Jump to ratings and reviews
Rate this book

Narmade Har Har

Rate this book
It's about Narmada Parikrama done by the author.

On the Hindu pilgrimages along the banks of Narmada River; impressions of a Hindu, of his travel along the banks of the river.

256 pages, Paperback

First published January 1, 2010

76 people are currently reading
967 people want to read

About the author

Jagannath Kunte

6 books37 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
242 (58%)
4 stars
116 (28%)
3 stars
34 (8%)
2 stars
11 (2%)
1 star
9 (2%)
Displaying 1 - 28 of 28 reviews
10 reviews4 followers
Read
November 15, 2020
किंडलवरच्या माझ्या इबुक सजेशन लिस्टमध्ये नव्यानं आलेल्या मराठी इबुक्सच्या यादीत चक्क जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा परिक्रमेवरचं ‘नर्मदेऽऽ हर हर’ हे इबुक दिसलं. अतिशय गाजलेलं पुस्तक... बऱ्याच दिवसांपासून काही-ना-काही कारणानं वाचायचं राहिलेलं... पण आता ठरवलं वाचायचंच. आता एका क्लीकवर तर पुस्तक उपलब्ध होणार होतं. वेळेचं बंधन नाही, दुकान बंद असण्याची चिंता नाही की प्रत मागवून ती येईपर्यंत वाट बघायचीही गरज नाही. इबुकसारख्या चिरंजीवी आणि सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या माध्यमाची हीच तर खासियत. इबुक या सोयीनं वाचकाची प्रतीक्षा संपवली. मीही लगेच ते घेतलं आणि डाऊनलोड करून वाचायला सुरुवातही केली. वाचता-वाचता या पुस्तकानं मला कधी झपाटून टाकलं ते कळलंही नाही.

पूर्वीपासूनच आपल्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी (आत्मिक उन्नतीसाठी) भ्रमंती करण्याला एक प्रकारची राजमान्यता मिळाली आहे.
‘केल्याने देशाटन, पंडित मैत्र, सभेत संचार मनुजा, ज्ञान येतसे फार...’


ज्ञान मिळवण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी भ्रमंती करणं शास्त्रसंमत आहे... म्हणूनच काही जण वारी करतात तर काही जण परिक्रमा. परि म्हणजे सभोवार, क्रम म्हणजे फिरणे, दक्षिण म्हणजे उजवी बाजू, उजव्या बाजूला दैवताला ठेवून फिरणे म्हणजे प्रदक्षिणा, परिक्रमा.
अगदी निरनिराळ्या साधूसंतांनीसुद्धा या भ्रमंतीचं समर्थन केलं आहे. कित्येकांना तर अशी भ्रमंती करण्याची आज्ञा खुद्द त्यांच्या गुरूंकडूनच झालेली आहे. त्यांपैकीच आत्ताच्या काळातलं एक उदाहरण म्हणजे स्वामीजी अर्थात जगन्नाथ कुंटे. यांनाही त्यांच्या गुरूंनीच नर्मदा परिक्रमा करण्याची आज्ञा दिली आणि तीही एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा. त्या अनुभवाचं संचित आपल्यापुढं मांडणारं ‘नर्मदेऽऽ हर हर’ हे पुस्तक त्यांनी तिसर्‍या परिक्रमेनंतर लिहिलं. स्वामीजींच्या या पुस्तकातून आपण फक्त अनुभवकथन किंवा वर्णन वाचलं असं वाटत नाही तर एक प्रकारची अनुभूती मिळते... कारण जरी गुरूआज्ञा असली तरी कसलीही प्रौढी मिरवण्यासाठी किंवा स्वतःला साधूपद प्राप्त व्हावं म्हणून ही परिक्रमा त्यांनी केली नाही. ते सर्वसामान्य भाविक यात्रेकरू नाहीत. संसारातल्या वैयक्तिक सुखदुःखाच्या निवारणासाठीसुद्धा ही परिक्रमा नाही. स्वामींनी देशविदेशांत पत्रकार म्हणून काम केलेलं आहे... तसंच इतरही अनेक क्षेत्रांत कामं केली आहेत... त्यामुळे डोळसपणे आपला धर्म, आपली संस्कृती जाणून घेत, निरनिराळ्या अनुभवांना साक्षीभावानं सामोरं जात तीन वर्षं तीन महिने तेरा दिवसांची ही परिक्रमा सगळे नियम पाळून पूर्ण केली.

