Bhalchandra Vanaji Nemade (born 1938) is a Marathi writer from Maharashtra, India. He is famous for his books Hindu and Kosala. Also he is known for his novel Hindu jagnyachi samrudhha adgal. He is a recipient of the civilian honour of Padma Shri (2011) and the Jnanpith Award (2014).
बऱ्याच इंग्रजी कादंबर्या, ग्रंथ वगैरे वाचल्या नंतर एकादी मराठी कादंबरी वाचावी असा विचार चालू होता, पण नक्की कोणती वाचावी हे पक्के होत नव्हते. काही वर्ष्यांपुर्वी ‘कोसला’ या कादंबरीचे अर्धवट ध्वनिमुद्रण मी ऐकले होते आणि ते खूपच भन्नाट वाटले होते म्हणून मी ;कोसला’ वाचायचे नक्की केले.
कोसालाची सुरवात खूपच मजेशीर आहे उदाहरणार्थ,वगैरे,आता हे नवीनच आणि आणि हे भलतच अश्या मस्त वाक्यांनी धमाल उडवली आहे. जर तुम्ही पुण्यात शिकला असाल आणि तुमच्या वर्गात बाहेत गावाकडून आलेली मुले असतील तर मग हि कादंबरी तुम्हाला खूपच जवळची वाटेल. कोसला हि कथा आहे १९६० च्या पिढीतील पांडुरंग सांगवीकर या तरुणाची, हे त्याच आत्मचरित्रच आहे असा म्हटले तरी चालेल. पांडू/पंड्या हा एका खेड्यातून पुण्यामध्ये शिकायला येतो. शहरातील गोष्टी, शहरातील लोकांचे वागणे इत्यादी बद्दलचे त्याचे निरीक्षण आणि त्याचे याच्या वरचेभाष्य खूपचमजेशीर आहेत.
अभ्यासाची वेळापत्रक करण्याचे त्याचे प्रयत्न, कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याच्या उठाठेवी, काही अंगलट आलेले प्रयत्न, होस्टेल, वेताळ टेकडी आणि टेकडी वरील यांच्या भटकन्त्य, सिगारेट,चहा, कॉलेजच्या मुली, पुण्यातले नमुने मित्र आणि विद्वान प्रोफेसर लोक इत्यादिमुळे पुस्तक कधी अर्धे संपते ते काळात पण नाही. काही प्रसंग खूप मजेशीर आहेत पण खूप काही सांगून जातात. माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे पांडुरंग आणि सुरेश यांच्या मधील बोलणे. प्रत्येक गोष्टीची व्याख्या करताना त्यांनी विडंबन मस्त केले आहे.
पुस्तकाच्या कल्पना आणि मांडणीला तोड नाही. पुस्तकाच्या शेवटचा काही भाग मात्र अनावश्यक आणि थोडा कंटाळवाणा वाटतो. पुस्तकाच्या शेवटाबद्दल मात्र मला काहीच तक्रार नाही.एकूणच आजही पुण्यात शिकायला येणाऱ्या प्रत्येकाने कोसला वाचले पाहिजे .
कोसला वाचून संपलं..पण मनात अस्वस्थता आणि डोकं भणभणतं सोडून! माझं वाचन तितकं पुरेसं नाही म्हणून की काय पण कोसला जड वाटलं.
कोसला वाचल्यानंतर समाधान मिळण्याऐवजी अस्वस्थता अजून वाढली. मेंदू अजून काहीतरी शोधत होता किंवा मेंदूच्या अपेक्षा अजून वाढल्या. कोसलाने अगणित प्रश्न निर्माण केले.कोसला प्रत्येक मध्यम वर्गीय मनाचं किंवा पांडुरंग प्रत्येक मध्यम वर्गीय तरूणाचं प्रतिनिधित्व करतोय असं वाटलं..
Lovely narrative. Its more like episodic book. Some reader may not like it. Someone wrote this 50 years ago and its still feel the same. I can imagine how beautiful it must be in Marathi.
Hailed as one of the path breaking modern novel emerged from post independence Marathi literature, Kosla (Cocoon) is episodic first person narrative, rounded off with plot, it sketches the life of its disillusioned protagonist Pandurang Sangvikar, the man trapped in the huge dichotomy between urban and rural contrast of life and feels alienated and disillusioned in both. With fine inter textual anecdotes covering theme of existential absurdity, the book covers brilliant critical eye and wonderful sense of wit and pun aimed at conventional, pretentious and rooted post colonial Indian mindsets in society, system and institutions. It shares resemblance in form with Salinger’s cult classic ‘The Catcher in the Rye’, but overall the novel is one of the finest and original voice emerges from regional Indian literature that reacts against the whole patriarchal socio-cultural order of power crushing the individuality and freedom. And I love the characters here, whether it’s Suresh Joshi, Madhukar Deshmukh, Ichalkaranjikar or Pandurang himself!
