It is actually not a biography & History of Yashwantrao Holkar, the great Maratha warrior. Holkar family who take care of the Swaraj Tree which chhatrapati Shivaji Maharaj takes with like any other Maratha family. Author has tried to narrate about his life, his triumphs, strives & a loyal service provided to Peshwe.
This review is for the Hindi translation of the book - 'Pratighaat' .
'Pratighaat' is a book based on Yashwantrao Holkar and his journey from illegitimate great historical figure . One of the best thing I like about Mr. Inamdar's writing is that his books have a very gripping start . The books creates a very intense atmosphere without wasting time . In this book Mr.Inamdar has successfully captured not only Yashwantrao Holkar's journey but also the internal tussle in the Maratha Confederacy . The rivalry among the various Maratha Houses and the politics related to it is drawn in a very compelling manner . The other thing I like was there was a subtle undertone pointing in midst of these political rivalries towards that how these internal tussles among Marathas failed the dream of Peshwa Bajirao - I .
The problem with the book lies in its translation . The translation of the book is not very good and most of the times it seemed that I am reading a plain historical account . The character were looking dull due to bad translation and none of them was good enough to make any impact . Language used in the translation most of the time was very casual , sometimes it looks like Yashwantrao Holkar is talking to his friends and not to his courtiers and sometimes his courtiers talks to him like he is their friend . A highly disappointing translation .
3 Stars . Only for N.S. Inamdar to write on such a lesser known topic of Indian history .
छोट्या रामशेज किल्ल्याचा मोठा इतिहास..... एका छोट्या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे. एकदम अफलातून!....... कादंबरीपेक्षा तो इतिहासच अफलातून!!
नाशिक जवळचा तुलनेने कमी उंचीचा रामशेज किल्ला. किल्ल्यावर केवळ ५०० शिबंदीसह एक शूर किल्लेदार. किल्ल्याकडे औरंगजेबाची वाकडी नजर वळते. १०००० सैन्यांसह एका खानला मोहिमेवर पाठवितो. मोहीम २ वर्षे चालते.... जवळपास ७-८ हजार सैन्य कमी येते ....... पण फतेह नाही.
पुन्हा दूसरा सरदार ३० हजार सैन्यांसह नामजाद होतो. मोहीम १ वर्षे चालते .... जवळपास २० हजार सैन्य कमी येते ....... पण फतेह नाही.
शेवटी १० हजार सैन्यांसह तिसरा सरदार नामजाद होतो. मोहीम ५-६ महिने चालवितो....... पण फतेह नाही.
त्यानंतर त्या गडावरील शूर सरदाराला विजापूर मोहिमेवर जावे लागते. नवीन तरणा बांड किल्लेदार नियुक्त होतो. वेढा चालूच असतो. पण एक दिवशी केवळ फितुरीने रामशेज किल्ला बादशहाच्या घशात जातो......!
कोणतीही रक्तहणी न होता बादशहाची फतेह!! बादशहा लगेचच गडाची डागडुजी करतो. दारूगोळा, रसद सर्व काही भरून ठेवतो. किल्ला पूर्वीपेक्षा भक्कम स्थितीत, पण मुघलांच्या ताब्यात!!
कहाणी इथेच संपत नाही. अचानक एका रात्री केवळ ३०० सैन्यांसाह केलेल्या हल्ल्यात रामशेज पुन्हा स्वराज्यात......! पूर्वीपेक्षा भक्कम स्थित!! हे कसे घडते ते सांगत नाही. त्यासाठी एकदा ही कादंबरी वाचाच!
जो किल्ला कोणतीही साधने नसताना ५० हजाराची फौज पाठवूनही औरंगजेब बादशहाला ५ वर्षात घेता आला नाही तोच किल्ला संभाजी महाराजांच्या अवघ्या ३०० शिलेदारांच्या तुकडीने केवळ एका रात्रीत पराक्रमाची शर्थ करत परत स्वराज्यात आणला ......!!
औरंगजेब जातीने २७ वर्षे महाराष्ट्रात राहूनही मराठ्यांना हरवू शकला नाही उलट १७०७ मध्ये त्याचीच कबर इथे खोदली गेली. हे असं कसं घडू शकतं त्याची एक झलक....... मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासातील एक सुवर्णपान....... झुंज!!!
