Hool (Rumours), the second part of the Changdeo tetralogy, presents on entirely new social milieu, unique on account of its historical background and religious setting in a small and arid country town. Here the people are sharply divided by well-defined communities - newly converted christians and demoralised muslims, prosperous Marwaris and several other Hindu castes- a microcosm of the incredible plurality found everywhere in India.
Changdeo begins his teaching career here in a college run by christian american mission. The monumental cross overlooking the entire campus is very symbolic of his genuine admiration for the humanitarian values of christianity, as he too bears his own cross of striving to live in the disconnected society ground. Many things are required to fill up the empty space of an alien young bachelor's life - find modest accommodation, learn the secrets of the new profession in the commericalised educational system, teach high values of literature in the rowdy unruly packed classroom, cultivate new friends and a brief encounter with a disturbingly beautiful girl wearing silver cross. His death- wish is overcame by the desire to live intensely.
Bhalchandra Vanaji Nemade (born 1938) is a Marathi writer from Maharashtra, India. He is famous for his books Hindu and Kosala. Also he is known for his novel Hindu jagnyachi samrudhha adgal. He is a recipient of the civilian honour of Padma Shri (2011) and the Jnanpith Award (2014).
बिढार चा पुढचा पार्ट म्हणजे हूल! बिढारमुळे आपल्या अपेक्षा खूप वाढल्या असतात त्या सगळ्या अपेक्षा हूल पूर्ण करतं. हूल फिक्शनल असूनही खूप प्रॅक्टिकल/रिऍलिस्टिक आहे हीच त्याची खरी ताकद म्हणावी लागेल. भालचंद्र नेमाडे म्हणजे खरंच ग्रेट माणूस! चांगदेव पाटील तुम्हाला बिढार मध्ये जेवढा आवडला त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त हूल मध्ये आवडेल ह्यात शंका नाही!!
हूल म्हणजे चकवा किंवा फसवणे, तर चांगदेवने मृत्यूला हूल देऊन एका छोटया शहरात स्थलांतर करतो म्हणजेच त्याने मुंबईमधल्या बकाल जीवणाला अगदी मृत्यूला सुध्दा हूल दिली आणि तो मुंबईतून एका छोटया शहरात स्थलांतर करतो, अगदी नव्या दृष्टीने कात टाकून, त्याचं जुनं दरिद्री जीवन, त्यामुळे आलेलं नैराश्य, तसेच सगळं जूनं मित्रमंडळ वगैरे सगळं मागे सोडून देतो..... त्या जुण्या बिढारचं विसर्जन करतो आणि नव्या अशा-आकांक्षा सह नव्या शहरात प्रवेशतो.
पण या नव्या शहरातहि त्याचा सगळीकडे स्वप्नभंग होऊ लागतो. त्याची सुरवात त्याच्या घर शोधण्यापासून होते, ६ महिने शोधाशोध करून हि त्याला घर मिळत नाही कारण तो कारा असतो आणि ज्या महाविद्यालयात तो प्राध्यापक असतो तिथं, तिथली मुलं, सहकारीवर्ग फार भयानक अनुभव देतात. एका एका वर्गात शेकड्यानी विद्यार्थी असतात नव्हे कोंबलेले असतात, अगदी मेंढरासारखे. हे विद्यार्थीही दोन दोन वेळा नापास होऊन केवळ शिष्यवृत्ती लाटायला येत असतात. मग ही टारगट पोरं वर्गात धड शिकवूही देत नाहीत, त्यातच, कॉलेजमधील राजकरण जे सगळीकडेच असतं त्याचा त्याला त्रास होऊ लागतो. मग त्यातुन शिक्षणाचं बाजारीकरण वगैरे पाहून त्याला पुन्हा नैराश्य येऊ लागतं. चांगदेवला इथं समजतं कि एकूण आयुष्य हे बराच संघर्ष अन तडजोडी करूनच जगलं पाहिजे. तसंच, इथं त्याला गरिबी, गरिबीमुळं होणारी धर्मांतरं, या धर्मांतराला बाहेरून मिळणारी मदत वगैरेही गोष्टीही त्याला अस्वथ्य करतात. जेवायला बोलावून विमा माथी मारणारे त्याचे वरिष्ठ सहकारी हि भेटतात.
थोडक्यात, त्याला त्याच्या एकूण आयुष्याच्या कल्पनेला हूल मिळालेली असते.
