G.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.
He was honoured with a D.Litt degree by university of Pune.
अग्निशिखा संत समर्थ गुरु रामदास की कहानी है। मुझे इस किताब को पढ़ने में बहुत आनंदित हुआ, खासकर उनका जीवन और उनका कार्य। जब वे पूरे भारत में यात्रा कर रहे थे, तो कहानी में किस तरह से बोलियाँ बदल रही थीं, यह मुझे बहुत अच्छा लगा। वे शिवाजी महाराज और उनके पिता शाहजी से भी मिलते हैं। मैं हमेशा से स्वामी समर्थ रामदास पर किताब पढ़ना चाहता था और मुझे बहुत खुशी है कि मैंने इस किताब को पढ़ा। अब मैं जीएन दांडेकर के लेखन का प्रशंसक हो गया हूं। यह किताब मूल रूप से मराठी में लिखी गई थी। उस किताब का नाम दास डोंगारी रहातो है।
समर्थांचं साहित्य घेऊन, त्याची माहित असलेली जीवनकहाणी घेऊन गोनीदा आपल्याला रामदासांच्या काळात घेऊन जातात. तीच भाषा, तेच लोक आणि तशीच संस्कृती आपल्यासमोर उभी राहते. चरित्र लिहिण्याची ही एक वेगळीच धाटणी आहे.
पुस्तक लिहीतानाच्या काळाशी सुसंगत भाषा आणि वाक्यरचना वापरून बहुतांशी चरित्रे लिहिलेली असतात. ज्याचे चरित्र लिहिले जाते त्या व्यक्तीची जास्तीत जास्त संगतवार माहिती एखाद्या माहितीकोशातल्या संपादित पानाप्रमाणे उलगडत जाते. गोनीदा ह्या मूलभूत पद्धतीलाच छेद देतात.
बोहल्यावरून पळून जाणारा नारायण ते शिवाजी महाराजांना उपदेश करणारे समर्थ रामदास हा प्रवास आपण बरोबरीने जगतो. हेच ह्या पुस्तकाचं यश आहे.
१९६० चं मूळ प्रकाशन आहे, त्यामुळे भाषा जुनीच. त्यात लेखनाची शैली मुद्दामून शिवकालीन असल्याने नवख्या वाचकाला थोड्या ठेचा लागू शकतात, पण त्याच काळात समर्थांचे श्लोक खुलून येतात. त्यांच्या ओव्या आणि सुभाषिते जागोजागी विखुरलेली आहेत, एका कादंबरीच्या रूपात त्या आपल्याला भेटतात आणि अधिक सहज, जवळच्या वाटतात.
महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी, आणि समर्थ रामदासांविषयी जिव्हाळा असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय आहे.
The book is just amazing. With his effdective writing GN has created a masterpiece. This book mesmerizes you & since swami's life is so thrilling & full of different inspiring instances, ofcourse you get very much involved in it. This one is definitely a collectible & have it in your personal library
गोनीदां हे किमान भटकंती करणाऱ्या मराठी माणसाच्या परिचयाचे(आणि आदरणीय!) व्यक्तिमत्त्व.
मी बोटावर मोजण्याइतक्या कादंबऱ्या वाचल्या पण त्यातील अतिशयोक्ती आणि विपर्यास पाहून कादंबरी हा प्रकार विशी ओलांडायच्या आतच सोडून दिला.
रामदास नवमीच्या निमित्ताने का होईना, समर्थांबद्दल(त्यांचे लिखाण नव्हे!) काहीतरी वाचावे या इच्छेने ' दास डोंगरी राहातो' ही गोनीदांची कादंबरी वाचावयास घेतली, ती हातातून खाली ठेवणे अवघड गेले.
साधी सोपी भाषा/लोकभाषा, यामुळे वाचन सुलभ झाले. समर्थांची जांब पासून पंचवटी, मध्य प्रदेश, उत्तराखंड, वाराणसी, कर्नाटक प्रांत आणि पुन्हा मावळ अशी पदयात्रा, त्यांची ज्ञानलालसा, कुतूहल, अचूक आणि बारीक निरीक्षण, अफाट स्मरणशक्ती आणि प्रज्ञा, समाजाविषयी कळवळ, जनसंपर्क आणि व्यवस्थापन, म्लेंच्छ आणि त्यांनी भारतवर्षात चालवलेले अत्याचार, भय आणि निष्क्रियता याने मोडकळीस आलेला समाज अशा अनेक पैलूंवर ही कादंबरी प्रकाश पाडते.
