What do you think?
Rate this book


182 pages, Paperback
First published January 1, 1994
"
पुस्तक वाचणं, टेबलाकडं बसून लिहिणं आणि इकडंतिकडं सहलीला जाणं या सगळ्यांत आमचे बाबा म्हणजे नंबर एक ! बाबा पुस्तक वाचत असले की मग गंमत येते कधी कधी. पुस्तक तोंडासमोर धरून ते घरात कुठंही आणि केव्हाही बसलेले असतात. कुठं की दूर गेल्यासारखे. त्यांच्या त्या पतंगासारखं त्यांच्यासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं,
"बाबा, चहा घ्या."
"तिकडं कपाटात आहे..." ते नक्की म्हणणार.
"बाबा, आंघोळीला चला."
"ठेव तिकडं..."
मग आई स्वैपाकघरातून म्हणते,
"अहो, सकाळी उठल्या उठल्याच आंघोळ झाली आहे तुमची."
"येताना घेऊन येतो," बाबा म्हणणारच.
" मी म्हणजे पत्ते खेळणार नंबर एक. मला खूप डाव येतात. पण लेडिस म्हणजे मला एकदम आवडणारा. दोघादोघांची टीम, पहिल्यांदा चारचारच पत्ते वाटायचे, ज्याची पाळी असेल त्यानं हुकूम बोलायचा. मग उरलेली चारचार पानं वाटून खेळायला सुरुवात.
दिसायला एकदम साधा, सरळ आणि सोपा, कंटाळवाणा, पण हुकूम बोलण्यातच सगळी मजा असते. आधी तो फक्त चारच पानांवर बोलायचा असतो. उरलेली पानं हुकूम बोलल्यावर मग मिळणार. त्यामुळं हुकूम बोलायच्या आधी आपल्या मिडूकडं कोणकोणती पानं आहेत हे समजणं महत्त्वाचं, भिडू बावळट असेल तर काय त्याच्याकडं कोणकोणती पानं आहेत ते जीव गेला तरी समजायचं नाही. पण भिडू गोष्टीतल्या मुला-मुलींसारखा चाणाक्ष, चतुर, चलाख असेल, तर मग मात्र काही विचारू नका, मजाच मजा, भिडू आणि आपण दोघं नसून एकच आहोत, आपल्या हातात चार पानं नसून आठ पानं आहेत, असंच होतं. मग आपण कायम जिंकणारच. दगडावरची रेघ की काय, तेच."