Jump to ratings and reviews
Rate this book

Shivratra

Rate this book
शिवरात्र
१. श्री गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी
२. श्री गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य
३. गांधी हत्या आणि मी
४. खान अब्दुल गफारखान
५. मौलाना आझाद: एक स्मरण
६. अच्चुतराव पटवर्धनांच्या सहवासात एक दिवस
७. आधुनिक भारतीय राजकारणात मुसलमानांचा प्रश्न
८. मुसलमानांच्या विचारासाठी काही प्रश्न
९. बनतावालांच्या संदर्भात

186 pages, Unknown Binding

15 people are currently reading
202 people want to read

About the author

Narhar Kurundkar

35 books50 followers
Narhar Kurundkar (Marathi: नरहर कुरुंदकर) was a well-known thinker and critic in Maharashtra. Through his books in Marathi and through various lectures related to such varying disciplines as history, politics, dramaturgy, literary criticism, aesthetics, fine arts, he contributed to the cause of education and culture in Maharashtra. He offered original and unbiased incisive analysis of manifold challenges and complexities of contemporary social, political and cultural environment.

During his life time with lectures, writings and encouragement to young writers and poets Prof. Kurundkar instilled confidence within people of Marathwada. He provided thought leadership to various social and cultural activities. School of Art, schools of music, research center for history, Marathwada Vikas Andolan are some of the examples. Prof. Kurundkar had become synonym for the Socio-cultural movement of Marathawada. His untimely death had created a void in socio-cultural arena.

प्रा. कुरुंदकरांच्या लिखाणाची औपचारिक सुरवात १९५३ साली प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध होऊन झाली. त्यावेळी ते केवळ २१ वर्षाचे होते. त्यानंतर मराठवाडा दिवाळी अंकात शरदचंद्र चटर्जी यांच्या शेषप्रश्न या पुस्तकावर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे नवभारत, सत्यकथा अशा प्रस्थापित मासिकांमध्ये विविध विषयावर लेख प्रकशित होऊ लागले.
रिचर्डसची कला मीमांसा हे पहिले पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले. देशमुख आणि कंपनी च्या रा. ज. देशमुख यांच्या आग्रहाखातर प्रा. कुरुंदकर यांनी एक २०० पानांचा समीक्षणात्मक लेखसंग्रह करून द्यायचे कबुल केले. तो पुढे रूपवेध या नावाने प्रसिद्ध झाला. या नंतरही प्रा. कुरुंदकर यांचे अनेक लेखसंग्रह प्रकाशित झाले. लेखसंग्रहाबद्दल एका पत्रात प्रा. कुरुंदकर लिहितात,
"लेख सुटे सुटे प्रकाशित होतात. त्या त्या वेळी पार्श्वभूमीसह संपूर्ण विषय मांडावा लागतो. अशा वेळी संग्रह केला की ग्रंथभर पुनरुक्ती होत राहते".
ही पुनरुक्ती टाळणे हे लेखकाचे कर्तव्य आहे असे ते मानत. मधल्या काळात झालेल्या अभ्यासाने मतांमध्ये ही बदल होतो.
"जे माझे मत चूक आहे, हे मला पटले व मी त्या मताचा त्याग केला", अशी त्यागलेली मते/ विचार लेख संग्रहात प्रकाशित करण्याची प्रा. कुरुंदकर यांची तयारी नव्हती. ग्रंथ रूपाने लेख संग्रह प्रकाशित करताना ते मोठ्या प्रमाणात फेर लिखाण करून, जेथे शक्य असेल तेथे पुनरुक्ती टाळून, चुका सुधारून घेत असत. आपल्या पुस्तकाबद्दल एका पत्रात ते लिहितात,
" माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे."
ते पुढे लिहितात,
"पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे."

