Jump to ratings and reviews
Rate this book

Dhag

Rate this book
कादंबरीकार म्हणून उद्धव ज. शेळके यांना उदंड कीर्ती मिळवून देणारी ‘धग’ ही कादंबरी आहे एका शिंपिणीची कहाणी. परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा.
‘कौतिक’ ही एक सामान्य स्त्री, पण तिची झुंज असामान्य आहे. परिस्थितीपुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी ऊरफोड करणारा माणूस, हाच ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे.
ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे. तिच्यातील बोली वऱ्हांडी आहे. प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात, तर प्रादेशिकता हे वास्तववादाचे विस्तृतीकरण असल्यामुळे ते साहित्यिक होऊ शकत नाही, अशीही बाजू मांडली जाते. प्रादेशिकता हे मूल्य होऊ शकत नाही. साहित्यिक तर नाहीच नाही. पण त्या प्रकारची कृती मात्र श्रेष्ठ साहित्यकृती निःसंशय ठरू शकते. बोलीभाषेतील ही कृती अभ्यासताना बुजरेपणा आणि अनास्था ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर ‘धग’ वाचतांना अडचण पडत नाही. शब्द स्वतःचा अर्थ सांगत जातात. वाट सापडत राहते आणि कौतिकचा हा असामान्य लढा मनाला जाऊन भिडतो.
‘धग’ची शैली साधी आहे. निरलंकृत आहे. नीरगांठ, सूरगांठ व शेवटी उकल करण्यासाठी हेतूतः राखून ठेवलेली क्षणरहस्ये, ती जपण्यासाठी योगायोगांचा फाफटपसारा असे इथे काही नाही. उत्कटता हा तिचा हृद्य विशेष आहे. कठोर वास्तवदर्शन हा तिचा हेतू आहे आणि म्हणून चाकोरीतल्या कादंबऱ्याहून वेगळी पडणारी ‘धग’ रसरशीत उतरलेली आहे.

Kindle Edition

7 people are currently reading
68 people want to read

About the author

Uddhav J. Shelke

6 books3 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
14 (50%)
4 stars
8 (28%)
3 stars
5 (17%)
2 stars
0 (0%)
1 star
1 (3%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for Aniket Patil.
525 reviews23 followers
May 12, 2018
I found this book okay. read it as it is considered as classic in Marathi literature. Its about extension of realism and probably existentialism. language is varhadi , I like this language ,gives flavour of vidharbh. The scenario and different instances occured in a way which makes you feel down, however,having read multiple such stories (with variations) and studied different social issues , I found this one okay. It must have been fantastic book at the time of its publishing.
Profile Image for Dipti  Bhagat .
7 reviews
October 19, 2023
या कादंबरीतले संवाद अस्सल ’वर्‍हाडी’ बाजेत असल्याने माझ्या सारख्या पुणेरी प्रमाणभाषिकाला पहिल्यांदा समजायला जरा अवघड वाटते... पण नंतर वऱ्हाडी भाषेचा लहेजा सहज समजू लगतो... त्याही नंतर आवडू लागतो... भाषेचे माधुर्य आणि रांगडेपणा एकत्र मिळून वाचकावर प्रभाव पाडतात अन् अगदी शेवटपर्यंत खिळवूनही ठेवतात.

तर धग हि कथा आहे एका स्त्रीची. कौतिकची...
हि कौतिक खेड्यात वाढलेल्या अगदी सामान्य चारचौघी बाईसारखीच. आपल्या संसारात कशाची कमी भासू नये म्हणून वाट्टेल त्या थराला जाऊन राब राब राबणारी. आपल्या मुलाबाळांना, नवऱ्याला पुऱ्या घराला एकत्र बांधून ठेवायची धडपड करणारी.
आपल्या लेकरांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी धडपडणारी. आपला मुलगा चुकला माकला तर हळहळते. त्याला गोडीगुलाबीने सरळमार्गावर आणण्याचा प्रयत्न करते. तरी एक टप्प्यावर त्याचा गुन्हा पोटात न घेता त्याच्याशी संबंध तोडायलाही मागेपुढे न पाहणारी ही नायिका म्हणजे कौतिक.

आपल्या नवऱ्याला सातत्याने बळ देणारी बायको,
मुलाबाळांना योग्य मार्ग दाखवणारी आई, शेजारधर्माला जागणारी शेजारीण , धडाडीने काम करु बघणारी शेतमजूर अशी एक ना अनेक रुप आपल्याला कौतिकच्या रुपात आपल्या आजुबाजूला गावखेड्यात आजही बघायला मिळतात..
This entire review has been hidden because of spoilers.
Displaying 1 - 2 of 2 reviews