पुस्तकाचे नाव- दिव्यस्पर्शी लेखक-धनंजय देशपांडे पुस्तक प्रकार-चरित्रात्मक कादंबरी प्रकाशन- प्रसाद प्रकाशन मूल्य- 225 पृष्ठ संख्या- 237
मला रात्री 1नंतर झोप लागली नाही असं फार क्वचितच होतं ,आज दिव्यस्पर्शी वाचून झाल्यावर माझी अवस्था काहीशी अशीच होती, मी त्या पुस्तकाच्या विचारातच होते. माणसं आपल्यातल्या सामान्यत्वाला असामान्यात्वात कसं बदलतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'दिव्यस्पर्शी'. जगविख्यात मसाजिस्ट,एक राजमान्य योगी ,एक स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्तव डॉ. राम भोसले यांचे चरित्र या पुस्तकात सांगितले आहे. लहानपणीच अनाथपण वाट्याला आल्यामुळे इतरांकडे आश्रयित म्हणून ते राहिले ,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले मसाजिस्टचे शिक्षण पूर्ण केले. पं.नेहरु, म.गांधी, स्टॅलिन, आयसेन हॉवर यांसारख्या जगातील अनेक मान्यवरांना त्यांनी मसाजने आराम दिला. साक्षात महावतार बाबाजी त्यांना गुरु म्हणून लाभले. बाबाजींच्या दिव्यस्पर्शाने त्यांना अतिंद्रीय शक्तींचा लाभ झाला आणि त्यांच्या दिव्यस्पर्शाने जगातील अनेकजण वेदनामुक्त झाले.
डॉ. भोसले यांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर ते कलेचे उपासक होते. प्रख्यात पखवाज वादक लयभास्कर पर्वतकर यांच्याकडून त्यांनी पखवाज वादनाचे धडे घेतले, अहमदजान थिरकवाॅं साहेबांकडून ते तबला तर अन्नपूर्णा देवींकडून ते सतार शिकले. बॅले नृत्य आणि कथ्थक नृत्य या नृत्यप्रकारांमध्ये ते पारंगत होते.
जीवनातील सर्वच लढ्यात ते शौर्याने लढले. 'अदभूताचिया घरा वीररस आला पाहूणेरा' असे त्यांचे जीवन चरित्र आहे. सह्याद्रीचे हे शिखर हिमालयापेक्षाही उंच आहे असेच आपणांस हे चरित्र वाचून वाटेल,असे हे अत्यंत प्रेरणादायी पुस्तक नक्की वाचावे हेच आत्मनिवेदन.
आवडलेली काही वाक्य: कुशल हात,सद् भावना आणि ज्ञान या त्रयीच्या हाती शस्त्र आले तर जीव वाचवता येतो.. आणि अविवेक ,अविचार ,भावनावशता या त्रयीच्या हाती शस्त्र आले तर जीव घेता येतो
मानवी शरीर हे ईश्वराने एखाद्या सतारीसारखं निर्माण केलं आहे आणि आपण जर त्या शरीरातल्या वेगवेगळ्या तारांना छेडू शकलो तर दु:ख आणि वेदना नावाची गोष्टच जगात राहणार नाही.
मन आणि शरीर, हृदय आणि शरीर हे काय दोन वेगळे भाग आहेत का? एक बिंब तर दुसर प्रतिबिंब आहे ,एक सागर आहे तर दुसरे लहर म्हणून तर एक आंदोलित झाले की त्यांचे तरंग दुसर्यावर उमटतात ,ते तरंग दु:खदायी झाले की वेदनेमध्ये आणि शारीरिक दुखण्यात परावर्तित होतात.
अनुभवाचा क्षण संपला की तो क्षण स्मृतिमध्ये परिवर्तित होतो पण साक्षात्कार म्हणजे अनुभवातला गाभा बोधाच्या रूपाने हृदयात प्रकट होणे.
चैतन्याच्या ठिकाणी तर बोधमयता असते जीवनात मोठं व्हायचे तीन मार्ग आहेत. एकतर तुम्ही असामान्य व्हा किंवा असामान्यांच्या सहवासात या किंवा सामान्यांमधलं असामान्यत्व टिपायला शिका. गायत्री😇
This book is based on the life of Dr. Ram Bhosale , the massage therapist who pioneered massage therapy in India during pre-independence era. The life of Dr. Bhosale is extremely inspirational. However the books contains spiritual , supernatural experiences in abundance which gets annoying to read. It would have been better if the book had focused more on the scientific approach rather than just describing many superstitious things.
The book helped me to know about the Divine healing of Dr. Ram Bhosale. And how he was blessed by many modern age Saints. Knowing Unknowingly, the book teaches the 2 basic principles of greatness: 1. Always Identify and appreciate the hidden talent in the common man 2. Either do the great things or be with great people always