I’m sure I’m missing the pun, wit and double entendre of original Marathi, while reading its translated English version. The original Marathi book is regarded as radical one, especially the way Nemade played with its form. But Sudhakar Marathe had done fine possible justice to the English translation. The essence of the content and fun of the form are not lost in translation here as in the case of most of Indian English translations.
शंभरातील नव्व्याण्णंवास.. मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच एव्हडी भन्नाट सुरु होते. पुढचे पान अजूनच जबरदस्त. वर लिहिलेली ओळ ह्याच पहिल्या पानावरची. कोसला. म्हणजे कोष.
कुठल्यातरी सांगवी नामक गावातला पांडुरंग सांगवीकर स्वत:ची कथा सांगायला सुर करतो. कथा घडते मुख्यत्वेकरुन ५९ ते ६३च्या पुण्यामध्ये. पण त्याआधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरातल्या आई-आजीचे पिचलेपण, त्यातून होणारी भांडणं, मुळची त्रास देण्याची वृत्ती, वडिलांची क्षुल्लक गोष्टीतली लांडी-लबाडी खोटारडेपणा आणि ह्यात तयार होत गेलेला संवेदनशील, भावनाप्रधान व वरुन घट्टपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्यासमोर मोजक्या शब्दात उभा राहतो. तिथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावाकडचे बुजरेपण टाळत ’व्यक्तिमत्व’ घडवण्याच्या मागे जाणारा सांगवीकर, गॅदरिंगला कल्चरल सेक्रेटरी होउन पदरचे पैसे खर्च केलेला सेक्रेटरी, अभ्यासाकडे दुर्लक्ष करत ’चमकण्याच्या’ मागे असलेला सांगवीकर, घरुन येणार्या पैश्यांची फारशी फिकीर नसलेला आणि आल्या-गेलेल्याला चहा-सिगरेटी पाजणारा सांगवीकर, मेस सेक्रेटरी असताना वर्षाच्या शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर इंटरच्या आणि ज्युनिअरच्या वर्षात वाहत जातो. मनू मेल्याचे दु:ख पचवण्याची क्षमता नसलेला, मानसिक षंढत्वाची जाणीव होणारा, पैश्याची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसे खिशात न खुळखुळवणार्या मित्रांबरोबर राहूनही एकूणातच सर्वांपासून अलिप्त होत, दूर होत जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर आता दिसतो. आणि मग शेवटी एकूणच परिक्षेत पेपर सोडून शिक्षणाला रामराम ठोकून, गावी परत जातो. तिथे वडिलांच्या धंदा-कारभाराला शिव्या देत, थोडेफार त्यातलेच काम बघत, इतर अश्याच शहरात राहून शिकून गावी परतलेल्या कंपूत दिवसचे दिवस ढकलणारा, आता जे होइल ते होवो, सगळेच भंकस, मग का चिंता करा अश्या पराभूत तत्वज्ञानाशी येउन पोचलेला पांडुरंग. इतकीच खरेतर कोसलाची कथा.
पण ह्या सगळ्या स्थित्यंतरात कोसला ह्या कलाकृतीने किती एक गोष्टी वाचकाच्या समोर आणल्या आहेत. कोसलाची भाषाशैली. सुरुवातीला उदाहरणार्थ, वगैरेचा अतिरेक करुन तेव्हाच्या रुळलेल्या कादंबरीय भाषेला छेद देत कोसला सुरु होते. कोसलात कुठेही, 'आई म्हणाली, "..." - मग अवतरणचिन्हात संवाद वगैरे भानगड नाही. संपूर्ण गद्य सलग शैलीत लोकांमधील संवाद, पांडुरंगाची मानसिकता (पुस्तक प्रथमपुरुषी निवेदनशैलीत आहे) एकामागोमाग येत राहतात. पण वाचकाला कुठेही तुटकता येत नाही, गोंधळ उडत नाही. असे लिहिणे खरेच फार अवघड आहे. कोसलात कुठेही शिवीगाळ नाही, लैंगिक-कामुक वर्णने नाहीत, मध्यमवर्गीय कुटुंबातून ज्या श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा बोलताना पाळल्या जातात त्या मर्यादेत संपूर्ण पुस्तकभर भाषा आहे. पण कुठेही ती भाषा मिळमिळीत होत नाही. तसेच रुक्ष मन:स्थिती, वास्तवता दाखवण्यासाठी भडक शब्दांची साथ घेत नाही. तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब कोसलात पडत राहते, आजूबाजूला दिसत राहते. वेगवेगळ्या कुटुंबामधून, आर्थिक स्तरांतून आलेली मुले-मुली, त्यांची राहण्याची-वागण्याची पद्धती, पांडुरंगचा श्रीमंत-गरीब असणाची वर्षे, त्याचे बदलणारे मित्र आणि सिगारेटी कथानक पुढे नेत राहतात. डायरीच्या रुपातून एक आख्खे वर्ष समोर ये��े. भविष्यातल्या इतिहासकाराच्या नजरेतून आजच्या समजाची टर उडवली जाते. महारवाड्यातल्या वह्यातून जगण्याचं एक तत्त्वज्ञान बाहेर येतं. पण ह्या सगळ्यातून एक समान धागा, सूत्र वा विचार येत राहतो तो पांडुरंगला पडलेल्या प्रश्नांचा - जगण्याचे प्रयोजन, असण्याचे प्रयोजन, असलोच तर मी असाच का वा दुसरा एखादा तसाच का - शोध, त्यांची न मिळणारे उत्तरे, उत्तरं न शोधता त्यापासून दूर दूर पळणारा पांडुरंग आणि मृत्युमुळे हे सुटेल काय ह्याची खोल मनात तळ करुन असलेली त्याची आशा हे कादंबरीत जागोजागी येत राहतात. ’भटकते भूत कोठे हिंडते?’ अश्या एका तिबेटी प्रार्थनेपासून ह्या प्रश्नाच्या मृगजळामागे पांडुरंगाचा प्रवास सुरु होतो. मनीच्या मृत्युंनंतर तो हे प्रश्न थेट विचारतो. पण तेव्हडेच. बाकी सगळीकडे अप्रत्यक्षपणे, माहिती असून तो प्रश्नांना सामोरा जात नाही. उत्तरं वांझोटीच असणार आहेत असा एक विश्वास त्याला आहे. आणि म्हणुनच त्याच्या हाइटन्ड मोमेन्ट्सनंतर तो भरार पाणी ओतून रिकामा होतो. उदाहरणार्थ, सांगवीकरच्या तिसर्या वर्षाच्या खोलीचे एक गहिरे चित्रण करुन, एका स्वप्नातून उभी केलेली हॉस्टेलच्या आयुष्यातली क्षणभंगुरता पण तरिही एकमेकांबरोबर व्यतीत केलेला प्रचंड वेळ ह्या सगळ्याचा अंत एका वहिवाल्याच्या वहीनं होतो: क्रम संपता दोन्ही भाई भांडती हो भांडती आत्मा कुव्हीचा नाही कोनी सांगाती हो SSS सांगाती अन् आत्मा कुव्हीचा नाही कोणी सांगाती SS पण ह्या इंटेन्स/तीव्र वातावरणात सुर्श्याचा एक जोक लगेच पुढे येतो: ’एकजण अचानक माझ्या खोलीवर टकटक करून बळजबरीनं आत आला. तो म्हणाला, एक्स्क्यूज मी. ही माझी पुर्वीची खोली. आहा. हीच खोली. काय ते दिवस. हीच ती खिडकी. हेच बाहेरचे झाड. असंच माझं टेबल खिडकीशी असायचं. आहा. हीच कॉट. अशीच माझीही होती. हेच माझं कपाट. ह्या कपाटात मी कपडे ठेवायचो. आहा, आणि ह्यात अशीच लपून बसलेली नागडी मुलगी.’ बदबदा पाणी ओतून पांडुरंग रिकामा.
पांडुरंगाची सगळ्याला क्षुल्लक ठरवण्याची वृत्तीच्या मागे मी का जगतोय वा काय अर्थ आहे का ह्याला हा धागा जास्त दिसतो. त्यातून तो सुरुवातीला गावाला, गावातल्यांना, त्यांच्या मानसिकतेला शिव्या देत शहरात रमून जायचा प्रयत्न करतो तर कादंबरीच्या शेवटाला शहराला शिव्या देत गावच बरा म्हणत येतो. नॉस्टॅल्जिया त्याला तो येवून देत नाही, पण खोल तळाशी कुठेतरी त्याला एक एक सोडून जाणारा मित्र, खोली, वर्षे अस्वस्थ करत जाते. शेवटाला तो सगळंच सोडून फक्त प्रवाहात तरंगणारी काडी व्हायला तयार होतो.
