Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.
काही पुस्तकं पावसासारखी असतात. मोठमोठ्या सरींनी वाचताना ती चिंब तर करतातच पण जमिनीच्या आत दडलेल्या बियांचे अंकूर करुन जातात, पुढे जाऊन त्याची बहारदार व्रुक्ष होतात.
काही पुस्तकं हातात पडली की ती वाचकावर अशी काही जादू करतातं की तो पुर्वीचा मनुष्य रहातच नाही.
काही पुस्तकं मनात काही नवीनच सुर छेडतात नी मग ते सुर शेवटपर्यंत सोबत राहतात.
काही पुस्तकं मैफल रंगावी तशी रंगतात. मध्येच काही वाक्य एवढ्या कसोटीने नी लकबीने लिहीली असतात की क्षणभर पुस्तक बंद करून वाचक मनापासुन दाद देतात.
महोत्सव तर या साऱ्यांचा मिलाप! वपु पुरोगामी आहेत, वपु विचारवंत आहेत, वपु अप्रतिम लेखक आहेत, वपु स्त्रीवादी आहेत, आणि ते एक महान लेखक आहेत. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की ही साहित्यसंपदा मराठीत कैद होऊन राहिली आहे.