WHAT IS HUMAN LIFE? IT IS A UNION OF THREE BEAUTIFUL FEELINGS. THE FIRST IS OUR OWN HAPPINESS AND PROGRESS. THE SECOND FELLING IS TOWARDS OUR FAMILY, THE OBLIGATIONS, THE INDEBTNESS. ONE HAS TO TRY TO REPAY IT TO THE BEST OF HIS/HER ABILITY. THE THIRD IS THE UNSEEN FLOW, TO HELP THE SOCIETY PROGRESS, THE SOCIETY OF WHICH WE ARE MEMBERS. ONES LIFE CAN BE SAID FULFILLED ONLY WHEN THE INDEBTEDNESS OF OURSELVES, THAT OF THE FAMILY AND OF THE SOCIETY IS SATISFIED AT THE SAME TIME. IF THERE IS NO CONFLICT BETWEEN THESE THREE THEN WE CAN SAY THAT THE PERSON IS SUCCESSFUL IN HIS LIFE. V. S. KHANDEKAR`S BOOK REVEALS THESE SECRETS OF HUMAN LIFE IN HIS NOVEL. THERE ARE MANY CHARACTERS IN THIS NOVEL OF THEM, ANAND BELIEVES ONLY IN SACRIFICE, THE TRADITIONAL BELIEF; APPA AND BHAYYA ARE THOSE INCOMPETENT PEOPLE WHO SHADE OFF THEIR RESPONSIBLITIES AND JUSTIFY THEMSELVES BY MAKING A SINGLE PERSON SHOULDER IT. MANIK IS HOPELESS, LITERATE GIRL BUT HAS ALWAYS FAILED IN RECOGNISING A GOOD MIND, USHA IS YET ANOTHER CHARACTER WHO HAS BEEN ALOOF, NEVER EXPRESSING FEELINGS, GOOD OR BAD. WHAT ARE THESE CHARACTERS EILLING US? THEY TELL US THAT FOLLOWING THE CUSTOMS AND TRADITIONS BLINDLESSLY IS HARMFUL NOT ONLY TO THE PERSON FOLLOWING THEM BUT ALSO TO THE SOCIETY AT LARGE. IT WAS IN 1939 THAT THE AUTHOR STATED HIS VIEWS AS FOLLOWS, "WHEN WE TALK ABOUT THE VALUES IN A MAN`S LIFE THEN SACRIFICE IS ALWAY HIGHLY REGARDED THAN ENDURING. BUT THE SACRIFICE SHOULD ALWAYS BE FOR A NOBLE CAUSE.` DO NOT YOU THINK THAT THIS VIEW IS TRUE EVEN TODAY?
In 1920, Khandekar started working as a school teacher in a small town.He worked in that school until 1938.While working as a teacher,Khandekar produced in his spare time abundant Marathi literature in various forms. In his lifetime, he wrote sixteen novels, six plays, around 250 short stories, 50 allegorical stories, 100 essays, and over 200 critiques.
मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ॠण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती. व्यक्तिगत ॠण आणि समाजॠण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी 'सुखाचा शोध' या कादंबरीतून मांडले आहेत. "त्यागातच सुख असते" ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा 'आनंद', एकावरच संसाराचे ओझे लादणारी 'अप्पा आणि भय्या' ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित 'माणिक' आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली 'उषा'. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, "परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते. मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये." १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे.
१९३९ मध्ये जी कल्पना केली ती आजपण तंतोतंत लागू पडते यातच या कादंबरीचा लौकिक सिद्ध होतो. अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत खिळवून ठेवणारी आनंदाची ही कथा आजपण घराघरांत पाहायला मिळते. काहीच आनंद त्यांच्या जीवनात उषेच्या अस्तित्वाबद्दल सुदैवी असतात. कुटुंब आणि समाजकारणापेक्षा स्वतः साठी वेळ काढणे किती महत्त्वाचे आहे हे या कथेतून शिकायला मिळते.
As one reads it, one wonders why one hasn't read more of this author. Answer comes without looking for it.
He finds easy solutions in his prejudices, cheating himself and his readers of deeper, complex realities.
In his introduction he justifies the portrait of the social working educated woman who's despised normal life when young, and married later without any concept of love. That justification goes on and on, perhaps because he was aware of how one sided, unfair it is, even if it may have been based in observation.
The book was written for a film, eight or so decades ago, and perhaps prejudices like his still prevail, despite education of women being not only norm but just another of the several requirements, tacked on to all of the others. Exceptions usually are about daughters vs other women, but not always.
And sometimes, it's hatred of the woman who's no less. *****
प्रास्ताविक
" ... ही कथा मुळात मी जी कल्पिली ती केवळ चित्रपटाकरिता! ‘देवता’ चित्रपटाबरोबर त्याची कादंबरी प्रकाशित होऊन ती लोकप्रिय झाल्यामुळे त्याच्या पाठोपाठ निघणाऱ्या या चित्रपटाचीही कादंबरी मी लिहावी अशी कल्पना पुढे आली. नेहमीप्रमाणे घाईतच– फार फार तर बारा-तेरा दिवसांत असेल– मी हे कादंबरीलेखन संपविले आणि ‘सुखाचा शोध’ या चित्रपटाच्या पाठोपाठ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यामुळे स्वतंत्र कादंबरी या दृष्टीने तिचा आणखी किती व कसा विकास होऊ शकतो हा विचार त्या वेळी माझ्या मनाला शिवलासुद्धा नाही. किंबहुना या कथेचा विषय बरेच दिवस माझ्या मनात घोळत असूनही मी माझ्या संकिल्पत कादंबऱ्यांत त्याची कधीच गणना केली नव्हती.
