G.A. Kulkarni or simply "GA” was a legendary Marathi writer of short stories.
GA, who bought new strength and vitality to the Marathi short story, is admittedly the most distinguished exponent of that genre. He did not subscribe to the cause of modernism in literature. He charted his own separate course and cultivated new acuity and taste for a class of faithful readers.
GA created a world of his own in his short stories where his characters are in pursuit of the unknowable destiny. A dark mode reflects the inscrutable ways in which destiny shadows his characters. His use of symbolism, allegory and irony provides his stories a unique texture and ethos. His world encompasses a wide diversity of locales, situations, characters and experiences. The mythic, allegorical experiences make it difficult to sort out the realities from the dreams, themes, and meditations. Yet, it is possible for the reader to identify with is characters, places, and experiences because of his keen observation of human, animal, and social worlds in their beauty and deformity.
Critics observe that characters in GA’s world are multifaceted, but they are not independent. They lead their lives as if they are puppets guided by an unseen hand are unable to change the direction. Why they follow that path to their demise or why they cannot change it by their volition is not known. In that sense, his work is a reversal of direction fostered by the modernist short story in Marathi. GA's earlier short stories depicted the tragic and cruel aspects of human situation.
Pingalavel, according to me, is the most profound writing available in Marathi. There are some books/authors which appeal to one's intellect.. there are some which appeal to the child inside you.. and there are some others. G.A. Kulkarni's writing however is beyond all these genres and descriptions. He writes with a root approach to life and his stories completely mesmerize your mind. Stories like Swamy and Kairi are masterpieces in Marathi literature. His writing can be summarized by the quotes found in opening pages of this book.
“Stranger, think long before you enter, For these corridors amuse not passing travellers. But if you enter, keep your voice to yourself. Nor should you tinkle and toll your tongue. These columns rose not, for the such as you. But for those urgent pilgrim feet that wander On lonely ways, seeking the roots of rootless trees. The earth has many flowery roads; choose one That pleases your whim, and gods be with you. But now leave! - leave me to my dark green solitude Which like the deep dream world of the sea Has its moving shapes; corals; ancient coins; Carved urns and ruins of ancient ships and gods; And mermaids, with flowing golden hair That charm a patch of silent darkness Into singing sunlight.”
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःखाचे आणि त्याच्या भोवतालच्या परिस्थितीचे मार्मिक वर्णन GA यांनी या कथासंग्रहात केले आहे. काही कथांमधील काल्पनिक जगतातील पात्रांचा देखील अंतिमतः वापर याच दृष्टिकोनातून केला आहे. लघुकथा असली तरी थोडक्या वर्णनात कथेतील पात्रे आपल्या मनात घर करतात आणि त्यांच्या संघर्षात आपली मानसिक गुंतवणूक होऊन जाते.
अनेक हृदयस्पर्शी कथा आहेत. मला सर्वात जास्त प्रभावी वाटलेली कथा म्हणजे कैरी. तानीमावशी कडे राहायला आलेल्या अनाथ भाच्याचे नवीन गावातील आणि शाळेतील अनुभव यापासून कथेस सुरवात होते. हळूहळू मावशीच्या आयुष्यातील दुःखाचे आणि नवऱ्याच्या चारित्र्यहीन वागण्यापुढील हतबलतेचे अलगद कंगोरे समोर यायला लागतात. तशा परिस्थितीत देखील आपल्या भाच्याची काळजी घेण्याची तिची प्रामाणिक इच्छा आणि त्यामुळे होणारी ओढाताण याचे हृदयद्रावक चित्रण कथेमध्ये केलेलं आहे. कथेचं नाव देखील मावशी आणि भाचा यांच्या एका अर्धवट राहिलेल्या प्लॅन वरुन घेतलेलं आहे. शाळेच्या एका सहलीसाठी पैसे नसल्याने भाच्याचा झालेला अपमान मावशीला सहन होत नाही आणि ती त्याला हरेश्र्वर येथे सहलीला नेण्याचे कबूल करते. तिथल्या मंदिराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडावरील कैऱ्या तोडून आत मीठ, लाल चटणी घालून खाण्याची मजा कशी असते त्याचं ती वर्णन करते. आणि कथेच्या शेवटी तिने या कठीण आयुष्यातून स्वतःला संपवण्याचा मार्ग पत्करला हे कळल्यावर भाच्याला त्याच कैरीची आठवण होते.
