Jayant Vishnu Narlikar was an Indian astrophysicist and emeritus professor at the Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA). His research was on alternative cosmology. Narlikar was also an author who wrote textbooks on cosmology, popular science books, and science fiction novels and short stories.
प्रेषित मी जेव्हा पहिल्या प्रथम वाचले तेव्हा नुसता थक्कच झालो नाही तर पूर्णपणे भारावून गेलो होतो. इतका की खगोलशास्त्रज्ञ होण्याची मी (दिवा)स्वप्नं पाहू लागलो. मला वाटते की डॉ.जयंत नारळीकर यांच्यासारख्या महान व्यक्तींची आपल्या देशाला खूप गरज आहे. नारळीकर केवळ संशोधनातच अद्वितीय नव्हते तर खगोलशास्त्र या विषयावर लोकांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी मातृभाषेतून समाजाला समजेल अशा भाषेत ( कथा - कादंबरी रुपाने) कित्येक पुस्तकांची देणगी दिली. प्रेषित मी माझ्या शालेय जीवनात वाचले तेव्हा केवळ खगोलशास्त्रज्ञ व्हायचे स्वप्न मनाशी बाळगून होतो. मी स्वतःवरुन नक्कीच सांगू शकतो की नारळीकरांनी मला माझ्या शालेय जीवनात प्रचंड प्रेरित केले होते. काही वैयक्तीक कारणास्तव मला माझी शिक्षणाची ही आवड जोपासून शिक्षणाला दिशा देणे शक्य नाही झाले. पण अजूनही मी खगोलशास्त्रावर जमेल तसे वाचन, चिंतन व लेखन करत असतो.
असो, तर हे सर्व सांगायचा मूळ हेतू जयंत नारळीकर यांच्या 'प्रेषित' या कादंबरीचे अवलोकन करणे हा आहे. 'प्रेषित' ने कित्येक शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात एक वेगळी दिशा दिली असणार याची खात्री आहे. ज्या मुलांना शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अशी मार्गदर्शक पुस्तके मिळतात ती मुले भाग्यवान होय.
तर 'प्रेषित' ची सुरुवात होते ती अमेरिकेतील जॉन प्रिंगल या एका शास्त्रज्ञाच्या वेगवान प्रवासाने. सायक्लॉप्स टाऊन या अवाढव्य परिसरात जेव्हा जॉन दाखल होतो तेव्हा सायक्लॉप्सच्या दुर्बिणीचे वर्णन थक्क करुन सोडणारे आहे. सायक्लॉप्स चे वर्णन करतानाच जॉड्रेल बँक या सर्वात मोठ्या दुर्बिणीची उपमा देऊन वाचकांच्या ज्ञानात बारीक सारीक माहितीची भर टाकण्यास जी सुरुवात करतात ती कादंबरी संपेपर्यंत सुरुच असते. असे असूनही कादंबरीतील थरार कुठेही कमी होत नाही.
तर हा धडाडीचा तरुण शास्त्रज्ञ जॉन प्रिंगल व त्याचा मित्र पीटर लॉरी यांच्या चर्चेतून राक्षसी तारे हे परकीय जीवसृष्टीचा शोध लावण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवून देताना वैज्ञानिक संशोधनाला सरकारी लाल फितींमध्ये कसे भरडले जाते याची काळी किनारही तितक्याच ताकदीने नारळीकर दाखवून देतात. पण या लाल फितीच्या हुकुमशाहीतही जॉन प्रिंगलसारखे हाडाचे वैज्ञानिक उपलब्ध असलेल्या दुर्बिणीचा विज्ञानासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करतात. त्यातून काय फलनिष्पत्ती होते. सायक्लॉप्ससारखी अवाढव्य दुर्बिण ज्या हेतूने बांधली गेली होती तो मूळ हेतू जॉन प्रिंगल कसा साध्य करतो? जॉन प्रिंगलच्या त्या एका कृतीतून नक्की काय निष्पन्न होते? हे सर्व मुळातूनच वाचण्यासारखे आहे. त्याबद्दल अधिक सांगून रसभंग नाही करत.
तर जॉन प्रिंगलचे अचानक अपघाती निधन झाल्यावर अमेरिकेतील ही वेगवान कथा अवतीर्ण होते ती भारताच्या भूमीवर - महाराष्ट्रात सातारा-कराड महामार्गावर. सुधाकर आणि मालिनी या एका सुखी दांपत्याला रस्त्यावर एक मूल सापडते. त्यांच्या सुखात कमी असते ती फक्त अपत्याची ती देखील या सापडलेल्या मुलाच्या रुपाने पूर्ण होते. आलोक हे नाव ठेवले जाते या निसर्गाच्या देणगीचे.