"मध्यम वर्गातल्या स्त्रीचे दास्य आणि दु:ख दिग्दर्शित करणारा माझा ‘देवता’ बोलपट चित्रित होऊ लागला तेव्हा माझ्या मनाच्या अजबखान्यात कुठे तरी पडून राहिलेला हा विषय पुन: पुन्हा डोके वर काढू लागला. मी स्वत:शीच विचार करू लागलो.. कलावंतांचे मोठेपण जीवनाच्या सर्व बाजू सहृदयतेने चित्रित करण्याच्या कौशल्यात आहे. कलावंत हा नुसता चतुर वकील नाही, तो प्रामाणिक तत्त्वशोधक आहे. तो एकांगी प्रचारक नाही; सर्वस्पर्शी सत्यपूजक आहे. ‘Doll's House’ मध्ये ‘पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीकरिता जो त्याग करू शकत नाही, तो लाखो बायकांनी आतापर्यंत आपल्या प्रिय पुरुषांकरता केला आहे’ असे नवऱ्याला बजावून घरातून निघून जाणारी नोरा चित्रित करणाऱ्या इब्सेननेच 'Lady from the Sea' मध्ये केवळ स्वप्नाळू स्मृतीमुळे रम्य वाटणाऱ्या पूर्वजीवनाकडे धाव घेणाऱ्या नायिकेचा भ्रमनिरास रंगवून आपले हरपलेले सुख आपल्या घरातच आहे हा साक्षात्कार तिला घडविला नाही काय? ...
" ... दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे दुसरे अधिवेशन जमखंडी येथे १९४० साली माझ्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संमेलनातल्या एका चर्चेत कै.आनंदीबाई किर्लोस्कर, सौ.मालतीबाई दांडेकर प्रभृती स्त्रियांनी ‘माणिक’च्या स्वभावचित्रचा उल्लेख करून वाङ्मयात सुशिक्षित स्त्रीला अन्याय होत आहे अशी तक्रारही मांडली होती. ... "
" ... चित्रपटात कृत्रिम नाट्याची (Melodrama) फार जरुरी असते, अशी आपल्याकडे निर्मात्यांची समजूत असल्यामुळे चित्रपटातल्या कथेत माणिक आत्महत्या करते असे दाखविले होते. पण कथेचा हा शेवट केवळ कलेच्याच नव्हे तर जीवनाच्याही दृष्टीने अस्वाभाविक होता. म्हणून कादंबरी लिहिताना मी माझ्या मूळच्या कल्पनेप्रमाणे माणिक रंगविली. या माणिकच्या डोळ्यांत चांगले चरचरीत अंजन पडलेले असते. पश्चात्तप्त मन:स्थितीत ती आत्मपरीक्षणाला उद्युक्त होते. ते करताना तिला पूर्णपणे कळून चुकते की, संसारातले सुख काव्याची थट्टा करण्यात नाही; आपल्या त्यागाने दुसऱ्याच्या जीवनात काव्य निर्माण करण्यात आहे. अंतर्मुख झाल्याबरोबर तिचा आत्मवंचक अहंकार गळून पडतो. तिच्या दृष्टीपुढले धुके पूर्णपणे लोप पावते. आता तिला पटते की, समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे. ज्याला आपल्या घरावर प्रेम करता येत नाही, आपल्या माणसावर प्रेम करता येत नाही, त्याला समाजावरही प्रेम करता येणार नाही. अशी जाणीव झालेल्या माणिकचे पुढचे जीवन रंगविण्याची इच्छा गेली सात वर्षे माझ्या मनात वारंवार उद्भवली आहे. या नव्या माणिकची आनंदाची पत्नी झालेल्या उषेशी ज्या नाट्यपूर्ण घटनेमुळे पुन्हा गाठ पडते, तो प्रसंग माझ्या मनाच्या फलकावर कल्पनेच्या कुंचल्यामुळे मी अनेकवार रंगविला आहे.
"पण...
"आंब्याला येणाऱ्या साऱ्या मोहराची फळे होतातच असे नाही. लेखकाच्या मनात नृत्य करणाऱ्या अगणित कल्पनांचेही तसेच आहे." ********
आप्पा
"पिकते तिथे विकत नाही म्हणतात, ते काही खोटे नाही.
"माझी गेल्या नऊ वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत-व्याख्यानमालांची सोळा आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव-बुद्रुक, पिंपळगाव-खुर्द, कडबोडे, वसाड, फुरसुंगी, मोडलिंब... छे! साऱ्या गावांची नावेसुद्धा लक्षात राहत नाहीत!
"या सोळा व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहानसहान काम आहे? सोळा विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’, ‘चरखा? छे, सुदर्शन!’, ‘केल्याने होत आहे रे’, ‘देव तेथेचि जाणावा’, हे चार मथळे कागदावर टिपले न् टिपले तोच...
"माझी किंमत आमच्या घराला कळतीय् कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाजसेवकाला निवांतपणा हवा असतो, हे या घरात कुणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिऱ्याची शाई घेऊन बसावे, टिळक-गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे नि अगदी त्याच क्षणी आईने दारात येऊन म्हणावे, ‘आप्पा, माझा उपास आहे आज; जरा केळी घेऊन येतोस का?’
"असा राग येतो अशा वेळी!
"पण...
"जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे? मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते. परत येऊन कामाल��� बसावे, तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते! तासतासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो, याची आईला कुठून कल्पना असणार? तिने उपास करावेत, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे!"
