Jump to ratings and reviews
Rate this book

Chandanyacha Rastaa

Rate this book

Unknown Binding

First published April 14, 2013

2 people are currently reading
58 people want to read

About the author

Prakash Narayan Sant

5 books45 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
17 (70%)
4 stars
2 (8%)
3 stars
4 (16%)
2 stars
1 (4%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
Profile Image for Tanvi R.
7 reviews
June 8, 2025
‘चांदण्याचा रस्ता’ या ललितलेखसंग्रहात प्रकाश नारायण संत यांच्या पूर्वप्रकाशित १० ललित लेखांचा समावेश आहे. संत यांच्या आयुष्यातील आठवणी, लहान-मोठे प्रसंग, त्यांतून त्यांची झालेली जडणघडण आणि घडत गेलेलं भावविश्व या सर्वांची सुरेख गुंफण त्यांनी या लेखांमधून केली आहे. प्रकाश नारायण संत हे संवेदनशील लेखक तर होतेच, पण त्याबरोबरच ते एक प्रतिभावान चित्रकारही होते. त्यांच्या काही निसर्गचित्रांच्या फोटोंचा समावेशही या पुस्तकात केला आहे. त्यांतील भिरभिरं, ओळख, शिशिर, डेसोलेट आणि हिरवा प्रकाश या चित्रांचे संदर्भ पुस्तकातील लेखांमध्ये आले आहेत. या पुस्तकालाही संत यांच्याच चित्राचं सुरेख मुखपृष्ठ लाभलं आहे.

प्रकाश नारायण संत हे नाव वाचताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो त्यांच्या लेखणीतून जन्मलेला लंपन आणि त्याचं भावविश्व. असंच तीन मित्रांचं निरागस भावविश्व त्यांनी ‘टारझन, सॅमसन आणि सिंद्रेला’ या लेखातून टिपलं आहे. या लेखाची सुरुवातच रविवारची निवांत दुपार, खिडकीलगतच्या झाडाच्या सावली न्याहाळत वाचायचा प्रयत्न करणारे लेखक आणि घरालगतच्या बागेत खेळणारी तीन लहान मुलं अशी झाल्यामुळे हा पहिलाच लेख वाचताना आपण एखादी कथाच वाचत असल्यासारखं वाटतं. लहानपणी पाहिलेल्या चित्रपटांमुळे प्रत्येकाची आवडती श्रद्धास्थानं ठरलेली असतात. मित्रमैत्रींणींसोबतच्या खेळात मग निरनिराळ्या चित्रपटांतली ही पात्रं एकत्र येऊन एक निराळंच विश्व तयार होते. ही पात्रं साकारताना त्या तीनही मुलांचं भावविश्व वाचकालाही त्याच्या बालपणात घेऊन जातं. टीव्ही आणि इंटरनेटचा मध्यमवर्गीय घरात प्रवेश होण्यापूर्वीच्या पिढीतला प्रत्येकजण या तीन लहान मुलांचं आयुष्य जगलेलं असल्यामुळे हा लेख वाचकाला त्याच्या बालपणाची सैर घडवून आणतो. रविवारच्या दिवसाचं असं निवांतपण आजच्या धकाधकीच्या जीवनात क्वचितच अनुभवायला मिळतं, त्यामुळे अशा निवांतपणाबद्दल वाचताना वाचकही सुखावून जातो.

