Jump to ratings and reviews
Rate this book

ऐसपैस गप्पाः दुर्गाबाईंशी

Rate this book
Transcript of interview with Durga Bhagwat, b. 1910, Marathi author.

224 pages, Paperback

First published November 1, 1998

Loading...
Loading...

About the author

Pratibha Ranade

19 books4 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
3 (30%)
4 stars
6 (60%)
3 stars
1 (10%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for In.
160 reviews1 follower
June 10, 2015
मी दुर्गा भागवतांचं कुठलंच पुस्तक वाचलेलं नाही. म्हणजे अजून तरी. आईच्या त्या आवडत्या लेखिका. काहीतरी आईला आवडीचं म्हणजे नक्कीच आपल्याला बोजड किंवा फुकट तत्वज्ञानी अजीर्ण देणारं असेल असं वाटून मी कायमच त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष केलं. अलीकडेच घरी ऐसपैस गप्पा हे पुस्तक हातात पडलं आणि दुसरा काही उद्योग नव्हता म्हणून ते चाळत होतो. त्या पुस्तकाने दुर्गा भागवत म्हणजे काय चीज आहे हे अगदी थोडक्यात सांगितलं. सांगितलं तेही इतकं प्रभावीपणे की आता त्यांची सर्व पुस्तक वाचेन हे नक्की.


दुर्गा भागवत हे विलक्षण व्यक्तिमत्व. त्यांनी मराठीतून भरपूर लिखाण केलेलें आहे. त्यांच्या लिखाणाला सखोल अभ्यासाची जोडही आहे. बुद्धाचे विचार समजून घेऊन त्यांनी त्याविषयीच्या ग्रंथांचं भाषांतर केलेलं आहे. अनेक जण ग्रंथांचं इंग्रजी भाषांतर घेऊन त्यावरून अभ्यास करतात, पण दुर्गाबाईंनी मूळ पाली प्रती वाचून त्याचा स्वतःच्या अनुभवसिद्ध वकुबाने अभ्यास केला. एवढेच नव्हे तर मध्य प्रदेशातील गोंड आदिवासींबद्दल पण त्यांनी लिखाण केले. त्यासाठी त्या आदिवासींबरोबर जाऊन राहिल्या. त्यांचे लिखाण हे केवळ अभ्यासपूर्ण प्रबंधांवर संपत नाही. महाभारतावर त्यांनी लिहिलं, निसर्गाच्या ऋतुचक्रावर त्यांनी लिहिलं. कविता, लेख, लघुकथा, कादंबरी अशा अनेक साहित्यप्रांतात त्यांनी मुक्त संचार केला आणि त्यावर आपली एक ओळख प्रस्थापित केली. प्रखर बुद्धीवादी आणि आपल्या मतांवर ठाम राहणाऱ्या त्यांचं लिखाण वाचणे म्हणजे नक्कीच एक वेगळा आणि खूप काही देऊन जाणारा अनुभव ठरेल.

हे पुस्तक म्हणजे प्रतिभा रानडे ह्या अजून एका प्रतिष्टीत लेखिकेने दुर्गा भागवतांशी मारलेल्या गप्पा आहेत. सरळ मोकळेपणाने आणि प्रवाही स्वरूपात मारलेल्या ह्या गप्पांचं पुस्तक सहज आपल्याला त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन जातं. जणू असा विचार करावा की पुस्तकांच्या सानिध्यात बसलेल्या ह्या दोन व्यक्ती आपल्या समोर ज्ञानाचं भांडार खुलं करून ठेवत आहेत. अनेकविध विषयांवर वाचन आणि लेखन केलेलं असल्याने दुर्गा भागवतांबद्दल सहज म्हणून वाचायला जाणाऱ्याला धाप लागेल, पण अश्या ह्या पुस्तकातून त्या आपल्याला एक व्यक्ती म्हणून, एक तर्कशुद्ध विचार म्हणून भेटतात आणि मनापासून आवडून जातात.

मधून मधून थोडे विषयांतर होत असले तरी प्रमुखपणे हे पुस्तक काही विषयांना वाहून घेतलेल्या प्रकरणांनी बनलेले आहे. आणि थोडी थोडकी नाही तर अठ्ठावीस पानांची, प्रतिभा रानड्यांनी लिहिलेली प्रस्तावना दुर्गा भागवतांची छोटीशी ओळखपण करून देते. संस्कृतीच्या पाऊलखुणांपासून सुरु होऊन गप्पांचा हा ओघ, साहित्य चिंतन, बौद्ध शिकवणी, दुर्गाबाईंचे इतर लेखन आणि मग म्हातारपण आणि मृत्यूविषयीच्या विचारांनी संपतो. ह्या सर्वच ठिकाणी उदाहरणांचा, इतर पुस्तकांच्या, लेखकांच्या संदर्भांचा खच पडलेला आहे. पानागाणिक वैचारिक रत्नांचा सडा पाहून अलीबाबाच्या गुहेत शिरलेल्या कासीम सारखा मलाही मोह झालाच आणि तो तुम्हालाही होईल ह्यात शंका नाही.

