Jump to ratings and reviews
Rate this book

Bidhar

Rate this book
Bidhar - on the move is the story of Changdeo Patil. Haunted by illness and obsessed with death, he moves to Mumbai from his village Udali, breaking away from his feudal roots. He encounters young men frustrated by the system but refuses to become one of them. Suddenly, he takes a fancy to education and pursues masters in Arts, without his family knowing about it.
Bidhar is the story of a pessimist who struggles to move on in life.

First published January 1, 1975

10 people are currently reading
200 people want to read

About the author

Bhalchandra Nemade

19 books122 followers
Bhalchandra Vanaji Nemade (born 1938) is a Marathi writer from Maharashtra, India. He is famous for his books Hindu and Kosala. Also he is known for his novel Hindu jagnyachi samrudhha adgal. He is a recipient of the civilian honour of Padma Shri (2011) and the Jnanpith Award (2014).

Wikipedia

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
64 (36%)
4 stars
81 (46%)
3 stars
28 (15%)
2 stars
2 (1%)
1 star
1 (<1%)
Displaying 1 - 13 of 13 reviews
Profile Image for Ashish Iyer.
870 reviews633 followers
June 19, 2020
Good marathi literature. Wish i could read it in original language.
This book is the first part of Tetralogy. I have 2nd book with me i.e. Hool(हूल). Lets see how that goes.
Profile Image for Rasika Mahabal.
Author 1 book13 followers
February 7, 2017
Scene 1:
Me: (to an organizer O on a BMM convention committee) Why don't you invite Nemade for the convention this year?
O: nobody knows him
Me: how come? We should be proud, he is a padmashree winner after all.
O: Yes, but let's be honest how many people read Marathi?

Scene2:
S sent me first draft of her book to review
Me: We need these type of books in Marathi, why don't you publish this in Marathi?
S: There is no money there, who reads Marathi?

When I speak in Marathi with the younger generation they say "aunty can you please repeat that in English" so this generation is a step ahead (or behind, who knows!).

I know Maharashtrians who haven't read Batatyachi Chaal but had the energy time and patience to read the crappy series of Fifty shades of Grey.

Bidhar is a story of 4 Marathi writer friends who go at lengths to be able to publish in Marathi, failing to do so because let's be honest how many people read Marathi!

The book was written years ago but it is (more so) relevant today.

* This post is written in English so that everyone can read it as I am sure it is true with all Indian regional languages, they are all beautiful (if I may say so) even more than English is. I hope our languages do not die a slow death.
Profile Image for Sumant.
271 reviews8 followers
January 7, 2017
बिढार वाचली आणि कोसला सारखे डोक्यात विचार येऊन गेले कि नेमाडेंना नक्की ह्या कादंबरीमधून वाचकाला नक्की काय सांगायचे आहे . कोसला मधला सांगवीकर मला निराशावादी वाटलं . तो जगण्याची लढाई सुरु होण्याचा आधीच हरला आहे असा वाटला . पण चांगदेव पाटील जो ह्या कादंबरी नायक आहे मला जरा वेगळा वाटला.

कादंबरी मुंबई मध्ये घडते जिथे चांगदेव शिकण्यासाठी आलेला आहे. चांगदेव आधी मुंबईत स्वतःला शोधात असतो त्याचा शोध मला बराच जवळचा वाटला कारण कि जेव्हा कोणता पण ग्रामीण विद्यार्थी एका मोठ्या शहरात येतो तेव्हा त्याला सगळेच नवीन असते. तो अश्या गोष्टी शोधायचा प्रयत्न्य करतो ज्या त्याला जवळच्या वाटायच्या आणि कधी कधी हा शोध त्याला इतका निराश करतो कि त्याला वाटते कि का म्हणून आपण शहरात सगळे सोडून आलो. चांगदेवचे नशीब चांगले असल्या मुळे त्याला काही चांगले मित्र भेटतात. पण मधेच त्याच्या आयुष्यात एक वादळ येते ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्याची उलथापालथ होते .
Profile Image for Vijay.
127 reviews16 followers
July 12, 2020
बिढार ही चांगदेव चातुष्ट मधील ही पहिली कादंबरी, अश्या एकूण चार आहेत, त्यातील हूल, झूल, जरीला अजून वाचायच्या आहेत.

