Jump to ratings and reviews
Rate this book

बिटविन द लाइन्स: Between The Lines

Rate this book
कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रंपुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर?– अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक!रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात,तेव्हाच त्वचेखाली धावणारया रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून ‘आत’ल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात!ही चित्रंच आहेत.शब्दांनी रंगवलेली.पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हातीरंगांची पेटी देणार्या जन्मदात्याची,वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्याद गुरूजनांची,भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची,मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची,धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची,काही दुखर्याा पूर्णविरामांच

233 pages, Kindle Edition

Published September 7, 2021

1 person is currently reading
1 person want to read

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (100%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for Devi Keluskar.
50 reviews4 followers
October 2, 2023
ललित लेख असलेले हे पुस्तक ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लिहिले आहे. चित्रकाराचा चित्रात जिवंतपणा आणावयाचा गुण व खोल निरीक्षण त्यांच्या ह्या लेखांमध्ये पण दिसून येतात. लेखकास आयुष्यभरात जी लोकं भेटली, ज्यांच्याशी त्यांचे व्यवहार झाले अश्या लोकांची व्यक्तिचित्रणं त्यांनी ह्या पुस्तकात केली आहेत. कॉलेज पासून नंतर मोठे चित्रकार होईपर्यंत त्यांना जी लोक भावली त्यांच्याबद्दल ह्यामध्ये लिहिले गेले आहे. मग त्यात त्यांचे वडील आहेत, शिक्षक आहेत, मित्र आहेत, अगदी पु.ल व कवी ग्रेस अशी थोर व्यक्तिमत्त्वं पण आहेत. एखादा माणूस समोर बसून किस्से सांगतो तसेच हे पुस्तक वाटते. व्यक्तिचित्रणं असली तरीपण, प्रत्येक गोष्टीला स्वतःचा असा वेगळेपणा आहेच तरीही त्या सर्व गोष्टींत एक मिश्कीलपणा पण आहे. परत लेख वाचताना आर्ट स्कुल कसे असते हे तर कळतेच व पुण्याची सफर होते ती वेगळीच.
आयुष्यात आपल्यालाही बरीच आगळीवेगळी लोकं भेटत असतात पण त्यांना तसेच कागदावर उतरवणे म्हणजे एक कौशल्यच असते व ते लेखकास अगदी नीट जमले आहे.
निळी सायकल, जिलेबी, मटका, कौमार्यभंग आणि स्वीकार व नकार हे मला सर्वांत जास्त आवडलेले लेख.
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.