Jump to ratings and reviews
Rate this book

Garambicha Bapu | गारंबीचा बापू

Rate this book
English 242

227 pages, Hardcover

First published January 1, 1952

16 people are currently reading
325 people want to read

About the author

Shripad Narayan Pendse

20 books37 followers
श्री ना पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
57 (41%)
4 stars
49 (35%)
3 stars
26 (18%)
2 stars
3 (2%)
1 star
3 (2%)
Displaying 1 - 7 of 7 reviews
Profile Image for Reader Vivek.
229 reviews12 followers
January 19, 2022
गारंबीचा बापू

पुस्तकाचे नाव :- गारंबीचा बापू
लेखक :- श्री. ना. पेंडसे
पाने :- २२७
शैली :-
प्रकाशन :- काॅन्टिनेन्टल प्रकाशन
प्रथमावृत्ती :- १९५२


पुस्तकातील कथा पूर्णतः काल्पनिक आहे. हर्णे बंदरातील, गारंबी ह्या गावातील मुख्य पात्र बापू ह्याची ही जीवनकथा.
सोबत त्याची आई ऐंशी, बायको राधा, मित्र दिनकर, मावशी आणि बाप विठोबा ह्यांचदेखील लेखकाने उत्तम रित्या वर्णन केलेली आहेत.
पुस्तकातील पात्र ज्या प्रकारे बनवलीत आणि वाढवली, ती वाचतांना कहानी खरीच वाटते.

लेखकाने ह्या पुस्तकात, जातीवादिय भेदभाव, गावागावातील, आपापसांतील चुगल्या/लावालाव्या मुळे एखाद्या व्यक्तीवर होणारा अन्यायाला वाचा फोडली आहे. तसेच अंधश्रद्धेमुळे, गावातील विरूद्ध कुजबुजीमुळे घट्ट मैत्रीत येणारी तुटकता वर्णिली आहे.

व्यक्तीच्या दृढ विश्वासाच्या जोरावर, शून्यातुन शिखर गाठण्याची जिद्द, कथेतील पात्र इथे आपल्याला सांगतो.
समाजातील परंपरागत चालत आलेल्या अंधश्रद्धेला, ज्या इतरांना फक्त नुकसानच देतं अशा खराब आणि बुरसटलेल्या रुढींना कसं तोंड द्यायचं, कसं झिडकारायचं, ते हे पुस्तक शिकवतं.

लेखकाने अतिशय उत्तम भाषा शैलीत हे पुस्तक लिहिलेलं आहे, जे एकदा नक्कीच वाचण्याजोगं आहे.
Profile Image for In.
157 reviews1 follower
August 30, 2021
निव्वळ कोकणातल्या वर्णनासाठीच ह्या कादंबरीला उचलून धरलं पाहिजे. पेंडश्यांनी गारंबी नुसत्या शब्दांनी उभी केली. नदी, तिच्यावरचा साकव, डोंगरावरची सुपारी आणि पाट, इथेच जिंकले ते. त्यावर कडी केली ती माणसांनी. कोकणातला माणूस मनाने खूप दिलदार, पण आपल्या पायरीशी पक्का. फार मोठ्या आशा- आकांक्षा नाहीत अश्या अतिश्रीमंत नाही तरी खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या गावात बापू हे अजब रसायन तयार झालं.

रूढार्थाचे कुठलेही नियम न पाळणारा बापू. त्याला अफाट बापू म्हणायचे ते उगीच नाही. स्वतःच्या हिमतीवर जगला. योग्य अयोग्यतेच्या जगाच्या व्याख्या गुंडाळून ठेवल्या त्याने. आपल्या जीवनात गारंबीला चघळायला अनेक विषय त्याने दिले. त्याच्या संपूर्ण जीवनाचा आलेख लेखकाच्या लेखणीतूनच वाचलेला बरा.

कथा बरीचशी संवादाच्या वळणाने जाते. कोकणाच्या भूमीचं वर्णन येतं तेच वर्णनात्मक भाग आहेत. केवळ २२७ पानात अनेक व्यक्तिरेखा फक्कडपणे उभ्या करण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. बापू व्यतिरिक्त त्याची आई, मावशी, विठोबा, दिनकर, राधा आणि रावजी हे सगळेच जण मनात घर करतात. विठोबाचे वर्णन वाचताना पुलंचा नारायण आठवतो. अण्णा खोत संवादामध्ये फारसे आले नाहीत तरी त्यांचा वावर संपूर्ण कादंबरीत जाणवण्यासारखा आहे.

पुस्तक वाचून संपल्यावरही त्या काळातल्या कोकणचा वर्णन मनातून एवढ्यात जाईलसं वाटत नाही.
16 reviews
August 7, 2022
कोकणातील छोटंसं गाव आणि त्या गावातील अफाट बापू ची ही कहाणी.
बापूचा बाप हा अण्णा खोताकडे पाणक्या. आई खोतांच्या घरातली कामं करणारी. बापूचा वडलांवर प्रचंड जीव तेवढाच आईचा प्रचंड तिटकारा.
सुरुवातीला शून्य असणारा बापू तरुण वयात सुपारीच्या धंद्यात चांगलाच जम बसवतो आणि अण्णा खोताच्या नाकावर टिच्चून आयुष्यात उभा राहतो इतकंच सरळ कथानक.
पण यातल्या व्यक्तिरेखा आणि स्वभाव वैशिष्ठ्य चांगलीच लक्षात राहतात. बेरकी आणि आपमतलबी अण्णा खोत, प्रेमळ पण भोळा बाप विठोबा, कजाग आई, मायाळू मावशी, आणि सगळ्या प्रसंगांत बापूला साथ देणारी, सावरणारी राधा...
वाचून झाल्यावर... तेवढाच सुंदर... काशिनाथ घाणेकर अभिनित movie पण बघण्यासारखा आहे.
Profile Image for Mosami.
6 reviews
August 23, 2019
This book is a must read if you need a journey with the story of a young lad from a small village. A book can teach you a lot about life and bitter experience of a character's life makes you learned. Live thousand lives in one lifetime is only possible through books.
11 reviews3 followers
March 31, 2019
It takes you through the typical konkan village... their culture, traditions, human nature, some gems from the remote and the description of one gem 'baapu'. Must read
1 review
July 29, 2025
कोंकणनाचे आणि कोंकणवासीयांचे समर्पक वर्णन पेंडसे यांनी केले आहे. विठोबा चे पात्र मनात घर करते,ते वाचताना मन जड होते. दिनकर सारखा मित्र असणे किती भाग्याचे आहे. बापू, राधा, मावशी चे पात्र आपल्याला बरंच काही शिकवून जाते. ही कादंबरी तासन् तास आपल्याला खेळवून धरते
Displaying 1 - 7 of 7 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.