बिढार हि मुळात नेमाडे यांच्या कोसला नंतर ची गोष्ट आहे, यात त्यांनी नापास झाल्या नंतर काय केलं, मग कसं MA केलं त्यानंतर लिहलेली कादंबरी, त्यात आलेल्या अडचणी, जगण्याची आशा सोडलेली, मग त्यातून चांगदेव कसा वाचतो आणि त्यातून त्याला जीवनाकडे पाहायची एक नवी, कात टाकलेली दृष्टी मिळालेली असते, मग पुढील आयुष्यातील संघर्ष करून त्यातून काढ्लेला मार्ग वगैरे आहे आणि त्याचवेळी मित्रमंडळी व त्यांचीही जीवन लढाई छान मांडली आहे.

साधारण, चार मित्र भेटल्यावरते कुठली भाषा वापरतात, तशीच भाषा वापरली आहे त्यामुळे कादंबरी जरा जास्त जवळची वाटते. चांगदेव वा त्याच्या कोणत्याही मित्राला पूर्ण कादंबरीत आदर्शवादी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न अजिबात नाही, हे लोक सिगरेट-दारू पिणे, पैसे नसतील तर उपाशी झोपणे, पाव खाऊन दिवस काढणे, अस्वच्छ जागेत राहणारे लोक सगळंच फार वास्तव आहे. मित्रांमध्ये बसल्यावर एकमेकांच्या वडलांचा उल्लेख बाप, म्हातारा वगैरे करतात आणि आजही हि प्रथा अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे माझ्या लहानपणी, आमच्या आप्पांचे(वडीलांचे ) मित्र मला 'तुझे आप्पा कुठ आहेत ?' असं न विचारता 'तुझं म्हातारं कुठाय ?' असं विचारायचे.

तसंच जाता जाता नेमाडे समाजाच्या उदासीनतेबद्दल बोलतात, रस्त्याच्या कडेला एक स्त्री पडलेली असते. तिचा कदाचित सामूहिक बलात्कार झालेला असतो आणि अजून दोन लोक तिला ‘वापरायला’ बघत असतात. ती बिचारी पाय घट्ट दाबून पडलेली असते. हे फार अस्वस्थ करतं.

बिढार कथा ...

चांगदेव पाटील हा एका गावाकडील संप्पन्न एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला तरुण मुलगा पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबईत येतो. पण साधारण आयुष्यात भरपूर संकटे येत असतात तशी ती त्यालाही येतात पण यातून त्याला बाहेर कस पाडाव ते काही काळात नाही. आणि मग यातून येतं ते म्हणजे संताप, राग, भीती, न्युंनगंड अन नैराश्य!! त्यात कमी कि काय म्हणून कसलासा जडतो आणि मग तो जगायची आशाच सोडून देतो. त्यातून जन्मलेली जीवनाबद्द्दलची नकारात्मकता आणि निष्काळजीपणा वाढत जातो. त्यातच एकत्र कुटुंबातील वाद अन कटकटी, बापचं त्याच्या साठी, त्याच्या शिक्षणासाठी इकड-तिकड लबाडी करून पैसे मिळवतो त्याला वाटत असतं. यातून त्याची अस्वस्थ खूपच वाढत जाते.

त्याचे सर्व मित्रही जवळपास त्याच अवस्थेततून जात असतात. पण हे सारे मित्र हुशार असतात आणि प्रत्येकाला काहीतरी सिध्द्ध करायचं असतं. त्याचे मित्र सारंग, शंकर, नारायण, भैय्या, अप्पा, वगैरे अस्सल पात्रे आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र विचारसरणी आहे, भूमिका आहेत, पण तरीही सगळे मित्र आहेत. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरची तरुण मंडळी एकत्र येऊन आयुष्यचा गाडा खडतर रस्त्यावरून अतिशय कष्टाने पण तितक्याच तिरकस-खट्याळ-मजेशीर पद्धतीने पुढे ढकलत असतात. हे लोक मग बरेच उदयोग करतात, मासिक, साप्ताहिक वगैरे सुरु करतात पण हवं तसं यश काही मिळत नाही. एकजण कादंबरी हि लिहितो पण त्याची प्रकाशकाकडुन कशी फसवणूक होते वगैरे.

आणि मग हळू हळू प्रत्येकजण कुठेतरी स्थिर होत जातो. चांगदेवहि प्राध्यपकाची नोकरी मिळवितो व मुंबईला रामराम करतो.

