Authors account of life in a forest when he visited a forest retreat for several weeks, with simple living - no electricity, no newspaper or mail delivery - observing wildlife and making sketches.
Whether and how much one likes the book is largely, but not entirely, a function of how much one loves animal life, especially in wild - and reversely of how much one is put off by death or what's normally considered disgusting details of biological nature.
But what's certain is that if one does read it one learns about it, and about forest vegetation.
And humans in context as well. When it comes to an abrupt end, due to a questionable concern of human civilisation, one is unable to criticise the poor labour involved, but certainly disapproves of the role of management, and hopes that things are now slightly better, post smoking ban era; in any case, the disappointment of his sojourn cut short, shared with the author, is quite real, even if one hates all the biological details.
तळे
"भंडारा जिल्ह्यातील नागझिरा ह्या जंगलात गतवर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी मी एकवार ओझरता जाऊन आलो होतो. तेव्हाच मनात विचार आला होता की, एक रात्र आणि एक दिवस इथे पुरेसा नाही; चांगला महिनाभर इथे एकट्यानेच काढावा.
"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या. दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे. त्यात पदार्थसुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःची कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे, अंथरूण टाकणे आणि काढणे, ह्या साध्यासुध्या गोष्टींसाठी माणसाने दुसऱ्या कुणावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून, जंगलात पायी भटकायचे. निसर्गाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा, ह्या माफक अपेक्षेने मी गेलो आणि माझा काळ फार आनंदात गेला."
"मी पाच एकर विस्तार असलेल्या तळ्याकाठी राहिलो. हे तळे म्हणजे जंगलाचा डोळा होता. वरच्या बाजूला डोंगराची भिवई होती. अल्याड-पल्याड घनदाट वृक्षराई होती. कोणी मुद्दाम लावले होते का, आपसुक आले होते; कोण जाणे! पण तळ्याच्या चारी बाजूंना भव्य असे प्रचंड बुंध्याचे पिंपळ होते. शांत अशा रात्री वारा सुटे आणि उघड्यावर खाटले टाकून झोपलेल्या मला जाग येई; तेव्हा धुवाधार पाऊस कोसळत असावा, असा घोष कानी येई, तो ह्या पिंपळपानांचा असे. माझ्या उशाकडील बाजूलाच एक साठ-सत्तर फूट उंचीचा पिंपळ होता. शिवाय सभोवार आज्ञाधारक रक्षक उभे असावेत, असे सरळसोट बुंध्याचे किती तरी वृक्ष होते. ऐन होते, धावडा होता, बिजा होता; तेंडू, पलाश, मोहा, चारोळी असे कित्येक होते. तळ्याच्या उजव्या बाजूला बांधापलीकडे पाझराचा झरा होता. त्याचे पाणी उष्णकाळमासीही आटत नसे."
"‘पान पडत यो कहै-
"सुनि तरुवर! बणराई!
'अबके बिछुरे ना मिलै,
"दूर पडेंगे जाई!
"रुखडा बोले पानसे,
"सुन पत्ते! मेरी बात,
"इस घर की यह रीति है;
"इक आवत, इक जात!"
"जुनी पाने गळून गेली होती, नवी अजून फुटत होती. तळ्याच्या डाव्या तीरावरचा एक भव्य शाल्मली, तर शांतिपर्वातल्या कथेतील वाऱ्याशी पैज घेऊन घाबरलेल्या आणि पराभव टाळण्यासाठी हल्ला होण्याआधी स्वतःच पाने, फुले, फांद्या मोडून टाकून उभा असलेल्या शाल्मली वृक्षासारख्या निव्वळ खराटा होऊन उभा होता. लांबून मी त्याला ओळखला नाही. पण एके दिवशी प्रभातकाळी मी तळ्याभोवती परिक्रमा केली, तेव्हा त्याला जवळून पाहिला आणि म्हणालो, ‘अरे, हा तर वृक्षराज शाल्मली! प्रत्येक वर्षी स्वतःचा खजिना वाटून टाकणाऱ्या सम्राट हर्षासारखा हा वैभवत्यक्त असा उभा आहे.’"
