झुंज आणि झेप या ना.स. इनामदार यांच्या मालिकेतील मंत्रावेगळा हे तिसरे पुस्तक होय. छत्रपती शिवरायांनी उभारलेले स्वराज्य आणि पेशव्यांनी अटकेपार नेलेले मराठा साम्राज्याच्या अस्ताचे विस्तृत दर्शन दुसऱ्या बाजीरावांच्या मनोभूमिकेतून या कादंबरीत उत्कृष्ठरित्या मांडले आहे. दुसऱ्या बाजीरावांची प्रतिमा जनमानसात दुबळा, भित्रा ज्याने मराठी दौलत इंग्रजांच्या घशात घातली अशी आहे. या प्रतिमेला लेखकाने छेद देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची प्रस्तावनाच 40 पानांची लिहिली आहे यात लेखकाने पुस्तकाचा हेतू स्पष्ट केला आहे. झेप पुस्तकाच्या शेवटी त्रिम्बकजी डेंगळे त्याग करून इंग्रजांना स्वाधीन होतात आणि सदर पुस्तकाची कथा तिथून सुरु होते. बाजीराव त्रिम्बकजींना इंग्रजांच्या तावडीतून सोडवून आणतात आणि मराठी साम्राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांशी राजकारण करत शेवटपर्यंत प्रयत्नांची अयशस्वी शर्थ करतात ही पुस्तकाची कथा आहे. द्वितीय बाजीरावांनी त्यांच्या कारकिर्दीत ही शेवटची मोहीम सोडली तर कोणतीच मोहीम हाती घेतली नव्हती त्यामुळे मराठी फौजेला मागच्या वीस वर्षापांसून लढाईचा सराव नव्हता. त्यात इंग्रजांनी मराठी दौलतीच्या मातब्बर सरदारांना पेशव्यांपासून तोडून त्यांना एकाकी पाडले. त्यात भरीस भर छत्रपती प्रतापसिंहाकरवी इंग्रजांनी त्यांचे पेशवेपद ऐन युद्धात काढून घेतले. बऱ्याच मराठी लोकांनी फितुरी करून इंग्रजांची साथ केली. अशा विविध कारणांनी मराठी सत्ता संपुष्टात आली. दुसरा बाजीराव हा महान योद्धा किंवा मोठा मुत्सद्दी नव्हता पण तो भित्रा अजिबात नव्हता. त्याच्या काळात निरनिराळे इंग्रजांशी तह झाल्याने मराठी साम्राज्याला सुरुंग या पूर्वीच लागला होता आणि तो मात्र याला निमित्तमात्र उरला. नाना फडणवीसांनी त्याला लहानपणी कैदेत असताना राजकारणाचे किंवा युद्धाचे शिक्षण मिळू दिले नाही आणि एक दुबळा पेशवा मराठी सत्तेला मिळाला आणि तिथूनच मराठी साम्राज्याला उतरती कळा सुरु झाली. दुसरा बाजीराव भित्रा नव्हता पण इंग्रजी सत्तेचे पाश गळ्यापर्यंत आल्यावर त्याने हातपाय मारायला सुरुवात केली आणि तोवर बराच उशीर झाला होता. कोल्हापूर/ सातारचे छत्रपती , बडोद्याचे गायकवाड , इंदोरचे होळकर , ग्वाल्हेर चे शिंदे आणि इतर मोठे मराठी सरदार जसे इंग्रजांशी तह करून युद्ध न करताच मांडलिक झाले तसे पेशवे मांडलिक झाले नाही त्यांनी शेवटपर्यंत अयशस्वी का होईना झुंज दिली. त्यांना इतरांकडून साथ मिळाली असती तर कदाचित त्यांनी इंग्रजांचा बिमोडही केला असता पण दैवाला ते मंजूर नव्हते. मराठी सत्ता उत्कर्षाची गोष्ट बऱ्याच जणांनी लिहिली आहे पण त्याच्या अंताची कथा तेही मराठी राज्यकर्त्याच्या भूमिकेतून लिहिणारे ना.स. इनामदार हे निराळेच.
This book is another good book by Mr. N. S. Inamdar. The last Peshwa has been much-maligned by historians. In these novel, Inamdar tries to show the Peshwa in different light. A person who was imprisoned in his childhood for a crime which was supposedly committed by his mother Anandibai, a person who came to the Peshwai not knowing the ABC's of politics, and a person who was in the wrong place at the wrong time. he book very beautifully captures the Peshwa's feelings and thoughts. His hatred of the British, his acknowledgement of his past mistakes (like refusing to accept Yashwantrao Holkar), his sadness at not being able to father any children (all his children died very early or were stillborn) and also his last tearful farewell to Trimbakji at the end of the book.
Good interesting read about Bajirao 2 which presenta a entirely a different perspective to his legal which is not flattering in the least in the history of Maharashtra.
The language is flowery and beautiful. The place, the ambience of early 18 century is brought alive.