चांगदेव हट्टी, अहंकारी, अत्यंत लहरी, तुसडा तरीही संवेदनशील तरुण आहे. त्याला स्वतःचे असे काही विचार आहेत. पण एकूण तो आयुष्याच्या बाबतीत गोंधळलेला आहे, पुढे काय करायचं यावर तो काहीच विचार करत नाही. तो भिडस्त, संतापी आहे. त्याला परिणामांची पर्वा नाही. कुठेच हिशोबी, नाटकी वागत नाही. खोली मिळवून दिली नाही म्हणून पवारवर चिडणारा चांगदेव, वर्गात वात्रट मुलांना बदडणारा चांगदेव वा पारूशी हळुवार वागणारा चांगदेव… तो कुठल्याही पठडीतील नाही… सामान्य तरूनाप्रमाणे तो वागतो, वास्तववादी जगतो.
हूल कथा ...
चांगदेव एका टुकार लॉजवर राहत असतो, त्याच्या रूमला तर धड छप्परही हि नीट नसत. पूर्ण गावात पाण्याचं भयंकर दुर्भिक्ष्य असतं. त्यामुळं मूलं बरेच दिवस स्नान करायचे नाहीत वर्गात, त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असायची. याच लॉजवर त्याला गायकवाड भेटतो, ज्याच्याकडे पैसा तर खूप असतो पण त्याच्या शरीरसुखासाठी पोरगी भेटत नाही. तो सतत त्याच विचारात अन प्रयत्नात गढलेला असतो, जे कधी सफल ही होत नाही.
चांगदेवचे सहकारी मित्र प्राध्यापक पवार यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी त्याचा घरोबा वाढतो. हे पवारही कारे असतात. त्यांच्याही आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात अशाच अडचणी असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सतत मुली आणि ‘काम’विषय येत असतात. त्यात शिकवण्या घेणारे झोपे हे तर ह्या सगळ्या प्रकरणात मास्टरी केलेले असतात. ते त्यांना याबाबतीत कशी पोरगी पटवली पाहिजे हे ते सांगत असतात. इथेच त्याला पारू सावनूर नावाची सुंदर ख्रिश्चन तरुणीबद्दल आकर्षण निर्माण होतं, जिच्याबद्धल त्यानं अनेकांकडून बरं-वाईट ऐकलेलं असतं. पण तरीही तो तिच्यात भावनिक दृष्टया अडकत जातो. तो या साठी काही करायला तयार असतो. पण नंतर त्यांच्यात दुरावाही निर्माण होतो.
शेवटी तो हे गावही सोडायचा निर्णय घेतो आणि सोडतो. परंतु नव्या ठिकाणीही त्याला जवळपास तसेच अनुभव येणार असाच वाटतं.
चांगदेव चतुष्ट्या मधील दुसरी कादंबरी. बिढार नंतरचा चांगदेवचा प्रवास यात आहे. एक वर्ष चांगदेव कुठल्याश्या -बहुतेक मराठवाड्यातल्या - जिल्ह्याच्या गावात कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम करतो. त्या संबंध वर्षाचं वर्णन म्हणजे ही कादंबरी. नावीन्याच्या शोधात चांगदेव उत्साहात मुंबई सोडतो पण या नवीन गावात चांगदेवचा चांगलाच भ्रमनिरास होतो. चांगदेवला ही जी हुलकावणी मिळते त्यामुळेच कदाचित कादंबरीला तसं नाव दिलं असेल. यामध्ये मग मुंबईसारख्या महानगरीय जीवनापासून लांब असणाऱ्या छोट्या गावातील जातीपाती, धार्मिक व्यवहार आहेत. कॉलेजातील - प्राध्यापकां मधलं, प्रचार्याच्या पदासाठीचं, जाती, धर्माचं- राजकारण आहे. प्राध्यापक म्हणून पहिल्यांदाच शिकवण्याचा चांगदेवचा अनुभव व त्यातील संघर्ष आहे. लग्न, मुली, प्रेमप्रकरणं याविषयी उहापोह आहे. आदर्शवादी चांगदेव या व्यावहारिक जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. लग्न, प्रेम याविषयी व्यवहारी विचार करणारी पारू सावनूर त्याला खटकते. (चांगदेव म्हणतो कि बिनधोक माझ्या कवेत येणाऱ्या पोरीलाच मी आपलं म्हणेन). कोल्हापूर, सांगली इथे नोकरीसाठी मुलाखती च्या गोष्टी सुद्धा यात आहेत.