खरंतर साधकाची ही एक सत्त्वपरीक्षाच म्हणावी लागेल... कारण ‘नर्मदा परिक्रमा’ ही अत्यंत खडतर आणि म्हणूनच श्रेष्ठ मानली जाते. ती एकदाच पूर्ण करणं हे जिथं भल्याभल्यांसाठी अशक्य तिथं चारदा परिक्रमा करणं... तेही पायी म्हणजे एक चमत्कारच. ही सत्त्वपरीक्षा देताना जे-जे अनुभवलं त्याच्या रोचक हकिकती जसं की, अध्यात्मातले बरेवाईट अनुभव, ढोंगीपणा, बुवाबाजी, काळी जादू, मंदिरातलं राजकारण, धर्माच्या नावानं चाललेला बाजार, भाबड्या भाविकांची होणारी लूट, श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचं वाढतं वर्चस्व, आदिवासींच्या जीवनातल्या हालअपेष्टा, निसर्गाचा प्रकोप अशा अनेक गोष्टी यात वाचायला मिळतात. त्यांचे गंभीर पडसाद जाणवतात. विशेष म्हणजे हे सगळं वर्णन आहे ते १९९९ सालातलं आणि त्याच्यानंतरचं म्हणजे तसं बऱ्यापैकी अलीकडचं. महाराष्ट्राशिवाय भारताच्या इतर प्रांतांतली परिस्थिती दाखवणारं हे चित्रण डोळसपणे आणि नीरक्षीर विवेकानं केल्यानं ते वाचकाला अंतर्मुख करतं आणि फक्त परिक्रमेपुरतं मर्यादित न राहता राजकीय, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक, धार्मिक अशा अनेक बाबींवर भाष्य करतं. या लेखनात भावनेचा ओलावा, स्पंद एवढा आहे की, काही प्रसंगांत तर तुम्ही प्रत्यक्ष हजर असल्याचा भास होतो. ही परिक्रमा व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलते. तिला जीवनातलं मर्म कळतं... मग ती स्त्री असो वा पुरुष, तरुण असो वा वृद्ध, शिक्षित वा अशिक्षित... तिच्या जगण्यात, विचारांत आमूलाग्र बदल घडतो असं जे म्हटलं जातं त्यावर विश्वास बसतो.

यात चमत्कारही भरपूर आहेत... सगळ्यांचा उल्लेख अवघडच... पण काही प्रसंग मात्र हेलावून टाकणारे जसं की, स्वामीजींचा लक्कडकोट जंगलाआधीच्या गावातला अतिसारानं होऊ घातलेला मृत्यू विनाऔषधोपचारानं टळणं, स्वामीजींना प्रसाद म्हणून शाल हवी असताना ती अचानक मिळणं, ओसाड ठिकाणी अनपेक्षितपणे अजगरानं त्यांच्या समोरून निघून जाणं, स्वामीजी जातील त्या दुष्काळग्रस्त गावात त्यांच्या वचनानं पाऊस पडणं, नर्मदेच्या प्रवाहात बुडताना नर्मदा देवीला हाक मारताच साक्षात तिनं लहान मुलीच्या रूपात दर्शन देणं, जंगलात अचानक मिष्टान्न मिळणं, नर्मदा परिक्रमा झाल्यावर नर्मदादेवीनं वृद्ध पुरुषाच्या रूपात स्वामीजींच्या घरी येणं आणि त्यांना आशीर्वाद देणं असे कितीतरी चमत्कार... हे वाचून विश्वास ठेवण्यापलीकडे आपल्या हातात काही उरत नाही. इथं तर्क, अनुमान यांपेक्षा श्रद्धा महत्त्वाची... विश्वास महत्त्वाचा... हेच खरं....