"गेली नऊ वर्षे मी स्वत:चा संसार सोडून समाजाचा संसार केला, इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली, आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा ‘माझी मातृभूमी तुझ्याहूनही आजारी आहे’ असे तिला राखठोक उत्तर दिले! ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यानसुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातला प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युनिसिपालटीतच काय, कौन्सिलातसुद्धा आप्पाराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्रने साठ हजार वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही. पण या आप्पाराव देशपांड्याने अवघ्या नऊ वर्षांत..." *****
आनंद
"आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला या आनंदात ती दिवस काढीत होती! पण तो यापुढे नोकरी करून चार पैसे मिळवील असे काही लक्षण दिसेना."
"आप्पा दोन-तीन दिवसांनी निघून गेला. यापुढे प्रपंच कसा चालायचा, माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पडायचे, कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो!
"त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यांत आसवे उभी राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्फुंदूनस्फुंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू... ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी!
"धर्मराजाचे का कुणाचे रक्त जमिनीवर पडले तर मोठा हाहा:कार होईल म्हणून फार जपत असत, अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती, तिची आठवण झाली मला. आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते. हाताने ते पुशीत मी म्हटले, ‘असं काय करावं आई?’
"झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे धैर्य समूळ नाहीसे झाले होते. वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्हवीत आली होती. तिचे हात दमून गेले होते. आता आप्पा आपली जागा घेईल, आयुष्यातल्या शेवटच्या चार घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहात निवांत बसता येईल, अशी आशा तिने उराशी बाळगली होती! त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले असावे.
"मी मनात निश्चय केला– आईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे! मग माझ्या आयुष्याचे काहीही होवो! आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला... ठीक आहे. मी आईची सेवा करणार, तिला सुख होईल अशाच मार्गाने जाणार."
"रत्नागिरीचे काम दोन दिवसांत संपले. लगेच मालवणला गेलो. मोठे सुंदर गाव आहे ते! मागे ज्यांना भेटलो होतो अशी तीन-चार कुळे तिथे मिळाली नि सृष्टिसौंदर्याचा आनंदही पदरात पडला. तिथून निघायच्या दिवशी संध्याकाळी किनाऱ्यावर कितीतरी वेळ फिरलो मी! एका बाजूला माडाची झाडे, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटा! मोठा सुंदर देखावा होता तो! नि संध्याकाळची शोभा तर..." *****
उषा
"मला वाटले... देवाने मला पाखरांच्या जन्माला का घातले नाही? देवाने मला खारीचा जन्म का दिला नाही!
"किती तरी वेळ मी तशी बसले होते. रस्त्याने जाणाऱ्या गुरांच्या पावलांचा आवाज कानांवर पडला, तेव्हा मी डोळे उघडले. हडकुळ्या गार्इंचा एक मोठा तांडा होता तो!
"मी पुढे जाऊन त्या गाई हाकणाराला विचारले,
"‘कुठं चालल्यात या गाई?’
"‘म्हापशाला!’
"‘म्हापशाला? गोव्यात?’
"‘हं!’
"‘कशाला?’
"तो चिडून उत्तरला, ‘मरायला!’
"मला आठवले– दर आठवड्याला म्हापशाच्या खाटिकखान्याकरिता घाटावरून गुरे येतात!
"मी मनात म्हटले... या गार्इंना कुठे जगायचा अधिकार आहे? मग आपणच जगण्याची धडपड करण्यात काय अर्थ आहे? जे काम आज करता येण्यासारखे असेल ते उद्यावर ढकलू नये, असे मी शाळेत शिकले होते. मरणाइतके चांगले काम जगात दुसरे कुठलेच नाही, असे मला वाटू लागले. मी मालवणच्या वाटेने चालू लागले." *****
आनंद
"मी उषेला घेऊन दारात पाऊल टाकले मात्र! धावत पुढे आलेला बाळ ओरडला...
"‘आजी, आजी, आनंदकाका आले. बायकोला घेऊन आनंदकाका आले!’"
"उषा माझ्या आयुष्यात येताच या प्रवाहाचे तुषार घेऊन येणाऱ्या वायुलहरी माझ्या भोवताली स्वैरपणाने नाचू लागल्या.
"काही केल्या मन पूर्वीसारखे स्थिर होईना. त्याचा तरी काय अपराध होता? आईसाठी आणि कुटुंबासाठी नऊ वर्षे मी त्याला तुरुंगात ठेवले होते. काम... नुसते काम... एकसारखे काम! दुसऱ्या गोष्टीची आठवणच करायची नाही अशी कडक शिस्त लावली होती मी मनाला! कॉलेजमध्ये असताना मला गाणे फार आवडे. टेनिस खेळावेसे वाटे. कविता करण्याचीही अधून मधून हुक्की येई. पण ज्या दिवशी मी विमाएजंट झालो त्या दिवशी जगातल्या काव्याचा आणि जीवनातल्या क्रीडेचा मी निरोप घेतला. काही माणसे देशासाठी तुरुंगात जातात! आपण कुटुंबासाठी तुरुंगात असल्यासारखे जीवन कंठायचे असे मी मनाशी ठरविले." *****
उषा
"माझे आनंद मुंबईला गेले आहेत. पुस्तके घेऊन अभ्यासाला बसले तरी मनात येते– आनंद यावेळी मुंबईत काय करत असतील? त्यांना उषेची आठवण होत असेल का? त्यांना काकडीचा कायरस फार आवडतो. ते ज्यांच्याकडे उतरले असतील तिथल्या बायकामाणसांच्या ध्यानात हे राहत असेल का? त्यांना फुलेसुद्धा फार आवडतात. पण बागेत कितीही फुले फुलली तरी ते आपल्या हाताने त्यांतले एक सुद्धा तोडून घेणार नाहीत! आज रात्री उशीवर फुले दिसली नाहीत की त्यांना उषेची आठवण होईल. नि मग...
