"खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला? राजांनी की खानाने? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधापाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य." "स्थायी यश मिळणार्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय ... "
Narhar Kurundkar (Marathi: नरहर कुरुंदकर) was a well-known thinker and critic in Maharashtra. Through his books in Marathi and through various lectures related to such varying disciplines as history, politics, dramaturgy, literary criticism, aesthetics, fine arts, he contributed to the cause of education and culture in Maharashtra. He offered original and unbiased incisive analysis of manifold challenges and complexities of contemporary social, political and cultural environment.
During his life time with lectures, writings and encouragement to young writers and poets Prof. Kurundkar instilled confidence within people of Marathwada. He provided thought leadership to various social and cultural activities. School of Art, schools of music, research center for history, Marathwada Vikas Andolan are some of the examples. Prof. Kurundkar had become synonym for the Socio-cultural movement of Marathawada. His untimely death had created a void in socio-cultural arena.
प्रा. कुरुंदकरांच्या लिखाणाची औपचारिक सुरवात १९५३ साली प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध होऊन झाली. त्यावेळी ते केवळ २१ वर्षाचे होते. त्यानंतर मराठवाडा दिवाळी अंकात शरदचंद्र चटर्जी यांच्या शेषप्रश्न या पुस्तकावर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे नवभारत, सत्यकथा अशा प्रस्थापित मासिकांमध्ये विविध विषयावर लेख प्रकशित होऊ लागले. रिचर्डसची कला मीमांसा हे पहिले पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले. देशमुख आणि कंपनी च्या रा. ज. देशमुख यांच्या आग्रहाखातर प्रा. कुरुंदकर यांनी एक २०० पानांचा समीक्षणात्मक लेखसंग्रह करून द्यायचे कबुल केले. तो पुढे रूपवेध या नावाने प्रसिद्ध झाला. या नंतरही प्रा. कुरुंदकर यांचे अनेक लेखसंग्रह प्रकाशित झाले. लेखसंग्रहाबद्दल एका पत्रात प्रा. कुरुंदकर लिहितात, "लेख सुटे सुटे प्रकाशित होतात. त्या त्या वेळी पार्श्वभूमीसह संपूर्ण विषय मांडावा लागतो. अशा वेळी संग्रह केला की ग्रंथभर पुनरुक्ती होत राहते". ही पुनरुक्ती टाळणे हे लेखकाचे कर्तव्य आहे असे ते मानत. मधल्या काळात झालेल्या अभ्यासाने मतांमध्ये ही बदल होतो. "जे माझे मत चूक आहे, हे मला पटले व मी त्या मताचा त्याग केला", अशी त्यागलेली मते/ विचार लेख संग्रहात प्रकाशित करण्याची प्रा. कुरुंदकर यांची तयारी नव्हती. ग्रंथ रूपाने लेख संग्रह प्रकाशित करताना ते मोठ्या प्रमाणात फेर लिखाण करून, जेथे शक्य असेल तेथे पुनरुक्ती टाळून, चुका सुधारून घेत असत. आपल्या पुस्तकाबद्दल एका पत्रात ते लिहितात, " माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे." ते पुढे लिहितात, "पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे."
आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.
'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे.
या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे." "समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
एवढे परखड आणि वस्तुनिष्ठ विचार वाचल्यावर मी खरे सांगायचे तर एकदम थक्क झालो. कुठे हे कुरुंदकरांचे २० व्या शतकातले वस्तुनिष्ठ विचार? आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर? असो.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. पैकी पहिली अत्भुत घटना ते अफझलखानाचा वध ही मानतात. तर या पहिल्या अत्भुत घटनेआधीची २९ वर्षे ही नाट्यशून्यतेची होती हेही ते परखडपणे दाखवून देतात. शिवाय "छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे" अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.
