पुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
I felt this was sub par as compared to some of his other Essays. Ofcourse there are the classic Pu LA touches that do make you laugh, but overall it seemed to have repetitive theme. That being said, the essay on his rebuttal to 'humor should not be classified as Literature' is superb. To fully appreciate the awareness of the social conditions in Maharashtra of the 50s, 60s,70s , 80s is must , else the reader will have no enjoyment whatsoever.
AghalPaghal is a collection of articles/short essays written by my favorite writer, P.L Deshpande.
Ranging from topics like 'different categories of fan-mails, How literature and style of writing have changed, Different slangs used in Marathi, giggles are assured. This might not be as funny as some of his other works, but he ensures you know 'Observation' is his super power :)
I absolutely admired the article in which he has compared some classical 'Taals' to an everyday situation. It's brilliantly done, which also tells us not only was his observation strong but also his knowledge of Music and its rhythms.
खळाळून हसत दिवस प्रसन्न करणाऱ्या १२ लेखांचा हा संग्रह आहे. अर्थातच पु. लं. देशपांडे यांच्या खास शैलीत शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचे भांडार त्यातून खुले होते. या विनोदाला दृश्यात्मकता असल्याने प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहण्याची किमया या लेखांनी साधली आहे. या लेखांची शिर्षकही आगळीवेगळी.
काही साहित्यिक भोग, प्रा. विश्व. अश्व. शब्दे, माझा एक अकारण वैरी, माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने, मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास ही शिर्षके उत्कंठा निर्माण करतात. काही (बे)ताल चित्रे या लेखात केरवा, दादरा, एकताल, झपतालावर आधारित शब्दचित्रे उभी करतात. ती दाद द्यावीत अशीच!
पु. ल. देशपांडे यांचं शब्दलेणं आणि वसंत सरावते यांचं मुखपृष्ठ आणि रेखाचित्र लाभलेलं हे पुस्तक म्हणजे जपून ठेवावं असा ठेवा आहे, मी आणि माझे पत्रकार, काही साहित्यिक भोग, आमचे भाषाविषयक धोरण, मी : एक मराठी माणूस, माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने, विनोदी लेखन हे साहित्य आदी आदी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक मनमुराद हसवतं.
या सर्व लेखांची सुरवातही आगळीवेगळी. एकेकाचं मराठी मध्ये ते सुरवात करतात, '...यापुढे बायाबापड्यांनी मराठी लिहिलं पाहिजे. मराठी साहित्य संमेलनातील एक अध्यक्षीय आदेश. 'माझा एक अकारण वैरी'मध्ये ते लिहितात, 'माझ्याविषयी समाजात तसे कुठेही गैरसमज नाहीत. कचेरीत मी अजातशत्रू आहे. या साऱ्या अक्षरघनाचा साज रेखाचीत्रांमुळे खुलला आहे.
"I'm not particular about this Ganpati or that! (Retired पुणेरी म्हातारा भडकला की इंग्रजीत फुठतो)Or any temple for matter of that" 😂
"बालसंपादक - काका, तुमच्या आयुष्यातला अविस्मणीय आनंदाचा प्रसंग कुठला ? पु ल - पुष्कळ आहेत. (खरे प्रसंग :(अ) गेल्याच आठवड्यात शेजारच्या शेंडे डॉक्टरांचे रात्रंदिवस भुंकून उच्छाद मांडणारे कुत्रे मेले. (ब) वरच्या गोखल्यंची सुमी त्यांच्याच ड्रायव्हर चा हात धरून पळाली (क) आमच्या किरणाभुसारवाले गणूशेठ यांनी मोड परत करताना वीस पैसे अधिक दिले. किती म्हणून अविस्मरणीय प्रसंग सांगावे? पण यात साहित्यिक अविस्मरणीयता नाही.) माझ्या आयुष्यातला अविस्मणीय आनंदाचा प्रसंग म्हणजे एस. टी. स्टँड वरून एका वृद्ध बाईची भाजीची टोपली मी स्वतः उचलून डोक्यावर घेतली आणि स्वारगेटपासुन मंडईपर्यांत तिला सोबत केली. (न्या. मू. महादेव गोविंद रानडे यांच्या आत्म्याने मला क्षमा करावी. त्यांनी एका म्हातारीच्या टोपलीला उचलायला हात लावल्याची कथा मी वाचली होती. ती सत्यकथा मी ललित केली एवढेच.) " 🤣😂 . . . "पत्रकार - जनजागरण: आपली प्रतिक्रिया हवी आहे. मी - कोण गेलं हो? जनजागरण - गेलं नाही कुणी. मी - मग कसली प्रतिक्रिया ? (एके काळी कुणी आटोपले की ' क्रिया' करण्यात माणसे गुंतयची. आता ' प्रतिक्रिया' ही करावी लागते.) जनजागरण - कापूस एकाधिकार योजना संबंधी जे सरकारचे धोरण आहे त्याबाबत तुमची एक साहित्यिक म्हणून प्रतिक्रिया हवी. ...." 😂😂 . . . बरं का तारा... हा कप समज, हा तुझा बाप. आणि ही किटली. ही समज तुझी आई."