या परिक्रमेत स्वामीजींइतकीच आणखी एक व्यक्ती लक्षात राहते ती म्हणजे कुंतल. कुंतल हा आजकालच्या उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न, सुसंस्कृत घरातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करतो. आईवडलांचा एकुलता एक मुलगा, मुंबईत वाढलेला, इंग्लीश माध्यमात शिकलेला, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सिनिअर कॅप्टन पदावर काम करणारा, भरगच्च पगार, रूपानं देखणा, नोकरीनिमित्त गोव्यात एकटाच राहणारा, जीवनाचा सर्व अंगानं मुक्तपणे उपभोग घेणारा... तो कालांतरानं या चंगळवादाला कंटाळून परिक्रमा करायला कसा तयार होतो हे वाचणं उत्कंठावर्धक आहे. यथावकाश त्याची स्वामीजींशी भेट होते आणि त्यांच्याबरोबर तो परिक्रमा करायला लागतो. वडील आणि मुलगा असं वयातलं अंतर असणारे हे दोघं एकमेकांसोबत परीक्रमेतले अनुभव कसे घेतात; त्यांच्यात मानवी जीवन, अध्यात्म, प्रपंच, धर्म अशा वेगवेगळ्या विषयांवर ज्या चर्चा होतात त्या मनोरंजक तर आहेतच... शिवाय बोधप्रदही आहेत.

सतत कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय हीच आपल्या जगण्यातलं चैतन्य, नावीन्य नाहीसं करते. क्वचितप्रसंगी आपलं जगणं ओझं असल्याचंही भासवते... पण या सगळ्यातनं बाहेर येऊन माणूस म्हणून स्वतःला घडवायला हवं, आत्मिक प्रगती साधायला हवी. स्वतःच्या शरीरभोगाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता यायला हवं. विचार आणि आचार यांच्यात एकवाक्यता आणायला हवी.

इबुक स्वरूपात प्रकाशित झाल्यानं हे पुस्तक आता जगातल्या सर्व मराठीप्रेमींना सहज वाचता येणार आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या परिक्रमेचं सविस्तर स्वरूप, तिची माहिती, महती समजणार आहे. यातून परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींना परिक्रमेतल्या नियमांचं आणि इतरांशी संवाद साधताना काय काळजी घ्यावी याचंही मार्गदर्शन घडतं. तिथली बोलभाषा; वस्तूंची वेगळी नावं; उठण्याबसण्याच्या, एकमेकांना संबोधण्याच्या पद्धती यांबद्दलही माहिती मिळते. पुस्तकाचं मुखपृष्ठ या खडतर प्रवासाला साजेसं, सूचक आणि कमीतकमी रंगरेषांतून साकारलेलं आहे. पुस्तकात रंगीत छायाचित्रांचा, परिक्रमेच्या मार्गाचा नकाशाही समाविष्ट केलेला आहे... त्यामुळे ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन करणारं आणि वाचकाला वेगळी दृष्टी देणारं, अनोखं जग दाखव��ारं आहे.
Profile Image for In.
157 reviews1 follower
August 15, 2021
प्रचिती आणि अनुभव हया दोन वेगळ्या गोष्टी. अनुभव कथन करुन ऐकणाऱ्याचे शंकानिरसन करता येईलही, मात्र प्रचिती ही मुळातच अतिशय खाजगी गोष्ट. आशा असेल तर आनंददायी आणि विश्वास नसेल तर खडबडून जागे करणारी. नंतरही इतरांना संपूर्णपणे सांगूनही त्यांना निःशंक करता येईल हे कठीण. त्यामुळे प्रचीती संदर्भातील लिखाण हे तुमच्यापर्यंत संपूर्ण पोहोचेल असे नाही.

