डाॅ. श्रीराम लागू ॲक्टर म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहितीयेत पण ते लेखक आणि एक माणूस म्हणूनही किती अफलातून आहेत हे ‘लमाण’ वाचून समजतं. लागूंनी त्यांचं संपूर्ण करीयरच ह्या पुस्तकाद्वारे आपल्यासमोर मांडलंय. टिपीकल आत्मचरित्रांप्रमाणे लहानपणाच्या घटनांवर जास्त वेळ न घालवता आपल्या तरूणपणाच्या स्ट्रगलवर आणि डाॅक्टर की ॲक्टर ह्या द्विधा मन:स्थितीवर लागू सुरवातीच्या काही पानांतच येतात त्यामुळे कुठेही हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही.
लागूचे कॅनडा, लंडन, आफ्रिका ह्या देशांतले अनूभव एकदमच बाप. कॅनडाला असताना वीकेंडला कसरत करून न्यूयाॅर्कला येउन ब्राॅडवेवरची नाटकं बघणं, इथल्या ॲक्टर्सची नाट्यव्यवसायाबाबतची शिस्त ती भारतातल्या नटांना नाही ह्याबद्दल वाटणारा खेद वगैरे गोष्टी तर खूपच भन्नाट लिहिल्यायत.
नंतर पूर्ण वेळ व्यावसायिक नट झाल्यावर त्यांनी नट म्हणून हाती घेतलेले नाटक-सिनेमे, वेगवेगळे नाटककार, डायरेक्टर, त्यांची नाटकं, त्यावर आपली मतं लागूंनी बिनधास्त लिहिलीयेत. नाट्यनिर्माते तसेच प्रेक्षकांकडून त्यांची काशिनाथ घाणेकरांबरोबर होणारी तुलना, त्यावर त्यांचं स्वत:चं स्वत:बद्दलचं ॲनालिसिस लागूंनी फारच रंजकपणे मांडलं आहे. तसेच प्रभाकर पणशीकरांसोबत काम करताना आलेले अनूभव, पारंपारिक नाटकं सोडून नव्या ध्यासाची प्रायोगिक नाटकं करण्यासाठीचा त्यांचा आवेग, नट म्हणून काम करताना स्टीरीओटाईप न होता सतत वेगळं काही करण्याचा त्यांचा हव्यास ह्या गोष्टी पुस्तकाला वेगळीच उंची देतात.
ह्याचप्रमाणे आपण काही निर्णय घेताना काही व्यक्तींबाबत चुकलो हे लागू कबूल करतात. वयाच्या ७३ व्या वर्षी म्हातारपणामुळे डायलाॅग मध्येच विसरायचो त्यामुळे ‘सूर्य पाहिलेला माणूस’ नाटकासाठी प्राॅंप्टर ठेवायचो हे ही (अगदी प्राॅंप्टरच्या नावासकट) बिनधास्त लिहून मोकळे होतात. त्यामुळे कुठेच हे पुस्तक कृत्रिम वाटत नाही. मनाला जे भिडलं ते लागूंनी कुठलाही मुलाहिजा न ठेवता लिहीलं असं वाटतं.
त्यातल्या त्यात खटकलेली गोष्ट म्हणजे २-३ ठिकाणी क्रोनोलाॅजिकल आॅर्डर थोडी चुकलीये. १९६७ चा एक प्रसंग येतो मग १९७० आणि मग अचानक १९६०. त्यामुळे थोडी लिंक बिघडते पण पुस्तकाच्या दर्जाच्या दृष्टीने ही अगदीच माामुली गोष्ट!
राजकारण-सत्ताकारण आणि नाट्यक्षेत्र, त्यामुळे बदलत जाणारी प्रेक्षकांची अभिरूची हे नवं अंग ह्यानिमित्ताने मला समजलं. म्हणजे बाबरी मशीद आणि नंतरची दंगल, राजकीय कुरबूरी.. दरम्यान झालेला टीव्ही माध्यमाचा प्रसार ह्यामुळे मध्यमवर्गीय प्रेक्षक क्षणिक चंगळवादाकडे, थिल्लर काॅमेडीकडे कसा झुकत गेला ह्यावर लागूंनी खूप सविस्तर लिहिलंय. दुसऱ्या महायुद्धानंतर असा क्षणिक चंगळवाद युरोपमध्येही बळावला होता. राजकीय अस्थिरता आली की फक्त नाटक-सिनेमाचा दर्जाच नाही तर प्रेक्षकांचीही अभिरूचीही कशी खालावते हे लागूंनी खूपच सुंदरपणे समजावून सांगितलंय.