’कोसला’ने एक पुस्तक म्हणुन मला स्वत:ला प्रचंड आनंद दिला आहे. पांडुरंग पलायनवादी आहे का? हो, आहे. निराशावादी आहे का? हो, आहे. तो रुढार्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे का? नाही. पण म्हणुन मला कोसला कमअस्सल वाटत नाही. अशी माणसेदेखील असतात, आहेत. कोसलातला पांडुरंग पराभूत होतो, निराश होतो, सत्यापासून पळून जातो म्हणुन कोसला दुय्यम वा अवाचनीय ठरत नाही. उलट एक अतिशय समृद्ध, सकस साहित्यकृतीचा अनुभव वाचकास नक्कीच देते. कोसलातील कित्येक प्रसंगांचे वर्णन अफाट आहे. कुठेही जडबंबाळ, बोजड, अलंकारीक भाषा नाही. वाक्य पण सगळी छोटी-छोटी तुकड्यात. पांडुरंगाला सुर्श्या पहिल्यांदा भेटणे आणि त्यांची दोस्ती होणे हे केवळ ’पण सुरेश सारखा माझ्या डोक्याकडे पहात होआ. शेवटी तो म्हणाला, तुमची बाटली फुटली वाटतं? हे थोरच आहे. मग आमची दोस्ती झाली.’ इतक्याच मोजक्या संवादातून उभे करतो. कोसलामधला विनोद पण सहसा न आढळणार्या पद्धतीचा आहे. तो होतो, घडवून आणला जात नाही आणि विनोद केल्यावर लेखक 'बघा मी कसा विनोद जुळवुन आणला' असे न करता मॅटर ऑफ फॅक्टली पुढे जातो. उदा. तांबेचे कविता करणे, त्याच्या जीवनात उद्दिष्ट्य असणे आणि महान नाटके लिहिणे: तांबेच्या नाटकातला एक प्रवेश - प्रभाकर: (मागे सरुन) सुधा याचं उत्तर दे. सुधा: अरे पण प्रभा, माझे वडिल माझ्याबरोबर होते, आणि तू हाक मारलीस. प्रभाकर: (पुढे येत) असं होय? मला वाटलं तू मला माकड म्हणालीस ते मनापासूनच. हे असले भयंकर लिहीत कोसला तुम्हाला बुडवून टाकते. मावशीच्या नवर्याने ’इतिहासच घे बीएला, इतिहासाच्या प्राध्यापकाला दरवर्षी नवीन वाचायला लागत नाही’ असे सांगणे, इचलकरंजीकर, रामप्पा, ते दोघे, सिगरेटी, मद्रास, चतुश्रुंगी-वेताळ टेकड्या, अजंठ्याची सहल सगळेच महान - ओघवते - प्रवाही. अजंठा तर केवळ महान. मनू मेल्यावरची पांडुरंगची तगमग, घरातल्या सर्वांवरचा राग, आपण काही करु न शकण्याचे, क्षुद्र असण्याची जाणीव, पलायनाचे मार्ग शोधणे हे सगळे पुन्हा-पुन्हा येते. तो एके संध्याकाळी पावसात भिजून हॉस्टेलवर परतल्यावर पांडुरंगला झालेला साक्षात्कार की गेली चार वर्षे राहिलेली ही जागा, इतक्या मित्रांसोबत काढलेला वेळ, कुणाचेच कुणी नाही. सगळेच इथे तात्पुरते. आपले काहीच नाही. आणि मग कादंबरीत क्वचितच येणारा थेट प्रश्न - ’मग सगळ्या आयुष्यात हेच - आपल्या कशालाच किंमत नाही’. आणि मग शेवटच्या पेपरात पाय लांब करुन दोनच प्रश्नांची उत्तरं लिहून बाहेर पडलेला सांगवीकर. मी प्रत्येकवेळी हा भाग वाचताना शहारतो - घाबरतो. केवळ उरतो.
भटकते भूत कोठे हिंडते? पूर्वेकडे? की उत्तरेकडे. पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे. देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपर्याकोपर्यांत विखुरले आहे आणि तुला ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस ये, हे भटकत्या भुता, ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू मार्गस्थ होशील.
This book is beyond my choice and I felt he deliberately used phrase udaharnarth. I really couldnt dare to read this book. I though I would learn from his struggle, however, mine is much more than his. Nothing special. I really doubt why some books are so highly rated,is there any mass rate bot working? :)
मराठी साहित्यातील मैलाचा दगड. नेमाडे यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी लिहीलेली. तरूणाईच्या अस्वस्थतेला व्यक्त करते. समाजापासुन तुटलेल्या वैफल्यग्रस्त तरुणाची ह्रदयद्रावक कहाणी. भाषा आणि शैली म्हणजे फारच थोर. आता हिंदु वाचली पाहीजे.
I found this a little bit heavy. I loved the start. It was comic, the language was giving a tint of my own language. And it was so damn funny, for a sentence or two, I laughed a lot, putting book aside. The end, I found useless - but at the same time, it was giving a serious face to this light self portrait of Sangvikar. Other little things are expressed very nice. But sincerely, I expected a lot from Kosla. Even though, finishing this book gave me a feeling of accomplishment, I am not so happy by this.
