इसवी सन १७७० चे दशक म्हणजे मराठा साम्राज्यातील राजकीदृष्ट्या सर्वाधिक कट कारस्थान आणि फंद फितुरीेचा काळ.. तरीही ह्या काळातील घटनांबद्दल मराठी जनता अनभिंन आहे.. लेखकाने हा काळ खूप रंजकपणे आपल्यासमोर उभा केलाय.. नाना फडणीस, राघोबा दादा, महादजी शिंदे, सखाराम बोकील, तुकोजी होळकर, गायकवाड, आनंदीबाई, पार्वतीबाई आणि बाकी सर्वच पात्रे त्यांच्यातील गुण दोषासह आपल्यासमोर जिवंत केली आहेत.. तुळजा, तात्या आणि उदाजी यांच्या पात्रातून त्या काळातील सामान्य जनतेतील मराठा साम्राज्याचे स्थान अधोरेखित केले आहे..
राघोबादादा चा पाठलाग, वडगाव मावळ च्या लढाईतील मराठ्यांचे नियोजन, त्याचे फौजेने केलेली अमंबजावणी ह्याचे खूप सुंदर चित्रण कांदबरी मध्ये केलेलं आहे..
इतिहासाची आवड असलेल्या वाचकांसाठी चुकवू नये अशी कादंबरी..