मी व पत्नीने नुकतीच युरोप सहल केली (१९-६-९८ ते १६-७-९८). जर्मनीत आम्ही १६ दिवस होतो. हिटलर संबंधातल्या अनेक स्थळांचे निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली. अॅडॉल्फचा निवास होता त्या डोंगरमाथ्यावरील साल्झबर्ग खेड्याच्या आताच्या स्थितीची व ‘बर्गहॉफ’ ची काही छायाचित्रे या पुस्तकात त्यामुळे समाविष्ट केली आहेत. - वि. ग. कानिटकर