"पाखरांसारखे फुलांना जर उडता येत असते, तर बागेतल्या साऱ्या फुलांना मी मुंबईला जायला सांगितले असते."
"आप्पांनी पुढे लिहिले होते...
"‘आता एक आनंदाची बातमी! आनंदाची बातमी कसली? आनंदाच्या बायकोलाच घेऊन येतोय् मी! मुलीचं नाव माणिक! चांगली बी.ए. आहे. सहा-सात वर्षे मास्तरीण होती. सभांत कशी फडाफड बोलते. समाजसेवेची फार हौस आहे तिला!’" *****
आनंद
"माणिक!
"सारे जग माणिकमय झाले आहे असे लाजाहोमाच्या वेळी मला वाटले.
"लग्नविधी संपता संपता उपाध्याय म्हणाले, ‘आता नक्षत्रदर्शनाला बाहेर चलायचं!’
"माणिककडे पाहून हसत हसत मी पुटपुटलो, ‘नक्षत्र पहायला बाहेर कशाला जायला हवं? आपण नाही बुवा हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणार!’
"माणिकने मान मुरडून माझ्या या विनोदाचा निषेध केला." ***
"जगाच्या दृष्टीने आईचे सोने झाले. पण मला मात्र घरात अंधार पसरलेला दिसू लागला. त्या अंधारात एकच तारका डोळ्यांना दिसे... उषा. पण तिच्यावर माझा काय हक्क होता?
"आणि जिच्यावर माझा हक्क होता त्या माणिकला माझ्या हृदयाला केवढी जखम झाली आहे याची कल्पनाच नव्हती. आज पदवीधर स्त्रियांचे संमेलन आहे, उद्या भगिनीवर्गात चर्चा आहे, परवा शिशुसप्ताहात व्याख्यान आहे म्हणून ती घराबाहेर जात होती. माझ्या पिचणाऱ्या मनाला तिच्याकडून शब्दांचासुद्धा ओलावा मिळाला नाही. मी माझ्या खोलीत येरझारा घालून कसा तरी वेळ काढीत होतो.
"कविता म्हणता म्हणता मिरा ‘स्वामी तिन्ही जगांचा! आईविना भिकारी’ या ओळी म्हणू लागली की एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझ्या डोळ्यांत पाणी उभे राही.
"मृत्यूपुढे मनुष्य लहा��� होतो हेच खरे! बाळने मला मिठी मारून ‘काका, आजी कुठं हो गेली?’ म्हणून विचारले की घट्ट मिठी मारून आपणही त्याला तोच प्रश्न विचारावा असे क्षणभर माझ्या मनात येई. बाळमनाची समजूत घालण्याकरिता ‘आजी देवाघरी गेली’ असे मी सांगितले की बाळ प्रश्न करी, ‘तिथं तिचे पाय कोण हो रगडील?’
"त्याचे असले प्रश्न ऐकले नि उषेचे मूक प्रेम पाहिले की माणिकच्या वागणुकीचा मला संताप येई. आईचा मृत्यू ही तिच्या दृष्टीने जगरहाटीतली एक साधी गोष्ट होती!
"माणिकचे मन देवाने कशाचे घडविले हेच मला कळेना. जे माणूस आपल्या मनातले सुखाचे चांदणे फुलवीत नाही, दु:खांचा अंधार उजळीत नाही, त्या माणसाला मी आपल्या आयुष्याचा भागीदार केले होते!
"अशा वेळी वाटे... माणिकने माझ्याशी लग्न केले तरी कशाला? थोरल्या बहिणीच्या घरी तिच्यावर अवलंबून राहून जन्म काढण्यापेक्षा आपले हक्काचे घर असावे, एवढाच तिचा लग्न करण्यातला हेतू होता की काय? पदवीधर झाल्यावर माणिकने तीन-चार वर्षे शिक्षिकेचे काम केले, समाजसेवेत भाग घेतला. या निमित्तानेच तर तिची नि आप्पाची ओळख झाली होती. मग ही सारी उच्च ध्येये सोडून तिने उशीरा लग्न केले ते कशासाठी? तिच्या माझ्याविषयीच्या उदासीनतेचा उगम कशात आहे? तिचा प्रेमभंग झाला असेल का? आणि त्या दु:खाचा विसर पडावा म्हणून तर तिने हे लग्न केले नसेल ना?
"ऐन विशीत काल्पनिक ध्येयामागे धावून, तिशीत मिळेल त्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालणाऱ्या... एखाद्या गरीब अबलेची सवत होण्यांतसुद्धा आनंद मानणाऱ्या... तीन-चार सुप्रसिद्ध सुशिक्षित स्त्रियांची मला आठवण झाली!" *****
"माझा हात घट्ट धरून त्यांनी मला प्रश्न केला, ‘कुठं चाललीस?’
"ते आनंदच होते.
"मी शांतपणे उत्तर दिले, ‘कुठंही, या घराच्या बाहेर कुठंही!’
"‘या घरात तुझं कुणीच नाही?’
"मी हसून म्हणाले, ‘आहे ना! ते सुखी व्हावं म्हणूनच मी हे घर सोडून जात आहे!’