आलोकच्या वाढत्या वयाबरोबरच सुधाकर आणि मालिनीला त्याच्या अफाट बुद्धीमत्तेची जाणीव होते. त्यानुसार सुधाकर आलोकच्या करियरसाठी योग्य ती तरतूद करतो. पण हा बालबृहस्पती एवढा विद्वान असतो की मिश्रांसारख्या कसलेल्या शिक्षकाचे मन जिंकून घेतो. त्यात आलोकला लहानपणापासून पाहणारे विद्वान डॉक्टर साळुंखे यांनी आलोकच्या बुद्धीमत्तेवर केलेले प्रयोग, त्यातून काढलेला निष्कर्ष, आलोकने स्पेस शटलमधून चंद्राची सफर करणे, जागतिक संघटनेत प्रवेश मिळवणे व त्यात आपली छाप पाडणे. या सर्व घडामोडींबरोबर आलोकच्या भावनिक बाजू जपणारी सँड्रा ही गर्लफ्रेंड व चेंग सारखा हरहुन्नरी मित्र घटनाक्रमात महत्वाची भूमिका बजावतात.
या सर्वांचा शेवट होताना कथानक पुन्हा भूतकाळाशी जोडले जाते व सर पीटर लॉरी यांची आलोक भेट घेतो ती कशासाठी? त्यातून काय साध्य होते? आलोकच्या बुद्धीमत्तेने प्रभावित होऊन डिक मम्फर्ड सारखा उच्चपदस्थ संचालक राष्ट्राध्यक्षांची सायक्लॉप्स वर काम करण्याची परवानगी आलोकसाठी का मिळवून देतो. आलोक या संधीचा पाठपुरावा कसा करतो? व का करतो? हे सर्व खूप खिळवून ठेवणारे व मनोरंजक आहे व मुळातूनच "प्रेषित" वाचून अनुभवण्याची गोष्ट आहे.
प्रेषित चे वाचन करताना जयंत नारळीकर हे किती उच्च श्रेणीचे शास्त्रज्ञ होते हे तर पटतेच पण स्वतःकडे असलेले ज्ञान पुस्तकरुपाने - ते ही मनोरंजक पद्धतीने - सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत कसे मांडायचे याची पुरेपुर जाणीव होती हे ही दिसून येते. 'प्रेषित' चे वाचन करताना सर्वसामान्य माणसाला अवकाशयुगाची नांदी कधीपासून सुरु झाली हा इतिहास तर कळतोच. पण चंद्रावरची सफर करण्यासाठी आधी किती वेळ लागायचा व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस होणार्या प्रगतीमुळे त्या वेगात वाढ कशी होणार आहे या भविष्यातील घटनेचा जणू आढावाच घेतलेला आढळतो. तसेच व्हिडिओ फोन, रेडिओ व ध्वनि तरंगाचे विज्ञान, रेकॉर्डींग क्षेत्रातील क्रांती. अशा कित्येक बारिकसारिक गोष्टींद्वारे विज्ञानाने सर्वसामान्यांच्या जीवनात केवढी मोठी क्रांती घडवून आणली आहे हे देखील नारळीकरांनी अतिशय सुंदर पद्धतीने दाखवून दिले आहे.
"प्रेषित" ची रचना खूप विचारपूर्वक झालेली जाणवते. पुस्तकाच्या अनुक्रमाणिकेपासूनच सुरुवात होते. प्रत्येक प्रकरणाला नारळीकरांनी खूप समर्पक नावे दिली आहेत हे प्रत्येक प्रकरण वाचताना जाणवते. जसे सायक्लॉप्स.... निसर्गाची देणगी .... स्पेस अॅकॅडमी.... सर पीटर.... टेपच्या शोधात...इ...इ...
जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते की "प्रेषित" या कादंबरीच्या रुपाने डॉ. जयंत नारळीकर यांनी मराठी साहित्यविश्वाला खूप अनमोल देणगी दिलेली आहे. या सुंदर पुस्तकाबद्दल डॉ. जयंत नारळीकर यांना मनःपूर्वक अनेक धन्यवाद. - सागर.