केव्हा दिले, कोणत्या उद्देशाने दिले, का दिले, कसे असेल, आवडेल का वेगैरे वेगैरे उगाचच भंपक विचार करण्यात वेळ घातला आणि जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा तीन दिवसात वाचले...स्पर्धा वेगैरे नाही हो ते सांगायच म्हणून सांगितलं...आणि शेवटी ज्यानं दिलं त्याला मेसेज टाकून धन्यवाद बोललो...
I need to reread it, may be when I'm calmer, when I can think of life in minute details. I should have got this when I was in college. Or rather when I was home after college. Some book are like hammer, need to be read like a hammer on the hot iron and then they impact best. I am by no means that flexible. Like the author says in the epilogue, whether to live as per the conscience mind or live conscously - it is a decision one takes. I feel I'm on the other spectrum and from here I can't see the rainbow in the prism. But rainbow it is for sure. Sometimes you admire after knowing, sometimes you admire and know that you don't know the entirety.
BTW, it's an adulthood story of a boy, based on the real life, where he goes to a city from a village and lives life on his own terms, makes mistakes and unable to fit in the mould, fails exams. Not because he cannot study but because he cannot convince himself to follow the rut like a "normal" person can. When you cannot follow the norms and cannot live as per expectations, life becomes a trying exploration. Kiska talk about that exploration with full of emptiness.
उत्तम भाषा कधींन पहिल्यांदा वाचलेली, नेमाडेंच्या स्वतःच्या जीवणारवर असलेली ही कथा आहे ते त्यांनी पांडुरंग सांगवीकर हे नावाने चितारलेले आहे, आपण नेह��ी जिंकणार नायक पहिला आहे, पण हरणारा नायक वाचताना अनेक पैलू जाणून घेता येतात, कादंबरीवरील मुखपृष्ठ हे मणी ह्या भागावर आहे, हा भाग तर इतक्या सुंदरतेने लिहला आहे की प्रतक्ष आपल्याला त्या गोष्टी जाणवतात, रमी विषयच प्रेम आहे, अजून बरेच काही नक्की वाचा,
“कोसला” मुळात नेमाडेंची ओळख सुरु होते ती येथून. कोसला म्हणजे कोष ज्यात एक जीव धडपडून मोठा होण्याचा प्रयत्न करतो. १९६३ साली नेमाडेंनी वयाच्या २५ व्या वर्षी हि कादंबरी लिहली आणि अल्पवधीत ती खूप प्रसिद्ध झाली. लेखनाची साचेबंद चौकट मोडून केलेलं लेखन अप्रतिम वाटत. हि कादंबरी नेमाडेंच्या स्वतःच्या आयुष्यावर आहे. यामध्ये पांडुरंग सांगवीकर नावाचा नायक आपल्या शालेय जीवनापासून ते कॉलेज जीवन आणि त्यानंतर गावाकडील काही वर्ष हे सर्व आपल्या कादंबरीत मांडलेले आहे.
एक युवक ज्याला गावाकडील निरुत्साही वातावरण न आवडणारा त्याला त्याबद्दल वाटणारा तिटकारा, पण तरीही गावासाठी काहीतरी थोर करावं असं त्याच स्वप्न. पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधील. आणि त्यात बरीच केलेल्या उठाठेवी जसे कॉलेजच्या निवडणुकीत मित्राच्या सांगण्यावरून भाग घेणे, स्नेहसंमेलनात पुढाकार घेऊन पैसे अडकणे अश्या नाना प्रकारच्या गमती होतात आणि पुढे नीट अभ्यास करावा हा ध्यास.
मणी नावाची त्याची धाकटी बहीण आणि ती देवीच्या साथीने मरण पावते ह्या क्षणाबद्दल लेखकाने इतक्या तिडकीने लिहाल आहे कि आपल्याला हि त्या भावना जाणून येतात. अजून रमी आणि बुंदी ह्या मुलींशी त्याच वागणं.
कॉलेज मधेच अर्थवट सोडून आल्या नंतर गावात बरीच शी थू होते ते सहन करत आणि गावातील काही मित्र आणि लोकांना पाहिल्यानंतर बदलेले विचार हे खर ह्या कोसलाच सार आहे. नक्की वाचून पहा अशी हि कादंबरी.