"‘तुझ्यावाचून ते माणूस सुखी होईल?’
"माझे मन म्हणत होते... ‘आनंद, आनंद, कशाला हा प्रश्न विचारलात मला?’
"माझ्या जिभेने उत्तर दिले, ‘सुख दोनच माणसांच्या जगात असतं. या घरात माझं जे कुणी तरी आहे, त्याला आपलं माणूस मिळालं आहे. त्या दोघांमध्ये येऊन त्याला दु:खी करण्यापेक्षा...’
"बोर्डिंगातल्या एकांतात क्षणोक्षणी आर्इंचे ते शब्द मला आठवू लागले... ‘उषा, माझ्या आनंदला सांभाळ हं!’
"राहून राहून माझ्या मनात येई... आर्इंच्या या शब्दांचा काय बरे अर्थ असेल?
"माणिकताई आनंदांचा संसार सुखाचा करणार नाहीत. आनंद दु:खी होतील. दु:खाने माणसाच्या मनाचा तोल जातो. आनंदांचा असा तोल गेला तर उषेने त्यांना सावरावे, असा आर्इंच्या त्या शब्दांचा अर्थ होता काय?"
"घरी गेले तो आजाराची शंका खरी ठरली. आनंद आजारी नव्हते. पण आदल्या दिवशी बाळला खूप ताप आला होता. बोर्डिंगात राहायला गेल्यापासून आनंद दिवसभर विम्याच्या कामाकरिता बाहेरच असत. बाळला ताप आला आहे हे ठाऊक असूनसुद्धा माणिकताई बाहेर गेल्या. आनंद घरी परत आले तेव्हा ताप एकशेचारपर्यंत चढून बाळ बेशुद्ध झाला होता. मिरा त्याच्यापाशी रडत बसली होती. माणिकताई परत आल्यावर आनंद त्यांना खूप खूप बोलले! त्यांनीही रागाने त्यांना उलट उत्तरे दिली."
"बाळचा ताप मलेरियाचाच होता. संध्याकाळी तो कमी झाला. ताप निघाल्यावर त्याने आनंदांना मिठी मारली. तेव्हा ते म्हणाले, ‘उद्यापासून तुला नि मिराला बोर्डिंगातच ठेवू या!’
"माझ्याबरोबर बोर्डिंगात राहायला मिळणार म्हणून बाळ आनंदाने टाळ्या पिटू लागला. मिरालाही खूप आनंद झाला. पण ती लगेच आनंदांच्याकडे वळून म्हणाली, ‘काका, तुम्ही एकटेच राहणार घरी?’
"त्यांनी हसत उत्तर दिले, ‘मलाही बोर्डिंगात ठेवून घेतात का पाहू या!’" *****
चंचला
" ... ‘माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या बंगल्यावर येत चला’, असे सांगितल्याबरोबर त्या दोघांची जी त्रोधा झाली... त्या संस्थानिकाला आपली म्हातारी आई आठवली... त्या शेठाला जातीची भीती वाटली! म्हणे ‘मोटार माग, जडजवाहीर माग, दुसरं काही माग. पण लग्नाची गोष्ट तेवढी काढू नकोस!’
"श्रीमंत नंदीबैलाची बायको होण्याइतकी चंचला काही दूधखुळी नाही म्हणावे." *****
आप्पा
"संमेलन लवकर करावे असे मी सुचविले तेव्हा एक गृहस्थ म्हणाले, ‘तुमच्या मातु:श्री नुकत्याच कैलासवासी झाल्यात. तेव्हा...’
"या म्हाताऱ्या माणसांना केव्हा मरायचे हे सुद्धा कळत नाही. चार महिन्यांपूर्वीच आईने आपले प्रस्थान ठेवले असते तर काय बिघडले असते? नाही तर आणखी चार महिने जगायचे होते! नको कोण म्हणत होते? पण आमच्या आईच्या अंगी एवढा पोच होता कुठे?
"आई बोलूनचालून अशिक्षित. तिला काय बोल लावायचा? पण हा आनंद... आता लवकरच एल.एल.बी. होऊन वकिली करायला लागेल. त्याला तरी आपला थोरला भाऊ किती मोठा झाला आहे, याचा पत्ता कुठे आहे? ज्या दिवशी वर्तमानपत्रात आप्पाराव देशपांडे स्वागताध्यक्ष होणार असे छापून आले त्या दिवशी तो थंडपणाने मला म्हणाला,
"‘आप्पा, हे वाचून फार आनंद झाला मला!’
"म्हणे आनंद झाला मला! त्याने आनंदाने नाचायला हवे होते, वेडे व्हायला हवे होते. मी त्याला म्हटले, ‘बच्चा आहेस तू अजून! तुझा आप्पा ही केवढी मोठी विभूति झाली आहे याची कल्पना नाही तुला. उद्या त्याचा पुतळा होईल, त्याचं चरित्र लिहिलं जाईल...’" *****
आनंद
"माणिकच्या मत्सरामुळे उषा बोर्डिंगात गेली, माणिकच्या बेजबाबदारपणामुळे बाळ आणि मिरा यांना बोर्डिंगात ठेवावे लागले. लहानसहान गोष्टीवरून वितंडवाद घालण्याच्या तिच्या सवयीमुळे घरात गोड शब्दालासुद्धा मी पारखा झालो. तिने त्या धनंजयाशी मोकळेपणाने वागावे नि माझ्याशी मात्र तुटकपणाचे वर्तन करावे याचे राहून राहून मला दु:ख होऊ लागले. चंचलेविषयी माझ्या मनात उत्पन्न झालेला मोह... अनेक दिवस उपाशी ठेवलेल्या मनुष्याने केलेली चोरी होती ती!