"आपल्या आईला स्वतःचा प्रियकर चक्क किटली म्हणतो हे ऐकून कुठली स्वाभिमानी मुलगी तयार होईल? तिने स्पष्ट सांगितले, “बाबांना कपबिप म्हणायचं कारण नाही. इथं तू त्या कपाचा कान धरला आहेस. पण ते तुझा कान धरून तुला बाहेर फेकून देतील. आणि माझी आई किटली काय ? - तुझी आई बादली आणि बाप हौद ! गुड बाय्!” असे म्हणाली आणि फॅमिली रूमचे दार आपटून गेली. 😂 . . . वेटर अवतरला... "दो ढोशा बोला तो विसर गया?" "सादा मसाला ?" "हमकू मसाला. सोन्या, तुमकू?" “मसालाच.” चप्पलमधल्या 'च्य'सारखा उच्चार करत सोन्यानं सांगितलं. ढोशा कडक बोला तो मऊच लाया! कडक करनेकू हात क्या तवेपर भाजता होतो.. क्या?" आता मीदेखील वैतागलो पण वेटर म्हणजे साक्षात बर्फाच्छादित असल्यामुळे त्याने कहर थंडपणाने विचारले, "और क्या लावू ?" "विष लाव विष. "-मी.
"फिश् इदर नही मिलता. अमारा वेजटेरयन आटेल औ.' त्यानं विषाचं 'फिश्' करून माझा काटा मोडला...
वेटर अवतरला... 'और क्या साब-बिल लावू?" "ए जंगली!" चक्क वेटरला हा 'जंगली' म्हणाला. "हम क्या तुमारा पैसा लेक भागता है? - बेवकूफ ! साबलोकका बिल हमारे बिलमें जमाव . " आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो बर्फावगुंठित माणूस वश्यापुढे पार वितळला आहे लाचारीने हसत - हो, ह-स-त- 'अच्चा साब, अच्चा साब' म्हणून निघून गेला. . . . 'कांदेपोहे गरम आहेत' ही पाटीवर खडूने लिहिलेली अक्षरे वाचून आत शिरावे वर्तमानपत्राचा आपल्या वाट्याला आलेला तुकडा उलटूनपालटून दहा वेळा वाचून वाह (हॉटेलांत असलेल्या वर्तमानपत्राचे पहिले पान माझ्या वाट्याला अजून कधी आले नाही किबहुना, हॉटेलवाले वर्तमानपत्राचे फक्त एक इंची जाहिराती, नोटिसा, बाजारभाव आणि अन्य फालतू कॉलम भरती असलेले ते सुटे पानच विकत घेतात की काय, न कळे आणि सुमारे दहा मिनिटांनी आपल्याला वेटरचे दर्शन झाल्यावर "कांदापोहे आणा" अशी आपण आर्डर द्यावी. वेटर विजारीत झुरळ शिरल्यासारखा त्या पाटीकडे धावत जातो आणि फडक्याने 'कांदापोहे गरम आहेत' ही अक्षरे पुसून येतो.
