भारतीय विवाह संस्था का इतिहास का यह दूसरा संस्करण है। आद्य समाज के विकास के इतिहास के प्रति गहन अनुसन्धानात्मक एवं वैज्ञानिक दृष्टिकोण की परिचायक यह पुस्तक इतिहासाचार्य राजवाडे के व्यापक अध्ययन और चिन्तन की एक अनूठी उपलब्धि है। स्वर्गीय विश्वनाथ काशीनाथ राजवाडे के बारे में जैसा कि कहा गया है : "जैसे ही उन्हें पता चलता कि किसी जगह पर पुराने (इतिहास सम्बन्धी) कागज पत्र मिलने की सम्भावना है, वह धोती, लम्बा काला कोट, सिर पर साफा पहने, अपने लिए भोजन पकाने के इन-गिने बर्तनों का थला कन्धे पर डाले निकला पड़ते और उन्हें प्राप्त करने के लिए अथक परिश्रम करते।" इसी परिश्रम का सुपरिणाम था-मराठा का इतिहास की स्रोत-सामग्री बाले मराठांची इतिहासाची साधने महाग्रन्थ का 22 खण्डों में प्रकाशन वहा संस्कृत भाषा और व्याकरण के भी प्रकाण्ड पण्डित थे, जिसका प्रमाण उनकी सुपसिद्ध कृतियाँ राजवाडे धातुकोश, तिडकत विचार तथा संस्कृत भाषेचा उलगडा, आदि हैं।
राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ : (१२ जुलै १८६४-३१ डिसेंबर १९२६). मराठीतून इतिहास, वि. का. राजवाडेवि. का. राजवाडेभाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावाना असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहाससंशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावले.
त्यांचा जन्म पुण्यास झाला. १८८२ मध्ये पुण्यातून ते मॅट्रिक झाले. मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेज व पुण्यास डेक्कन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९० मध्ये बी.ए.झाले. १८९१ मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, पण सु.अडीच वर्षांनी १८९३ मध्येच त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे आयुष्यात त्यांनी कधीही, कसलीही नोकरी अशी केली नाही. विद्यार्थिदशेतच १८८९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता, पंरतु १८९२ मध्येच त्यांची पत्नी निवर्तली आणि त्याच वेळी त्यांनी दुसऱ्या विवाहाचा विचारही न करता स्वतःस प्रापंचिक पाशातून कायमचे सोडवून घेतले. पुढे ते पुणे, सातारा, वाई, धुळे, मिरज, तळेगाव-दाभाडे इ. ठिकाणी कमी-अधिक वर्षे वास्तव्य करून असले, तरी बहुधा महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात सतत हिंडत राहिलेले दिसतात. दऱ्याखोऱ्यातून प्राचीन अवशेष पहात व कोनाकोपऱ्यातून जुनी दप्तरे गोळा करीत असतानाच, त्यांचे लेखनकार्यही अव्याहतपणे सुरू होते. १८९४ पासून स्वतः सुरू केलेल्या भाषांतर तसेच कोल्हापूर येथील समर्थ, तसेच ग्रंथमाला, विश्ववृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इ. नियतकालिकांतून ते भरपूर लिहू लागले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या शीर्षकाचे अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादून प्रसिद्ध केले(१८९८-१९१७). ह्यापैंकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. राधामाधवविलासचंपू आणि महिकावतीची बखर हे दोन जुने ग्रंथ त्यांनी अनुक्रमे १९२२ व १९२४ मध्ये संपादून छापले व त्यांनाही मोठ्या विवेचक प्रस्तावना जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, निङ्त विचार, सुबंतविचार, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहतकाल असे काही त्यांनी संपादिलेले व लिहिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाले. मराठी धातुकोश, नामादिशब्दव्युत्पत्तिकोश इ. ग्रंथ त्यांच्या मृत्यूंनतर प्रसिद्ध होऊ शकले. राजवाड्यांच्या लेखांचे आणि प्रस्तावनांचे काही खंड शं. ना. जोशी आदींनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. धुळ्याच्या संशोधकच्या अंकांमधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रसिद्ध करू लागल्यामुळे राजवाड्यांचा बोलबाला होऊ लागला; तथापि ह्या स्वरूपाच्या कार्याचा प्रारंभ त्यांच्या आधीच का.ना. साने वगैरे संशोधकांनी केलेला होता. साधनांचा उपयोग करून मराठी सत्तेचा प्रत्यक्ष वृत्तांतात्मक इतिहास ग्रँट डफने इंग्रजीतून बराच सविस्तर असा सिद्ध केला होता. अगदी लहान प्रमाणावर का होईना; पण मराठीतही तसे प्रयत्न राजवाड्यांपूर्वीच सुरू झाले होते आणि ह्याचबरोबर इतिहास ह्या विषयाचा मूलगामी विचार करण्याचा उद्योगही काही विचारवंत करीत होते. उदा., मराठी सत्तेचा उत्कर्ष (राइज ऑफ द मराठा पॉवर) हा निबंध म.गो.रानडे यांनी लिहिला. हा निबंध इतिहासाचे तत्त्वज्ञान जाणणाऱ्या पंडितांनी लिहिला आहे असे लक्षात येते. राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी जो प्रचंड खटाटोप केला, तसा त्यांच्या आधी कोणी केला नव्हता हे खरेच. अस्सल आणि अमूल्य अशी कागदपत्रे त्यांनी देशाच्या सर्व भागांतून, शहरांतून व खेड्यांतून अखंड भ्रमंती करून जमविली. परंतु ह्या साधनांचा उपयोग करून डफप्रमाणे मराठ्यांचा समग्र असा इतिहास त्यांनी सिद्ध केला नाही. आणखी भरपूर साधनसाहित्य हाती पडल्याशिवाय ते काम हाती घ्यायचे नाही, अशी त्यांची धारणा होती. तथापि संत रामदास आणि छ. शिवाजी यांच्या कार्याविषयी त्यांनी पुष्कळ लिहिले. संत रामदासांनी ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यत झालेल्या वारकरी संतांपेक्षा वेगळा, आक्रमक, लढाऊ, धार्मिक भक्तिमार्गाचा ध्येयवाद सांगितला, असे त्यांचे मत होते. पानिपतच्या लढाईसारख्या काही घटनांवरही त्यांनी प्रस्तावनांतून प्रदीर्घ विवेचने केली आहेत. मराठ्यांच्या सत्ताविस्ताराच्या राजकारणामागे महाराष्ट्र धर्माची स्थापना करण्याचा ध्येयवाद होता; हिंदुपदपातशाहीच्या ध्येयाने मराठे प्रेरित झालेले होते, असे ते कित्येक ठिकाणी प्रतिपादितात. मराठे शेवटी पराभूत झाले ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावी. लांब पल्ल्यांची नवीन आधुनिक शस्त्रे व तंत्रज्ञान यांनी संपन्न असलेल्या इंग्रजांनी मागासलेल्या मराठ्यांचा पराभव केला, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
#भारतीय #विवाहसंस्थेचा इतिहास - लेखक: इतिहासाचार्य वि. का. #राजवाडे
प्रागैतिहासिक काळातील समाजाची जडण-घडण, विशेषत: भारतीय विवाहसंस्था, कुटुंबजीवन, समाजजीवन व रुढीं कश्या उत्क्रमीत होत गेल्या याचा या पुस्तकात लेखाजोखा घेतलेला आहे. अर्थात, हे राजवाड्यांचे सर्वच सर्वांना विचार पटतील वा सहमत होतील असे नाही. पण त्यांचा अभ्यास फार दांडगा होता नि तितकाच महत्त्वाचाहि आहे, जो दुर्लक्षता येणार नाही. महाभारतपूर्व - महाभारतकालीन व त्यानंतरचा समाज आणि त्यांची विचारधारा कसकशी बदलत गेली हे सांगताना ठिकठिकाणी महाभारत व वेदातील संस्कृत श्लोक उधकृत केले आहेत. काहींना पुस्तकाचं नाव 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' आणि पुस्तकातला मजकूर यात तफावत वाटू शकते.