नेमाडे ह्यांचे कोसला वाचायला सुरवात केली आणि बर्याच गोष्टी डोक्या वरून गेल्या. ही कादंबरी वाचायला बरीच जड आहे कारण ती तुम्हाला विचार करायला लावते. ती जड आहे कारण कि नेमाडे ह्यांनी पूर्णपणे वेगळी भाष्या ह्या कादंबरी मध्ये वापरली आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे कि लेखकाला नक्की सांगायचे काय आहे आणि मग त्याच्या मधला अर्थ समजून घेयला लागतो. मी सुरवातीला जशी आपण एक साधी कादंबरी वाचतो तशी हि सरसकट वाचत गेलो त्याच्या मुळे मला अर्धी कादंबरी संपल्यावर पण काही पत्ता लागत नव्हता कि नक्की काय चालले आहे म्हणून जेव्हा मी इंटरनेट वर जरा शोधून पहिले तेव्हा कळले कि नेमाडे ह्यांनी बर्याच गोष्टी अश्या लिहल्या आहेत की तुम्हाला लवकर कळत नाहीत पण तुम्ही जेव्हा त्या गोष्टींचा विचार करता तेव्हा तुम्हाला त्याच्या मधली मेख कळते.
म्हणून जेव्हा तुम्हाला नेमाडे ह्यांना सांगयचे काय आहे हे जेव्हा कळते तेव्हा तुम्हाला त्यांचा वेगळेपणा जाणवतो. त्यांनी इतक्या वेगवेगळ्या विषयावर कादंबरी मध्ये भाष्य केले आहे ती सगळे समजून घेण्यासाठी तुम्हाला ती परत एकदा वाचलीच पाहिजे . त्यांनी संपूर्ण कादंबरी पांडुरंग सांगवीकर नावाच्या तरुणाला त्याच्या जीवनात आलेल्या अनुभावरून सांगितली आहे . कादंबरी मधला काळ साधारण १९६० मधला आहे. सांगवीकर हा एक खानदेशातून पुण्या मध्ये शिक्षणासाठी आलेला आहे. तू तुम्हाला त्याच्या दैन्यादिन जीवनात काय चालते हे एका रोजनिशी सारखे सांगत जातो. त्याला आलेला चांगले आणि वाईट अनुभव त्याला भेटलेली तऱ्हेवाईक माणसे आणि ह्या सगळ्यामधून त्याचा झालेला ब्रह्मनिरस आपल्याला समजत जातो.
मी नववीला असताना आम्हाला कोसला मधला एक परिच्छेद अभ्यासाला होता. पांडुरंगाच्या अजिंठयाच्या सहलीबद्दलचा. त्यावर्षीचा माझा तो सगळ्यात आवडीचा धडा होता. तेव्हापासून wishlist केलेलं हे पुस्तक आत्ता वाचण्याचा योग आला. आणि आत्ता वयाच्या तेविशित असताना चौथ्यांदा सीए फायनल च्या परिक्षेचा अभ्यास करताना अगोदरच उद्विग्न असलेल्या माझ्यासाठी याहून उत्तम योग नाही.
•
कोसलामधून नेमाडेंनी स्वतःची कथा मांडली. आणि आज ती साठ वर्ष जुनं असुनही मला माझी वाटली. अगदी पहिल्या पानाच्या पहिल्या ओळीपासून पांडुरंगाच्या शब्दांमध्ये असलेली विफलता मनाला अस्वस्थ करणारी. काय झालं असावं या मुलाच्या आयुष्यात ज्यामुळे ऐन विशीत हा असा बोलतो आहे. इथे सुरु होते त्याची गोष्ट. खरतर माझी गोष्ट. गावातलं बालपण. अगदी typical आई- आजी, बाबा, बहिणी. तसेच गावातले शेजारी. तेच शेत. घरात त्रास देणारे उंदीर, वाळवी आदी प्राणी. दहावी पर्यंत तिथे शिक्षण आणि नंतर पुणं! शहरातलं सगळंच वेगळं. तिथले नातेवाईक. गर्दी. कॉलेज. मित्र. सगळं नवं. तरीही आयुष्यातलं रिकामेपण तसंच. परीक्षा आणि त्यामुळे आयुष्याला मिळणारी वळणं. अपयशं. ती पचवण्याची असक्षमता. शहरातून गावाला रवानगी. आणि मग शहरी आणि ग्रामीण जीवनातला त्याला कळलेला फरक. आणि मग आयुष्याचे काढलेले अर्थ. निरर्थकता. एकंदरीतच वैफल्य!
•
गावातल्या निम्म्याधिक लोकांनी अनुभवलेली तीच गोष्ट. पण तरीही ती वाचाविशी वाटते नेमाडेंच्या शब्दांमुळे. सुरूवातीला काही शब्द पुन्हा पुन्हा वापरणं आणि मग अचानक ते बंद होऊन नवीन शब्दांची पुनरावृत्ती करणं उदाहरणार्थ जसं बहुधा आपणही करतोच बरेचदा. नवीन एखादा शब्द कळल्यावर तो सतत वापरणं. हे थोरच.