जगन्नाथ कुंटे यांनी ३ वेळा नर्मदा परिक्रमा केली. ह्या त्यांच्या अनुभवांचे आणि अर्थात प्रचीतींचे वर्णन नर्मदेऽऽ हर हर ह्या पुस्तकात आले आहे.

नर्मदा परिक्रमा ही अतिशय कठीण मानली जाते. किंबहुना पुस्तकातील वर्णने वाचल्यावर ते पटतेच. शारीरिक दृष्ट्या खडतर आणि मानसिक परीक्षा पाहणारे हे साहस. शास्त्रीय पद्धतीने करू जातास, ही परिक्रमा ३ वर्षाहून अधिक काळ घेते. परिक्रमावासी झालेल्या व्यक्तीने जमिनीवरच बसावे, परिक्रमा चालतच करावी, अस्वाद भोजन घ्यावे असे नियमही कठोर. अर्थात ह्या तीन वर्षांत स्वतःच स्वतःची नव्याने भेट व्हावी हा उद्देश असावा.

एक पत्रकार म्हणून कुंट्यांनी आलेल्या अनुभवांचा कसा अर्थ लावला ह्यासाठी मी उत्सुक होतो. हे पुस्तक मात्र बव्हंशी आध्यात्मिक अंगाने जाणारं आहे. प्रचीतीचे अनेक दाखले आहेत मात्र त्यांचा कार्यकारणभावाची मीमांसा नाही. प्रचीतीच्या विलक्षण नोंदी आहेत पण, एकूणच परमेश्वरी लीला अगाध आहे ह्या उक्तीचाच पुनः प्रत्यय येत राहतो, समाधान होत नाही.

अर्थात अनुभव ज्याचे त्याने घ्यावे आणि स्वतःपुरते त्यांचे अर्थ लावावे असा उद्देश लेखकाचाही आहे. लेखकाचा उद्देश, गणेशाने जसे व्यासांनी सांगितले आणि आपण लिहिले, तत्सम निष्काम कर्मभावनेने अनुभव टंकलिखित करण्याचा वाटतो. हा लेखनप्रपंच देखील 'आज्ञा' झाली म्हणून लेखकाने संकल्प केला व सिद्धीस नेला असा वाटतो. कारण एकदा 'आज्ञा' हा पारलौकिक घटक आला की हेतू/उद्देश हे भौतिक घटक गौण ठरतात.

लेखक स्वतः अतिशय आध्यात्मिक सामर्थ्यवान. पण त्यांच्या बरोबर परिक्रमा करताना त्यांना भेटलेले अनेक इतर परिक्रमावासी माणूस म्हणून अधिक जवळचे किंवा ओळखीचे वाटतात. भग्न देवस्थानांविषयीचा 'कुंतल'चा राग आणि उद्वेग, एकंदर जगण्याचा अर्थ काय ह्या विचाातूनच आलेला विषाद ह्या विचारांचा उल्लेख येतो पण निचरा होत नाही.

मी स्वतः या विषयातील अडाणी. मात्र कुतूहल आणि कुतूहलमिश्रित आश्चर्य भरपूर. म्हणूनच डोके टेकायच्या आधी प्रश्नच जास्त. अर्थात लेखकांविषयी आणि त्यांच्या गुरू आणि साधनेविषयी संपूर्ण आदर आहेच. मात्र संपूर्ण पुस्तक संपवून अंती रिताच राहिलो हे माझे दुर्भाग्य.

प्रवासवर्णनातून माहितीच्या अपेक्षा असतात तसेच प्रवाशांच्या भावनांचा आविष्कारही अपेक्षित असतो. या दोनही बाबींमध्ये पुस्तक खरे उतरते. मात्र थोडेसे रोजनिशीच्या अंगाने जाते.

तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची असेल तर नक्कीच वाचनीय पुस्तक आहे. मात्र नर्मदा परिक्रमा कशाला व त्याने अंती काय लाभले ह्या दोन प्रश्नांची पटेलशी उत्तरे मला मिळाली नाहीत.
Profile Image for Dipti Haldankar - Khot.
6 reviews1 follower
Read
April 12, 2021
' परमेश्वर आहे परंतु नक्की कोठे?
परमेश्वर नाही सांग तसे का वाटे?
तो असो नसो पण कशावरून तू असशी?
काठाशी असुनी राही रिकामी कळशी.'
नर्मदे ss हर हर!

मानवी स्वभावाची हीच खोट आहे. त्याला जरा सुख मिळाले की तो म्हणतो अधिक हवे, हे कमी आहे ; ते कमी आहे. हे अजून हवेय - मागणी कधी संपत नाही, अधिकाची मागणी हे दुःखाचे मूळ आहे. पण उमज पडेल तर...

सर्व काही इथेच करायचे आहे आणि सर्व काही इथेच सोडून जायचे आहे.. मनातला मोह टाळता आला की बर्‍याच गोष्टी सोप्या होऊन जातील.. साध सरळ आयुष्याच गणित आहे.. जे माहित असत पण दुसर्‍याने सांगितल्याशिवाय कळत नाही किंवा लक्षात ही येत नाही.. त्यासाठी आयुष्यात अशी एक तरी भ्रमंती म्हणा किंवा परिक्रमा केली पाहिजे..
Profile Image for Gourang Ambulkar.
184 reviews5 followers
July 9, 2021
DISCLAIMER : I have deliberately penned a near cryptic and a non -committal review so as not offer any bias for the reader.
The author has completed this arduous circumambulation of approximately 3000+ KM on foot not once , not twice but thrice. Out of the 3 times, the last 2 times were back to back with a 4 month halt. Man that is something. I am into endurance sports and I therefore bow down to this superhuman with utmost reverence. He has recounted selective memories from the countless that he may have come across in this book. All I can say is he is light years above my league. Now the logicians and skeptics may well question his experience and attribute potential explanations, but like the author has offered an honest confession and disclaimer that those are experiences and he does not claim that everyone will have similar occurrences. However he does assure that Narmada will offer each and every pilgrim experiences, and that those will differ based on their elevation of spiritual understanding. Every reader is definitely at the liberty of agreeing , disagreeing or discarding based on their mental make up, the views, however as the author prefaces that these are after all experiences and may seem far fetched to some versus day to day occurrences to others. Its upto the reader to decide which end of the spectrum they lie. The stars I have offered are not for the content, however for the effort taken and the way the content is laid out in a lucid and palatable manner.

Overall a must read book for all, but especially those of spiritual inclinations. He has managed to cast some light on several shades of human natures that he has encountered through his Uber ultra marathons of over 12000 KMs+. Hats off to him.
Profile Image for Aniket Patil.
525 reviews22 followers
October 25, 2017
First 100 pages are exciting ,fast, thrilling then later on it becomes similar experience. However, I liked this book because Its different , Little bit of philosophy,mysticism is there. This teaches you many things about life. Its a travel experience. definite read.
Profile Image for Dhananjay Kulkarni.
147 reviews6 followers
June 12, 2021
A great read of Narmada Parikrama. Swamy did the parikrama three times. This is very insightful read. Full of experiences - common and strange. It also has occasional pointed commentary on contemporary social, political, and religious situation.
12 reviews
August 21, 2021
जगन्नाथ कुंटे यांचं "नर्मदे हर हर" वाचलं.
अचाट आहे, नर्मदा परिक्रमा मधील अनुभव आणि आलेले दृष्टांत , परिस्थितीचे वर्णन छान सांगितलंय.