नुकताच ‘नाथ हा माझा’ वरून ‘आणि.. डाॅ. काशिनाथ घाणेकर’ मूव्ही रीलीज झाला. डाॅ. लागूंसारख्या मनस्वी स्टारवर कधी पिक्चर येतो ह्याची आता वाट पाहतोय. 🙂
रंगभूमी, चित्रपट गाजवणारे उत्कृष्ट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे 'आत्मचरीत्र' म्हणजे 'लमाण'. खरं तर डॉ. लागूंनी सांगितल्याप्रमाणे हे त्यांचे चरीत्र नसून त्यांच्या नाट्यप्रवासाचा आढावा आहे त्यामुळे पुस्तकात त्यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलणे ते टाळतात. जुजबी वैयक्तीक माहिती सोडल्यास संपुर्ण पुस्तक हे नाटकाभोवतीच फिरते. मेडीकल कॉलेजचा विद्यार्थी ते पी.डी.ए, रंगायन या सारख्या नाट्यसंस्थांमध्ये हौशी नट असा सुरू झालेला प्रवास असा पहिला टप्पा म्हणता येईल. नंतर मग पुढील शिक्षणासाठी केलेली परदेशवारी हा दुसरा टप्पा. डॉक्टरी व्यवसायासाठी त्यांचे वास्तव्य कँनडा, टांझानिया व लंडन येथे झाले त्याचे प्रवास वर्णन व अनुभव ईतक्या सुंदररीत्या व मजेशीर लिहिले आहेत की त्यावर एक स्वतंत्र पुस्तक ते छापू शकतात. वरकरणी गंभीर वाटणारे लागू काही प्रसंगात फारच मिश्कील व खट्याळ भासतात. व शेवटचा टप्पा म्हंजे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी डॉक्टरकी सोडुन पुर्णवेळ व्यावसायिक नट होण्याचा घेतलेला निर्णय आणि मग त्यानंतर रंगभूमी, सिनेमा यामध्ये बहरलेली त्यांची कारकीर्द. नटसम्राट, गिधाडे, ईथे ओशाळला मृत्यु, हिमालयाची सावली यासारख्या उत्कृष्ट कलाकृतींबद्दल अत्यंत मौलिक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. पिंजरा, सामना यांचा अपवाद वगळता सिनेमाबद्दल मात्र फार कमी लिहिले आहे त्यांनी. फक्त नाटकच नाही तर सेन्सॉरबोर्ड, आणीबाणी यावर पण आपलं मत परखडपणे व्यक्त करतात ते. थोडक्यात सांगायचे एका उत्कृष्ट नटाचे नाटकाभोवतीच फिरणारे तितकेच उत्कृष्ट पुस्तक म्हणजे लमाण.
Exceptionally narrated autobiography of Sreeram Lagoo. Eloquent, impeccable, and deeply engaging - this book tells the tale of this Doctor turned Actor by taking us on a walk inside his brilliant mind. The anecdotes invoke laughter, sympathy, empathy and most of all a passion for theatre and cinema in even those who are far from the domain - such is Lagoo's love for the art; it's contagious. There's very little about his family and children, which also answers some questions it begets.
I read this book on the recommendation of Naseeruddin Shah by getting my father to read it in Marathi and then elaborate it to me. The entire experience has been a memorable one!
This book begins with Dr. Lagoo’s childhood and college years, highlighting his introduction to theatre. It then explores his exposure to the Western world through his medical career, before tracing his lifelong journey in theatre upon his return to India.
If you are a drama enthusiast and are familiar with the Marathi theatre, this book is a treat.
You get to see Dr Lagoo as a person and a philosopher in the first half, and Dr Lagoo as an experimental artist in the second half.