G.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.
He was honoured with a D.Litt degree by university of Pune.
पडघवली हे म्हणजे पुस्तक म्हणजे गोनिदांच्या भाषेत एका खेड्याचे शब्दचित्र आहे .एक कोकणी माणूस म्हणून तर ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो .पुस्तक अक्षरशः हातातून ठेववत नव्हते..गोनीदांनी लेखणीतून जे कोंकण उभे केली ते म्हणजे तर अफलातूनच
अंबू वहिनींबरोबरच आपण पडघवलीत प्रवेश करतो. त्यांच्या बरोबर पडघवलीच्या उटपुटीची कथा ऐकत ऐकत आपण पढघवली कर होऊन जातो त्यांच्या बरोबर गणू भावजी होत आपण पडघवलीतील त्यांच्या पोफळी - माडांच्या बागेत फिरत फिरत आणि गावातल्या एकेक व्यक्तीशी भेटता भेटता आपल्या समोर हळू हळू पडघवलीऐवजी आपल्या गावाचा पट उलगडत जातो आणि अचानक जाणीव होते के अंबू वाहिनी म्हणजे आपली आजी तर नसावी आणि मग हे शब्दचित्र पडघवली पुरते मर्यादित न राहता अख्या कोकणाचेच शब्दचित्र होऊन जाते.
गोनीदांच्या लेखन शैली विषयी तर बोलू तितके कमीच आहे..त्यांनी अंबू वाहिनी तर अक्षरशः परकाया प्रवेश केल्या असल्याप्रमाणे जिवंत केल्या आहेत.. कोंकणातील ब्राह्मणांची भाषा आणि कुलवाड्यांची भाषा एवढी अफलातून सादर केलीय की आपण गावातलाच संभाषण ऐकत आहोत की काय असे वाटावे. कोंकणी माणसांनी आपल्या गावातून फेरफटका मारून येण्यासाठी आणि इतरांनी कोकणातले जीवन अनुभवण्यासाठी तरी एकदा पडघवलीत यावेच.
थोडक्यात सांगायचं तर पडघवली ही गोष्ट आहे कोकणातल्या एका वाडीची. शून्यापासून उभी केलेली पडघवली, तिचे भरभराटीचे दिवस आणि माणसांमधले जिव्हाळ्याचे संबंध, मग हळूहळू सुरु होणारं शहरीकरण आणि पडघवलीचा होत जाणारा अस्त.
लहानपणी इथे सासरी आलेली अंबा उतारवयात आपल्याला पडघवलीची गोष्ट सांगत आहे. गोनीदांनी केलेलं वर्णन इतकं सुंदर की ती माणसं आणि अख्खी पडघवली आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते! आपणही पडघवलीत गुंतत जातो आणि तिचाच एक भाग होऊन जातो. मग मन सुन्न होऊन जातं आणि आपणही काय चुकलं, काय घडायला नको होतं याचा विचार करायला लागतो. माणसाचं असलेलं माणसांबरोबरच नातं, निसर्गाशी असलेलं नातं, तो काळ एकदा तरी अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं, आणि जर तुम्हाला कोकण आवडत असेल, तिथली प्रेमळ माणसं आवडत असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.
काही कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात इतिहास घडविला आहे. गो. नी. दांडेकर यांची पडघवली ही त्यातीलच एक. गो. नी. सांगतात, 'पडघवली ही कादंबरी नव्हे; ते एका नष्ट होऊ घातलेल्या खेड्याचे शब्दाचित्र आहे.' 'पडघवली सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रातिनिधी आहे.' त्यांनी भारतभर भ्रमंती केली होती. त्यामुळे त्यांनी खेडी, तेथील जीवन जवळून पाहिलं होतं. त्यातून प्राचीन समाजव्यवस्था ढासळली आसल्याचं लक्षात आलं. याच पडझडीचं दर्शन त्यांच्या या कादंबरीतून होतं. ते सगळं पाहताना त्यांचं संवेदनशील मन दुःखी होतं. या सगळ्याचं दर्शन घडवताना त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. जुन्याच्या जागी नवं काय निर्माण होईल, याचा घेतलेला शोधही प्रत्ययास येतो.
कारखाने आणि उद्योगधंदे यांचे केंद्रीकरण झाल्यामुळे खेड्यातील नवसर्जनशील मनुष्यशक्तीचे शहरात जे विलीनीकरण होत आहे, ते भयानक आणि विचारी माणसाला चिंतित करणारे आहे. 'पडघवली' या सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रतिनिधी आहे.
देवाच्या दयेने अर्धा-अधिक भारत भटकलो आहे. विशेषत: त्यातली खेडी अगदी जवळून पाहिली आहेत. प्राचीन समाजव्यवस्था ढासळली आहे. सगळ्याच ग्रामसंस्था उध्वस्थ झाल्या आहेत. पूर्वपरंपरेने चालत आलेले व्यवसाय तिथेच सोडून माणसे नवनवीन व्यवसायांचे मनोरे आपल्या दुबळ्याशा हातांवर पेलू पाहत आहेत. हे इष्ट की अनिष्ट हे मला माहित नाही. पण प्राचीन समाजव्यवस्थेवर हे जे वादळ कोसळले आहे त्याचा साक्षी होऊन मी व्यथित मनाने ही पडझड प्रत्यक्ष अनुभवली आहे.