"मुद्दाम आणून सोडलेली सहा मोठी राजहंस पाखरे तळ्यात होती. एकमेकांना धरून ती तळ्यातच राहत. फार तर काठावर येऊन पंख साफ करीत बसत. जवळपास कोणी आले की, ओरडून आकांत करावा असे त्यांचे चाले. रात्री-अपरात्री त्यांचा आकांत ऐकला की, मला कळत असे ह्यांना भीती आहे, असे कोणी पाण्यावर आले आहे. मोठा अजगर किंवा बिबळ्या किंवा रानकुत्री. ह्या तळ्यात मगरी नव्हत्या."
"तळ्यापलीकडे, डोंगराच्या उतारावर जी वृक्षराजी होती; तिच्यात काळ्या डोक्याचे पिवळे हळदुले पक्षी पुष्कळ होते. पिवळ्यारंजन रंगाची ही पाखरे जेव्हा ह्या वृक्षावरून त्या वृक्षावर भरारत, तेव्हा पिवळ्या शाल्मलीच्या फुलांनाच पंख फुटले आहेत, असे वाटे.
"बांधाच्या उतरत्या बाजूवर दोन ज्येष्ठ असे उंबर होते. त्यांचे शीर्ष पाहताना मला माझी टोपी काढून हातात घ्यावी लागे. उंबराच्या माथ्यावर हरोळ्यांची वस्ती आहे. ह्याचा पत्ता मला लागला नव्हता; पण एकवार भल्या सकाळी मी गेलो, तेव्हा ‘फडर्र’ असा त्यांच्या पंखांचा ओळखीचा आवाज आला. हरोळ्यांच्या बळकट पंखांचा आवाज त्यांच्या वेगळेपणामुळे तत्काळ कळून येतो. अशा बेसुमार उन्हाळ्यात, झाडेझुडपे निष्पर्ण झाली असताना ही पाखरे कुठली बरे फळे खाऊन आपले बळकट पंख उडते ठेवीत असतील?"
"आटलेल्या तळ्यात सुरेख हिरवे गवत माजले होते. एरवी, बांबूची पालवी, झाडपाला, वेली हेच खाद्य ज्यांच्या वाट्याला यायचे; त्यांना उन्हाळ्यात हे गवत म्हणजे उत्तम मेजवानी होती. एक कळप चरत असतानाच दुसरा त्याच ठिकाणी आल्यावर संघर्षाला सुरुवात झाली असली पाहिजे. तू मोठा का, मी मोठा यासाठी तांबड्या रंगाच्या म्हणजे तरण्याबांड खोंडांनी लढत सुरू केली असली पाहिजे."
"एरवी, तळ्याच्या काठी रात्री केवढी तरी शांतता लाभे. संध्याकाळ झाली, डोंगरापलीकडे सूर्य गेला की थंड वारे वाहू लागत. रातवे पक्षी ‘चक्कुऽ चक्कुऽ चक्कुऽऽ’ असा सुरेख ठेका धरीत. दिवसभर पळापळ केलेली वानरे झाडांच्या सुरक्षित डहाळ्यांत विसावत. लवकरच आभाळ चांदण्याने झगमगू लागे.
"अशा शांत, सुखद वेळी मी हिरव्या रंगाची ती वेताची आरामशीर खुर्ची उचलून झाडांच्या मेळाव्यात, हिरवळीवर टाकत असे आणि पायांत काही न घालता, थंड हिरवळीवर पावले ठेवून एकटाच बसत असे."
"रघुवंशात शातकर्णीऋषींचा उलेख आहे. तो मृग कळपाबरोबर राहत असे आणि दूर्वांकुर भक्षण करीत असे.
"माणसे हीसुद्धा ज्या काळी, हरिणाप्रमाणे निसर्गाची लेकरे म्हणून वावरत होती, तो काळ किती वैभवाचा म्हणावा! तेव्हा एखादा देवदार वृक्ष कोणी पुत्रवत् मानून त्याचे पालनपोषण करी. वनातील वाटेवरून रथ चालला की, चाकांचा आवाज ऐकून मोर केकारव करीत.
"मनू म्हणतो की, कृष्णसारमृग ज्या वनात यथेच्छ विहार करतात, तो प्रदेश यज्ञीय समजावा.
"आता कोठे आहेत ते कृष्णसारमृग?"