"भुकेची वेळ झाली म्हणजे लहान मूल जसे रडू लागते, तशी माझ्या मनाची स्थिती झाली होती." *****
चंचला
"त्या शेठ-संस्थानिकांना शह देण्याकरिता चातुर्याची शिकस्त करून मी आनंदला पकडलं. त्याचा पुरा नक्षा उतरविण्याकरिता आज मी धनंजयाला जवळ केले आहे. चार महिन्यांनी अमेरिकेत गेल्यावर हा धनंजयही मागे पडेल." *****
आनंद
"इतके दिवस आयुष्य ही एका व्यक्तीची लढाई मानीत होतो मी!
"ती साऱ्या समाजाची लढाई आहे हे आज मला पटले. हा विचार मनात आला तेव्हा कुठे माझा डोळा लागला.
"दुसरे दिवशी मी या लोकांत काम करायला सुरुवात केली. लगेच माझ्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली... वकील म्हणून माझा या लोकांना पुष्कळ उपयोग होण्यासारखा होता. सामाजिक क्रांतीचे काम माझ्यासारख्या लक्षवधी लोकांचे आहे. त्याला हातभार लावता लावता गोरगरिबांना मदत करणे आणि त्यांची दु:खे हलकी करणे प्रत्येक धंद्यातल्या मनुष्याला शक्य आहे. शिक्षकाला त्यांना शिकविता येईल, डॉक्टराला त्यांना औषधे देता येतील, व्यापाऱ्याला कमी नफा घेऊन त्यांना माल देता येईल, वकिलाला त्यांची भांडणे मिटविता येतील..." *****
चंचला
"माझ्या डोळ्यांपुढे एकच प्रश्न नाचत होता, आनंदाचा सूड कसा घ्यायचा?
"तीन-साडेतीन महिन्यांनी धनंजयाने ती संधी मला आणून दिली. तो वेडपट भय्या माणिकचे एक पत्र घेऊन त्याच्याकडे आला. धनंजयाने त्या पत्राला तोंडीच उत्तर दिले, ‘जगात तत्काळ जीव घेणारी पुष्कळ औषधे असतात असे माणिकला सांग!’" *****
उषा
"उषेने आनंदांना सोडून जायचे? आनंदांच्यापासून दूर राहून उषा सुखी होईल? जगात कुठेही तिला सेवा करता येईल! पण प्रेम? आता आनंदांशिवाय दुसऱ्या कुणावर ती कशी प्रेम करू शकेल?" *****
आप्पा
"मी अगदी गोंधळून गेलो. पहिल्यांदा ही बातमी खरीसुद्धा वाटेना मला. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. तरी बँकेच्या मॅनेजराकडे गेलो. ‘धनंजयानं संमेलनाच्या खात्याची सर्व रक्कम बँकेतून काल काढली’, हे त्यानेही सांगितले." *****
माणिक
"आक्काच्या अकारण मत्सराने मी मनात जळत होतेच. या आगीत तेल ओतले ते वर्तमानपत्रातल्या एका बातमीने! शाळेत असताना ज्यांचे आयुष्य मी आदर्श म्हणून माझ्या डोळ्यांपुढे ठेवले होते त्या हेडमास्तरीणबार्इंनी चाळीसाव्या वर्षी लग्न केले होते; नि तेही ज्याला पहिली बायको व तिच्यापासून झालेली चार मुले होती अशा एका मनुष्याबरोबर!
"त्या बातमीने मला अगदी बेचैन केले. याच वेळी आप्पा मला भेटले, त्यांनी माझ्यापाशी लग्नाची गोष्ट काढली आणि तुम्हाला पाहताच मी लग्नाला होकार दिला.
"मी लग्न केले ते मला हक्काचे घर असावे, सुखाने जगता यावे, मालकीण या नात्याने अधिकार गाजवायला मिळावा म्हणून! आनंद, रागावू नका. विमा-एजंटाशी लग्न करण्यात मी त्याच्यावर फार मोठे उपकार करीत आहे, अशा धुंदीत मी लग्नाला उभी राहिले."
"आनंद, तुमच्यापाशी दुसरे काही मागत नाही मी! एकच गोष्ट... उषेला मुलगी होईल, तेव्हा तिचे नाव माणिक ठेवाल का?
"मला मुलगा झाला तर त्याचे नाव मी ठेवणार आहे, आहे का ठाऊक?... आनंद.
"तुम्ही म्हणाल... मुलगी झाली तर?
"तिचेही नाव माझ्यापाशी तयार आहे... उषा." ................................................................................................ ................................................................................................