"कांदापोहे खलास आहेत.' "मग आणखी काय गरम आहे?'
वास्तविक तडक उठून जावे असे वाटलेले असते. पण वेटर समोर उभा असताना इष्ट मिष्ट शिल्लक नाही हे कळल्यावर हाटेलातून वाक औट करायला सिहाची किंवा आण्णा प्रधानाची छाती लागते. माझ्या जागी आप्पा प्रधान असता तर नुसत्या एका डरकाळीने त्याने गल्ल्यावरच्या मालकाला टेबलाशी खेचत आणले असते.
एकदा असेच “बटाटेवडे संपले' हे वेटरच्या तोंडून वाक्य पडले. आणि आप्पा प्रधान अशा आवाजात गर्जू लागला की, फळीवरचा रेडिओ ऐकू येईना.
"हाटेल चालवता की कोळशाच्या वखारी? तिथे मग त्या बोर्डावर 'बटाटेवडा तयार आहे हे काय फडकीवाल्या पोरांना पुस्ती काढायला शिकवता म्हणून लिहिलेय काय? अशा वेळी त्याच्या जिभेचा पट्टा मुरारबाजीच्या पट्ट्यासारखा चालतो. जिभेवर रणचंड नाचते. "त्यांच्या बापान्ही हाटेलं चालवली होती पाट्या लिहितात साले!"
मला हे जमत नाही. 'कांदेपोहे खलास' असे एक उर्मट उत्तर ऐकल्यावर मी निमूटपण विचारले, "गरम काय आहे?" "चहा!" वेटर थंडपणाने म्हणाला. . . . पार्श्वभूमी : चाळीतली खोली.
"त्या पोरीच्या बापाची तरी बाळगा पोलिसांत आहे तो जरा ठेव "उगीच बडबडू नकोस भांडखोर बायको म्हणजे पर
"काय?"
"नाही, शाप आहे-शापच बरोबर!"
"दिवसभर मेले चौकोन भरतात दोन रुपड्यांचं तरी बक्षीस लागेल तर शपथ!"
"पंचवीस हजार मिळतील तेव्हा पाटल्या मागायला देऊ नकोस" "पाटल्या घालताहेत! होत्या त्या विकल्या!"
"विकेन नाहीतर समुद्रात फेकून देईन-"
"मलाही द्या फेकून"
"चल ऊठ!" "ट्यं-"
"काय कारटी आहेत! लोकांची पोरं कशी हसत असतात. आमची कारटी बाप भरत
नाही म्हणून रडतात-"
"फार लवकर समज आलीय त्यांना-" "बाबा, मास्तरनी वही आणायला सांगितलंय!" “मास्तरना म्हणावं-वहीबिही काही मिळणार नाही! किती वह्या लागतात तुझ्या
मास्तराला ?"
"मास्तरना नाही मला लागतात.'
"मिळणार नाहीत! हा आणा घे. विड्या घेऊन ये लालधागा-"
" आणि वह्या ?"
"थोबाड फोडीन! अहो, जरा शिस्त लावा पोरांना-"
'आधी अंग घ्या जरा विसळून दीड मिटाची मेली आंघोळ तीन तास पेटतोय बंद" "पंचा आण! एकदा शेवटली आंघोळ करतो तुझ्या नावाने तांब्या कुठाय?" "तो काय समोर? घ्या आतून-"
"ते तू नको सांगायला.'
बुडबुडबुडूक- "ओय ओय मेलो! अग, हे आंघोळीचं पाणी आहे की चहाचं आधण ? - ओय ओय ओय-" . . . सुरवातीला वाचतना येणारा कंटाळा हळू हळू कसा निघून जातो कळतच नाही ...ही जादू आहे पु.ल. ची... It takes time to develop a taste of "साहित्य" of P.L. Deshpande.
This entire review has been hidden because of spoilers.
Ok ok book. Here our beloved author seems to have gone a bit overboard with his witticisms. Additionally reading it in 2019 might have deprived me of the period based satirical punches. Some selections were better than others.