समर्थांचे निसर्गाशी एकरूप होणे, पिके, माती, वृक्षवल्ली यांची सतत माहिती गोळा करणे, लाकूड तोडण्यापासून ते जमीन सारविणे अशी कामे स्वतः करणे, सूर्यनमस्कार घालण्यापासून ते रोजचा स्वयंपाक असा नेम, 'दिवसा जने पारखीत, प्रेरीत हिंडावे , आणि रात्री रघुपती आठवावा ' असे संतुलन, तरुणांना एकत्र आणून नमस्कार आणि भिक्षा यांची सवय लावणे इत्यादी विस्तार पाहता पाचही बोटं तोंडात घालावीत. उगाच उनाडक्या, फुकाचे वादविवाद अशी वागणूक समर्थांना आवडत नसे, ते खपवून घेत नसत.
' मोह मायेत जखडू नका ' अशी नुसती भंपकबाजी न करता व्यावहारिक कर्मे करत धर्म कसा जपावा आणि वाढवावा याची अनेक उदाहरणे मिळतात - परचक्र आले असता, पिके, बायाबापड्या यांची लूट होत असता मिशांवर ताव मारणे, धर्मकांड करत बसणे यावर समर्थ कडाडून टीका करतात. ' उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत' असा समर्थ नुसता आशीर्वाद देत नाहीत, तर स्वतः दासबोध अखंड लिहीत असता अफझलखान येतो आहे कळल्यावर दासबोध, आणि इतर कामे बाजूला ठेवून समर्थ राजकारणाकडे लक्ष देतात(त्यात पडत नाहीत!).
प्राचीन काळापासून ते अगदी इंग्रजी सत्ता भारत काबीज करेपर्यंत दशकानुदशके ग्रंथांचा अभ्यास, जुने ग्रंथ प्रतिलिपीत करणे, नवीन लिहिणे अशा भारतीय ज्ञानार्जनाची झलक मिळते.
समर्थांना किशोरवयात अनेक प्रश्न पडले, अनेकदा त्यांची संपूर्ण विरक्ती आणि समाजात राहून कार्य करणे यात फरफट झाली. या सर्व अनुभवातून सिद्धी प्राप्त करत समर्थ शेवटी दासबोध लिहितात - इतरांना लाभ व्हावा, आपल्यासारखी त्रेधा उडू नये म्हणून!
रामदास स्वामींचा सूर्याप्रमाणे तळपणारा जीवनपट सामान्य माणसास अनुभवायचा असेल, तर ही कादंबरी अवश्य वाचावी.
तळटीप: समर्थ आणि इतर मराठी संतजन, त्यांचे कार्य, तथ्ये, आणि मुल्यापन इतका मोठा आवाका या कादंबरीचा नव्हे!
गो.नी.दां ची 'आम्ही भगीरथाचे पुत्र' वाचून झाल्यावर अजुन काहीतरी वाचावे असे वाटत होते. आणि मग दास डोंगरी राहतो वाचायला घेतली. महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे हा काळ. त्यावर आधारित ही कादंबरी त्या काळातील भाषा, लोकजीवन, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि घटना यांचा अनुभव करून देते.
गोनीदांच्या मी वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी हे नक्कीच सर्वोत्तम आहे. समर्थ रामदासांवर माझा जीव आहेच, त्यामुळे ही असेल, पण मला हे पुस्तक कधीच खाली ठेवावंसं वाटलं नाही. माझ्याकडे वेळ असता तर मी पूर्ण पुस्तक एका sitting मध्ये संपवलं असतं. प्रत्येक ओळ काळजाला भिडत होती, अंगावर रोमांच उठवीत होती. अतिशय सुंदर पुस्तक. १०/१० वाचनीय.
Author used pure local language in which words are sweet like nector. Book is not longer, nor shorter, just perfect. If anyone read this book, the reader will run to read other books of same author. Without a doubt, the Author is Legendary in Literary circle of Maharashtra.