Jump to ratings and reviews
Rate this book

गुलमोहर [Gulmohar]

Rate this book
Gulmohar

300 pages, Hardcover

First published January 1, 1970

Loading...
Loading...

About the author

V.P. Kale

62 books410 followers
Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
123 (42%)
4 stars
96 (32%)
3 stars
60 (20%)
2 stars
9 (3%)
1 star
3 (1%)
Displaying 1 - 8 of 8 reviews
Profile Image for Pradnya.
325 reviews107 followers
March 5, 2021
वपुंच लिखाण उत्तमच आहे. अलंकारांनी नटलेल्या पण तरीही साजुक नववधू सारखी त्यांची लेखणी. जवळपास १०-१२ लघूकथेचं संकलन म्हणजे गुलमोहर. आणि तोही बहरलेला, सुंदर आणि अगाध. मला काही कथा फारच आवडल्या. काहींनी निराश ही झाले. उगाच खुप जास्त खेचल्या सारखं वाटलं कथानक.
वपुंची पात्र सखोल असतात आणि कुणी कधी विचार ही करू शकत नाही अशा दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगावर फुंकर घालून त्यांच्या कथा साकारलेल्या असतात. निदान एक तरी पात्र प्रोग्रेसिव्ह असतं. मला ते प्रत्येकच पात्र खूप आवडतं. आपण जर त्या पातळीवर विचार करू शकलो तर जग फारच सुंदर होईल.
पण एकंदरीत मनोरंजन आणि वैचारिक समृद्धतेनं बहरलेला गुलमोहर तुम्हाला नक्कीच आवडेल.


"आपल्या आवडत्या माणसाचं जे चित्र उमटलेलं असतं, त्या चित्राला फक्त जन्म असतो, त्याला मृत्यू नसतोच.’’

"आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील. आनंद वेगळे आहेत; पण दु:ख एकच आहे याचं त्यांना समाधान वाटलं."

"प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो."

"माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात.’’

27 reviews
January 21, 2026
#bookreview
#mybookshelfof2026

पुस्तक-गुलमोहर
पुस्तक प्रकार-कथासंग्रह
लेखक-व.पु.काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्य-१३०₹
पृष्ठ संख्या-१२७

"माणसांच्या गर्दीत 'माणूस' शोधणारा लेखक" अशी ओळख असणाऱ्या व.पु.काळेंचं लिखाण म्हणजे वाचकांसाठी कायमच एक पर्वणी असते.'गुलमोहर' हा याच पर्वणीचा एक भाग.लोकविलक्षण माणसांच्या चाकोरी बाहेरील कथांचा संग्रह म्हणजे 'गुलमोहर'.

गुलमोहराचं झाड जसं निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डुलणारं व काळ्या ढगातही तितकंच वैभवशाली बहरलेलं दिसतं,अगदी तसंच या संग्रहातील १३ कथा मनावर प्रभाव पाडतात.या कथा मानवी मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना,नात्यांमधली गुंतागुंत,हलकासा विनोद,मनाला अंतर्मुख करणारे विचार व आयुष्याकडे पाहण्याचा एक हळुवार दृष्टिकोन यांचा जणू सडाच घालतात.यातील कथा छोट्या क्षणांमधलं मोठेपणं अगदी नेमकं पकडतात व म्हणूनच प्रत्येक कथा वाचकाला थांबवून विचार करायला भाग पाडते.

संग्रहातील प्रत्येक कथा जीवनाचा एक नवा पैलू उलगडते.'गुलमोहर' कथेत दिवाकरपंतांचा समंजसपणा दिसतो,तर 'गांधारी' नियतीने दिलेल्या माणसांना स्वीकारण्याची जाणीव करून देते.'एकटा' मधील विशा उपासमार व पश्चात्तापाचा असा ठसा उमटवतो की तो वाचल्यानंतर वाचकही सुन्न होतो.'भरती' ही कथा लग्नानंतरच्या सच्च्या प्रेमावर विश्वास निर्माण करते,तर 'नजर' मधील आबांचा त्याग सांगतो की पाहणे म्हणजे केवळ डोळ्यांनी नव्हे तर मनाने पाहणे होय.

नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करताना 'दहावा ग्रह' लग्नसंस्थेवर अस्वस्थ प्रश्न उभा करते. 'सर' व 'अढळपद' या कथा स्त्री-पुरुष नात्यांतील सूक्ष्म पदर समोर आणतात.'मुक्तछंदा' मधील संयम व 'शिळा' मधील अहिल्येची समाजमान्यतेच्या चौकटीतून झालेली मुक्ती मनाला भिडते.तर 'पुरुष' ही कथा समाजातील विकृत मानसिकतेची जाणीव करून देते.

या कथांमधील व्यक्तिरेखा या वरवर पाहता आपल्याला 'विक्षिप्त' वाटू शकतात पण खोलवर विचार केल्यावर जाणवतं की,ही माणसं स्वतःच्या तत्त्वांवर ठाम असणारी,स्वतःच्या सिद्धांतांना चिकटून राहणारी आहेत. त्यांचे विचारसरणी जगाला न पटणारी असली तरी ती पूर्णतः प्रामाणिक आहे.

या पुस्तकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे वपुंची सहज सुंदर लेखनशैली.मानवी भावभावनांचा स्पेक्ट्रम वपूंच्या लेखणीतूनच सप्तरंगात उधळला जातो असं मला वाटतं.वपु कधीच उपदेश करत नाहीत ते फक्त आयुष्य जसं आहे तसं समोर ठेवतात.म्हणूनच,कोणतीही कृत्रिम नाट्यमयता नसतानाही प्रत्येक कथा मनाचा ठाव घेते.

असं हे आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं थांबून मानवी मनाचा प्रवास समजून सांगणारं पुस्तक आपण सर्वांनीही वाचावे.
.
.
.
-©® गायत्री😇
Profile Image for The Bibliophile Doctor.
872 reviews285 followers
October 15, 2022
गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं.
पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्‍हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्‍या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्‍या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.

Gulmohar is set of short stories and it is as beautifully written as his rest works. What I always admired about V. p. Kale was his crystal clear ideology and modern philosophy. His ideas were forward for the era he was living in. How works are like a cool breeze on a hot summer day.

Will recommend everyone to read it.
5 reviews
January 27, 2019
Best read as usual

Every Marathi reader should feel thankful to have books of this great author available to read. All his books are awesome.
Profile Image for Sujay Sawant.
102 reviews2 followers
June 26, 2023
व पुं च्या प्रतिभासंपन्न लिखाणांपैकी एक बहरलेला कथा संग्रह. अव्यक्त, अनाकलनीय वागण्यातून होणारे समज, गैरसमज यांची संवेदनशील गुंफण सगळ्या कथा वाचताना जाणवते.
Profile Image for mrinal saravate.
91 reviews2 followers
February 17, 2022
Va Pu is one of the finest short-story writer. I simply love how he begins the story and how he weaves it from one incident to another.
▪︎
The thoughts he expresses from his stories is way ahead of his times. Also, he knows the secret of perfect happy relationships- it can be between two friends, two lovers or maybe with a stranger.
▪︎
Many people say that if you want to understand a person thoroughly then you have to read Va Pu; and that's quite true. Whenever I read about any new character in his story, at first line only I judge him. But most of the times I'm wrong. Maybe this applies in our real life also. We should not make our judgements about someone unless we know there stories.
▪︎
Displaying 1 - 8 of 8 reviews