अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नेपोलियन नावाचं एक वादळ युरोपियन भूमीवर काही काळ घोंघावलं. संपूर्ण युरोपवर एकछत्री साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या नेपोलियननं त्याच्या पंचवीस वर्षांच्या राजकीय कालखंडात युरोपमधील एक सिंहासनं गदागदा हलवली. राजेशाहीविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या बाजूनं उभा ठाकलेला नेपोलियन स्वत:च फ्रान्सचा बादशहा बनला. लोकांनी त्याला मोठ्या प्रेमानं सिंहासनाधिति केलं. एक साधा कॉर्सिकन सैनिक बघता बघता फ्रान्सचा सर्वेसर्वा बनला आणि युरोपची बहुतांश भूमी स्वत:च्या छत्राखाली आणली. आपल्या अपूर्व बुद्धिचातुर्यावर आणि रणकौशल्यावर तो कोणतीही लढाई बघता बघता जिंकत असे. म्हणूनच "तो आला.. त्यानं पाहिलं... आणि त्यानं जिंकलं" असं नेपोलियनच्या बाबतीत म्हटलं जातं. जसा नेपोलियनचा झपाट्यानं उत्कर्ष होत गेला तसाच अपकर्षही हृदयद्रावक पद्धतीनं झाला. प्रस्तुत कादंबरीत त्याच्या जीवनात घडलेल्या अनेक नाट्यपूर्ण घटनांवर प्रकाश टाकलेला आढळेल. फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते नेपोलियनला ठकवून सेंट हेलिनामधे नेईपर्यंतचा कालखंड या कादंबरीत रेखाटला आहे. प्रेम-विरह, फितुरी-हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील ही अद्भुतरम्य, रससिद्ध कादंबरी 'दिग्विजय’
B.D.Kher, who authored about 117 books during his life time, wrote his first book in 1939. His recently published books, 'Sanjeevan' (based on the life of Sant Dnyaneshwar) and 'Gandharvagatha' (based on the life of Balgandharv), were well received by readers. Kher left Marathi daily 'Kesri' as an associate editor after 22 years of service. Later, he joined 'Sahyadri' as the editor and stayed in that position for 10 years.
In 1976, a Japanese foundation had invited him to write a novel on the Hiroshima bombing incident. Kher received awards for his novels like 'Anandbhavan', 'Hasre Dukkha', 'Hiroshima', 'Samagra Lokmanya Tilak' etc. He authored V D Savarkar's biography 'Yadnya', which registered 11,000 pre-publishing bookings.
The ratings are not for the book but the man . Had almost all the qualities a good leader shall have . A man who started from zero and died in zero/zero ie infinity . A well written book , at times make efforts to make you fall in love with the protagonist. Takes you on a roller coaster ride with his cinematic style life.
Veni, vedi, vici...really he comes , he sees and he wins your hearts .
तो आला,त्याने पहिले आणि त्याने जिंकले !! या उक्तीस साजेसे व्यक्तिचरित्र म्हणजे नेपोलियन बोनापार्ट.आपल्या बुध्दीचातुर्याच्या बळावर फ्रान्स चा बादशाह झालेल्या या सेनानीने कोणे एके काळी संपूर्ण युरोप फ्रान्सच्या अधिपत्याखाली आणण्याच्या स्वप्नाचा पाठलाग केला होता अगदी जीवावर बेतेपर्यंत. धडाधड राज्ये पादांक्रांत करणाऱ्या या सेनानीला रशियातच माघार का घ्यावी लागली? राजकीय डावपेचात आणि सेनासामर्थ्यात प्राविण्य मिळवलेल्या या बादशाहला काटशह देण्याचे कसे आणि काय प्रयत्न झाले ? या सर्व प्रश्नाच्या उत्तरात हि कादंबरी सापडते. उत्तुंग साहसाचा बळावर सर्वसाधारण मनुष्य स्वप्नाचे फक्त इमलेच बांधत नाही तर ती स्वप्ने सत्यात उतरविण्याचे शौर्य,बळ आणि बुद्धी सुद्धा बाळगतो याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे - बोनापार्ट !
भा.द.खेर यांच्या लेखणीतून उतरली असल्या कारणाने नक्कीच वाचावी अशी कादंबरी.