नायकाला हळुहळू कळत जाणारं आयुष्य वाचताना nostalgia होतो. कुठेतरी केमसच्या 'the stranger' ची आठवण होतो. त्याही पुस्तकाचा साधारण हाच विषय. Absurdity of existentialism. Ikigai वगैरे वाचून आपणही शे- दीडशे वर्ष जगावं अस वाटू लागणाऱ्या माझ्या हातात 'the stranger' येतं तेव्हा थांबावसं वाटतं, एकंदरीतच आयुष्याचा जरा विचार करावासा वाटतो.
•
यशस्वी लोकांच्या आणि त्यांच्या यशाच्या गाथाच सगळे गातात पण आपल्या आसपास क्वचित काही टक्के यशस्वी लोक आपण पाहतो. बाकी सगळ्या प्रवाहात वाहणाऱ्या काड्याच. त्यांच्या कथा कोण लिहितं. त्या काळातली ही खरोखरच प्रचंड वेगळी कादंबरी होती. नवीन काही शिकायला घेतल्यावर असणारा हुरुप वेगळा आणि काही वर्षांनी वाटणारा तोचतोचपणा, शक्य असतानाही प्रयत्न करण्याची इच्छा नसणं, मित्र आणि गप्पा या सगळ्यांतच रस न वाटणं, सगळाच भंपकपणा! हे सगळं कादंबरीच्या नायकाला वाटणं वाचकांसाठी नवीनच. कोसलातला विनोद, नायकाची बोलण्याची शैली, स्वतःची आणि मित्रांची, घरच्यांची अगदी दोन वाक्यात करून दिलेली ओळख सगळंच नवं! कुठेही बोजड, अलंकारिक भाषा नाही आणि तरीही एक सकस आणि समृद्ध साहित्य असणारं हे पुस्तक.
Considered to be the first existentialist novel in Marathi literature, "Kosala" follows Pandurang Sangavikar, a young man struggling with transitioning into adulthood as he moves to a city from his village for an education, feels lost within a circle of opportunistic people during his dramatic college life and creates troubles for himself, then returns to his village unemployed, only to be plagued with questions about his existence.
I'd like to point out an instance where the writer took my breath away with his writing skill. It is when he describes a scene in which Pandurang takes a solitary visit to a monument on a hill, soon after receiving the message about the death of his younger sister back in his village while he is still away in his college hostel, and the way the whole scene is built up to convey how he can now only helplessly grieve over a person he has been distanced from forever is incredibly moving.
However, I felt like the novel failed on many levels while describing the struggles of Pandurang as he faces life stressors. There is no intellectually satisfying interrogation into the suffering of the character and his response to it. I wanted to learn about Pandurang's perception of his position in life and expected more depth to his emotions. I feel like the suffering has been exaggerated and romanticized to make it seem "appealing". While I am not opposed to reading about characters that fail to live a decent life because of their mistakes and/or because of forces out of their control, I would like to get serious and sincere perspectives of such failed characters. Unfortunately, this novel does not present any.
I would rather recommend the stories of G. A. Kulkarni, who presents strong viewpoints of characters who struggle and suffer and confront the cruelty of life in their own ways, which make the reader develop empathy and understanding towards people.
This entire review has been hidden because of spoilers.
कोसला हे एक फार सुंदर पुस्तक. तर तुम्ही म्हणाल पुस्तक म्हणजे तरी काय ? पुस्तक म्हणजे त्या काळातील महान वगैरे लोकांनी आपल्या मनातील कागदावर उतरवलेली घालमेल. अशी पुस्तके वाचक वैगेरे, आपले वास्तव विसरून दुसऱयांचे आयुष्य जगू पाहणारे लोक वाचत असत. त्या काळात वाचक लोक असे का बरं करत असावेत? कारण त्यातूनच त्यांना कोसला सारखी उत्तम कलाकृती कधीतरी अनुभवता येते. आता अनुभव म्हणजे तरी काय ? असल्या उदाहरणार्थ भंपक गोष्टी आपल्याला काय ठाऊक.
Have read Kosla 3 times till now. At different age. first one at the age of 16. Then somewhere in between at the age of 28 and now third time at 40. Every time it was as amusing as it was or rather more. Every time I could read things differently. Hats off to Nemade.
Outstanding, superb, terrific. No words to describe this book. The best book I have read so far. I keep coming to this every now and then and everytime it gives me something new...
i have read kosla in english . Loved the language throw . Manu's character , hostel scenes and the hills !! my fav part . i could actually imagine all of that for real .
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं.