प्रस्तुत ग्रंथ अपूर्ण आहे, त्यामुळेच तो राजवाड्यांच्या मृत्यपश्चात प्रकाशित झाला. राजवाडे आणखी जगते तर आर्यांचा इतिहासाचा मोठा ग्रंथ निर्माण झाला असता. मराठ्यांच्या इतिहासाचा शोध घेत असताना सा-या आर्य संस्कृतीचा इतिहास शोधण्याची जी ईर्षा त्यांच्यात निर्माण झाली होती तिचा परिपाक या ग्रंथरूपाने मिळू शकला असता. त्याची रूपरेषाही त्यांनी आखली होती. धातुकोश व विवाहसंस्थेचा इतिहास पूर्ण होऊ शकले असते, पण मृत्यूने त्यांचे हे विशाल मनोरथ मध्येच अडविले. (संदर्भ: समग्र राजवाडे)
महाभारतात व हरिवंशात ब्रम्हाची प्रजोत्पाताची वंशावळीत (आदिपर्व ६६) एक मुख्य गोष्ट दिसून येते ती म्हणजे सख्खी भावंडे, चुलत भावंडे, चुलता-पुतणी आणि बाप-मुलगी (मनू - इला, वसिष्ठ प्रजापती - शतरूप ) यांचे शरीरसंबंध होते असं व्यासानी लिहून ठेवलंय आणि या चालींना ऋग्वेद ही पुष्टी देतो. अशीच चाल मिसर समाजातही रूढ होती जी क्लिओपात्राच्या काळातही अस्तित्वात होती, असं त्यांचा इतिहास नमूद करतो. अर्थात, हे तत्कालीन समाजमान्य असल्यामुळे निंद्य नव्हते. जर अविवाहित मुलीला परपुरुषाकडून अपत्य झाले तर ते त्या मुलीच्या बापाचे नाव लावू शकत होते, संप्पतीचाही उपभोग घेऊ शकत होते आणि त्या अपत्याला पिंडही देता येत होते असं वशिष्ठसंहिता सांगते. अनेक पुरुष एकाच स्त्रीशी संबन्ध ठेवू शकत होते व उलट हे हरिवंशात दिसून येत. तथापि, या साऱ्या चाली महाभारतातील जन्मेन्जयाच्या काली निंद्य होत्या, समाजमान्य नव्हत्या. तसेच, कर्णही शल्याची यासाठीच निंदा करतो, हेही व्यासानी नमूद केले आहे. अश्याच चाली आयर्लंड, पर्शिया वगैरे भागातही प्रचलित होत्या, हे लोकही त्यांच्या आया-बहिणींशी विवाह करीत असत.
महाभारतात स्त्री-पुरुष उघड्यावर (आदिपर्वात अध्याय १०४) वा यज्ञ भूमीवर समागम करीत, यातून अपत्येही जन्मत (सिता - द्रौपदि, या अयोनिज म्हणजे घराबाहेर जन्मलेल्या) अशी नोंद आढळते. पेशवेकाळातही 'घटकंचुकी' (काही निवडक स्त्रीपुरुष जमत आणि घागरीमध्ये सर्व बायकांच्या चोळ्या जमा करत, मग पुरुष त्यातून ज्या बाईची चोळी काढे त्या बाईशी सर्वासमोर रममाण होई) खेळली जायची, तीच प्रथा कर्नाटक, तामिळ मध्ये ५० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. अशीच काहीशी चाल सीझर काली त्यांच्याकडे फार लोकप्रिय होती. परंतु, यात कोणती जोरजबरदस्ती नव्हती.
देवसमाज व आर्यसमाज यात देव नेहमीच वरचढ राहले आणि त्यांनी आर्यांच्या मालमत्तेवर (यांची मुख्य मालमत्ता म्हणजे स्त्रिया) ताबा मिळविला, हा हक्क इतका जबरदस्त होता कि स्त्री जन्मली कि तीवर देवांचा पहिला हक्क, युरोपातील Prelibation सारखा. मग हे आर्यसमाजी लोक देवांना त्यांच्या चीजवस्तू (हिरवे धान्य, साचलेले तूप, लाह्या) देऊन स्त्रिया देवांच्या अग्रोपभोगातून सोडवून आणत. अग्रोपभोगाची हि प्रथा सरंजामी वतनातही चालू होती. शिवाय, अजूनही प्रशियाच्या नेदरलँड आणि जर्मनीच्या काही लॉर्ड आजही हा आपला हक्क आहे असा दावा करतात. त्यांचाच परिणाम म्हंणून आजही विवाहात 'लाजाहोम' करतात, काही ठिकाणी 'अवदानही' म्हणतात, त्याची सारी प्रक्रिया हि वधूला मुक्त करण्यासंबंधी आहे. म्हणजेच आपण आजही या लाजिरवाण्या प्रथेला डोक्य्वर मिरवतो.