निवास
"मार्च महिन्यात शिक्षणासाठी ते मधुमलाई जंगलात असताना एक अनुभवी वनाधिकारी व्याख्याते म्हणून आले होते. फोटो घेण्यासाठी ते हत्तीच्या मागोमाग गेले. बाकीच्या लोकांनी त्यांना धोक्याची सूचना दिली :
"‘‘एक हत्ती... एकटा हिंडतो... तो रागीट आहे... माणूस पाहताच धावून अंगावर येतो... तुम्ही जाऊ नका!’’
"साहेबांचा जन्मच जंगलात गेला होता. ते म्हणाले, ‘‘रानातल्या जनावरांशी कसं वागावं, हे मला ठाऊक आहे.’’
"तरीही एक जण सोबतीला म्हणून गेला.
"तो हत्ती दिसताच जवळ जाऊन साहेबांनी कॅमेरा रोखला आणि सोंड वर करून, तुतारी फुंकून हत्तीने चाल केली. सोबत होता तो शहाणा माणूस चपला घालून आला होता. त्या काढून टाकून तो पळाला आणि झाडावर चढला. साहेबांच्या पायात मात्र रिवाजाप्रमाणे जंगलात वापरायचे जाडजूड बूट होते. ते एका मोठ्या टणटणीच्या झुडपाभोवती चकरा खाऊ लागले. हत्ती मागे होता. दोनदा चकरा होताच तो थांबला आणि उलटा वळून उभा राहिला. साहेब अगदी आयते त्याच्या सोंडेत आले."
"पहाटे-पहाटे मला झोप लागली.
"– आणि चौकीदार पुन्हा आला. ह्या खेपेला त्याच्या हातात बत्ती होतीच. मला उठवून तो म्हणाला, ‘‘साहेब, हे लोक मला ‘संगं चल’ म्हणतात... हे गुन्हेगार आहेत... शिकरीला आलेत....’’
"मी ‘कोण आहे तेऽ?’ असे ओरडून मच्छरदाणीतून बाहेर येऊन पाहिले, तर रस्त्यावर जीप उभी होती. तिने इंजीन सुरू करून तत्काळ पोबारा केला. म्हणजे अभयारण्यातही रात्री-अपरात्री घुसून शिकार करणारी मंडळी होतीच. मोठ्या शिंगांचा चितळ नर रायफलची गोळी शरीरात घेऊन तळ्यात येऊन मेला होता, तो अशाच कुणा तरी शिकारी चोरांकडून.
"शिकारी चोरांचा बीमोड करणं, ही सोपी गोष्ट नाही. कौटिल्य सांगतो, ‘पाण्यातला मासा पाणी कधी पितो, हे जसे कळत नाही; तसेच नोकरीतला माणूस लाच केव्हा खातो, हे कळत नाही.’
"शिकारचोर हे लाचखोरांचे भाईबंदच असतात."
रस्ता
"चव्हाट्यावर पोहोचले की, वडाच्या छायेखाली असलेल्या नागझिरादेवीच्या लहानशा देवळाला वळसा घेऊन पुन्हा डावीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. इथे देवीच्या पलीकडे जुने कौलारू रेस्ट हाउस होते. रानकुत्र्यांचा अभ्यास करीत उन्हातान्हात हिंडणारे माझे मित्र मारुतराव चितमपल्ली इथे मुक्काम टाकून होते. त्यापलीकडे रेस्ट गार्ड्सची दोन घरे होती. त्यांच्या अंगणात बांधलेली बैलजोडी, हवेला लाथा मारत धावणाऱ्या कोंबड्या, अंगणात घातलेली वाळवणे बघून मला जन्मगावी आल्याचा आनंद होई. माझी प्रभातफेरी सुरू होई, तेव्हा या घरासमोर खाटली टाकून, पांघरुणाच्या गबाळ्यात मुले-माणसे झोपलेली दिसत; त्यांच्याकडे पाहूनही मला बरे वाटे.