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
41 (69%)
4 stars
15 (25%)
3 stars
2 (3%)
2 stars
1 (1%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 5 of 5 reviews
Profile Image for Rohit Harip.
55 reviews6 followers
September 20, 2015
awesome book by true Rationlist mr.Narhar kurundkar. reading this book is the process of enlightening your self with original perspectives. Conflict between hindu and muslims is one of the grave threat for Indi's unity in 21st century and author tackle this issue very rationally and without the lossing the balance.
still he get succeded in expressing his thoughts gallantly
Profile Image for Akash Balwante.
104 reviews5 followers
September 11, 2021
महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर लिखित आणि महाराष्ट्र शासनाने गौरविलेले शिवरात्र हे विविध विषयांवरील राजकीय भाष्य होय.
पुस्तक 1970 पूर्वी लिहिलेल्या अनेक लेखांचा संग्रह आहे. लिहिलेले लेख हे पन्नासहून अधिक वर्ष लोटूनही आजच्या भारतातील राजकारणावर बहुतांशी लागू होतात.
पुस्तकाला मुख्यतः तीन भागात विभागले आहे आणि या तीन भागाला पुन्हा तीन भागात विभागल्या गेलेल्या अशा एकूण 9 लेखांचा हा संग्रह आहे.
पहिला लेख हा श्री गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी या संबंधी आहे. या दोन्ही व्यक्ती भिन्न विचारसरणीच्या होत्या हे आपणा सर्वांस ज्ञात आहेच आणि यांच्या दृष्टिकोनातून भारत कसा हवा या वर लेखकाने प्रकाश टाकला आहे.
महात्मा गांधी यांना भारताचा राष्ट्रपिता म्हणतात. गांधीनी जे काही फाळणी काळात कार्य केले किंवा त्यांच्या अहिंसा या पद्धतीला आम्ही मानीत नाहीत म्हणून गांधींजी राष्ट्रपिता होऊ शकत नाहीत असा विरोधी स्वर काही लोक आळवतात. एखादी व्यक्ती आपल्या वडिलांच्या मताशी सहमत नसते म्हणून त्याचे वडीलपद त्या मुलासाठी रद्दबादल होऊ शकत नाहीत तसेच गांधीजीही काही लोक त्यांच्याशी काही गोष्टीत सहमत नाहीत म्हणून त्यांचे महात्मा किंवा राष्ट्रपिता हे संबोधन ते काढून घेऊ शकत नाहीत. महात्मा गांधी हे अहिंसावादी होते किंवा ते स्वतःला हिंदू मानीत किंवा ते काहींच्या मते मुस्लिमधार्जिणे होते म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हंटले जात नाही तर त्यांनी अखिल देशपातळीवर स्वातंत्र्यासाठी सर्वांना एकत्र आणले या बद्दल त्यांना राष्ट्रपिता म्हणतात हे समजून घ्यावे लागेल.
दुसरा लेख हा गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्णाबद्दल आहे. गोळवलकर गुरुजी हे चातुर्वर्ण मानीत आणि त्यांचे याला समर्थन होते. पण भारतातील बहुजन जनतेचे या मुळे शोषण झाले हे ही खरे आहे. लेखकाने आपल्या परीने या लेखात मनुस्मृतीची चिकित्सा केली आहे.
तिसरा लेख गांधी हत्या आणि मी असा आहे. गांधी हत्या ही पूर्णपणे राजकीय हत्या होती. त्यामागे फक्त एक व्यक्ती नसून एक विचारधारा होती. नथुराम गोडसे हा काही लोकांसाठी हिरो ठरला. काहींनी महाराष्ट्राला यासाठी दोष दिला पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की साने गुरुजी असोत वा विनोबा भावे हे ही महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचेच होते. त्यामुळे गांधी हत्येनंन्तर पुण्यात ब्राह्मणाच्या ज्या कत्तली झाल्या हे निंदनीय होते. गांधीजी आणि नथुराम गोडसे दोघेही देशभक्त होते याबाबतीत दुमत नाही पण त्यामुळे गांधी हत्या ही गांधीवध म्हणता येणार नाही.
चौथा लेख हा सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांच्या बद्दल आहे. पेशावर इथल्या पठाणांना एकत्र आणून गांधी सारखे कार्य वायव्य प्रांतात करणाऱ्या आणि पाकिस्तान मध्ये देशद्रोही ठरवल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे जीवन चरित्र थोडक्यात उलगडले आहे.