माधवी आख्यान (उद्योगपर्व १०६) मध्ये ययाती राजाने त्याची मुलगी माधवी हिला गुरुदक्षिणा म्हणून दिली, गालव ऋषीने स्वतःची मुलगी म्हणून तिला ३ राजांना प्रत्येकी एक पुत्र होईतो भाड्याने दिली. तद्दननंतर, विश्वामित्राला भार्या म्हणून दिली, तिच्यापासून विश्वामित्राला पुत्र प्राप्ती झाल्यावर गालवने तिला त्याच्या पित्याकडे सुपूर्त केली. तात्पर्य हे कि त्या काळी मुली भाड्याने वा विकत देता होत्या, यावर उपजिविकाही करीत, त्यांना 'भाटीक' (अपभ्रंश भाड्या) म्हणत.
दम ऋषी मृगीसोबत संग करताना पंडू राजाकडून मारला गेला आणि त्याने पंडुला शापदग्ध केलं, इथं हे लोक पशुसोबतही मैथुन करीत असं न लिहिता व्यासांनी ते रूप पालटून कामक्रीडा करीत होते असं लिहिलं अथवा पंडू राजाच्या सहमतीने कुंतीला ३ परपुरुषांपासून (विवाहापूर्वीचा पकडून ४) आणि माद्रीला २ परपुरुषांपासून पुत्रप्राप्ती झाली. हि काही शे वर्षांपूर्वीची उघडीनागडी कथा व्यासांना धर्म - नीतीला गौण आणणारी वाटली त्यामुळे त्यांनी हि पुत्रप्राप्ती देवांकडून झाली असे लिहिले. पण केवळ असे प्रथम व्यासांनीच केले असे वाटत नाही. कुमारी मेरीला कोना परपुरुषापासून ख्रिस्त झाला, पण यालाही यहुद्यांनी दडवून त्यालाही देवपुत्र केले. कारण, व्यास आणि हे ख्रिस्ती पंडित यांना हे धर्मबाह्य वर्तन वाटलं म्हणून त्यांचा हा आटापिटा.
बहूपतीत्व हि चाल शातवाहन आंध्रवासियांत, आंध्रभृत्य व ऑस्ट्रेलिया-टॅस्मेनिया इथे अस्तित्वात होती.
अतिथींना, मित्रांना स्वस्त्री उपभोर्थ दिली जायची, हि प्रथा ग्रीक मधेही प्रचलित होती असं प्लूटो - केटो नमूद करतो. तसंच, शांतिपर्वात (१६८) गौतम ब्राह्मणाला कुणी दासी दिल्याचा उल्लेख आहे. अनुशाशन पर्वात सुदर्शनची कथा आहे, तो त्याच्या भार्येला तसा उपदेश करतो आणि जेव्हा त्याच्या अपरोक्ष तसं घडतं तेव्हा स्वतःला धन्य झालो असं म्हणतो व बायकोची पतिव्रताधर्माबद्दल पाठ थोपटतो. अर्थात, हि चाल कालौघात बंद पडली, त्याचं उदाहरण म्हणजे, (शांतिपर्वात २६६) गौतमाच्या बायकोसोबत इंद्र संभोग करून गेला हे कळताच, त्याचा पुत्राला चिरकारीला तिचा वध करण्यास सांगतो. जमदग्नी च्या बायकोने - रेणुकेने फक्त चित्ररथ गंधर्वाकडे सकाम दृष्टीने पहिले तर त्याने लगेच परशुरामाला तिला ठार करण्यास सांगितले.
थोडक्यात, नीतिमत्ता, चाली - रूढी हळहळू बदलत गेल्या. म्हणजेच आज आपल्याला धार्मिक वाटणाऱ्या गोष्टी पूर्वी तश्याच होत्या वा पुढे त्या तश्याच राहतील असं मुळीच नाही.