"इथेच रस्त्याच्या उजव्या बाजूला रायवळ आंब्याची चार-सहा झाडे होती आणि मोठे गवती कुरण होते. त्यापलीकडे जंगलच जंगल होते. कशासाठी कोण जाणे, या कुरणाला तारेचे कुंपण होते. ते खुबीने ओलांडून चवीने कैऱ्या खात बसलेली वानरांची टोळी भर दुपारी मला इथे दिसत असे. हे कुरण आणि मधे कुसुमतोंडीस गेलेला रस्ता सोडून पलीकडे तसलेच मोठे कुरण म्हणजे, उठून गेलेल्या नागझिरा गावाची शेतजमीन होती म्हणे. कुरणाच्या एक बाजूला जंगल होते. कुरणाच्या मागे पुन्हा फॉ रेस्ट गार्डांची क्वार्टरे होती. रात्रीच्या वेळी कांचनमृगांचे मोठमोठे कळप या कुरणात जंगलाच्या बाजूने शिरत. तिकडे कुंपण नव्हते. रात्री पाच-सातशे कांचनमृगांचा कळप इथे विसावे. मनुष्यवस्तीच्या आश्रयाने रात्र घालवणे त्यांना सुरक्षित वाटे."
"तिरोडा रस्त्यावरच्या फरशीअलीकडे मोहाचे झाड आहे. रस्त्यावर फूल पडले की आवाज होतो. टपाटप फुले पडतात. आज सडा पडलेला पाहिला. झाडाला पाने दिसली नाहीत. फूल ओले, जड, पिवळसर रंगाचे कळीवजा दिसले. चोखून पाहिले, गोड लागले. वास उग्र होता."
"तिरोडा रस्त्यावर मला नेहमीच्याच ठिकाणी, नेहमीच्या वेळी कांचनमृगांचा कळप दिसे. तीन मोठे नर, सात मद्या, वर्षाची पोरे, लहान शावके – असा एक कळप तीन वेळा मी पाहिला; तेव्हा त्याच्या मागोमाग दिवसभर हिंडावे, असा विचार करून मी रस्ता ओलांडून टेकडी चढलो. पानगळ झाल्यामुळे कितीही जपून चालले तरी आवाज हा व्हावाच, असाच हा ऋतुकाळ होता. बिबळ्यासारख्या मांजराच्या चालीने जाणाऱ्याच्या पंजाचासुद्धा जिथे वाळल्या सागाच्या पानांवर आवाज होई, तिथे मी कोण?
"टेकडीपलीकडे पुन्हा मला तोच कळप दिसला; पण झाडेझुडे, ओघळी, टेकड्या, यांनी हा भाग एवढा घनदाट झाला होता, जनावरांच्या जाण्या-येण्याच्या इतक्या असंख्य वाटा दिसत होत्या की; तास-दोन तास भटकूनही मला नेमके या कळपामागे सारखे राहता आले नाही. मी त्यांना पाहण्यासाठी बहुधा त्यांनी मला पाहिलेले असे. हा अनुभव मला अनेकदा आला. शिवाय तांबड्या डोक्याचे पोपट संशयास्पद रीतीने वावरताना झाडांच्या शेंड्यांवरून मला पाहत. त्यांचा मला काही पत्ता नसे. मी झाडाशेजारी जाताच कॅऽकॅऽकॅऽ असा दचकवणारा मोठा कोलाहल करून उडत. त्यामुळे आसमंतातील वन्य प्राणी सावध होत आणि फार लांबून मला हेरत. ट्रीपाय, किलकिल्या, तांबट, काष्ठकूट ही सगळीच पाखरं मी दृष्टीला पडताच हाका द्यायला सुरुवात करत. त्यांच्या किंकाळ्यानी जंगल भरून जाई. माझ्या घुसखोरीमुळे मलाच शरमल्यासारखे होई. कांचनमृगांना माझा पत्ता चटकन लागे आणि तो कळप तत्काळ पसार होई. त्यामुळे एकच एक कळप धरून त्यामागोमाग महिनाभर तरी हिंडण्याचा बेत सफल झाला नाही. मी नाद सोडून दिला."
"तो टपाटपा फुले गाळणारा मोहाही एकदा असाच लालचुटूक पालवीनं भरून गेलेला मी पाहिला. आजूबाजूला हिरवी झाडे आणि मधे हाच तेवढा लाल. पुढे-पुढे त्याची गडद सावली रस्त्यावर पडू लागली. आंब्याच्या बरोबरीने मोहाचे झाडही थंडगार छायेसाठी नाव कमावून आहे."
