A story of 3 generations & their struggle to live a noble life by casting away incorrect traditions & customs followed by Brahmin society during 18th-19th century.
आभाळाचे गाणे
'क्षितीजावरती सीमारेषा कवेत घेणे । आभाळाचे गाणे । आभाळाचे गाणे ॥''
रवीन्द्रांचे मूळ गाव वाई. त्यांची नाळ वाईशी घट्ट जुळलेली होती. वाईला जायचे म्हणजे केवढा आनंद असायचा. पण हाच आनंद हिरावून घेतला गेला आपल्याच माणसाकडून आणि मग
जगी जरी सर्वज्ञ शहाणा, माझ्या घरचा मीच पाहुणा ।
म्हणत हा कवी मनात झुरत राहिला, अशाच गावासाठी झुरत असलेल्या कोण्या एकाची ही कहाणी. एका धरणामुळे सबंध गावाची झालेली वाताहत या कादंबरीत रेखाटली आहे.
An effective author of his generation, most of his books are biographies of main personalities who impacted life of common society in Maharashtra
रवीन्द्र सदाशिव भट... १७ सप्टेंबर १९३९ रोजी कृष्णाकाठी जन्मलेला एक मनस्वी कलावंत...!
उत्कृष्ट कादंबरीकार, अध्यात्माची ओढ असलेला एक साधक, संतसंस्कृतीचा अभ्यासक, हळुवार मनाचा कवी, समाजप्रबोधनासाठी तळमळणारा फर्डा वक्ता, बहुविध विषय हाताळणारा नाटककार, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माता, संगीताची उत्तम जाण असणारा गीतकार असं अष्टपैलु व्यक्तिमत्व म्हणजे रवीन्द्र भट!
'इंद्रायणीकाठी', 'सागरा प्राण तळमळला', 'भेदिले सूर्यमंडळा', 'भगीरथ' यासारखी कादंबरीमय चरित्रे लिहीत असताना रवीन्द्र भटांनी 'अरे संसार संसार', 'केल्याने होत आहे रे', 'अस्सा नवरा नको गं बाई' यांसारखी नाटकेही लिहिली.
मोगरा फुलला, कान्हियाने चोरी केली अशा भावकवितांप्रमाणेच 'खुर्ची' सारखा विडंबनात्मक काव्यप्रकारही यशस्वीपणे हाताळला. बाल कुमारांसाठी त्यांनी लिहिलेली संतचरित्रेही खूप गाजली. 'पंडिता रमाबाई', 'महाराष्ट्राची वीस वर्षे', 'लोकमाता' यांसारखे त्यांचे अनुबोधपट आजही आठवतात. 'कृष्णाकाठचा भुत्या', 'सारी पाऊले मातीचीच' अशासारखे ललित लेखनही त्यांनी केले.
'ते माझे घर' हा त्यांनी अगदी तरुण वयात निर्मिलेला चित्रपट त्यांना राष्ट्रपती पुरस्काराची राजमान्यता देऊन गेला.
समर्थ सेवा मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आदि अनेक संस्थांमधील त्यांचे कार्य आजही आदराने नमूद केले जाते. 'ॐ ज्ञानपीठ' तर त्यांनीच चालविलेले सांस्कृतिक व्यासपीठ. या माध्यमातून त्यांनी पत्नी कुमुदताईंच्या सहकार्याने देश विदेशात अनेक सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
His language, writing style has always mesmerized me in different ways, he has narrated a story of traditional brahmin family who settles in new village, after their abandonment from native place...Damodarpant, main character of the novel decides to rise against blind belief, wrong customs/traditions followed in the religion like untouchability, cast systems in Hinduism, his son Sadashiv follows the same path by taking part into freedom fight against british rule & his grandson by becoming a barrister of independent India. All their lives, with their family, they tried to help people & society in varied ways...which is referred as "the song of the sky".