या पुस्तकातील इतर काही कथा आणि त्यातील नोंद करून ठेवावे असे काही परिच्छेद पुढीलप्रमाणे :
ऑर्फियस - मनुष्याच्या मृत्यूची शाश्वती त्याचे जीवन कसे सुंदर करते याविषयी कथा - "प्रत्येक सुंदर वस्तू संपणार किंवा तू स्वतः नाहीसा होणार हे जाणवताच तू जास्त उत्कटपणानं, हावरेपणानं तिचा भोग घ्यायला हवास, तुझा प्रवास अगदी तात्पुरता आहे आणि या वाटेनं पुन्हा कधी येण्याची तुला संधी मिळणार नाही हे एकदा हाडात रुजलं, की एखादं साधं रानफूल देखील स्वतःच्या गूढ, अद्वितीय सौंदर्यानं तुला भारून टाकील. ऑर्फियस, तू अनेक देवांना भेटला आहेस. त्यांपैकी एक तरी देव फुलझाडाकडे पाहत विस्मित डोळ्यांनी उभा आहे, असं दृश्य तुला कधी दिसलं आहे? शक्यच नाही. कारण त्यांना घाई करण्याची गरज नाही आणि आज नाही तर उद्या, अशी सवय एकदा झाली की मग नसलं तरी चालतं हाच स्वभाव होऊन बसतो. आपल्या अनेक देवता पाहा. त्यांना संतती तरी नसते किंवा झालीच तर ती त्यांच्या प्रणयक्रीडेचं अनिवार्य फळ म्हणूनच असते. एखादी देवता आपलं मूल कडेवर घेऊन त्याच्याकडे मातृप्रेमानं पाहत आहे, असं तुला कधी दिसलं आहे? नाही. कारण स्वतः अमर असल्यामुळं आपल्यानंतर आपली खूण मागं ठेवण्याची इच्छा त्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाही. मानवाच्या जीवनात ही भावना केवढी प्रबळ आणि सुखकारक आहे याचा विचार कर. सौंदर्यासक्ती आणि संततिप्रेम या दोन भावना तुमच्या आयुष्यातून काढून टाक आणि मग पाहा, तुमचं आयुष्य मळक्या चिंधीसारखं होईल आणि या दोन्हींचाही उगम क्षणभंगुरतेच्या जाणिवेतच आहे."
"नाहीतरी अखेर सुख म्हणजे एक अटळ तडजोड च असते. परिस्थितीच्या पुढे पण आपल्या अकांक्षेच्या सदैव अलीकडेच कोठेतरी सुखाचे स्थान असते."
"यालाच कदाचित ज्ञानही म्हणता येईल. वाट्याला अमर्याद दुःख, पण ते सहन करण्याची मर्यादित शक्ती; अपार आकांक्षा, पण ते साध्य करण्यासाठी क्षीण सामर्थ्य; अमृतबीज पेरूनही हाती विषफळच पडण्याची बाधा - असा हा मानव !"
घर - कथेची सुरुवात होते मधुकाका आणि त्यांच्या कुटुंबापासून. मधूकाका यांनी आयुष्यभर काटकसर करून नवीन घर बांधलेले असते आणि त्याच्या गृहप्रवेश करीत ते नियोजन करीत असतात. मात्र त्यांच्या मुलांच्या मनात त्यांच्या कटकासरेपणामुळे आलेला तिटकारा आणि घरात न राहण्याची इच्छा याची त्यांना पहिल्यांदा जाणीव होते.
त्यानंतर कथेमध्ये माधुकाका यांच्या आईवडिलांचे आधीचे वैभव आणि वडिलांची इतर भागिदारांनी फसवणूक केल्यावर झालेली वाताहत याची आपल्याला माहिती होते. वडीलांच्या आत्महत्येनंतर हक्काचे घर बांधण्याचे आईला दिलेले वचन मधुकाकांच्या पुढील आयुष्याची वाटचाल ठरवून टाकते.
शेवटच्या भागात, त्यांच्या पत्नीने आयुष्यात कायकाय सोसले होते याची ओळख होते. पती अथवा मुलांनी मात्र ही माहीत करून घेण्याचं कुतूहल कधीही न दाखविल्याचे दुःख ती शेवटी मुलांकडे व्यक्त करते. घर ही संकल्पना अपेक्षेनुसार साकार होण्यासाठी माणसांबरोबर परिस्थिती देखील तशी असावी लागते नाहीतर मनुष्याकडे हतबल होण्याशिवाय पर्याय राहत नाही हे GA प्रभावीपणे दाखवून देतात.