वाटा
"रस्ते हे वाहनांसाठी असतात आणि पायांसाठी वाटा असतात, हे जनावरांइतके आणखी कुणाला कळले नसावे. रस्त्यांचा उपयोग फक्त ओलांडण्यासाठी त्यांनी केलेला मी पाहिला.
"मग मी जनावरांनी पाडलेल्या वाटा धुंडू लागलो.
"ह्या उद्योगात चुकून भलतीकडे जाण्याचा धोका होताच. अरण्यात चुकण्याचा एक अनुभव मी बऱ्याच वर्षांपूर्वी धारवाडकडच्या ‘गुंजावती’ जंगलात घेतला होता आणि काही धोका होण्याऐवजी बुद्धीला कानस लागून ती लखलखीत होण्याचं फळ माझ्या पदरी पडलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या काळजीनं हैराण झालेल्या सवंगड्यांच्या शिव्या ह्या फायद्याबदली मी आनंदानं सोसल्या.
"जनावरांच्या या वाटांनी मला बऱ्याच अज्ञात गोष्टींकडे नेले."
"वाळलेल्या झाडांना पालवी फुटत होती. उत्तरोत्तर नवे-नवे चमत्कार दिसत होते. पिवळ्यारंजन फुलांच्या घोसांनी लहडलेले बहावे जागोजाग मला दिसत. कधी लालचुटूक पानांनी लहडलेला मोहा दिसे. आजूबाजूला पोपटी रंगाच्या पालवीची झाडे, मधेच पिवळा रंग शिंपडल्यासारखे बहावे आणि एकदम हा लालचुटूक मोहा.
"आता जंगलात रंगपंचमी खेळली जात होती."
"तिरोडा रस्ता मी ताज्या वर्तमानपत्रासारखा वाचला आणि वाटा धुंडताना रहस्यकथेच्या पानांतून वावरलो.
"सुताने स्वर्गाला कसे जाता येते, ते ह्या वाटांनी मला दाखविले.
"काहीही मिळवायचं म्हणजे वाटा तुडवाव्या लागतातच."
वानरे
"विदर्भातला उन्हाळा ऐन भरात होता. रोजचे तापमान दहा ते बारा डिग्री असे. मार्च महिन्यापासून पतझडीला सुरुवात झालेली. मे महिन्याच्या सुरुवातीला वृक्ष केवळ खराटे उरले होते. गवत, वेली, झुडपे सर्व काही पर्णहीन होते. नुकतेच नवे कोंभ, नवी पालवी फुटू लागली होती. जंगलात कुठे-कुठे हिरवा शिडकावा दिसत होता. पाच एकर विस्ताराचे तळे आता आटून बरेच संकोचले होते."
"शाल्मली वृक्षाखाली एकदा वानरांचा घोळका वाऱ्यावर तरंगत खाली येणाऱ्या पांढऱ्या म्हाताऱ्या धरताना बघून मी चकित झालो. ... "
"नागझिराला रेस्ट हाउससमोर वन खात्याने सुंदर बागा तयार केलेल्या आहेत. ह्या बागांत येऊन वानरे फुलझाडांचा नाश करतात, म्हणून माळी त्यांना सतत हुटाहुट करीत. माळ्यांचा ताफाच्या ताफा ह्या कामात तत्परता दाखवीच; पण माळ्यांच्या बायका, मुली, मुले, दोन कुत्री हीही वानरांमागे हात धुऊन लागत. रॉकेल तेलाची डबडी धाड्ऽ धाड्ऽ वाजवीत, धोंडे फेकून हा-हो करीत. दोन कुत्री वानरांचा ताणपट्टा काढीत. बाजारच्या दिवशी सुट्टी असली की, माळी शेजारी आठ-दहा मैलांवर असलेल्या बाजाराच्या गावी जात. सर्वत्र शुकशुकाट असे. अशा वेळी दबकत-दबकत वानरांची झुंड बागांत उतरे आणि चोरटेपणाने फुलझाडांवर तुटून पडे.
