जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते-ते तसंच लिहित गेलो. पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो. कुणावर दोषारोप ठेवावा हा हेतू कधीच नव्हता. अनेकदा मोह होऊनही स्वत:ला सावरत गेलो. काही ठिकाणी काही व्यक्तींची नावे बदलली ती नाइलाज म्हणूनच. या पलीकडे माझ्या पदरचं काही नाही.
या पुस्तकानं भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नावर सामाजिक मंथन सुरू झालं, भटक्यांचे प्रश्न सामाजिक चर्चेचा विषय झाला आणि त्यांच्यासाठी काम करणार्या मंडळींच्या कामाला चालना मिळाली तर पुस्तक लिहिण्याचे श्रम सार्थकी लागले असे मी समजीन. पिढ्यान्पिढ्या बिर्हाड पाठीवर घेऊन गाढवाचं जिणं जगणार्या मंडळींच्या वेदना समाज समजावून घेऊ शकला तरी खुप झालं.
Upara (a Marathi language word meaning outsider) is an autobiography written by Laxman Mane, a writer who lives in the state of Maharashtra, India. It has been translated into English by A. K. Kamat and titled "Upara - An Outsider". Arjuna Dangale sees it as a remarkable example of a "Dalit" autobiography. It finds mention in Encyclopaedia of Indian Literature under the genre Autobiography (Marathi). According to Braj B. Kachru et al. it is a path breaking work in the domain of Marathi literature. The Cambridge Companion to Modern Indian Culture (2012) considers it to be a "landmark publication".
Laxman Bapu Mane (Marathi: लक्ष्मण बापू माने) (born June 1, 1949) is a Marathi writer and a social activist from Maharashtra, India. Mane came to sudden fame after publishing his autobiography Upara, (An Outsider), in 1980. Upara was considered as a milestone is Marathi Dalit literature and received Sahitya Akademi Award in 1981 and Padma Shri in 2009.
His autobiography Upara (उपरा) brought to the attention of the public in Maharashtra the problems of nomadic tribes arising out of their social and economic conditions. Under a two-year grant from the Ford Foundation for field work among nomadic tribes in Maharashtra, Mane wrote in 1984 his second book Band Darwaja (Closed door, 1984).
Mane converted to Buddhism in October 2006 and soon had many followers . His next book was ‘Palawaracha Jag’ and last year, he published a collection of letters he wrote to Supriya Sule, who is now a Lok Sabha MP from Baramati.
दलित लेखना चा उपरा हा एक छान नमुना आहे. पुस्तकात भटक्या लोकांची जीवनशैली व हालअपेष्टा दिसून येतात. लेखकाचे बालपण व आंतरजातीय विवाह केल्या नंतरचा संघर्ष ह्याबद्दल वाचण्यास मिळते. एकंदरीत चांगला पुस्तक आहे. फक्त पुस्तक प्रमाण भाषेत नसल्यामुळे वाचनास वेळ लागतो.
this book shall provide you comprehensive account of struggles of Nomadic Tribes in Maharashtra in post-independence era esp.60s to 80s. much of those things have changed but few things are still there in society that ought to change.
I have read such struggles in different format with different stories. Still this one is appreciable and makes you think about many things. Sometimes inspires you to do more efforts and fight with adversaries if life.
லக்ஷ்மன் மானே எழுதிய சுயசரிதை நூல் (மூலம்-மராத்தி) தமிழ் மொழிபெயர்ப்பு படித்தேன். இதில் கைகாடி(நாடோடி) எனும் இனத்தில் பிறந்து கல்வி கற்கவும், தாம் பார்த்த தன் இன மக்கள் பட்ட துயரம் பற்றியும் கூறியுள்ளார். நூல் முழுவதும் கெட்ட வார்த்தைகள் நலிவின்றி உள்ளது. தேசிய விருது பெற்ற நூல்.
उपरा - मी वाचलेले पहिले पुस्तक साधारण सन १९९९-२००० ची गोष्ट असेल आमच्या गावात महात्मा गांधी वाचनालय होते तेथून मी हे पुस्तक वाचायला आणले होते.मी हे पुस्तक वाचताना फार रडलो होतो.तेव्हा पासून वाचनाची आवड निर्माण झाली ती आज पर्यंत चालूच आहे.
शेकडो वर्षे बिऱ्हाड आपल्या पाठीवर घेऊन पोटासाठी गावोगावी फिरणाऱ्या मंडळीच दुःख आणि त्यांच्या समस्या आपल्या समोर या पुस्तकांमधून येत असतात...लेखकांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे..जात-धर्म,जातीवाद,अंधश्रद्धा,रूढी-परंपरा,उच-नीच,गरिबी,आंतरजातीय विवाह,महिलांसोबत आपली वागणूक ,जात-पंचायती मधी चालणारे ते न्यायनिवाडे इत्यादी ....ही पुस्तक वाचत असताना मी अक्षरशः किती वेळा रडलो याच मला भान सुद्धा नव्हता..पुस्तक वाचत असताना मनामध्ये खूप वेदना होत असतात समाजाची चिड येते ..आणि जेव्हा लेखक व्याजाने कर्ज घेऊन नवसासाठी कोंबडे, बकरे कापण्याच वर्णन करतात तेव्हा तर किळस येते...समाजाची दुसरी बाजू आपल्याला या पुस्तकांमधून अवगत होते..उकांड्यावर तीन दगडाच्या चुलीवर मांडलेला तो संसार,दिवसभर गाढवामागं फिरणे,बा च दारू पिऊन आई ला मारणे,धान्य साठवण्यासाठी ची कनगी बनवण्याचं कार्य तो सुद्धा लोकांच्या शेतातून चोरून आणलेल्या फोकीने,लग्न कार्यात खांदे दुखोस्तर ढोलकी वाजविणे व उंकड्यावर वेगळ्या पंगतीत जेवणे, कधीकधी २-३ दिवस उपाशीच राहणे,अशिक्षितपणा,घर दार सोडून पोटासाठी वर्षभर भटकायचं आणि दसऱ्याला किंवा चैत्रीला घरी येणं व कर्ज घेऊन तो अंधश्रद्देपोटी केलेलं नवस फेडणे,आंतरजातीय विवाह केल्याने लेखकाच्या कुटुंबातील लोकांना वाडीत टाकणे,लग्न केल्यावर लेखकाचे व त्यांच्या पत्नीचे हाल इत्यादी प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो..एकूणच समस्या,गरिबी आणि उपेक्षित लोकांच जीवन आपल्याला या पुस्तकातून कळतो..बस्स !!!
पुस्तक वाचल्यानंतर मला माझ्या आयुष्यातील सर्व समस्या खूपच क्षुल्लक व कमी वाटू लागल्या आहेत..एकदा नक्कीच वाचा..
It has changed my views towards people from these category, category from which Laxman Mane belongs to. "They are also people like us, they also has life,drems,ambitions. Only difeerence between them and us is they are little bit behind us in education, economically etc"