संत यांनी बी. एस्सी. झाल्यानंतर उत्तर कारवार जिल्ह्यात कॅसलरॉक स्टेशनपासून काही मैल आत असलेल्या घनदाट जंगलातील मॅंगनीजच्या खाणीवर जिओलॉजिस्ट म्हणून काम केलं होतं. कॉलेजमधून नुकतंच बाहेर पडल्यानंतर नवीन नोकरीत रुजू होताना या बदलाला सामोरं जाताना मनाची होणारी द्विधा मनःस्थिती, नव्या नोकरीतील दमछाक, नवीन वातावरणात रुळताना मनावर जमणारं मळभ आणि पावसाच्या आगमनाने मनात निर्माण झालेलं चैतन्य हे सर्व ‘पाऊस’ या लेखात वाचताना त्या प्रसंगांचं चित्रण डोळ्यासमोर जिवंत होते. चित्रकार म्हणून संत यांचा प्रवास त्यांनी ‘चांदण्याचा रस्ता’ या लेखातून उलगडला आहे. विन्सेंट व्हॅन गॉचं चित्र पाहून अस्वस्थ झालेले लेखक, अल्बर्ट काम्यूच्या ‘A Landscape is a state of soul’ या वाक्यातून मिळालेल्या प्रेरणेने चित्रकार म्हणून त्यांना गवसलेली वाट आणि शहरातल्या अंधाऱ्या रस्त्याने फिरत असताना त्यांच्याकडून चितारलं गेलेलं चांदण्याने न्हाऊन निघालेल्या रस्त्याचं चित्र हे सारं वाचताना चित्रकार म्हणून त्यांनी टिपलेलं निसर्गाचं सौंदर्य, त्यांतील बारकावे तितक्याच प्रभावीपणे त्यांच्या लेखांतही तरलपणे गुंफले असल्याची जाणीव होते. या पुस्तकातील ‘ओळख’, ‘आधार’,काळोख आणि ‘हिरवा प्रकाश’ हे लेखही लेखकाचं निसर्गाशी असलेलं घट्ट नातं अधोरेखित करणारे आहेत.

‘उंबरठा’, ‘माझं शिक्षण’ आणि ‘आई’ या लेखांमधून संत यांनी त्यांच्या बालपणीच्या आणि तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयुष्याचा वेध घेणारी स्वप्नं आपल्या प्रत्येकालाच पडत असतात. नकळत्या वयात वडिलांचं छत्र गमावलेल्या छोट्या प्रकाशला दूर गेलेले वडील स्वप्नांच्या माध्यमातून भेटतात, स्वप्नात त्यांना मिठी मारताना येणारा त्यांच्या कोलनवॉटरचा सुगंध त्याला जाणवतो, पण काही बोलण्याआधीच आलेली जाग स्वप्नांच्या मर्यादेची जाणीव लेखकाला करून देते. हा प्रसंग वाचताना मनात गलबलून येतं. वडील गेल्यानंतर आईने सांसारिक जबाबदाऱ्यांची धुरा सांभाळत केलेला संत आणि त्यांच्या तीनही भावंडांचा सांभाळ, त्यांच्यावर केलेले संस्कार आणि ते करत असताना एका आईने जपलेलं मुलांचं व्यक्तिस्वातंत्र्य याबद्दल लिहिताना संत यांनी त्यांच्या आई, जेष्ठ कवयित्री आणि लेखिका इंदिरा संत, यांचा जीवनपटही उलगडला आहे. इंदिरा संत यांना वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आलेलं वैधव्य आणि त्यानंतर तीन मुलांना सोबत घेऊन जीवन जगत असताना दररोज येणारी आव्हानं आणि त्याही परिस्थितीत सकारात्मक राहून त्यांनी केलेला नेटका जीवनप्रवास वाचकासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. ‘आई’ याच लेखातील शाळेत असताना मास्तर आईबद्दलची कविता शिकवत असताना रडणाऱ्या मुलामुलींबद्दलच्या आठवणीबद्दल वाचताना वाचकाच्या डोळ्यांसमोर आपसूकपणे ‘लंपन’ उभा राहतो. लंपनचं संत यांच्या आयुष्याशी असलेलं साधर्म्य हे लेख वाचताना वेळीवेळी वाचकाच्या लक्षात येते.

या पुस्तकाच्या सुरुवातीचा आशा सावदेकर यांचा ‘चांदण्याचा रस्ता : एक आस्वाद’ हा या पुस्तकातील लेखांबद्दलचा सविस्तर लेखही वाचनीय आहे. दररोजचं धकाधकीचं जीवन काही काळ विसरायला लावून चंद्रप्रकाशाप्रमाणे शीतलतेची अनुभूती देणारं हे पुस्तक आवर्जून वाचा.
8 reviews
March 29, 2025
There are some books that make you feel humble with their writing style. This book is one of them. Also, the last piece 'mother' written on writer's mother 'Indira Sant' made my eyes wet.
Profile Image for Praveen.
1 review9 followers
May 13, 2013
Good book, need a peace of mind to read this book then only u can like it.
Displaying 1 - 3 of 3 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.