२००३ या वर्षी Spirit आणि Opportunity अशी दोन रोवर्स नासा तर्फे मार्स एक्सप्लोरेशन अंतर्गत पाठवण्यात आली होती. त्याच वर्षी मी पहिल्यांदा नारळीकरांच्या विज्ञान कथांचे दोन संग्रह वाचले होते. त्यात पहिला 'प्रेषित' आणि दुसरा 'यक्षांची देणगी'. प्रेषित वाचल्यावर जो मनाला झटका बसला होता, तो मला अजूनही आठवतोय. एक अंतराळवीर काही वर्षानंतर परत पृथ्वीवर परततो तेव्हा त्याच्यात झालेले बदल आणि त्याच्या एका मित्राकरवी आपल्याला कळणारा वयाचा फरक, हा असा काहीतरी प्लॉट होता. मी चक्क ते वाचल्यावर उडाले होते. माझ्या मैत्रिणीसोबत केलेली कितीतरी मिशन मार्सची पारायणं आणि त्याबद्दल अपार कुतूहल, असा संमिश्र पण विज्ञाननिष्ठ विद्यार्थी म्हणून तो काळ आम्ही सोबत घालवला होता. नारळीकरांच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद. त्यांच्या लिखाणात नुसतीच खिळवून ठेवायची ताकद नाही तर वाचणाऱ्यांना गुंतवून टाकणारं अजब कसब आणि रसायन आहे.
Superb book जयंत नारळीकर वैज्ञानिक म्हणून जेवढे महान आहेत तेवढेच एक लेखक म्हणून आहेत. पुस्तकातल्या उल्लेखाप्रमाणे त्यांनाही dual personality असावी एक वैज्ञानिक आणि एक लेखक. १९८३ ला आपल्या देशात विज्ञान फारसे प्रगत नसताना लिहिलेलं हे पुस्तक नक्कीच अप्रतिम आहे. आजच्या काळातल्या तंत्रज्ञानापुढे पुस्तकातील गोष्टी विसंगत असल्या तरी खोट्या वाटत नाहीत. पुस्तकात खूप वैज्ञानिक संज्ञाचं मराठी भाषांतर केलाय ते पण मस्त आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून एक रोमांचक कथा मस्त गुंफलीय. खिळवून ठेवणारं आणि एका वेगळ्या जगाची सफर घडवणारं पुस्तक.
पुस्तकाचे नाव - प्रेषित पुस्तक प्रकार - विज्ञान कादंबरी. लेखक - जयंत विष्णू नारळीकर. प्रकाशक - मौज प्रकाशन. मूल्य - २५०₹ पृष्ठ संख्या - १२८
प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक, प्रतिभावंत साहित्यिक आणि समतोल समाजचिंतक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृध्द केले आहे. मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या हेतूने डॉ. नारळीकरांनी लेखणी हाती धरली आणि विज्ञानकथा, विज्ञान कादंबरी असे नवीन प्रकार मराठी साहित्याला लाभले.
प्रेषित' ही डॉ. नारळीकरांची पहिली विज्ञान कादंबरी. 'सायक्लॉप्स' हा या कादंबरीच्या केंद्रभागी असलेला विषय. पृथ्वी आणि पंचक या दोन ग्रहांतील संदेशग्रहणाची, संदेशप्रेषणाची आणि सांस्कृतिक संपर्काची ही कादंबरी आहे. Extra-Terrestrial(पृथ्वीबाहेरील) जीवन, त्याला जोडून येणारे विविध भावनांचे कंगोरे, वैज्ञानिक तथ्य हा या कादंबरीचा गाभा आहे. एलियन म्हणजे नक्की काय? आपल्या कल्पनेपेक्षा हे विश्व किती महाकाय आहे, त्यातील प्रत्येक सजीव - निर्जीव गोष्टींचं अस्तित्व निसर्गाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे आणि माणूस म्हणून तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला किती अद्भुत गोष्टी दाखवू शकतो हे या कादंबरीतून जाणवते. 'अर्थपूर्ण भाष्य, रेखीव व सुबक वर्णने, मार्मिक स्वगते आणि विचारगर्भ व मिस्कील संवाद यांमुळे हे लेखन आकर्षक झाले आहे.