सुखाचा शोध ही खांडेकरांनी १९३९ साली लिहिलेली एक वेगळ्या विषयावरची कादंबरी. कदाचित हा विषय मांडताना तत्कालीन परिस्थिती मध्ये क्रांतिकारी विचार वाटू शकला असावा. स्त्रियांच्या भावना आणि दुःख यांचे विवेचन लेखकाला आणि वाचकाला नेहमीच भावते पण पुरुषांच्या भावना , त्यांची मनातून चाललेली घालमेल , स्वतःशी आणि समाजाच्या नियमांशी असलेली लढाई या सारख्या कितीतरी गोष्टींना या पुस्तकामध्ये वाचा फोडली आहे. कथेचा नायक आनंद हा बेताच्या परिस्थितीतून आलेला , घरच्या परिस्थितीमुळे अनेक इच्छा आकांक्षा अनेक वर्ष मारलेला तरुण. मोठा भाऊ समाजसेवेच्या नावाखाली लष्कराच्या भाकऱ्या भाजत असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारीचे ओझे डोक्यावर वाहत असताना त्याला उषा भेटते. उषाचे दुःख आणखी वेगळे आहे पण आनंदला भेटल्यापासून ती त्याची भक्ती करायला लागते पण आनंदला तिच्यावर प्रीती ओवाळून टाकायची आहे. या भक्ती आणि प्रितीच्या मनाच्या संघर्षात प्रेम व्यक्त करायचे दोघांकडून राहून जाते आणि आनंदच्या आयुष्यात माणिक बायको म्हणून येते. माणिक हे पात्र अतिशय उत्तम साकारले आहे. बेडगी समाजसेवेची आवड असलेली , व्याख्याने झाडणारी, संसारात तिळमात्रही रस न घेणारी आणि स्वतःला प्रेमापासून कायम लांब ठेवणारी माणिक विचार करायला लावणारी आहे. सहसा हे स्त्री स्वभावाला विरुद्ध वर्तन आहे. आनंद हा कवी कल्पना आणि काव्याचा भोक्ता आहे पण आयुष्यात माणिकच्या रूपाने निवडुंग आल्यामुळे तो सुखाचा शोध घ्यायला घराबाहेर पडतो. अनेक कडू गोड अनुभव आल्यानंतर शेवटी आपल्या संकुचित सुखापेक्षा समाजाचे ऋण फेडण्यासाठी केलेल्या कामात परमसुखाचा आनंद आहे हे त्याला कळून चुकते. कथा आणि कथेची भाषा नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट आहे. आपल्या समोर मोहाचे कितीतरी क्षण नाचत असतानाही मनाचा संयम सुटू न देणारा आनंद खऱ्या अर्थाने कथेचा नायक शोभतो. त्याच्या अधोगतीच्या काळात उषाने त्याला दिलेली साथ ही त्या काळाच्या स्त्रियांचे आणि स्त्री सुलभ भावनांचे प्रतीक आहे. चिडखोर स्वभावाची आणि प्रेम व भावानांपेक्षा बुद्धीला अधिक महत्त्व देणारी माणिक ही निसर्ग नियमांच्या चौकटीत न राहता झगडणारी एक तथाकथित स्त्री आहे. प्रत्येक जण सुखाच्या शोधात असून क्षणिक गोष्टींमध्ये ते शोधायचा प्रयत्न करत आहे. कारण प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या आहेत.
"व्यक्तिगत ऋण, कुटुंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल" याच विचारांच्या धारेवर चालणारी ही कथा आहे. कथा आनंद भोवती फिरते.. या आनंद च्या आयुष्यात त्यागाला महत्त्व फार.. आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या ऐहीक सुखांचा त्यानं केव्हाच त्याग केलाय.. त्याबदल्यात त्याला काय हवं? प्रेम आपुलकी अन् जिव्हाळा. घरासाठी स्वतःच्या सुखांचं पाणी करूनही तो प्रेमाचा भुकेलाच राहतो.. नियती तिच्या फटकाऱ्याने आनंदाला शिकवते की,
"मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे, परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये."
या कथेतली माणिक सुशिक्षित आणि हुशार आहे, मात्र ती भावनाशून्यतेच्या ओझ्याखाली स्वतःच्या हृदयाला पायदळी तुडवते..
"समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे. ज्याला आपल्या घरावर प्रेम करता येत नाही, आपल्या माणसांवर प्रेम करता येत नाही, त्याला समाजावरही प्रेम करता येत नाही."
या सत्याचं झोंबरं अंजन तिच्या डोळ्यांत पडतं..
या कथेत अप्पा आहे, भय्या आहे.. कोणत्याही समाजात कायम आढळणारी ही कर्तव्यशून्य माणसं. यांच्यासारखी माणसं कुटुंबात असणं म्हणजे दुर्दैव.. स्वतःसाठी आणि जवळच्या, सख्या माणसांसाठी काहीही न करणारी ही लोकं, कष्टाची फळं चाखण्यात मात्र यांचा नंबर पहिला.. यांच्याकडून आजूबाजूच्या लोकांना फक्त दुःख आणि दोषारोपच वाट्याला येतात. या माणसांचा ऐतखाऊ आणि नकर्ता स्वभाव खुद्द नियतीही बदलू शकत नाही..
आणि या कथेत आहे उषा.. उषेकडे भावनातिरेक नाही अन् भावनाशून्यताही नाही. ती भावना ओळखते, जाणते अन् जपते.. पदरी पडलेल्या दुःखाला, उपेक्षेला आणि पोरकेपणाला कंटाळून ही उषा जीव द्यायला जाते, या कठीण समयी आनंद तिला मागे खेचतो..
"ध्येयासाठी जीव दयायचा असतो , जिवाला जीव दयायचा असतो, मातीला नाही."
आनंदाच्या या शब्दांच्या आधाराने ती पुन्हा उभी राहते, प्रसंगी स्वतः आनंदाला सावरते, त्याला पुन्हा एकदा त्याग करण्याची हिंमत देते. मात्र यावेळी त्या त्यागाला आनंदाची अन् सत्पात्रतेची झालर असते..
"सुखाचा शोध" ही केवळ एक कादंबरी नसून, मानवी मन आणि त्याच्या गुंतागुंतीचा एक सखोल अभ्यास आहे असे मला वाटले. खांडेकरांनी या कादंबरीतून कुटुंब, समाज आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्यातील संघर्षाला तीक्ष्णपणे उलगडून दाखवले आहे.