यावरचा उपाय काय? ही परंपरागत समाजव्यवस्था आणि ग्रामव्यवस्था मोडून तिच्या जागी एखादी नवी व्यवस्था होणार आहे की काय? ती कशी असेल? आजचे सर्व संकेत त्या व्यवस्थेत पाळले जातील, की नवीन निर्माण केले जातील? की ती संकेतशून्य असेल? हे असेच आणि यांसारखेच दुसरे अनेक प्रश्न मला छळीत असतात. मात्र त्यांचे उत्तर मला सापडत नाही.
'पडघवली' हे शब्दचित्र अशा व्यतिथ मनोभूमीतून निर्माण झालेले आहे. हे वाचून वाचक काय करतील? कदाचित बरे म्हणतील; कदाचित वाईट म्हणतील. पण मला या स्तुतीपेक्षा किंवा निंदेपेक्षा वाचकांपासून जी अपेक्षा आहे, ती अशी - त्यांचे लक्ष आपल्या त्या जीर्णशीर्ण कोसळू पहाणार्या खेड्यातील घरकुलांकडे वळावे. कदाचित अपेक्षा पुरी होईल; कदाचित होणारही नाही."
I am pleased to experience konkan environment. Easy visualization and feeling. Very minute observation skills of Go Ni Dandekar. This is really fantastic book. Irrespective of where ever you reside in Maharashtra, you will surely visualize Konkan in changing times. Story is good. Night, day afternoon all times covered. a very unique feeling and easy read.
I am pleased to experience konkan environment. Easy visualization and feeling. Very minute observation skills of Go Ni Dandekar. This is really fantastic book. Irrespective of where ever you reside in Maharashtra, you will surely visualize Konkan in changing times. Story is good. Night, day afternoon all times covered. a very unique feeling and easy read.
गोनिदां चं पडघवली.. कोकणच्या मातीत वसलेलं, नव्हे वाडवडिलांनी वसवलेलं, जपलेलं पडघवली.. गावपणाची साक्ष देणारं समृद्ध पडघवली.. या गावात आपण येतो ते आंबे सोबत.. अंबा वहिनी सोबत.. जणू तिची पाठराखीण बनून.. अन् आता ही अंबावहिनी सांगतीये या पडघवलीची कथा.. ही गोष्ट आहे कष्टानं वसवलेल्या, मायेनं राखलेल्या आणि माणसांनी फुललेल्या पडघवलीची. खोतांच्या आधारानं उभं असलेलं हे गाव.. माणुसपणाला जागणारं गाव.. अंबुवहिनींसोबत आपण सारं गाव फिरतो नव्हे आपण सारं गाव जगतो.. या कथेत आतेसासूबाई, अक्की, ग���जाभावजी यांच्यासारखी मायेची माणसं आहेत तसंच व्यंकूभावजींसारखेही आहेत.. व्यंकूभावजींच्या हव्यासानं, दुष्टाव्यानं गावची घडी विस्कटली परंतु गावच्या देवमाणसांच्या पुण्याईनं गाव राखलं.. पण जर एक एक करून ही माणसंच गेली तर? तसंच झालं. दृष्ट लागल्याप्रमाणं माणसांनी गाव सोडलं, शहर जवळ केलं अन् एका पिढीत सारं पडघवली ओस पडलं, सारीकडे अवकळा आली. अश्या या पडघावलीची ही गोष्ट गोनिदांच्या लेखणीतून उतरून आपल्या मनात घर करते, मग पडघवलीच्या सुख दुःखात आपणही सामील होतो अन् सरतेशेवटी पडघवलीची दशा पाहून सुन्न होऊन जातो..
Excellent, just so beautiful presentation of a small village in Konkan regions landscape. Story is written from a a women's point of view, who is being told about the great generation of people who built this village, how they took to its current prosperity and how her own generation saw it's decline and become a ghost village. Characters built in the story are unique and have their own positive and negative side. Why a rotten egg, if not treated immediately can destroy all the produce. Similarly if people with wrong intentions are not caught and treated righteously, can destroy entire neighborhood.
पडघवली म्हणजे कोंकणातील एका छोटेखानी गावाची गोष्ट. गावच्या एका प्रमुख कुटुंबातील सुनेच्या नजरेतून रेखाटलेलं शब्दचित्र. गोनीदांनी अतिशय उत्कृष्टपणे विविध पात्रं उभी केली आहेत. कोंकणातील गाव ज्यांना अनुभवायचे असेल त्यांनी वाचावेच असे हे पुस्तक.
ह्या पुस्तकाचे संक्षिप्त अभिवाचनStorytel वर उपलब्ध आहे. विजय देव, वीणा देव, रुचिर कुलकर्णी आणि मधुरा देव यांनी उत्कृष्टरित्या ते साकारले आहे.
कथा सांगण्याची शैली सुंदर आहे पण एका गावाची अधोगती एका पिढीमध्ये बहुतांशी एकाच माणसामुळे झाली आणि हे कोकणातल्या किवा एरवी कोणत्याही गावाचे प्रातिनिधिक चित्र आहे असं सरसकटीकरण जास्त झालंय असं वाटलं
मन नकळत तुंबाडचे खोत शी तुलना करत राहिलं आणि तुंबाडचे खोत जास्त सरस वाटल
Padghavli is a brilliant exposition of a certain time in the Konkan region. The story traces the history of a knot family in small village, the internal politics, the dynamics and ultimately ruin. The nuances have been very well brought out. Worth a read.