'प्रेषित' ही नारळीकरांची पहिलीच कादंबरी असली तरी विज्ञान आणि साहित्य या दोन्ही कसोटयांवर पुरेपूर उतरताना दिसते. १९८३ साली आपल्या देशात फारसे विज्ञान व तंत्रज्ञान प्रगत नसताना लिहिलेले हे लिखाण कमाल आहे. 'प्रेषित' मधील स्थल व काल यांचा अवकाश पृथ्वी व पंचक या दोन ग्रहांना जोडणारा आहे. योगायोग व कल्पित यांच्या आधारावर ही कादंबरी पुढे सरकत असली तरी तांत्रिक प्रगतीचे दर्शन आणि भविष्यकालीन समाजाची मूल्यदृष्टीही येथे प्रकट झालेली आहे. विज्ञान विषयक दृष्टीकोण आणि शिक्षण व सत्ताधारी यांच्यातील द्वंद्व यामुळे कादंबरीला समाजभाष्याचे परिमाण प्राप्त होते. विज्ञान व रहस्य ही दोन्ही अंगे एकजीव करण्यात नारळीकर यशस्वी झाले आहेत.
कथेतले अनेक चढउतार प्रचंड उत्कंठा वाढवणारे आहेत पण ते इथे नमूद करणार नाही. घरच्याघरी बसून अंतराळाची सफर करण्याची इच्छा असण्यार्यांनी जरुर वाचावं असं हे पुस्तक.
I got this book as present on my recent b day. Was a great weekend read. Nice start for scientific novel. Author really kept it streaming with finer details of each and every technology involved. Cyclops is awesome!
यावर्षी वाचून आवडलेलं हे दुसरं थरारक पुस्तक. खरं तर ही एक विज्ञानकथा आहे. पण प्रत्येक पानागणिक आपली उत्कंठा वाढवणारे आहे. सदतीस वर्षांपूर्वी ही कथा लिहिली आहे यावर विश्वासच बसत नाही. आपल्या काळाच्या मानाने लेखकाचे विचार व कल्पकता कितीतरी पुढे होती याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.
एक वैज्ञानिक, प्रिंगल, अवकाशात अजून कुठे जीवसृष्टी आहे का याचा शोध लावतोय. ते सुद्धा लपून छपून मिलिटरीच्या यंत्रणेने. एका अपघातात त्याचा मृत्यू होतो. जवळजवळ चाळीस वर्षानंतर एका युवा जोडप्याला एका शेतात एक मूल सापडते ज्याचे नाव आलोक ठेवले जाते. लहानपणापासून हा आलोक समवयस्क मूलांपेक्षा जास्त बुद्धीवान असतो. कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर आणि मुलाचे शिक्षक त्याच्यावर लक्ष ठेवून असतात कारण त्यांना हा मुलगा विशेष आहे हे कळून चुकते. कथानक पुढे सरते तसे हा मुलगा एक परग्रहवासी आहे याचा उलगडा हळूहळू होत जातो. पुढे आलोक काय व कशासाठी करतो हे अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिले आहे.
सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक उत्कंठा वाढवणारे आहे. एकदा वाचायला सुरुवात केली मग सहज सोडवत नाही. लेखकाने उत्तम प्रकारे विषयाची मांडणी केली आहे. साध्या भाषेचा प्रयोग केल्याने वाचावयास कठीण जात नाही. चुकवू नये असे हे पुस्तक मुद्दामहून वाचा. नक्की आवडेल यात शंका नाही.
आजपर्यंत नारळीकर यांच्या जेवढ्याही कथा आणि कादंबऱ्या वाचल्या पण सर्वात आवडीत हीच....
सुरुवात ते शेवट पर्यंत वाचकाला पुढे काय होईल याची उत्कंठा लागून राहिल... आलोक सॅंड्रा यांची जोडी आणि चॅंग हे त्रिकुट, आलोक ने आपल मिशन फत्ते करायला केलेल्या कसरती, डॉ. साळुंके यांचे प्रयोग, सॅंड्रा आणि पिटर यांचे कंट्रोल रूम पर्यंतचा सफर, हे सर्व वाचून सर्व दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं....
योग्य त्या ठिकाणी कथा, क्रिकेट, तत्कालीन साहित्य यांचे उपमा व उदाहरणे देवून कथानकात आणखीच आनंद वाढला... या कादंबरीचा पुढचा भागही लिहिला जावा अशी इच्छा आहे.
I felt very excited by going through reviews but it ended when I read it . Book is okay ,story was predictable (probably due to lots of movies that i watched) but then it was okay.
I remember my science teacher has recommended me this book back in the school days, have got a copy to read it in the vacations of my SSC exams...a famous marathi science fiction by Naralikar...
this is one of the best stories I ever read. I read this book when I am in 10th and that was my first Marathi science fiction. then I got the fond of science fiction.