विजय सरवते
११-०७-२०२०
16 reviews
October 15, 2022
चांगदेव पाटील मुंबईत शिकायला येतो तेव्हा त्याला आपण मुंबईच्या शहरी वातावरणात टिकून राहू का याचीच शंका अधिक होती. गावाचं वातावरण आणि मुंबई कडचं वातावरण यात सतत तो तुलना करत राहायचा. कॉलेज च पहिलं वर्ष तसं चांगलं गेलेलं. चांगले मार्क्स हुशार मुलगा म्हणून नावलौकिक मिळालेला.
पण नंतर जे आरोग्याची आणि शिक्षणाची हेळसांड चालू झाली ती शेवट पर्यंत.

जग उलथून टाकून, ही भ्रष्ट system बदलवून नवीन काहीतरी करायची उमेद प्रत्येक तरुणाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर असतेच. ती उमेद आणि तो काळ मंतरलेला असतो.

पण तो काळ जातो आणि जग तुम्हाला त्याच्या नियमाप्रमाणे जगायला कसे भाग पाडते याचा प्रत्येकाला अनुभव येतोच...मग ते क्षेत्र कोणतेही असो.
48 reviews
August 31, 2019
Excellent. Very much as per Nemade style. Would be able to say more on it after reading other 3 books (Hool, Jarila and Jhool) in the series.
1 review
December 18, 2024
Great Novel

I think that the power of this book is, it pulls the reader in to the character of Changdev Patil so easily that you start feeling that everything is happening around you as Changdev himself.
Profile Image for Nikhil Asawadekar.
53 reviews5 followers
March 4, 2018
प्रत्येकाने जरूर वाचावी अशी कादंबरी. शिक्षण/नोकरीसाठी दुसऱ्या शहराच्या वाटा धुंडाळणाऱ्या बॅचलर लोकांसाठी तर ही कादंबरी ‘मस्ट रीड’ कॅटेगरीमध्येच!!
Profile Image for Aniket.
25 reviews
June 11, 2020
Writing style is unique, book has written around 20 years ago but one can relate it to current situations.
182 reviews2 followers
March 16, 2023
मुंबईत राहायचं का सोडायची हा फार मोठा स्ट्रगल आहे. एका सामान्य हुशार विद्यार्थ्यांची ही कथा आहे. बरेच लोक याच्याशी सहमत असतील.
Profile Image for Sameer Nichite.
3 reviews
September 6, 2018
कोसला नंतरची नेमाडे यांनी दुसरी कादंबरी, चांगदेव पाटील ह्या व्यक्तिरेखेवर हे सर्व आधारलेले आहे, चांगदेव चातुष्ट मधील ही पहिली कादंबरी अश्या एकूण चार आहेत, समाज जीवनाचा एवढा मोठा पट उत्तम रितेने मांडलेले आहे, बिढार मुळात नेमाडे यांच्या कोसला नंतर ची कहाणी आहे, यात त्यांनी नापास झाल्या नंतर काय केलं, मग कसं MA केलं त्यानंतर लिहलेली कादंबरी, त्यात आलेल्या अडचणी जगण्याची आशा सोडलेली, मग एक वाईट प्रसंग त्यात परत जगण्याची उमेद निर्माण होणे, मग पुढच्या आयुष्याचा संघर्ष उत्तम रीतीने मांडलेले आहे, मित्र आणि त्यांचे संबंध उत्तम रीतीने गुंफलेले आहेत,
16 reviews
June 1, 2025
विशीतल्या प्रत्येकाने वाचावी अशी ही कादंबरी. तार्किक, बौद्धिक, नैतिक मुळात विचार करणाऱ्या प्रत्येक विशीच्या युवकाच्या डोक्यातली गुंतागुंत, घालमेल, अनिश्चितता नेमाडेंनी अतिशय सुंदरपणे मांडली आहे. स्वतः लेखन विश्वाशी संबंध असल्याने मराठी साहित्य विश्वातील राजकारण, वर्तनव्यवहार या कादंबरीत बारकाईने येतात. तरुण लेखकांची विद्रोही वृत्ती, जुनं सर्व निकाली काढायचे पोरकट प्रयत्न, प्रकाशक-छापाईवाले यांची मनमानी इत्यादी विषयी उहापोह आहे. त्याच बरोबर या वयात वाटणारी बेफिकिरी, गरिबांविषयी वाटणारी आत्मीयता, श्रीमंतीचा तिटकारा तसंच शहरांचं विशेषतः मुंबईचं होणारं बकालिकरण यावर बरंच लिहिलं आहे.
Displaying 1 - 13 of 13 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.