The author being an intent admire of Ravindranath Tagore, visits Shantiniketan. The book describes the visit,the Shantiniketan,its people,their lifestyle,work of Ravindranath Tagore,his philosophy and above all, the intense effect this world casts on author,in an encounter with his own ideology and philosophy of life...!
पुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
एखादी नवी भाषा शिकणं म्हणजे मजेशीर प्रवास असतो. भाषा हे संपर्काचं माध्यम,त्यामुळं भाषाशिक्षण हे फक्त पुस्तकापर्यंत मर्यादित न राहता तिला दैनंदिन संभाषणात वापरणंही तितकंच महत्त्वाचं !अ
तसंच ज्या प्रदेशात ती बोलली जाते तिथला भुगोल, तिथली संस्कृती, समाजजीवन, राहणीमान, खानपान, इतिहास साऱ्याची माहिती ठेवणं हे ही ओघानंच आलं,म्हणूनच तो अनुभव रंजक असावा,हे नक्की !
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.लं नी बंगाली शिकायचा वयाच्या पन्नाशीत बांधलेला चंग व त्या अनुषंगाने त्यांना आलेल्या अनेक गोडकटु अनुभवांचा लेखाजोखा म्हणजे “वंगचित्रे”. तसं पाहिलं तर हे नुस्तं प्रवास-वर्णन नसुन, भाषा शिकण्याच्या मिषाने थेट बंगालात तीन महिने राहुन तत्कालीन बंगालची परिस्थिती, शांतिनिकेतन, तेथील वातावरण, नोबेल पुरस्काराने सन्मानित गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांचं जीवन, कार्य,साहित्य व कलेतील योगदान, भेटलेली अनेक लहान-मोठी माणसं, भाषा शिकताना होणारी कसरत, चालीरीती, बंगालमधे वाढत जाणारा माओवादाचा पगडा व बदलती सामाजिक समीकरणं असा जवळपास पन्नास वर्षापुर्वीच्या बंगालचा चौफेर परामर्श घेतला आहे.
एका पानावर लाल क्रांतीत जळणारा बंगाल “घरांच्या भिंती इंच न इंच काळ्या डांबरी रंगात कम्युनिस्ट क्रांतीच्या घोषणांनी चितारल्या होत्या” असं भगभगीत दृश्य की लगेच पुढच्या पानावरचं “बंगाल्यांना पाळण्यातले एक नाव असते आणि एक हाक मारायचे डाकनाम….आपल्या मुलीला नायलॅान या डाकनामाने हाक मारलेली ऐकुन मी थंड झालो” असे निखळ विनोद.अशा सौम्य सामाजिक, सांस्कृतिक खाचखळग्यांतुन आपला प्रवास सुरु होतो.
गुरुदेवांबद्दल बोलताना ते एके ठिकाणी म्हणतात “जवळपास तीन हजार गीते, नाटकं,कथा,कादंबऱ्या,निबंध,प्रवासवर्णने,हजारोंच्या संख्येने लिहिलेली पत्रं,नृत्य,नाटकं बसवली, त्यात भुमिका केल्या, गायलेही, शेकड्यांनी चित्रं काढली,विश्वभारतीसारखी ‘वन-मॅन-युनेस्को’उभी केली.ग्रामोद्योग,शेती,वैद्यक,हॅंडीक्राफ्टस,भाषणं,नवनवीन इमारती बांधणं व सतत पायाला चक्र लावल्यासारखा जगभर प्रवास.स्वत्व हरवलेल्या भारताला त्याचा “आत्मा”शोधून दिला.बंगालला नवी बंगाली भाषा दिली व हे सर्व स्वकीय-परकीय विरोधांना तोंड देत” यावरुन रविंद्रनाथांच्या कामाचा आवाकाच लक्षात येतो.गुरुदेवांबद्दल या पुस्तकात एवढं लिहलंय की त्यासाठी एक वेगळाच लेख लिहावा लागेल.
पु.लं ची तीच खुमासदार नर्मविनोदी शैली, बंगाली आत्मसात करताना त्या भाषेची सौंदर्यस्थळं अगदी तिच्या वळणदार लिपीपासुन संस्कृतप्रचुर शब्दसंभारापर्यंत, कितीतरी शब्दांचे मायमराठीशी असलेले साधर्म्य, तर काही धक्कादायक विरोधाभास, वानगीदाखल (मराठीतला ‘सत्कार’ बंगालीत ‘अंत्यविधी’ होतो),वाचताना गंमत वाटते.
उपसंहाराची दोन पानं सर्व चित्रांमधला रंग बेरंग करणारी वाटतात खरी, तरी त्याआधीच्या दोनशे पानांनी मनावर कोरलेली विविधरंगी ‘वंग’चित्रे काही केल्या पुसली जात नाहीत.
ती कायम लक्षात राहवीत अशीच आहेत !
युरोप प्रवासाची “अपुर्वाई” यांत नसेल, उगवतीचे भुलवणारे “पुर्वरंग”नसतील, पण आपल्या भारतभूला जगदीशचंद्रांपासुन ते सुभाषचंद्रांपर्यंत, शरदबाबुंपासुन ते विवेकानंदांपर्यंत, विज्ञान, कला, अध्यात्म, राष्ट्रसेवा अशा विविध क्षेत्रांत एकापेक्षा एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वं देणाऱ्या एका सुंदर प्रांताचं मनोज्ञ चित्रण यात आहे.
गुरुदेवांचं कार्य, ८० च्या दशकातलं बंगालचं पालटतं रुप, भाषेच्या गमतीजमती, आणि पु.लं च्या खास शैलीतील खुसखुशीत विनोद यामुळे असेलच, पण, “आपल्या” मातीतलं आहे म्हणुन “वंगचित्रे” मला खास वाटतं.
Its a book very different from his usual style of writing. Nonetheless its a rare gem. Such beautiful poetic description of beautiful Bengali ppl , their culture, and land . The helpless pain of seeing the degradation of heritage @ Vishwa Bharati. The entire description just flows naturally , smoothly touching every aspect of Benagl and Rabindranath Tagore's life
खूप सुंदर! बंगाली समाज, संस्कृती, भाषा याचं खूप सुंदर वर्णन. १९७०-७१ सालच्या बंगालमधील राजकीय परिस्थिती बद्दल आणि रविंद्रनाथांच्या कार्याबद्दल देखील लिहिले आहे. #MustRead