शिवाजी महाराज खरे कोण होते? आणि आधुनिक लोकशाहीच्या काळात सुद्धा त्यांच्या विषयी लोकांत आदर का आहे? याचे विवरण प्रस्तुत पुस्तकात लेखकाने प्रभावी पणे केले आहे. लेखकाचे विचार अती डावे असल्याने, त्यांचा अती उजव्या लोकांबरोबर संघर्ष होणे साहजिकच आहे. शिवाजी महाराजांची केवळ व्यक्तिपूजा न करता त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे असा लेखकाचा आग्रह आहे.