एकूणच परिक्रमा किती खडतर आहे आणि लोकांच्या विविध छटा असतात, कसे वागतात!! 🙏🏻

केवळ परिक्रमा करायची म्हणून करणारी अनेक माणसं असतात, पण श्रद्धा आणि विश्वास या बळावर, नर्मदा माई सगळं सांभाळून घेईल, काही कमी पडू देणार नाही हा आत्मविश्वास या बळावर श्री कुंटे यांची परिक्रमा पूर्ण ३ वेळा पूर्ण झाली.

नमूद केलेले अनेक अनुभव अथवा नर्मदा माई बरोबरचा संवाद, योग सिद्ध संन्यासांचे कथन, अध्यात्मात साधला जाणार स्वार्थ आणि घरात अन्न नाही, पैसा नाही पण केवळ धर्माबद्दल ची असलेली अतूट श्रद्धा जी प्रत्येक परिक्रमा वासी मनुष्याला शक्य होईल तसे सहाय्य करायची प्रवृत्ती असे अनेक अनुभव आहेत.

कित्येक अनुभव विश्वास बसणार नाहीत असे वाटतात, पण ज्यांनी पूर्ण श्रद्धेने परमेश्वराला शरण जाऊन जीवन जगणं स्वीकारलं आहे अशांना असे अनुभव येऊ शकतात.
Profile Image for Aniruddha Sastikar.
Author 6 books15 followers
August 30, 2018
माझा जन्म यवतमाळ चा, राहणे, वाढणे, शिक्षण सर्व अहमदाबाद ला. उन्हाळा आणि दिवाळी च्या सुट्या लागताच, ट्रेन चा २४ तासाचा प्रवास करत हेड्कॉर्टर ला जायची मजा काही वेगळीच होती.

फार खोलात नाही शिरणार, पण १९७४ ते २०१० (त्या नंतर विजिट झाली नाही, खेद आहे त्याचा) पर्यंत केलेल्या प्रवासात, 'नर्मदा' नदी मी अनेक वेळा पाहिली, पार केली.

भडोच आले की आई नी दिलेले ५० पैसे / १ रुपया चा सिक्का प्रवाहात टाकायचा. हि नदी खूप मोठी आहे, हिचे पात्र लहान-मोठे, लाहान-रुंद होऊ शकते, हीचा स्रोत्र दूर आहे, पावन नदी आहे, हे सर्व आई-वडील सांगायचे. ते सर्व सत्य मानून तिला नमस्कार करून धन्य वाटायचं.

'नर्मदा' ची ओळख फक्त एवढीच. पूल ओलांडला की ओळख संप���ी. खरी ओळख श्री जगन्नाथ कुंटे ह्यांनी लिहिलेल्या 'नर्मदे हर हर' या पुस्तकाने करून दिली. नर्मदा ची परिक्रमा (उगमा पासून परत उगमा पर्यंत). बाप रे! ते पण ३ वेळा.

खरोखर, श्री कुंटे ह्यांची लायकी किती मोठी आहे त्याची कल्पना करणं शक्य नाही. त्यांच्या गुरु चे किती मोठे पाठबळ.

'नर्मदे हर हर' वाचून मी खूप काही शिकलो - सार घ्यावे आणि असार सोडून ध्यावे, अहंकार मोडावे, दुसऱ्यावर अवलंबून राहू नये, समाधानी असावे, नामस्मरण करावे, आणि आपल्या गुरु वर निरभंग विश्वास ठेवावे.

हे पुस्तक जरूर वाचा.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Profile Image for Meethil Shah.
22 reviews1 follower
October 29, 2021
It appeared to me a completely narcissistic, vainglorious travelogue full of 'miracles' and unnecessary repetitive details.

IMHO what is ironical is going through all those months of pain and struggle described here to get detached from civilisation when you can't even free yourself from the compulsion of smoking cigarettes.