There is lot of material available on Raja Shivaji, Sambhaji raje as well as to certain extent Peshwe & their rule. however, behind these succesful figures there were great contributions of different sardars, who were loyal & made maratha rule proud & extensive. The history could never be complete without the stories. facts about these heroes & their lives. Author has made a wonderful attempt through this novel to bring forward the life aspects of Yashwantrao holkar before all of us & salute to his work that he made us aware of our strong & powerful histroy.
सुभेदार यशवंतराव होळकर म्हंटले की डोळ्यासमोर येते सन 1802 ला ऐन दिवाळीत झालेली पुण्याची भयंकर लढाई आणि त्यात झालेला विध्वंस. तुकोजीराव होळकर यांचे पुण्यातच जन्मलेले अनौरस चिरंजीव म्हणजे यशवंतराव. कनिष्ठ तसेच अनौरस असल्याने वंशपरंपरेने त्यांना सुभेदारी मिळाली नाही. सुभेदारीवरून तुकोजींच्या काशीराव आणि दुसरे मल्हारराव या दोन्ही औरस मुलांमध्ये वाद चालू असताना यशवंतराव आणि त्यांचे बंधू विठोजीराव दुसऱ्या मल्हाररावाला पाठिंबा देत होते. पण पुण्यात झालेल्या धुमश्चक्रीत मल्हारराव ठार झाल्याने यशवंतराव पुणे सोडून माळव्यात दाखल झाले. त्यानंतर हळू हळू सैन्य जमवत दिवंगत द्वितीय मल्हाररावांचे पुत्र खंडेराव यांना नामधारी सुभेदार करून त्यांनी सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. दुसऱ्या बाजीरावांच्या दृष्टीने काशीराव हेच सुभेदार असल्याने त्यांनी यशवंतरावांना अधिकृतपणे सुभेदारी दिली नाही. या गोष्टीला दौलतराव शिंदे यांना जबाबदार ठरवत शिंद्यांनी हस्तगत केलेले होळकरी महाल यशवंतरावांनी पुनःश्च जिंकायला सुरुवात केली. आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी ते पुण्यावर चाल करून आले. पुण्याला शिंदे तसेच पेशव्यांचा सैन्याचा पराभव केल्याने दुसरे बाजीराव पुणे सोडून पळून गेले आणि त्याचीच निष्पत्ती असलेला बाजीरावांनी इंग्रजांशी केलेला वसईचा तह अस्तित्वात आला. यातूनच पुढे इंग्रजांचे मराठी साम्राज्यात हस्तक्षेप सुरु झाले आणि मराठी साम्राज्याच्या लागलेल्या या सुरुंगाला अप्रत्यक्षरीत्या जबाबदार ठरलेल्या यशवंतरावांची मनातील घालमेल सुरु झाली. पुण्यातून परत माळव्यात परतल्यावर त्यांनी विशाल सैन्याची उभारणी करत भारतातील अनेक राजांशी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही आणि त्यांचा हिरमोड झाला आणि त्यातच दीर्घ आजारपणात त्यांची सन 1811 साली मृत्यूशी गाठ पडली. दरम्यान त्यांच्या इंग्रजांविरुद्ध छोट्या मोठ्या चकमकी घडत राहिल्या आणि त्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांशी चिवट अशी झुंज दिली. आपल्या भारतावर सत्ता स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षेत यशवंतराव हे मोठा अडसर आहेत हे इंग्रजांना देखील कळून चुकले. प्रस्तुत कादंबरीत यशवंतराव होळकर यांच्या इतर पैलूंवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. थोरल्या मल्हारराव आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या होळकर घराण्यात जन्मलेल्या कर्तबगार तसेच मराठी इतिहासात फारश्या प्रसिद्ध नसलेल्या स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव होळकरांना जाणून घेण्यासाठी सर्वांनी या पुस्तकाचा जरूर आस्वाद घ्यावा.