यात्रिक - या कथेत एखाद्या उपदेशकास अंतिम सत्य कळून चुकले आहे याचा निकष काय मानावा याविषयी दीर्घ चिकित्सा एका संभाषणाच्या माध्यमातून सादर केले आहेत. ह्या निकषांची प्रामाणिकपणे मागणी करणाऱ्या कथेतील नायकाचे एक वाक्य फार छान आहे - " शेवटी मला एकच गोष्ट कळून चुकली, की मी अगदी पूर्ण, असाध्य वेडा आहे. पण इतर माणसं कोणत्या बाबतीत शहाणी आहेत हे मात्र कधी मला उमगले नाही. "
"ज्ञानाचा बडेजाव हे अनंत काळापासून चालत आलेले कपट असून सगळे लहानमोठे धर्म म्हणजे त्या नाटकातील लहानमोठ्या लांबीचे अंक आहेत की काय, असा त्याच्या मनात गोंधळ उडाला. पाच अनुयायी असलेला धर्म चार अनुयायी असलेल्या धमपिक्षा श्रेष्ठ; त्याला जर राजाश्रय मिळाला तर तो जास्तच श्रेष्ठ; तो जर अनेक शतकांपूर्वी निर्माण झाला असेल तर त्याच्या महानतेला मर्यादाच नाही, मग आज त्याच्यात सापाने टाकलेल्या कातेएवढाही जिवंतपणा नसेना का..."
"कोणत्याही धर्माला बलिदानाची जोड मिळाली नाही तर त्याला झळाळी येतच नाही. केवळ शब्द आज आहेत तर उद्या नाहीत. शब्द म्हणजे निव्वळ तोंडचा वारा; त्यांना रक्त नाही की मांस नाही; पण एखाद्या प्रेषिताचं आत्मसमर्पण मनावर सतत आदळत राहिलं तर त्याच्या रक्ताची अमर नक्षत्रं होतात, त्याच्या शब्दांत विश्वाचे हुंकार ऐकू येतात."
" धर्माबद्दल एक गोष्ट मोठी विलक्षणआहे. तेथे सरळ साध्या भाबड्या अनुयायापेक्षा पश्चात्तापदग्ध दिसणाऱ्या, सर्वांसमोर स्वतःला हीनदीन करणाऱ्या माणसाला जास्त महत्त्व असतं. जेवढं पाप मोठं तेवढं त्याच्या पश्चात्तापाचं नाटक मोठं. आता असलं पाप केल्यावर तुला पश्चात्तापाचं ढोंग करता येईल; डोळे ओलसर, गळा घोगरा करीत तुला सगळ्यांपुढं नम्र होता येईल आणि त्याच वेळी तू ज्याची हत्या केलीस त्याच्याच उपदेशाचा प्रसार करता येईल. तुझं पातक महान म���हणून तुझा पश्चात्ताप महान आणि म्हणूनच तुझ्या शब्दांचे सामर्थ्य देखील अमर्याद !. म्हणजे बघ, महान पातक करण्याचं आणि त्याच वेळी महान विलास भोगण्याचं दुहेरी कर्तृत्व तुझ्या वाट्याला येईल."
समाजामधील ज्या घटकांचे आयुष्य आपणास सहसा जवळून पाहता येत नाही त्यांचेही सविस्तर वर्णन करून GA असे चित्र उभे करतात की आपण त्या घटनास्थळीच उभे असल्यासारखे वाटते.
G.A.Kulkarni is among one of my favorite authors. His style is realistic. He has ability to touch your sensitive mind. Stories are often emotional, negative, having dark shades of life, depressing. Suffering and emotions like the stories of Anton Chekhov.They are based on his experiences. His skills in converting emotions in writing are fabulous. Even imaginary stories from him are of top notch leve.
Stories such as Orphius, swamy, Kairi, Veej, yatrik and lakshmi are amazing. Frankly speaking I like each story from the book. This one is collectible for me.
Those who want to read best of the G.A.'s literature should go for these 4 books: 1. Kaajalmaya 2. Pingalavel 3. Ramalkhuna 4. Sanjshakun
एक एक कथा म्हणजे जीवनात येणाऱ्या नवनवीन संघर्षाचे तपशीलवार केलेले वर्णनच. परंतु, पिंगळावेल मधील कथांचे मुख्य पात्र व्हायला काल्पनिक जगातील पात्रे पण धजावणार नाहीत. कारण पिंगळावेल मध्ये अशी एकही कथा नाही जिचं मुख्य पात्र मृत्यूला जवळ न करता आयुष्याच्या जाचातून सुटलं. अतिशय निराशात्मक परंतु वास्तवाला चिकटून असलेलं हे लिखाण तुम्हाला क्षणभर विचार करायला नक्कीच भाग पाडेल...
All stories are crafted with time period of their individual characters. As usual no one is protagonist, story always tells inside individual story of each protagonist!!! Mukti and Yatrik talks beyond inside story!!!!