अलीकडचे हिंदी सिनेमे, इतका तोचतोच पणा वापरून बनवले जातात, कि त्यांचा शेवट आपल्याला आधीच माहित असतो. पण मतकरींच्या गूढ गोष्टींचं तसं नाही. अगदी शेवटच्या वाक्याला, एक असा खुलासा होतो, कि भर दुपारी, लोकांच्या गर्दीत असूनसुद्धा आपण क्षणभर दचकू शकतो. भिंतींच्या उडालेल्या रंगावरून सुद्धा एक गूढ गोष्ट, इतक्या प्रभावीपणे लिहिणारे, मतकरी खरंच ग्रेट आहेत.