What do you think?

रानभुली [Ranbhuli]
- GenresMarathi
Unknown Binding
About the author
G.N. Dandekar
41 books66 followersG.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.
He was honoured with a D.Litt degree by university of Pune.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 4 of 4 reviews
June 15, 2026
● पुस्तक –रानभुली
● लेखक – गो. नी. दाण्डेकर
● साहित्यप्रकार –कादंबरी
● पृष्ठसंख्या – १०२
● प्रकाशक – मृण्मयी प्रकाशन
● आवृत्ती – ०४ थी | ०१ ली - १९७८
● पुस्तक परिचय – विक्रम चौधरी
● मूल्य – १२५ रुपये
● मूल्यांकन - ⭐⭐⭐⭐
काही लेखक फक्त कथा लिहीत नाहीत, तर ते ज्या प्रदेशाबद्दल लिहीत असतात तो प्रदेश, तिथली संस्कृती, त्याचा इतिहास आणि तिथल्या माणसांच्या जीवनाचे सूक्ष्म अंग, त्यांचे भावविश्व त्यांच्या शब्दांतून जिवंत करतात. निसर्गऋषी गोनीदा त्यातलेच एक.. त्यांच्या प्रत्येक कादंबरीत लोकजीवन आहे, गड-किल्ले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या भूमीवर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत..
रानभुली ही कथा आहे मनीची. रायगडाच्या परिसरात वाढलेली, निसर्गाच्या सान्निध्यात लहानाची मोठी झालेली, निरागस आणि रानवेडी अशी मनी. तिचं आयुष्य रायगडाभोवती फिरतं. तिला त्या डोंगरदऱ्या, झाडं, वारे, पक्षी, पायवाटा आणि गडाचा प्रत्येक दगड आपला वाटतो. रायगड तिच्यासाठी केवळ ऐतिहासिक वारसा नाही; तो तिच्या अस्तित्वाचा एक भाग आहे.
मनीची ही कथा वरवर पाहता अत्यंत साधी वाटते. परंतु तिच्या साधेपणातच तिची खरी ताकद दडलेली आहे.
मनी ही या कादंबरीचं मध्यवर्ती पात्र आहे. ती नाट्यमय नाही, असामान्य नाही, कोणत्याही मोठ्या सामाजिक क्रांतीची वाहक नाही. ती अगदी साधी आहे. रायगडाच्या कुशीत धनगराच्या घरी जन्मलेली ही मनी जेव्हा तिच्या मुळांपासून लांब केली जाते, तेव्हा तिच्या मनोविश्वात काय काय घडत जातं, याची ही संवेदनशील कथा आहे.
मनीची निरागसता, तिचं निसर्गावरचं प्रेम, तिच्या जाणिवा आणि तिच्या मनातल्या 'तिच्या गडाबद्दलची' अनावर ओढ वाचकाला भिडत राहते. रायगडावर जन्मलेल्या मनीचं तिथल्या मातीशी, प्राण्यांशी, निसर्गाशी आणि आपल्या माणसांशी असलेलं नातं हे फार सूचक वाटतं. गाव सोडून शहरात राहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या मनात परतून घरी जाण्याची जी तीव्र इच्छा असते, त्याचं प्रतीक म्हणजे मनी. रानभुली वाचताना आपण सतत एका कोवळ्या मनाच्या आत चालणारा संघर्ष, त्याची तगमग आणि व्यक्तीस्वातंत्र्यसाठी असलेली कुतरओढ अनुभवत राहतो.
या कादंबरीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिच्यातील स्त्रीमनाचं चित्रण. मनीची वेदना ही केवळ एका व्यक्तीची नाही. लग्नानंतर स्वतःचं घर, माणसं आणि परिचित जग मागे सोडून नव्या आयुष्यात प्रवेश करणाऱ्या असंख्य स्त्रियांची ही प्रातिनिधिक कथा आहे. या कादंबरीची उजवी बाजू म्हणजे गोनीदांनी मनीच्या मनात चालणाऱ्या संघर्षाचं केलेलं अत्यंत संवेदनशील चित्रण. अनेकदा आपण स्थलांतर, बदल किंवा प्रगती यांविषयी बोलतो, पण या बदलांमुळे मनावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करतो. मनीच्या माध्यमातून गोनीदांनी हा प्रश्न अधोरेखित केला आहे जो आजही तितकाच प्रस्तुत वाटतो. माणसं फक्त घर बदलत नाहीत तर ती आपली माती, आपल्या स्मृती, आपलं भावविश्व आणि अनेकदा स्वतःचाच एक भाग मागे सोडून येतात. अनेक स्त्रिया हा बदल स्वीकारतात, काही जुळवून घेतात, काही संघर्ष करतात. मनीच्या माध्यमातून या अनुभवाला एक हळवा आणि मानवी चेहरा मिळतो.
मनीच लग्न होतं आणि ती मुंबई सारख्या शहरात येते. मनीसाठी हा केवळ घर बदलण्याचा प्रश्न नसतो. ती ज्या भूमीत रुजली होती, त्यापासून ती दूर जाते. शहर तिला परकं वाटायला लागतं. तिथली गर्दी, धावपळ, कृत्रिमता आणि बंदिस्त जीवन तिला स्वीकारता येत नाही. तिचं शरीर शहरात राहतं; पण तिचं मन कायम रायगडाच्या कुशीत भटकत राहतं.
या कादंबरीची आणखी एक मोठी ताकद म्हणजे गोनीदांची भूल पाडणारी लेखनशैली.. त्यांनी केलेलं निसर्गवर्णन हे केवळ दृश्यात्मक राहत नाही, तर ते आपल्या संवेदना जागृत करतं. ते वाचताना वाऱ्याचा स्पर्श जाणवतो, पावसाचा सुगंध जाणवतो आणि डोंगरांच्या कुशीतली शांतता ऐकू येते. रायगड आणि तिथल्या परिसराचा वर्णन त्यांनी इतक्या जिवंतपणे केलं आहे की वाचकाला आपण त्या वातावरणाचा भाग आहोत असं वाटू लागतं..गोनीदांची प्रत्येक कादंबरी वाचताना त्यातला निसर्ग एका पात्राइतकाच प्रभावी वाटत रहातो.
ही कादंबरी वाचताना वारंवार एक प्रश्न मनात येतो—आपण ज्या गोष्टींना प्रगती म्हणतो, त्या खरंच सर्वांसाठी प्रगती असतात का? शहरात येणं, आधुनिक जीवन स्वीकारणं, सुविधा मिळवणं या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्यासाठी आपण काय गमावतो?
आजच्या काळात ‘रानभुली’ अधिक महत्त्वाची वाटते. कारण आज स्थलांतर पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी लोक गाव सोडून शहरात, देश सोडून परदेशात जात आहेत. या प्रवासात आर्थिक प्रगती मिळते; पण अनेकदा माणूस आपल्या मुळांपासून दूर जातो. अशा वेळी मनीची कथा आपल्या मनाला आरसा दाखवते.
तुम्हाला निसर्गकेंद्री साहित्य आवडत असेल, सह्याद्री आणि रायगडाविषयी जिव्हाळा असेल आणि मानवी भावविश्वाचा सूक्ष्म वेध घेणारं साहित्य वाचायला आवडत असेल, तर ‘रानभुली’ नक्की वाचा..
©पुस्तकायन