इंग्रजी भाषेमध्ये culture बरोबर civilisation हा शब्दही वापरला जातो. पण दोन्हीमध्ये फरक आहे. civilisation हा शब्द साधारणपणे एखाद्या समाजाच्या परिस्थितीबद्दल वापरला जातो. की तो समाज शांतताप्रिय, स्फूर्तीदायक, वर्धिष्णू आहे की त्या समाजामध्ये क्रौर्य आहे, रानटीपणा आहे, तिथे सतत भांडणं मारामाऱ्या चालतात का? अशा अर्थाने तो वापरला जातो. आपण संस्कृती आणि सभ्यता हे दोन शब्द वापरतो पण ते वापरताना फारसा फरक करीत नाही. आपण पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य सभ्यता,यंत्रयुगाची संस्कृती, सभ्यता असे दोन्ही म्हणतो पण मुळात दोन्ही मध्ये फरक आहे गंमत म्हणजे हा शब्द मूळचा भारतीय नव्हेच. संस्कृत वाङमयातही सापडायचा नाही. आपण हा शब्द मुद्दामून बनवलेला आहे. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी तो प्रथम वापरला.


किंवा,

कशाचे धागेदोरे कुठे जाऊन सापडतील सांगता येत नाही. सिंह ह्या शब्दाची उत्पत्ती सापडत नाही असा व्याकरणाचार्य पाणिनीने म्हटलं आहे. सिंह हा मूळचा आफ्रिकन प्राणी, तिथे त्याला सिम्बा म्हणतात त्याचा इथे आल्यावर सिंह झालेला असेल हा दुवा जुळतो. भारत आणि आफ्रिका खंड पूर्वी जोडलेलेच होते.


हे आणि असे अनेक छोटे छोटे दाखले पानोपानी सापडतात. त्याच बरोबर त्याचे संदर्भदेखील.

दुर्गाबाईंचे विचार प्रगल्भ आहेत, आणि ते तसे असल्याने अश्या माणसांना बोलतं करण्यासाठी तोडीच्या माणसाची गरज असते, प्रतिभा रानडे ती जागा भरून काढतात. त्या दोघांना बोलताना ऐकून आपण फक्त बाजूला कोपऱ्यात बसून ऐकत रहावं असं समाधान हे पुस्तक देतं. प्रखरतेच्या सरळ मांडणीने ज्यांना घाम फुटेल अश्यांसाठी हे पुस्तक नाही, किंबहुना दुर्गाबाईंचं बरचसं लिखाणच त्यांच्या साठी नाही. द्रौपदी बद्दल बोलताना त्या म्हणतात,

आदिपार्वामध्ये द्रौपदी आपले केस कृष्णाला दाखवते. तेंव्हा कृष्ण गप्पा बसलेला आहे. आता एखादी बाई आपले लांबसडक, काळेभोर केस एखाद्या पुरुषाला दाखवते त्याला एक विशिष्ट अर्थ आहे हे माहित आहे ना? शिवाय कृष्ण द्रौपदीच्या स्वयंवराला गेला होता, ते कशासाठी? स्वयंवराची गंमत बघायला जाणाऱ्यांपैकी तो नव्हता. मनात विशिष्ट हेतू असल्याखेरीज उगाच कोणी स्वयंवराला जाणार नाही हेही लक्षात घ्यायला हवं.

मला स्वतःला कालिदास आवडत नाही, नाटकांमध्ये मला भासाची नाटक आवडतात. कालिदास कानांना गोड लागतो पण त्याच्यामध्ये दम नाही.

खांडेकरांची ययातीच बघ, शेकडो पृष्ठांची पण संपूर्णपणे फेल झालेली कादंबरी आहे ती.

अहिंसा हा बुद्धाचा धर्म परंतु, बुद्ध हा मांसाहारीच होता, क्षत्रिय होता.

गौतम बुद्ध बायकांच्या बाबतीत कंजूस होता. त्यांना निर्वाणाचा अधिकार नाही असाही तो म्हणाला होता.


अशी वाक्य लिहिताना त्याबरोबर संदर्भ देऊन त्या लिहितात. त्यांची मत गोंधळात टाकणारी वाटली तरी त्याला अभ्यासाची जोड आहे. अश्या अनेक गोष्टीनी हे पुस्तक भरलेलं आहे.

हे वाचल्यावर, आणि ते संपल्यावर ते लवकर संपल्याची एक हुरहूर मनाला लागून राहिली आहे. अर्थातच आता त्यांचे इतर साहित्य वाचणे होईलच. हा छोटासा लेख लिहिण्याचा उद्देश म्हणजे, हे पुस्तक शोधा, वाचा ह्यासाठी विनंती. फार कमी पुस्तकांना माझ्याकडून पूर्ण मार्क मिळतात, हे त्यामध्ये चपखलपणे बसणार आहे.

Review first published on Mercurial Stability
Profile Image for Shruti Barve.
14 reviews1 follower
Read
March 20, 2019
This book was an immersing experience. It is as if you are with Durgabai and she is taking you on whirlwind tour from culture to myth to Buddhism to emergency days and many more thought provoking topics. All marathi reading people must feel privileged just because books like these.
Displaying 1 - 2 of 2 reviews