"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही" असे सांगताना कुरुंदकर पुढे ते सप्रमाणही वाचकाला समजावून देखील देतात. आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
वतनदारांविरुद्धचा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खूप कठीण लढा होता. कारण हे वतनदार म्हणजे नुसते त्यांच्याच धर्माची माणसे नव्हती तर नातेवाईक, सगे-सोयरसंबंधातील माणसे होती. प्रश्न दोन : उत्तर एक या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात "शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे" शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात - "परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"
एक अनोखी घटना या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात - "औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजीसारखा असामान्य नेता दिवंगत झालेला होता. ......" जदुनाथ सरकारांचा दाखलाही कुरुंदकर देतात की "औरंगजेब लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता!" "साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी आहे"
पान क्र. २२ वर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना युवावस्थेत राज्यनिर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिजामातेने रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या असतील. विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत ऐकली असेल. दादोजी कोंडदेवांचे शासनचातुर्य पाहिले असेल. ज्ञानेश्वर-नामदेव साधुसंतांपासून प्रेरणा घेतली असेल. असे अनेक तर्क आहेत."पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्यापैकी एकालाच प्रेरणा का मिळते, इतरांना का मिळत नाही, याचे समाधानकारक उत्तर कोण, कसे देणार?" असा तर्कशुद्ध प्रश्नही कुरुंदकर उपस्थित करतात.
अफझलखान वधाचा वेध घेताना अफझल खान हा वाईचा सुभेदार होता तेव्हा शिवाजीचा नायनाट हे सुभ्याचा सुभेदार या नात्याने अफझलखानानेच करणे अपेक्षित होते. त्यासाठी आदिलशाही दरबारात शिवाजीचा नाश करण्याचा त्याने विडा उचलण्याची गरज नव्हती व ही केवळ कपोलकल्पित भाकडकथा आहे हेही कुरुंदकर वस्तुनिष्ठतेने निदर्शनास आणून देतात.
त्यानंतर सिद्दी जोहरचा वेढा , शाहिस्तेखानाला अचानक लाल महालात घुसून अचंभित करणे, औरंगजेबाच्या कैदेत असताना दिल्लीहून पलायन या घटनांतून शिवाजी महाराज हे केवळ धाडसीच नव्हते तर कल्पक देखील होते याकडेही कुरुंदकर लक्ष वेधतात. शत्रूच्या नेमक्या वर्मावर घाव कसा घालावा हे शिवाजी महाराजांना अवगत होते.
छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात - " २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे"
गडांची डागडुजी व उभारणी याचबरोबर आरमाराकडे लक्ष हाही शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन कुरुंदकर दाखवतात. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांना धडकी भरवली होती. पुढील काळात मराठ्यांनी या आरमाराचा वापर केला असता तर कदाचित इंग्रज देशावर राज्यकर्ता झाला नसता. पुढे खुद्द नानासाहेब पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावल्याचेही कुरुंदकर मोठ्या व्यथित मनाने लिहिताना दिसतात.
जनतेचे प्रेम शिवाजी महाराजांनी कसे मिळवले? याच्या मुख्य कारणांचा परामर्श घेताना कुरुंदकर म्हणतात - "शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे" याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य शिवाजीने निर्माण केले, हाही उल्लेख महत्त्वाचा आहे. सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले ( माझ्या मते अनावश्यक ) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. मी करुन देत असलेल्या पुस्तकाच्या परिचयाचा नव्हे. तेव्हा एवढे सोडले तर बाकीच्या पुस्तकात कुरुंदकरांनी जे विवेचन केले आहे ते खरेच अफलातून आहे.
काही मित्रांनी दादोजी व रामदास यांच्याबद्दल असे का लिहिले याबद्दल विचारणा केली म्हणून थोडक्यात काही लिंक्स देतो आहे. मटात काही संशोधकांची चर्चा झाली त्यातून यावर प्रकाश पडेल. गजानन मेहेंदळे यांची मटातील मुलाखत http://maharashtratimes.indiatimes.co...