I don't think someone with a scientific, rational mindset can relate to or believe most of the content.

Like the author says, everyone will have their own experiences during Narmada Parikrama, so I wouldn't recommend this book to anyone unless I've had my own share of hallucinations/supernatural experiences.

Honestly, this book deserves to be in the fiction shelf and would be an enjoyable read for non-questioning believers.
Profile Image for Heramb.
Author 5 books15 followers
January 8, 2016
Encounter things beyond our daily reasoning and logic through this book. Believe it or not, life has amazing things to offer, only if we are ready.
Profile Image for Omkar Joshi.
45 reviews
February 12, 2020
काही वर्षांपूर्वी नर्मदेच्या काठी आणि तिथल्या परिसरात थोडा हिंडलो तेव्हापासून नर्मदा परिक्रमेबद्दल कुतूहल आणि जिज्ञासा!

लेखकाने परिक्रमेचे रांगड्या आणि सरळसोट पद्धतीने केले आहे. कधी परिक्रमावासी बेबंद वारा वाहतो तसा‌ मोकाट सुटतो तर कधी त्याची परिस्थिती वाऱ्याने पालापाचोळा उडतो तशी तर कधी नदी अखंड वाहते तसा परिक्रमावासी ही प्रवाही राहतो - कशातही न गुंतून पडता ! लेखकाने अनेक अनाकलनीय अनुभवांचे कथन केले आहे ज्यावर विश्वास बसत नाही पण आपल्या घरात बसून इतके खडतर भ्रमण केलेल्या व्यक्तींचे अनुभव आपण कोणत्या आधारावर मान्य/अमान्य करावे?

हे पुस्तक वाचायला घेण्याआधी युट्यूब वर ' नर्मदा परिक्रमा ' ह्या विषयावर काही चित्रफिती पाहिल्या होत्या. त्याचा परिणाम असावा पण पुस्तक अर्धे संपत आले तरी मनाची पकड घेईना - मध्येच प्रवास वर्णन, अचानक अध्यात्मिक अनुभव, मध्येच समाजदर्शन असा प्रवाह असल्याने माझा गोंधळ उडत होता. लेखकाने जरी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आपण लेखक नसल्याचे लिहिले असले तरी वाचकास पुस्तकातील मजकूर कसा मांडला आहे ह्याने खूप फरक पडतो! लेखकाने तीन परिक्रमा केल्या आहेत पण शेवटच्या दोन परिक्रमांचे वर्णन इतके घाईघाईत आटोपले आहे की त्यांनी पाहिल्या परिक्रमेवरच पुस्तक आटोपले पाहिजे होते.

पुस्तक वाचनीय आहे पण हृदयात घर करून राहावे असे परिक्रमा वर्णन त्यात नाही, काही कारणांनी शुष्क वाटते ...
This entire review has been hidden because of spoilers.
Profile Image for Sameer Gaikwad.
7 reviews
July 26, 2023
A splendid book on the Narmada and the author’s experiences during his three journeys circumambulating the river. Gives a peek into the moments of spiritual, religious and human greatness and also its many fallacies. The author does not even shy away from his own weaknesses, documenting them as unabashedly.

The narration is in fits and starts though, leaving interpretations to the reader. Overall, this book kindles the faith in such a journey. It surely sparked mine and I ended up completing the Parikrama as a solo trip on a bicycle earlier this year.