The book describes the life of Maratha Subhedar Yashwantrao Holkar. The name of the book is apt, because 'Zunj' means struggle in Marathi. Certainly, the life of Yashwantrao Holkar was completely a struggle. The point of the book that, even after struggling so much against the circumstances, Yashwantrao is not able to fulfill his dream of India free of British. The book gave a sad ending which makes the book so easy to relate to. Also, the description of serious infighting among the Marathas and other indian lords is aptly described. This is able to show us how the British used the 'Divide and Rule' concept so effectively in India.
this book is about the life of maharaja yashvantrao holkar and his strugle with high class mentality and ,peshwa bajirao, shinde,english army. he was realy great man
Amazing story of Kille Ramshej. fought without any spport for 2 years against Aurangazeb's army..... with little support for another year. Great story of people working as a big family helping each other, and fighting against bigger army... 500 against 10k and then 30k along with the projectile weapon. The killedar (office managing the fort) was honored with fighting aongside the great warriors (to be sepcific - head of army) of Marathas.
पुस्तकाचे नाव: झुंज लेखक: ना. सं. इनामदार प्रकाशन: मिहाना पब्लिकेशन्स पृष्ठसंख्या: 620
---
#ना._सं._इनामदार लिखित #झुंज ही कादंबरी #यशवंतराव_होळकर या महान मराठा योद्ध्याच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी केवळ चरित्र नाही, तर एका वीराच्या संघर्षमय जीवनाची काल्पनिक पण वास्तवाशी सुसंगत अशी मांडणी आहे. लेखकाने यशवंतरावांच्या जीवनातील #राजकीय, #सामाजिक आणि वैयक्तिक संघर्ष अत्यंत प्रभावीपणे उभे केले आहेत.
कादंबरीत यशवंतरावांचे स्वराज्यावरील प्रेम, पेशव्यांप्रती निष्ठा, आणि माळव्याच्या सुबेदारपदासाठी केलेली #झुंज यांचे वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांच्या आयुष्यातील एक चुकीचा निर्णय — पेशव्यांकडून अपेक्षित मान्यता न मिळाल्यामुळे त्यांना झालेली मानसिक वेदना — हे पुस्तकाचे भावनिक केंद्रबिंदू ठरते.
इनामदारांची लेखनशैली ओघवती, समृद्ध आणि चित्रदर्शी आहे. त्यांनी ऐतिहासिक घटनांना काल्पनिक रंग देऊन वाचकाला त्या काळात नेले आहे. त्यांनी यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे उभे केले आहे. त्यांच्या धैर्य, निष्ठा आणि दु:ख यांचे संतुलित चित्रण झाले आहे. त्यामूळे कादंबरी वाचताना वाचकाला यशवंतरावांच्या वेदना आणि संघर्षांची जाणीव होते, जे लेखकाच्या लेखनकौशल्याचे प्रमाण आहे.
**मुख्य घटना:**
1. #तुकोजीराव_होळकर यांचे निधन यशवंतराव हे तुकोजी होळकरांचे अनौरस पुत्र होते. तुकोजीरावांच्या निधनानंतर सुभेदारीच्या वारसासाठी संघर्ष सुरू होतो.
2. सत्तेचा संघर्ष आणि राजकीय चढाओढ यशवंतरावांनी होळकर घराण्यातील सत्तेसाठी झुंज दिली. पेशव्यांच्या विरोधात उभे राहत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
3. पुणे शहरावर हल्ला यशवंतरावांनी पुण्यावर हल्ला करून पेशव्यांना धडा शिकवला. ही घटना त्यांच्या धैर्याचे आणि राजकीय दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
4. स्वराज्याची स्थापना आणि लढाया त्यांनी स्वतःचे राज्य स्थापन करून अनेक लढाया केल्या. इंग्रजांविरुद्धही त्यांनी लढा दिला, ज्यामुळे त्यांना "पुणे जाळणारा सरदार" म्हणून ओळखले जाऊ लागले.
5. राजकीय एकाकीपणा आणि अंत अखेरीस यशवंतरावांना राजकीय एकाकीपणा आणि मानसिक वेदना यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनाचा शेवट दु:खद असतो.
ही कादंबरी #इतिहासप्रेमी, मराठी साहित्याचे अभ्यासक, आणि संघर्षमय जीवनकथांमध्ये रुची असणाऱ्या वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. #झुंज ही केवळ एका योद्ध्याची कथा नाही, तर ती एका युगाची झलक आहे.