विस्मृतीत गेलेला एक वीरनायक. एक अविस्मरणीय लढाई.भारत इ.स. 1025गझनीच्या महमूदने आणि त्याच्या बर्बर टोळ्यांनी पुनःपुन्हा केलेल्या हल्ल्यांनी उत्तरी भारताला पुरतं खिळखिळं करून टाकलं आहे. उपखंडाच्या विस्तीर्ण भूप्रदेशाची आक्रमकांनी भयंकर हानी केली आहे—लुटालूट, हत्या, बलात्कार, अत्याचार. अनेक जुन्या भारतीय राज्यांनी कंटाळून, थकून त्यांच्यापुढे हात टेकले आहेत. जे त्यांच्याशी लढतात, ते सभ्यतेचे जुने संकेतपाळून लढतात, आणि जिंकण्यासाठी सर्व नियम धुडकावून लावणाऱ्या रानटी तुर्की टोळ्यांना ते थोपवू शकत नाहीत. मग या भूमीवरच्या सर्वात पवित्र मंदिरावर, सोमनाथ येथील भव्य शिवमंदिरावर हल्लाकरून तुर्क ते नष्ट करतात.या निराशेच्या अंधारयुगात, एक योद्धा या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी उभा राहतो.राजा सुहेलदेव.एका छोट्याशा राज्याचा शासक असणाऱ्या या राजाला, मातृभूमीसाठी काय केलं पाहिजे हे लख्ख दिसतं आणि त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची त्याची तयारी असते.एक जाज्ज्वल्यक्रांतिकारी. एक प्रभावशाली नेता. एक समावेशक देशभक्त.धैर्य आणि शौर्य यांची ही लोकप्रिय अद्भुत साहसकथा अवश्य वाचा. हा सिंहहृदयी योद्धा आणि बहराइचची देदीप्यमान लढाई या सत्यघटनेवर ही कथा आधारित आहे.
लेखकाबद्दल
अमीश एक मुत्सदी आणि लेखक आहेत. अमीशचे पहिले पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झाले आणि आजपर्यंत त्यांनी १० पुस्तके (कथा व कथेतर अशा दोन्ही प्रकारची) लिहिली आहेत. नुकतेच प्रकाशित झालेले वॉर ऑफ लंका हे त्यापैकीच. त्यांच्या पुस्तकांच्या ६० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत आणि त्यांचा २० भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. समीक्षकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पुस्तकांच्या मागे प्रचंड संशोधन, सखोल विचार, भारताचा प्रगाढ अभिमान आणि एक पुरोगामी प्रागतिक दृष्टिकोन असतो. द वीक या नियतकालिकाने अमीश यांना भारताच्या प्रकाशन इतिहासातील सर्वाधिक जलद खपाचा लेखक म्हटले आहे. फोर्ब्स इंडियाच्या भारतातील सर्वाधिक प्रभावशाली १०० प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव नियमितपणे असते. २०१४ मध्ये, जगभरातील उत्कृष्ट नेत्यांसाठीच्या आयसेनहॉवर फेलो या प्रतिष्ठेच्या अमेरिकी कार्यक्रमासाठीदेखील अमीशची निवड झाली. २०२१ मध्ये त्यांना यू.के. मध्ये ‘ट्वेन्टी फर्स्ट सेन्च्युरी आयकॉन’ पुरस्कार मिळाला, आणि २०२२ मध्ये सुहेलदेव या त्यांच्या कादंबरीसाठी गोल्डन बुक पुरस्कार मिळाला. ते दूरदर्शन माहितीपटांचे सूत्रसंचालकदेखील आहेत. यांमध्ये डिस्कव्हरी टीव्हीच्या ‘लीजन्ड्स ऑफ द रामायण अँड महाभारत’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचा समावेश आहे. यू.के. मधील भारतीय उच्चस्तरीय आयोगामध्ये ते मंत्री (संस्कृती), आणि लंडन येथील नेहरू सेंटरचे संचालक म्हणून ते ऑक्टोबर २०१९ पासून काम पाहात आहेत. अमीश हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), कलकत्ता या प्रतिष्ठित संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत (आयआयएम – कलकत्ता यांनी २०१७ मध्ये त्यांना ‘डिस्टिंग्विश्ड अल्युम्नस अवॉर्ड’ने सन्मानित केले). आर्थिक सेवांच्या क्षेत्रात १४ वर्षे काम केल्यानंतर ते पूर्णवेळ लेखनाकडे वळले.