What do you think?

धार्मिक [Dharmik]
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो का?
काही मानवी मूल्यांवर अनिल अवचट यांची श्रद्धा आहे.
जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते,
धर्म, जात, देश यांपलिकडे जाऊन
माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकवते,
एवढेच काय निसर्गातल्या प्राणी, वनस्पती
यांसारख्या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला
शिकवते, ती आवश्यक श्रद्धा
आणि याउलट जी माणसाला संकुचित
बनवते ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा.
भारतीय समाजातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्र्चन
धर्मीयांमधील अंधश्रद्धांचा मागोवा घेणारे हे पुस्तक

169 pages, Paperback
First published October 1, 1989
About the author
Anil Awachat
38 books49 followersडॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.
डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 3 of 3 reviews
December 15, 2018
a good melange of shocking but not really shocking aspects of religion!
May 18, 2023
टिपिकल अनिल अवचट यांचं रिपोर्ताज लेखन आणि जोडीला श्रद्धेच्या नावावर मांडल्या जाणाऱ्या बाजारांचा नेमका आढावा.
प्रत्येक जिज्ञासू श्रद्धावंताने जरूर वाचावं असं पुस्तक.

July 1, 2012
http://www.bookganga.com/eBooks/Book/...
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो का?
जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते,
धर्म, जात, देश यांपलिकडे जाऊन
माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकवते,
एवढेच काय निसर्गातल्या प्राणी, वनस्पती
यांसारख्या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला
शिकवते, ती आवश्यक श्रद्धा
आणि याउलट जी माणसाला संकुचित
बनवते ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा.
भारतीय समाजातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्र्चन
धर्मीयांमधील अंधश्रद्धांचा मागोवा घेणारे हे पुस्तक.