कोसला ही कादंबरी पारंपारिक कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून, यशस्वी तंत्र झुगारून अनपेक्षित, काहीशा विस्कळीत, तर्हेवाईक शैलीत लिहिलेली ही कादंबरी आशय आणि आविष्कार या दोन्ही बाबतींत वेगळी आहे. खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या सार्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो. भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते ... "आपण सगळं करू, हे म्हणतात वगैरे ते सगळं. थेट इतकी वर्षं अशी उदाहरणार्थ काढलीच की नाही? आणि आणखीही थेट वर्षं काढायची घमेंड वगैरे आहे. आपण कुणा दुसर्याची वगैरे वर्षं चोरणार नाही. किंवा कुणाच्या बापाचा पैसा वाया घालवणार नाही. वय गेलं असं हे अवांतर म्हणतात. ते मात्र उदाहरणार्थ बरोबर नाही. आणखी पुढे नाना वर्षं आहेतच. वर्षं नीट असतातच. आपण उदाहरणार्थ किती का उशिरा उठतना? त्या मानानं कसं का वागतना? आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच. ती वगैरे काही कमावता येत नाहीत. तेव्हा गमावली ही भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच."
This book is amazing. I am 24 years old and I went from small town to big city, this book just reflect what my mind was during my hostel time and now. I like how it uses Marathi dialect with easy words that characterizes author as normal person rather than a novel writer. For me this book is about thoughts and I think in Marathi dialect that I use to speak, this is correctly represented. Author being the same age as Pandurang and me too during writing, he was able to capture the world how I perceive. All the experiences sound real, some them I experienced myself and observed in my environment. The things I didn't liked, conversations looks confusing, sometimes I was unable to figure out who's saying what; some parts of the book looked unfinished like suddenly change in scene; some parts especially last 2 chapters are filled with fillers which makes no sense. Just because of this it lost one star. Many of the issues (in my opinion) are due to lack of experience as author mentioned in last, he was more of a poet. I really liked this book. People should read this book, many had this same experience in life. I was delighted that I wasn't only one thinking like that.
सर्वात आधी या लेखकाचे कौतुक करावे तितक थोड असेल. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी इतकी प्रगल्भता, अगदी आपले स्वतःचे वाटावेत असे मांडलेले विचार, इतके सारे व्यक्तीवर्णन सगळं काही खरच अफलातून !!! एका गावाकडून पुण्यात शिकायला आलेल्या तरुणाची ही आत्मकथा सुरुवातीला थोडीशी विचित्र वाटते पण हीच विचित्रता पुढे वाचकाला खुश करून टाकते. घर सोडून बाहेर कुठेतरी शिकायला गेलेल्या कुठल्याही मराठी व्यक्तीला ही कादंबरी अगदी स्वतःचीच वाटेल अशी... आणि त्यात जर तुम्ही पुण्यात शिकला असाल तर नक्कीच आवडणारी अशी ही कादंबरी एकदातरी वाचवीच.
एका पंचवीशीतल्या तरुणाची त्याच्या अस्तित्ववादावर असलेली ही कादंबरी आहे, खेड्यातून पुण्यात येऊन शिक्षण घेत असलेला हा तरुण नेमाडेंनी 1963 साली लिहिला पण तो आजही आपल्याच पिढीतला असावा असं वाटतं. एकंदरीतच वेगळीच लिखाणाची शैली आहे नेमाडेंची वगैरे वगैरे, उदाहरणार्थ, भलतंच, वेगळंच, हे शब्द असेही आणि इतक्यांदा वापरता येऊ शकतात हे कोसला मधेच कळत. नेमाडे आणि कोसला ही कादंबरी मराठीत आहे याचा एक मराठी म्हणून अभिमान वाटतो. नक्कीच वाचावी अशी कादंबरी.
अतंत्य विनोदी, पुन्हा-पुन्हा वाचविशी वाटणारी अशी हि कादंबरी. वाचत असताना प्रत्येकाला कॉलेज कट्टा आठवेल. कित्त्येक किस्से स्वतःच्या आयुष्यातही घडल्याचा योगायोग जाणवेल. पांड्या यू आर दि बेस्ट ! छोट्या बहिणीच्या गेल्याने तुझं ते नैराश्य वागणं कुठं तरी समाजाबद्दल खूप काही सांगून जातं. भाषा शैली उदारणार्थ भन्नाट. लेखकाने २५ व्या वयात अशे विचार मांडणं खरंच खूप थोर आहे. कोसलासाठी नेमाडेंना सलाम !!
I am so disappointed. Not only because I had heard so much about this book and the writer, but also because my expectations were raised by the first half of the book itself! So much so that, when it ended, I double checked to make sure I hadn't skipped a few pages!
Must read book. After 4 years i read Marathi literature..this book is fantastic.. I read almost every book of pu.la. Deshpande .. While reading this I found same logic of writing with different Marathi accent.. Best book I ever read...