गारंबीचा बापू
पुस्तकाचे नाव :- गारंबीचा बापू
लेखक :- श्री. ना. पेंडसे
पाने :- २२७
शैली :-
प्रकाशन :- काॅन्टिनेन्टल प्रकाशन
प्रथमावृत्ती :- १९५२
पुस्तकातील कथा पूर्णतः काल्पनिक आहे. हर्णे बंदरातील, गारंबी ह्या गावातील मुख्य पात्र बापू ह्याची ही जीवनकथा.
सोबत त्याची आई ऐंशी, बायको राधा, मित्र दिनकर, मावशी आणि बाप विठोबा ह्यांचदेखील लेखकाने उत्तम रित्या वर्णन केलेली आहेत.
पुस्तकातील पात्र ज्या प्रकारे बनवलीत आणि वाढवली, ती वाचतांना कहानी खरीच वाटते.
लेखकाने ह्या पुस्तकात, जातीवादिय भेदभाव, गावागावातील, आपापसांतील चुगल्या/लावालाव्या मुळे एखाद्या व्यक्तीवर होणारा अन्यायाला वाचा फोडली आहे. तसेच अंधश्रद्धेमुळे, गावातील विरूद्ध कुजबुजीमुळे घट्ट मैत्रीत येणारी तुटकता वर्णिली आहे.
व्यक्तीच्या दृढ विश्वासाच्या जोरावर, शून्यातुन शिखर गाठण्याची जिद्द, कथेतील पात्र इथे आपल्याला सांगतो.
समाजातील परंपरागत चालत आलेल्या अंधश्रद्धेला, ज्या इतरांना फक्त नुकसानच देतं अशा खराब आणि बुरसटलेल्या रुढींना कसं तोंड द्यायचं, कसं झिडकारायचं, ते हे पुस्तक शिकवतं.
लेखकाने अतिशय उत्तम भाषा शैलीत हे पुस्तक लिहिलेलं आहे, जे एकदा नक्कीच वाचण्याजोगं आहे.