मला कादंबरीतील पात्रांचे चित्रण फारच कमालीचे वाटले. संपूर्ण कथा ही आनंद या व्यक्तिरेखेभोवती फिरते. त्याचे वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्य यांचा परस्परातील मेळ खूपच वास्तव��र्शी वाटतो.
ही कादंबरी केवळ कुटुंबातील नातेसंबंधांचाच अभ्यास नाही, तर समजाच्या रुढीपरंपरा आणि त्यांचा व्यक्तीमत्वावर होणारा प्रभावही यातून स्पष्ट होतो. आप्पाचा समाजसेवेचा ध्यास त्याच्या कुटुंबाच्या सुखाला दुर्लक्षित करतो, तर आनंदचे कुटुंबाविषयीचे समर्पण त्याच्या स्वतःच्या आनंदाला बळी पाडते. उषा, एक शिक्षित असून विधवा म्हणून समाज तिची विटंबना करतो, तर माणिक सामाजिक मान्यतेच्या खांद्यावर आपल्या गतायुष्याचा भार सोसते.
खांडेकरांची भाषा सुबोध आणि प्रभावी असून, त्यांनी पात्रांच्या मनोविश्र्लेषणातून त्यांच्या आंतरिक संघर्षाला मार्मिकपणे चित्रित केले आहे. या कादंबरीने, मला स्वतःच्या आयुष्यातील मूल्यांचा पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केले. पात्रांची कृती आणि निर्णय अनेकदा त्यांच्या काळातील प्रचलित सामाजिक मानदंड आणि लिंग भूमिका यांनी प्रभावित होतात. कादंबरी या सामाजिक अपेक्षा आणि त्यांचा व्यक्तीवर होणारा परिणाम यांचे चिकित्सात्मक विश्लेषण करते.
वेगवेगळे रस्ते असले तरी, सगळेच लोक खरं तर सुखाच्या शोधात असतात. पण, सुख म्हणजे काय आणि ते कसे मिळेल याबद्दल प्रत्येकाचं वेगळं मत असतं. या कादंबरीत कुटुंबातले, वैवाहिक आणि समाजातले नाते कसे गुंतागुंतीचे असते हे दाखवलेलं आहे. ती मानवी संवादातील आव्हाने आणि जटिलता तसेच पूर्वीच्या अनुभवांचा सद्यस्थितीतील संबंधांवर होणारा प्रभाव यावर प्रकाश टाकते.
This entire review has been hidden because of spoilers.
Sukhacha Shodh" (The Search for Happiness) is a classic Marathi novel by V. S. Khandekar.
Sukhacha Shodh offers deep insights into human relationships, sacrifice, and the search for true happiness through its compelling characters and narrative.
This book is so simple but still deep when it comes to understanding the relationships. Some sacrifices can destroy more than one life forever...
A very beautiful story! ... Following traditions blindly does harm not just to the person following it but also to others around him. It's an unputdownable story.. I really loved reading this novel💞
I have read Marathi book after a long time. This book is so simple but still deep when it comes to understanding the relationships. Some sacrifices can destroy more than one life forever, and the consequences of such failed expectations can make life more miserable.
V S Khandekar is one of my favourite authors. Such a simplistic writing but the meaning is too deep.
A very beautiful story! As the title suggests, the main character believes in sacrifice, which is the traditional belief, while other characters have different and unpleasant definitions of a happy lifetyle. Eventually the story boils down to the fact that following traditions blindly does harm not just to the person following it but also to others around him. It is an engaging read.
ही कादंबरी एका वेगळ्याच पद्धतीने मांडलेली आहे. इथे गोष्ट एका पात्राच्या दृष्टिकोनातून न सांगता, प्रत्येक पात्र स्वतःच्या नजरेतून, पहिल्या पुरुषी स्वरूपात, आपली कहाणी सांगतं. त्यामुळे वाचकाला प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललं आहे, त्यांच्या मनातल्या भावना, विचार आणि संघर्ष समजून घेता येतात. एकाच प्रसंगाकडे वेगवेगळ्या पात्रांचे दृष्टिकोन उलगडले जातात. जेव्हा एखाद्या पात्राची गोष्ट वाचतो, तेव्हा दुसरं पात्र चूक वाटतं, पण जेव्हा त्या दुसऱ्या पात्राची बाजू समजते, तेव्हा त्याचं वागणंही योग्य वाटू लागतं. त्यामुळे प्रत्येक पात्र त्यांच्या ठिकाणी बरोबरच वाटतं. पात्रांची मानसिकता, त्यांच्या गरजा आणि त्यातून निर्माण होणारे संघर्ष अतिशय सहजपणे उलगडले आहेत. एकमेकांवर होणारा परिणाम, त्यांच्या आयुष्यातले बदल, नातेसंबंधातील गुंतागुंत, हे सारं खूप वास्तवदर्शी पद्धतीने उभं राहातं. एकंदरीत, सुखाचा शोध हे आत्मचिंतन घडवणारे, संवेदनशील आणि मूल्यांची जाणीव करून देणारे पुस्तक आहे. सुखाचा शोध हे पुस्तक, नावाप्रमाणेच, प्रत्येक पात्राच्या 'सुखाच्या शोधा' ची कथा सांगतं, जिथे त्यांचे मार्ग एकमेकांना छेदतात, गुंततात आणि एकत्रितपणे त्यांच्या आयुष्याचा प्रवास घडवतात.