"माझ्या निवासासमोरच्या बागेत अशी त्यांनी धाड घातलेली मी तीन-चार वेळा पाहिली. आपल्याला धुडकावयाला कोणी येत नाही, हे ध्यानी येताच त्यांना फार आनंद होई. इतका की, मोठ्या वानरिणीसुद्धा हिरवळीवर गडबडा लोळत, पोरे उड्या मारत, एकमेकांशी कुस्त्या खेळत, झाडाच्या बुंध्याभोवती शिवाशिवी चाले. फांद्यांना लोंबकाळणाऱ्या पोरांचे शेपूट ओढून त्यांना खाली पाड, लाकडी कुंपणाच्या कठड्यावरून डोंबाऱ्यासारखे चाल, असा अगदी हैदोस चाले."
"जपानी शास्त्रज्ञांनी काही वर्षांच्या निरीक्षणाने असे सिद्ध केले आहे की, एखाद्या टोळीतील हुप्प्या जेव्हा कमजोर होतो, तेव्हा ही सर्व नरां���ी टोळी त्या हुप्प्याच्या टोळीवर हल्ला करते आणि हुप्प्याला मारून टाकते. त्याची प्रजा अशी लहान-लहान पोरेही निर्दयपणे मारली जातात आणि सर्वांत ताकदवान असा वानर त्या टोळीचा प्रमुख होतो."
मरण
"मी राहत होतो, त्या तळ्यात पाणपाखरे फारशी नव्हती. तळ्यात पाणकणसे, लव्हाळी अशा वनस्पती नव्हत्या. अगदी पाण्याच्या काठाशी झाडझाडोराही नव्हता. भल्या मोठ्या वाड्यात दोनच माणसे असावीत, तसे पांढरे-काळे दोन करकोचे तेवढे दिसत. शिवाय सात-आठ गायबगळे होते. तळेगावकर हे एवढेच. ही उणीव भरून काढण्यासाठी की काय, कोण जाणे, वन खात्याने राजहंसांच्या तीन जोड्या तळ्यात आणून सोडल्या होत्या. दिवसभर एकमेकाच्या संगतीने ही पाखरे पाण्यात पोहत असत. एरवी, तळ्याच्या काठी हिरवळीवर उभी राहून पंख वाळवताना, साफ करताना दिसत. अंधार पडल्यावर तळ्यातल्या पाण्यावर कोणी जनावर आले की, मोठमोठ्याने कोकलत. त्यांचे ते ओरडणे केवढे तरी मोठे वाटे. ही सहा पाखरे म्हणजे तळ्याचा आवाज होता."
Author's accounts of deaths he saw in wildlife observation in forest.
रानकुत्री
Author quotes other writers' accounts of wildlife observations in general, and specifically some of wild dogs, including one a tigress hunted by a pack.
सोबती
Author describes various people whose company he had during his sojourn in forest.
झरे
Author writes about attempting to observe wildlife in heat of day by hiding next to a stream.
तेंडू
"इथे, रस्त्याकडून तळ्याकडे येणाऱ्या गवताळ पाऊलवाटेवर एकवार मी थबकलो. वाटेच्या कडेलाच, तापलेल्या जमिनीचे कवच फोडून भुईकमळाची कळी बाहेर यावी तसा तेंडूचा कोंभ बाहेर पडला होता. त्या लाल रसरशीत कोंभात, पुढे वाढणाऱ्या भव्य वृक्षाचे सारे आश्वासन दाटलेले होते. पण मला त्याचे रूप एवढे आकर्षक वाटले की, वेड्यासारखा मी त्याला जागचा हळूच सोडवला आणि मुक्कामाला घेऊन आलो. माझ्या टेबलावर असलेल्या बांबूच्या पेरात काठोकाठ थंड पाणी भरून त्यात त्याला मी ठेवला. म्हटले, हा मला बराच वेळ दिसू दे. पण दुपारी बाहेर उन्ह तापले आणि माझ्या डोळ्यांदेखत तो कोमेजला. बांबूच्या पेरावर त्याने मान टाकली.