I thank Shri Kunte-ji for documenting his experiences!!
Narmade Harr 🙏🏼
1 review
March 21, 2024
This book is just great. It is so much full of thrilling incidences which give goosebumps even while reading. I would like to share my personal experience, like when i was reading i had to unwillingly keep the book to do my other important works. I always felt like just one more page please and would read one or two extra pages all the time. After reading this I definitely want to do Narmada Parikrama once in my life. One of my most favorite part of this book is the experience of the author of witnessing Ashwaththama and some incidences of feeling the grace of Naramada mayya.
Profile Image for Sarang Gurao.
3 reviews
December 11, 2020
Actually, this book is not a guide book nor a travelogue of one of most unique religious pilgrimage of Narmada river parikrama (narmada river circulation). It's an experience that author shares while doing his travel. his spiritual journey, life stories, and stories of people living besides river. This book should not be read once but I recommend to read at least once each year. I have read it 3 times till now and everytime it was a new experience.
Profile Image for Amruta.
93 reviews2 followers
January 12, 2025
First book of 2025, always wanted to read this one. Partly because of fascination to find the truth behind the unexplained phenomenons, partly because I always admired the journeys by foot. This is a pilgrimage of one of the divine rivers of India. Liked the book but I feel that it was kind of diary and not a literary attempt at writing a book. Nonetheless there are some paragraphs which are brilliantly written and made me learn a different perspective. Giving 3.5 stars.
Profile Image for Rucha Dhakne.
4 reviews
February 24, 2022
I was fascinated about Narmada Parikrama from middle school. Got a chance to read this book, a good read to know the details of parikrama. The experiences are described with painstaking attention to detail. And it is everyone's personal view to believe the supernatural incidents mentioned
But a good read if one is curious about the topic!
2 reviews
Want to read
May 7, 2020
hi
This entire review has been hidden because of spoilers.
Profile Image for Pruthviraj Pawar.
7 reviews4 followers
May 11, 2020
Sansari jivanatun manane mukt zalelya eka Sadguru dasachi 3 Narmada parikrama kelyanantarchi hi amrutvani aahe.. apratim , assal pramanik aani anubhutipurn likhan.. must read..
Profile Image for Pramod Potdar.
17 reviews1 follower
May 5, 2021
What a journey of miracles. Cannot keep this book down once you start reading. Feels like it’s written in one breath.
Profile Image for Pradeep Shinde.
7 reviews3 followers
December 11, 2023
काय विलक्षण अनुभव आहे? हा माणूस गांजा सिगरेट ओढायचा, शिवराळ ही होता. पण एखाद्या अवतारी पुरुषा सारखे त्यालाही दिव्य अनुभव आले. खरोखर विलक्षण! धन्य तो माणूस आणि धन्य त्याची पत्नी देखील.
कोणा साधारण माणसाचे हे काम नोहे.
Profile Image for Surjit.
8 reviews4 followers
October 11, 2012
हे नर्मदा परीक्रमेवरचे सर्वात जास्त गाजलेले पुस्तक असावे. अध्यात्मिक साधना करणारे कुंटे यांना 'आदेश' मिळतो नर्मदेची परिक्रमा करण्याची. कुंटे एकूण तीन परिक्रमा करतात. या परीक्रमेदरम्यान येणाऱ्या अनेक अडचणी, भेटणाऱ्���ा माणसांचे वेगवेगळे नमुने, काही अध्यात्मिक अनुभव वगैरेंचा लेखाजोखा म्हणजेच हे पुस्तक 'नर्मदे......हर हर'. यातील काही बाबी पटो अगर न पटो त्या वाचनीय मात्र नक्कीच आहे.
1 review
September 12, 2016
Amazing book on Narmada Parikrama. Best for people interested in spiritual content. This book is basically story of the writer who travels along Narmada river banks to complete Narmada Parikrama. Reader simply gets a ride of Narmada Parikrama once he starts reading this book. Recommended.
1 review1 follower
Want to read
June 8, 2014
i can not read the book pl give me technical help my email id is surendranalawade@rediffmail.com
Profile Image for Chhayya Avhad.
1 review
April 13, 2015
This book is turning point of my life.... Really Swami is the Man beyond words... Thank you so much 'Swami' for giving us this treasure.....'Narmade Har' is auspicious 'Granth' for me..
Displaying 1 - 28 of 28 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.