What do you think?
Rate this book


86 pages, Paperback
First published January 1, 1982
“बोथरी शेपूट उभारून धावली. पातेयावर आवाज झाला आणि एका झुडपाआडून रानकुत्र्यानं झेप घेतली. ती झेप नेमकी बोथरीच्या अंगावर पडली. बोथरी पातेऱ्यात लोळताच कुत्र्यानं आपल्या पोलादी जबड्यात तिचा गळा घेतला आणि जबड्याचा चाप खटकन मिटला.”
“एकोणीसशे बावन्नपासून पुढे पंधरा वर्षे मी शिकारीच्या निमित्ताने कर्नाटकातील मासूर, यल्लापूर, गुंजावती, कोणनकेरी ही मोठमोठी जंगले आणि नंतर शिकार सोडल्यावर महाराष्ट्रातील ताडोबा, नवेगाव, नागझिरा, रेहेकुरी, मध्य-भारतातील कान्हा, आसाममधील काझिरंगा, भूतान सरहद्दीवरील मानस, दक्षिणेतील पेरियार, राजस्थानातील भरतपूर आणि रणथंबोर ही अभयारण्ये हिंडलो आहे. मासूर, ताडोबा, मानस व रणथंबोर या अरण्यांत भरपूर वानरे आहेत आणि मी त्यांचे निरीक्षण केले आहे. वानरे पाहण्यासाठी मी अबू पर्वतावर सात दिवस जाऊन राहिलो. सोनेरी वानरे पाहण्यासाठीच मी मानसला गेलो. ती इतरत्र कुठेही नाहीत. जंगलचा रंग आणि गंध, ध्वनी आणि स्पर्श यांचा अनुभव मी अनेक परीनी घेतला आहे.”