"या तेंडूवृक्षाची पाने गोळा करण्यासाठीच कंत्राटदाराने शे-सव्वाशे मजुरांची धाड या अभयारण्यावर टाकलेली होती. तेंडूची रुंद, निवडक पाने खुडण्याचा, त्यांचे पुडे बांधण्याचा, त्यांची मोजदाद करण्याचा फार मूल्यवान, फार किफायतशीर आणि सरकारला भरपूर द्रव्य मिळवून देणारा मोसम आता सुरू झाला होता. जंगल अधिकाऱ्यांच्या जीपगाड्या देखरेखीसाठी भरधाव धावत होत्या.
"ही तेंडूची पाने आता लाखांनी खुडली जाणार होती. हजारो ठिकाणी विड्या वळण्याचा जो व्यवसाय चालतो, त्या जागी ह्या पानाच्या विड्या वळल्या जाणार होत्या. रोजगाराला जुंपलेल्या बाया-बापड्या पुढ्यात सुपे आणि तंबाखू घेऊन बसणार होत्या आणि लाल धागा, पांढरा धागा, लवंगी विडी, मोठी विडी – अशा नाना विड्या वळणार होत्या. त्यांची वेष्टनात बांधलेली कट्टले गिऱ्हाइकांच्या हातात पडणार होती आणि नागझिराच्या जंगलात तरारलेली ही हिरवीकंच पाने शौकिन ओठांनी फुंकली जाऊन, त्याची नखभर राख इथे-तिथे झाडली जाणार होती. सरकारच्या तिजोरीत कोटींनी रुपये जमणार होते. व्यापाऱ्यांची फायदेशीर दोंदे वितीवितीने सुटणार होती.
"जमीन तापणे तेंडूला हितकारक असते, म्हणून आधाशीपणाने जंगलाला मुद्दाम आगी लावल्या जातात. जंगलरक्षकाचा डोळा चुकवून हे कर्म केले जाते. अशी आग एकवार लावून दिली की, वाऱ्याच्या चिथावणीने ती उद्दाम होते, पसरते. आपल्या सहस्र जिभांनी जंगलाचा सारा हिरवेपणा खाऊन टाकते. ओले, वाळले सगळेच जळते. गवतकाडी, झाडेझुडपे राख होतात. जमीन धरून राहणारे लहान-सहान जिवाणू जळून जातात. पाखरांचे अन्न जळून जाते. त्यांची अंडी, पोरे होरपळतात. हरणांचे गर्भपात होतात, पसरणारी ही आग विझवण्यासाठी जंगल अधिकाऱ्यांना जिवापाड मेहनत करावी लागते. काही बचावतं, काही जातं.
"कुसुमतोंडी रस्त्याने बरेच पुढे गेल्यावर उजव्या हाताला जी वाट फुटत होती, तिच्या डाव्या बाजूला जळून गेलेले बरेच मोठे जंगल मी पाहिले. काळीभोर पडलेली जमीन, वृक्षाचे उभे बुंधे आणि कुठं-कुठं हिरवा शिडकावा – असे हे उदासवाणे दृश्य होते. हे जंगल कोणी मुद्दाम आग लावल्यामुळे जळले का; वणव्यामुळे, अपघाती आगीमुळे जळले गेले, याची चौकशी मी केली नाही. या असल्या उदास पार्श्वभूमीवरच अनेक सकाळी, तेंडूची पाने खुडण्यासाठी एका ओळीने जंगलाकडे निघालेले अर्धनग्न असे रोजगारी भेटत. बाया, बाप्ये, पोरी, पोरं. बऱ्याच जणांनी पिण्याचे पाणी डोईवर घेतलेले असे. मडक्यांतून, कासंड्यांतून, वाळल्या भोपळ्यांपासून बनलेल्या बुधल्यांतून."
"हातावर पोट असलेली ही शे-सव्वाशे परमुलखातली माणसे जंगलात येऊन राहिल्यावर कॅन्टीनवाल्याचा मुक्काम नित्याचा झालेला मी पाहिला. यापूर्वी सुट्टीच्या दिवशी तो येई आणि सोमवारी सकाळी आपले सगळे गबाळे बैलगाडीत भरून निघून जाई. आता मात्र तळ्याकाठी उभारलेल्या लहानशा मांडवात तो मुक्काम टाकून राहू लागला. माणसांची वर्दळ वाढू लागली. सकाळ-संध्याकाळ स्टोव्ह पेटू लागला आणि गॅसबत्ती उशिरापर्यंत जळू लागली."