवर चाल करून येत असेल तर आफ्टर शेव चा सुगंध, दारूची मादकता वगैरे अलंकार सुचतात. इथे जी ए पण त्याला अपवाद नाहीत.
आठवी कथा: तीस वर्षाची मेहनत फक्त रुढीप्रियतेमुळे म्हणा किंवा अद्ययावत न केल्यामुळे म्हणा, एक दिवस तुम्हाला जगाच्या स्पर्धेतून कशी बाद करते याचे उदाहरण सदुभाऊच्या गोष्टीतून दिसून येते.
** Possible SPOILER*** या आठही कथातून तुम्हाला दुखीः, कष्टी, दयनीय आणि जीवनाच्या आगीत होरपळून निघालेल्या पण तुमच्या ओळखीतल्याच माणसाशी परत भेट होते. त्यापैकी एखादा अगदी तुमच्या भूतकाळाची आठवण पण करून देईल आणि मला वाटते कि यातच जी ए यांचा यश सामावलं आहे.
Wow!!! This book brings me "Radhi" in my life! Chandan smell never goes and when it comes to your blood it will always there. These are stories which tell you how people come to your life and they stay forever in your heart. Every character of every story is important! that's magic of GA, they don't have lead characters in this book, all characters in each story are leading the story. One character leaves the smell behind their entire life, that's how Chandan works.
Thank you GA for giving me 'Radhi', there was someone in my life who loves me like her. She didn't die but we are not in contact now.
If you like tragedies and stories which pull emotional strings this book is for you. This book has collection of such short stories. Author picked characters around us which are often neglected and unnoticed. Provided stage to such characters showed their other side which has deep sorrow in it.
अनेक वर्षांपासून कधीतरी जी.ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकाला हात घालावा असा विचार करीत होतो. पण विनोदी आणि विस्मयकारक प्रकारच्या कथा कादंबऱ्यामधे रमणाऱ्या मला ते प्रत्यक्षात उतरवायला वयाची चोपन्न वर्षे वाट पहावी लागली. पुस्तक ऍमेझॉन ऍप वर विकत घेतले आणि थोडे वाचून तर थोडे ऐकून काढले. जीएंची प्रतिभा पाहून थक्क झालो. आजपर्यंत आपण यांचे लिखाण का बरे वाचले नाही हा प्रश्न मनोमन पडला. पराभव, सोडवण, जन्म, राधी, पुरुष, लई नाही मागणे, वस्त्र आणि माघारा अश्या आठ कथा यात समाविष्ट आहेत. साऱ्या कथा साधारण सारख्या लांबीच्या आहेत. या कथांमध्ये उजवेडावे करणे खूप कठीण आहे.
प्रत्येक कथेत अनेक माणसे आहेत. या माणसांचे असणे याला सतत इतर माणसांचा आणि एकूण परिस्थितीचा सदैव संदर्भ आढळतो. ढोबळ मानाने कथा दुःखाकडे कल असलेल्या आहेत. परिस्थितीने आणि नियतीने माणसाला अगदी सहजपणे शरण आणल्याची वर्णने संपता संपत नाहीत. यातील पात्रांच्या दुर्दैवाचे दशावतार वाचताना काळीज पिळवटून निघते. एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याला लोकांनी कसे मारले याचे वर्णन देखील वाचताना एखाद्या सिद्धहस्त भयकथा लेखकाला जमणार नाही अशी भीती आणि किळस उत्पन्न करणे लेखकाने साध्य केले आहे आणि तेही अगदी कमी शब्दांत. कुठलेही अतिरंजित वर्णन किंवा उत्कंठावर्धक कथावस्तू नसतानाही, या सोलून उघड्या केलेल्या माणसांत आणि त्यांच्या प्रारब्धात आपण इतके गुरफटून जातो की आपण कथेचा एक भाग होतो. इतक्या जुन्या काळातील वर्णनात देखील ती माणसे आणि त्यांच्या सवयी, त्यांची पीडा, त्यांचे चुकलेले फासे , त्यांची ससेहोलपट हे आपल्याला जवळचे वाटतात. लेखकाने रुपकांचा वापर विलक्षण सामर्थ्याने केला आहे. “आपल्या सगळ्यांचेच हे असे आहे. स्वप्नाला स्पर्श झाला, की त्याचे रंग उडतात, त्याचे किडके दात दिसतात. वासनेला ओठ लावले, की तिची धुंदी उतरून ती पायांत घोटाळणारी एक कंटाळवाणी सवय होते.” अशी रांगड्या भाषेतील वाक्य आयुष्याचे तथ्य सांगण्यासाठी सहजपणे येतात. या कथांमधील माणसे स्वार्थी, लोभी , क्रूर, अनाचारी, दुष्ट असली तरी त्यांचे माणूसपण खरेखुरे वाटते. या प्रवृत्ती स्थायीभाव वाटतात. जी काही सुष्ट आणि सज्जन अशी माणसे आहेत त्यानी नशीबापुढे सपशेल लोटांगण घातले आहे. मला कथा लागोपाठ वाचता आल्या नाहीत. एक कथा संपली की ती पचवायला मला वेळ घ्यावा लागत होता. मला आवडलेली कथा आहे क्रमांक 8 ची. माघारा ही कथा वाचताना अनेकदा डोळ्यात पाणी आले. प्रमुख पात्राची असहाय्यता मनाला भिडली. मी या पुस्तकाला पाच स्टार दिले आहेत. आता निदान आठवडाभर तरी दुसरे पुस्तक वाचणार नाही.
अतिशय सुंदर पुस्तक. कुलकर्णी यांनी मानवी स्वभावाचे निथळ दर्शन खूप सहज आणि विदारक रूपात मांडले आहे. काही कथा मनाला भिडून जातात. नक्की वाचावे असे पुस्तक.