छत्रपति शिवाजी महाराजांनी गरीब रयतेला वतनदारांच्या जाचातून मुक्त केले यातच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य सामावले आहे असे वाचकाच्या लक्षात आणून देण्यास कुरुंदकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनी केवळ छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची अंमलबजावणी केली तर ते कृत्य खरे शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारे ठरेल.
नरहर कुरुंदकर यांचे हे छोटेसे पुस्तक वाचनीय तर आहेच पण छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्या प्रत्येक मराठी घरात असावेच असे आहे. शिवाय ऐतिहासिक संदर्भासाठीदेखील हे छोटेसे पुस्तक खूप मोठे काम करते.
नरहर कुरुंदकर माझे आवडते लेखक. व्यापक विचारदृष्टी त्यांच्याकडे पाहावी. अवघ्या ६० पानात त्यांनी शिवाजीराजांची थोरवी सांगितली आहे. कुठल्याही रोमांचकारी चित्रपटाची पटकथा होईल अश्या घटनांना वगळून, शिवाजी महाराजांचा धोरणीपणा, मुत्सद्देगिरी ह्याची महती त्यांनी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सांगितली आहे.
इतिहासाचा विचार करताना त्यातील व्यक्तींना देवत्व बहाल न केल्यास तत्कालीन समाजाची चांगली ओळख होऊ शकते. शिवाजीराजांच्या काळातील समाज कसा होता, विविध राजेशाह्यांचे एकमेकांशी संबंध कसे होते त्यातून वाट काढत, आपले राज्य उभे करताना त्यांनी कशी पावले उचलली हे ह्या पुस्तकातून उलगडते. अठरापगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन राज्य निर्माण करताना, लोकांच्या मनात हे आपले राज्य आहे ही भावना निर्माण करण्यात त्यांना आलेलं यश कमाल आहे हे खरं.
आग्र्याहून सुटका ह्या प्रसंगाविषयी बोलताना कुरुंदकर एक महत्वाचा मुद्दा मांडतात.शिवाजीराजे आग्र्याला असताना त्यांच्या मंत्रिमंडळाने कारभार चोख ठेवला. जनतेची त्यांना तितकीच मोलाची साथ होती. शिवाजी हा आपला राजा आहे हे मनामनांत मान्य असल्याशिवाय हे शक्य झाले नसते.
अफजलखानाचा वध, शायिस्तेखानाची बोटे कापणे, पावनखिंड आणि आग्र्याहून सुटका ह्या रोमांचकारी घटना थोड्याश्या बाजूला ठेवून शिवचरित्राविषयी समग्रपणे विचार करायचा झाल्यास हे पुस्तक त्यात मोलाची मदत करते.
शिवाजी महाराजांची खरी ओळख करून देणारं 60 पानांचं छोटेखानी पुस्तक.. शिवचरित्रासाठी इतर कोणतेही पुस्तक तुम्ही वाचा.. परंतु त्या पुस्तकानंतर हे छोटे पुस्तक जरूर वाचा. शिवाजी राजांकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल तुम्हांला. बाकी जास्त काही लिहीत नाही. ज्यांना या पुस्तकाचा अभिप्राय हवा असेल त्यांनी सागरने लिहिलेला अभिप्राय(review) प्रत्येकाने वाचावा.
A short, no-nonsense discussion on why Shivaji was such a remarkable personality and why he still rules the minds of Indians (not just Maharashtrians). This book contains the thoughts of Narhar Kurundkar on the various aspects of Shivaji’s rule and strategy. It describes certain remarkable events of his career and separates fact from fiction. He rightly describes Shivaji as not just an able general, but as a leader who was able to recognise the extraordinary talent of his colleagues, develop them and create a new rung of able administrators and generals and also lots of loyal and motivated footmen, which in turn created a belief created a belief in society about their independence and freedom. A must-read for anyone who wants to understand how and why Shivaji remains relevant four and a half centuries later.
another authentic book about The Shivaji. Kurundkar was a great marathi thinker. with very scientific thinking, Kurundkar has pointed great abilities and intelligent of the king.