June 20, 2020
गोनीदांच्या मानसकन्येची, ‘मनी’ची ही आगळीवेगळी कथा, एक सुंदर कलाकृती म्हणजे ‘रानभुली’.”
या कथेत गोनीदांनी एका धनगर समाजातील रायगडावर आणि तिथल्या प्रत्येक कडेकपारीवर अतोनात प्रेम करणार्या भोळ्या-भाबड्या परंतू अतिशय धीट पर्वत कन्येची, मनीची ही कथा... गडाशी असणारं तिचं सुंदर नातं आणि त्या नात्यामध्ये अडसर होवू पाहणारं आजुबाजुचं जग यांतली कूतरओढ फार जीवघेणी आहे.
हि मनी म्हणजे गडावरची खडानखडा माहित असलेली एक पोर, कधीही रात्री अपरात्री गडावर कुठेही हि बागडत असायची आणि धीट तर इतकी कि काळ्याकुट्ट मिट्ट अंधारात गाईची साथ देणारी चिमुरडी, अन वाघराच्या तोंडी गेलेल्या वासराचे पाय ओढणारी शूर वीरांगना ...
जेव्हा आप्पांनी तिला विचारलं कि तुला गडावर भीती नाही का वाटत तू अशी कधीहि कुठेही बागडत असतेस तर मणी यावर उत्तरली कि कशाची भीती बाळगू माझ्यासोबत तर राजांचा 'गडपुरुष' असतो, तो समर्थ आहे माझी राखण करायला.
पण हिच मणी जेव्हा मुंबई शहरात, एका बकाल झोपडीत नवऱ्यासोबत अतिशय तोकड्या जागेत राहू लागते तेव्हा अगोदरची धीट मणी भित्री भागुबाई झालेली असते.

June 22, 2025
गडावर, गुराढोरांवर जीवापाड प्रेम करणारी मनी लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला गेली पण गडाच्या ओढीनं २-३ वेळा माघारी आली. मनी होती एक धनगराची पोर, गुरं राखणारी, रायगडाच्या कितीतरी अवघड वाटा एकटीनं चढउतरणारी.
लाडक्या वासराला सोडवण्यासाठी वाघाशी झुंज देणाऱ्या मनीला भीती म्हणजे काय माहितीच नाही. जखमी गायीला वर नेण्यासाठी मदत येईपर्यंत अंधाऱ्या रात्री ती एकटी साथ करत बसली. गडावरचा प्रत्येक दगड, प्रत्येक गवताचं पातं तिच्या ओळखीचं.
नवऱ्याला मुंबईला नोकरी मिळाली म्हणून रहायला गेली पण तिथल्या झोपडपट्टीची, गर्दीची, तिथे दिसणाऱ्या माणसाच्या विकृतीची तिला घृणा वाटली.
तिथे रहायची अजिबात इच्छा नसलेली मनी चालत गडाकडे निघाली तर? मुंबईत चालणारे धंदे आणि तिथल्या बिभत्स वास्तवाशी तिची गाठ पडली तर काय?
अश्या या डोंगरकन्येची गोष्ट लिहावी ती गोनीदांच्याच लेखणीनं.

January 8, 2020
The main character in this story loves the fortress, where she was born and raised, so much that she can't live anywhere else, even after her marriage and going to her husband's small house in Mumbai. The sequence of events at the end is contrived.
Displaying 1 - 4 of 4 reviews