पाचवा लेख हा मौलाना आझाद विषयी आहे. मक्का इथे मौलवी घराण्यात जन्मलेले मौलाना हे मुस्लिम प्रवर्गात त्यांच्या मुक्त विचारधारेमुळे जास्त प्रसिद्ध नव्हते. फाळणीनंतर पाकिस्तानात न जाता ते भारतात शिक्षणमंत्री झाले परंतु प्रतिभा असूनही राजकारणात ते जास्त प्रगती करू शकले नाहीत. कुराणाचा नवीन अर्थ लावायचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला होता.
सहावा लेख त्यावेळी राजकारणातून निवृत्ती घेतलेले समाजवादी नेते अच्युतराव पटवर्धन यांच्याशी त्यांचे समाजवाद आणि त्याचे भारतीय राजकारणावर होत असलेले परिणाम याची चर्चा आहे.
शेवटचे तीन लेख हे आधुनिक भारतीय राजकारणात मुस्लिमांचा प्रश्न, त्यांची इस्लाम विचारसरणी आणि त्यामुळे भारतीय संविधानावर होणार परिणाम या संबंधी आहे. श्री बनातवाला यांच्या वर शेवटच्या लेखामध्ये कठोर टीका केली आहे.
एकंदरीत पुस्तकात कट्टरतेचा मग ती हिंदू असो वा मुस्लिम या दोघांवरही टीका केली आहे. मागील काही वर्षात धर्मनिरपेक्षता या संज्ञेची व्याख्या बदलली आहे पण त्या काळात धर्मनिरपेक्षता काय होती आणि त्याची खरी समज आपल्याला या पुस्तकातून कळून येते.
Profile Image for Nikhil Asawadekar.
53 reviews5 followers
July 25, 2022
कुरूंदकरांचं मी वाचलेलं पहिलं पुस्तक. एका मित्राने आणि त्याच वेळेस एका चुलत बहिणीने recommend केलं आणि म्हटलं वाचुन बघुया, नाही आवडलं तर बद करू.
काळाच्या पुढे विचार करणारा माणूस.
साधारण ४५-५० वर्षांपूर्वीचं लेखन आहे पण वाचताना एकही ओळ “outdated” वाटत नाही ही कुरूंदकरांची ताकद आहे. एका खेपेत वाचून संपवावं असं हे पुस्तक नाही ह्यातील पानं आणि chapters आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपल्या राजकीय, सामाजिक श्रद्धा/ ताकदींना कुरूंदकर challenge करतात आणि तेही मुद्देसूद पद्धतीने... आपण कुणी मोठे विचारवंत आहोत असा कुठलाही बडेजाव न मिरविता!
संपूर्ण पुस्तकच जबरदस्त आहे पण “गांधी हत्या आणि मी”, “अच्युतराव पटवर्धनांच्या सहवासातील एक दिवस”, “मुसलमानांच्या विचारासाठी काही प्रश्न” हे लेख खूपच अफलातून जमून आलेले आहेत.
“हे माझं मत आहे आणि हे त्यावरचं माझं स्पष्टीकरण.. तुमचं (वाचकांचं) मत हेच असावं असा माझा आग्रह नाही कारण नवी अभ्यासपूर्ण माहिती समोर आली अगर तुम्ही दिलीत तर मी ही माझे मत बदलायला तयार आहे” अशी कुरूंदकरांची मुद्दे मांडण्याची पद्धत प्रचंड आवडली. प्रश्न आणि त्यावरची उत्तर मांडणी वाचून अशी माणसं सध्या एकवीसाव्या शतकात का नाहीत असं प्रत्येक chapter संपवताना वाटतं पण त्याचबरोबर हे ही वाटतं की सध्याच्या फडतूस कारणांनी भावना दुखवल्या जाण्याच्या युगात कुरूंदकर नाहीत हेच बरंय! समाजाने त्यांना स्वीकारलंच नसतं.. म्हणूनच की काय ५० वर्षांनी आपल्या डोक्यात पिंगा घालणाऱ्या प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची मांडणी कुरूंदकरांनी १९७० मध्येच करून ठेवलीये. ह्याच्या विचारशक्तीचा आणि बुद्धिवादाचा हेवा वाटावा असा माणूस! भन्नाट माणूस!
Profile Image for Aniket.
25 reviews
June 4, 2021
It's superb book which comments on delicate topics like Hindutva, futile efforts of minimising gap between Hindu and Muslims post independence by 3 folks and few questions to Indian Muslims. This book has written in 70s but the rational provided in it is still applies to current events.
2 reviews
January 6, 2019
nicely written book and a good example of objective and balanced analysis of a person or a situation.
Displaying 1 - 5 of 5 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.